आत्मक्रिया योग व सहज समाधि प्रबोधन: दत्तप्रबोधिनी मस्तिष्क मापन कार्यप्रणाली काय आहे ? SEO

Dattaprabodhinee Sevaa Trust’ was started in the year 2014 with a vision to create a non-profit humanitarian proficient area for spiritual people to actively engage them in soulistic existences.

ब्रम्ह अंतःकरण कसे बनते ? अनुकरणशील स्वतंत्र सद् मार्ग...!
घरातील देवघर व देव पंचायतन आधिष्ठान - २
नवनाथ ग्रंथ ( Navnath Bhaktisar ) पारायण कसे करावे ? ब्रम्हाण्डीय सामर्थ्य विश्लेषण...!
आत्मरत्न ( Soul Gem ) म्हणजे काय ? माणुस का भरकटतो ?
श्री गोरक्ष किमयागिरी प्रवाह नाथामृत सिद्धग्रंथ व कार्यसिद्धी...!
Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

रविवार, १७ मे, २०१५

दत्तप्रबोधिनी मस्तिष्क मापन कार्यप्रणाली काय आहे ?


मानवी शरीर स्थुल व सुक्ष्म रहस्यांनी भरलेले व भारलेले आहे. स्त्रीच्या गर्भधारणेतच अर्भकाची चैतन्यमय जीवात्म्याच्या आगमनाने प्रारब्ध व भवितव्यातील घडणाऱ्या कर्मांची सुक्ष्म रुपरेषा स्पष्ट होते. संबंधित सुक्ष्म अभिव्यक्ती जन्माला आल्यास त्याचे व्यक्तीगत कर्मसंचित ठरते जे भोगणे प्रत्येक मानवी देहास बंधनकारक असते. अशा कर्मांची गती प्रारंभिक स्वरुपात ओळखुन त्यातील मानसिक, बौद्धिक व आध्यात्मिक कमतरता पुर्णत्वात आणण्यासाठी त्या देहाचे मस्तिष्क मापन करण्यात येते. मस्तिष्क मापन हे बौद्धिक मापनपेक्षा ( I.Q.) २१ पटीने जास्त प्रभावकारक असते.


Blog.dattaprabodhinee.org

*दत्तप्रबोधिनी मस्तिष्क मापन काय आहे ?

जीवानात घडणाऱ्या अकल्पनिय घटना, अनपेक्षित स्वभाव व अनाकलनीय परिणाम मानवी शरीराचे अभिन्न अंग आहे. संबंधित व्यक्ती वय मर्यादा ५ ते ४८ गटातील मानवाचे मानसिक, शारीरिक, अर्थिक, सामाजिक व आध्यात्मिक स्थैर्य निर्विघ्न स्वरुपात प्रस्थापित होणे व आत्मसंधानातुन अंतरीक स्थैर्यात उत्तरोत्तर वाढ होणे यासाठी भविष्यात घडणाऱ्या दुर्दैवी घटना, परिणाम व अनिश्चिततेचा नाश होण्यासाठी मस्तिष्क मापनाद्वारे आत्मनियोजन करण्यात येते. दत्तप्रबोधिनी मस्तिष्क मापनात शैक्षणिक, व्यावसायिक, व्यक्तीमत्व, चारित्र्य व आध्यात्मिक जीवनाबद्दल अभ्यासपुर्ण संबंधित व्यक्तीची आत्मवृत्ती आधोरेखीत करण्यात येते. 

*दत्तप्रबोधिनी मस्तिष्क मापन कसे कार्य करते ?

बालकांसाठी : वय मर्यादा ५ ते १४
लहान मुलांसाठी : वय मर्यादा १५ ते २१ 
प्रौढ वर्गासाठी : वय मर्यादा २२ ते ४८

बालकांसाठी कार्यप्रणाली खालीलप्रमाणे :

बालकांना प्रार्थमिक स्तरावरच त्यांच्या भविष्यात येणाऱ्या त्रिविध तापांना अनुसरुन कुंडलीद्वारे संबंधित वयात होणाऱ्या त्रास निवारण हेतु तोडगे देण्यात येतात ज्यायोगे त्यांची सर्वांगीण प्रगती निर्विघ्न स्वरुपात होऊ शकेल. 

लहान मुलांसाठी कार्यप्रणाली खालीलप्रमाणे : 

मुलांची वर्तमान स्थितीतील बौद्धिक पातळी व जिज्ञासा योग्य स्तरावर प्रगतीशील होण्यासाठी पालकांची प्रार्थमिक स्वरुपात मानसिक तयारी करण्यात येते. ज्या बालकाचे अथवा मुलाचे मस्तिष्क मापन व संबंधित सुधार करावयाचा आहे ; त्यास कोणतीही पुर्व कल्पना दिली जात नाही. सर्व अंतरिक वस्तुस्थिती पालकांनाच देण्यात येते. मुलांच्या स्थुल देहाला अनुसरून त्यांचे सुक्ष्म शरीर आत्मनियोजनातुन घडवले जाते. 

अभ्यासपुर्ण पुर्वतयारीसाठी कुंडली अध्ययन, हस्ताक्षर लिखाणे, दिनचर्या, संगत, आत्मिक कल व त्यायोगे उपजत कला ई. याद्वारे मस्तिष्क मापन करण्यात येते. संबंधित पुर्वतयारी अनुसरुन उज्वल भवितव्याच्या उभारणी हेतु कुंडलीतील दोष, स्वभाव, व्यक्तिमत्व व चारित्र्य हे आध्यात्मिक साधनेद्वारा संघटीत करण्यात येते.

प्रौढ वर्गासाठी कार्यप्रणाली खालीलप्रमाणे :

स्पर्धात्मक जीवनात टिकाव लागण्याहेतुने आपण अशाप्रकारे स्वतः ओळखावं व त्यायोगे आपली आवड व व्यवसाय अथवा नोकरी करावी हे महत्त्वाचे आहे. या वयातील लोकांना मस्तिष्क मापनाचे मार्गदर्शन स्वतःलाच घ्यावे लागते. आपल्या अंतरिक गुण दोषांना सुधारुन अल्पावधीतच जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणले जाते. संबंधित गुण दोषाचे निदान त्या व्यक्तिच्या सुक्ष्म देहाद्वारे करण्यात येते. 

अभ्यासपुर्ण पुर्वतयारीसाठी कुंडली अध्ययन, स्वतःची सही करण्याची पद्धत, दैनंदिन मनावस्था, संगत व आत्मिक कल व त्यायोगे उपजत कला ई. याद्वारे मस्तिष्क मापन करण्यात येते. संबंधित पुर्वतयारी अनुसरुन आध्यात्मिक स्तरावर कार्यक्षमता संघटीत करण्यात येते.

दत्तप्रबोधिनी मस्तिष्क मापनाच्या कार्यप्रणाली बद्दल अधिक सविस्तर माहीतीसाठी खालीलप्रमाणे संपर्क करावा.

श्री. कुलदिप निकम : 9619011227

आभार : दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Enter your email address:

Delivered by FeedBurner

लोकप्रिय पोस्ट

स्वामीसभासद नोंदणी प्रार्थमिक अर्ज