श्री स्वामी समर्थ योग व गहन आध्यात्मिक मार्गदर्शन: सद्गुरु श्री जंगली महाराज SEO

 स्वामी साधक सदस्यता घेऊन "दत्तप्रबोधिनीकर" व्हा...!

ब्रम्ह अंतःकरण कसे बनते ? अनुकरणशील स्वतंत्र सद् मार्ग...!
घरातील देवघर व देव पंचायतन आधिष्ठान - २
नवनाथ ग्रंथ ( Navnath Bhaktisar ) पारायण कसे करावे ? ब्रम्हाण्डीय सामर्थ्य विश्लेषण...!
आत्मरत्न ( Soul Gem ) म्हणजे काय ? माणुस का भरकटतो ?
श्री गोरक्ष किमयागिरी प्रवाह नाथामृत सिद्धग्रंथ व कार्यसिद्धी...!
Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu
LIVE सुरु असलेले वाचन
चालु आठवड्यातील वाचलेली निवडक लिखाणे
चालु महिन्यातील वाचलेली निवडक लिखाणे

सद्गुरु श्री जंगली महाराज


महाराज हे योगातील अधिकारी पुरुष होते.पुण्यातील काही सुप्रसिद्ध गोष्टींपैकी एक आहे श्री  सद्गुरु जंगली महाराजांचे मंदिर. शहरातील एक मुख्य रस्ता म्हणजे जंगली महाराज रस्ता. या रस्त्यावरच जंगली महाराजांचे मंदिर आहे. सप्तचक्रांसह दाखवलेले हे जंगली महाराजांचे भव्य तैलचित्र आहे.

श्री सद्गुरु जंगली महाराजांचा जन्म १८०३ मध्ये बडोदे येथील झाशीच्या महाराणी लक्ष्मीबाई यांच्या तांबे घराण्याशी संबंधित असलेल्या जहागीरदार घराण्यात झाला. लहानपणापासूनच त्यांना व्यायामाची आवड होती. १९५७च्या स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी सैनिक म्हणुन काम केले. नदीतीरावर असलेल्या शंकराच्या मंदिरात सकाळी ५-६ तास ध्यान करीत नंतर भिक्षा मागुन नदीच्या वाळवंटात भोजन करीत. कृष्णेला पुर आला म्हणजे त्यावर घोंगड टाकुन व त्यावर बसुन पैलतीरावर जात असत. तेथुन ते पुण्याला आले व भांबुर्ड्यात रोकडोबाचे मंदीर बांधुन तेथेच वास्तव्य केले. त्यांची योग्यता कळल्यावर लोकं त्यांना प्रतिदिन भोजन आणुन देत. दुपारी दासबोध, एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन करीत असत. त्यावेळी ते लोकांच्या शंकांचे निरसन करत असे. त्यांची किर्ती ऐकुन दुरदुरचे लोक धार्मिक विषयावर त्यांच्याशी संवाद साधणेहेतु येत. देहु येथे त्यांनी एक धर्मशाळाही बांधली आहे. महाराज हे योगातील अधिकारी पुरुष होते. त्याबाबतीत त्यांनी पुष्कळदा चमत्कारही केलेत. प्रतिवर्षी दासनवमीस ते सज्जनगडास जात असत. आळंदीचे नृसिंह सरस्वती स्वामीं व महाराजांचे स्नेहसंबंध होते. त्यामुळे नृसिह सरस्वती स्वामी पुणे येथे येवून महिना महिना महाराजांच्या जवळ राहात असत.

चैत्र शुद्ध चतुर्दशीस  शके १८१४ दि. ४/४/१८९० या दिवशी सायंकाळी ५.३० वा, महाराज समाधिस्त झाले.

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती

स्वामीसभासद नोंदणी प्रार्थमिक अर्ज

GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती