संसारीक लोकांसाठी अनुभवसिद्ध व सोपी मानस पुजा - ३ ( Easy Meditation - 3 ) - Works Quikly


स्थुल अन्न आपण ग्रहण करतो अर्थात सात्त्विक, राजसी किंवा तामसी...! ज्याअर्थी आपण स्थुल देह पोषण हेतु स्थुल अन्न आपल्या अन्नमय कोषाद्वारे ग्रहण करतो. त्याच प्रमाणे अजुन उर्वरित चार कोष असलेले आपल्या सुक्ष्म देहाला आपण विसरतो.

आपल्या शरीराचे पोषण होणे हेतु आपण सकाळपासुन रात्रीपर्यंत, निद्रा अवस्था गाठण्यापुर्वी अन्नपाणी ग्रहण करत असतो. कोणी तामसी अन्न तर कोणी सात्विक तर कोणी राजसी आहार घेत असतात. या आहारातुनच देहाचे निहीत कार्य चालायमान होते.


आपल्या शरीरातील पंचकोष रचना खालीलप्रमाणे...

 

  • १. अन्नमय कोष - स्थुल अन्नपाणी ग्रहण करणें हेतु.
  • २. प्राणमय कोष - सोहं  हंसात्मक प्राणशक्ती ग्रहण करणें हेतु.
  • ३. मनोमय कोष - सद्बुद्धीग्रहण करणें हेतु.
  • ४. ज्ञानमय/विज्ञानमय  कोष - मन काया वाचा स्थिरता ग्रहण करणें हेतु.
  • ५. आनंदमय कोष - आत्मिक व परमात्मिक आनंद लुटणे हेतु.

आज तिसरी स्वयं अनुभवसिद्ध साधनेचा प्रपंच करत आहे. त्यापुर्वी या अधि प्रकाशित केलेल्या साधना...

१.  संसारीक लोकांसाठी अनुभवसिद्ध व सोपी साधना -१ 

२. संसारीक लोकांसाठी अनुभवसिद्ध व सोपी साधना - २


आणि वर्तमान...


३. संसारीक लोकांसाठी अनुभवसिद्ध व सोपी साधना - ३


या तिन्ही साधना एकत्र कराव्यात. निवडक धरसोड वृती करु नये. अपेक्षित आध्यात्मिक लाभ मिळणे हेतु तिन्ही साधना समजुन घेऊन आपल्या प्रवृत्तीसोबत सांगड बसवा. यथाशक्ति धारण करा. एक करुन दुसरी सोडली असं करु नये.


संसारीक लोकांसाठी अनुभवसिद्ध व सोपी साधना - ३ ही साधना अतिशय सोपी आहे. ही साधना समजणे हेतु, आपल्या देहात स्थित असलेल्या पंचकोषातील भेद ओळखण्यास सुरवात करणे अतिशय महत्त्वाचे...!



स्थुल अन्न आपण ग्रहण करतो अर्थात सात्त्विक, राजसी किंवा तामसी...! ज्याअर्थी आपण स्थुल देह पोषण हेतु स्थुल अन्न आपल्या अन्नमय कोषाद्वारे ग्रहण करतो. त्याच प्रमाणे अजुन उर्वरित चार कोष असलेले आपल्या सुक्ष्म देहाला आपण विसरतो.

महत्त्वाची टिप - 

पंचकोषात्मक साधना करणे हेतु आपण शुद्ध शाकाहारी आणि सद्गुरु नामस्मरणात रहायला हवे. सुरवातीला ही क्रिया समजणें हेतु थोडी कठीण वाटणे सहाजिकच आहे. पण एकदा सुनिश्चितपणे अंतरीक भेदाचे आकलन आल्यास, स्वतःला समजणे अतिशय सोपे होईल व जीवन धन्यता येईल.



साधना क्रमांक - ३ "धारणा"

संसारीक लोकांसाठी अनुभवसिद्ध व सोपी साधना - १ मध्ये विशद केल्याप्रमाणे, सुरवातीचे पंधरा दिवस साधनायुक्त धारणा ग्रहण करायला सुरवात करावी. या धारणा ग्रहण काळात संसारीक लोकांसाठी अनुभवसिद्ध व सोपी साधना - २ मध्ये उद्घोषित केल्याप्रमाणे दर ३ तासांनी नाम मंत्र नामस्मरण फक्त ३ मिनिटांसाठी करावेत.


यासोबत, आपण सकाळपासुन ते रात्रीपर्यंत जे अन्नपाणी ग्रहण करतो ते अनायासे अन्नमय कोषात जमा होते, दर तीन तासांनी जे नाममंत्र मानसिक जप करत आहोत त्याची प्राणशक्ती सहजच आपल्या ह्दयस्थ प्राणमय कोषात जमा होत आहे, महाराज आपल्याला दिवसभरात केलेल्या सत्कर्मातुन सद्बुद्धी देत आहेत जे आपल्या मतीस्थित मनोमय कोषात जमा होत आहे अशी प्रबळ धारणा स्वतःशी तयार करा.


उर्वरीत ज्ञानमय कोष आणि आनंदमय कोषाचा विलक्षण आणि अतिदुर्लभ अनुभव तुम्हाला काही कालांतराने अनुभवास येण्यास सुरवात होईल. ते सर्वस्वी तुमच्या ग्रहणशक्तीवर अवलंबून आहे.


कारण ज्ञानमय व आनंदमय कोष  हे दोन्ही कोष, सद्गुरु महाराजच परीचालीत करतात. आपल्या आत्मसमर्पणाला अनुसरुन ज्ञान व आनंदात विलक्षण वृद्धी करुन देतात.



ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...





0