मणिपुर चक्र ( Manipur Chakra ) साधना व रुद्र ध्यानयोग | श्री स्वामी समर्थ योग व गहन आध्यात्मिक मार्गदर्शन SEO
Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

दत्तप्रबोधिनी त्वरीत चँनेल सहयोगी होण्याची कृती - Kindly Follow Step By Step.

1. दत्तप्रबोधिनी प्रकाशनाचे " Community App " - Google playstore app download आणि install करावेत.

Translator

Tuesday, May 24, 2016

मणिपुर चक्र ( Manipur Chakra ) साधना व रुद्र ध्यानयोग


आपल्या देहस्थित एकूण ११ रुद्रांपैकी प्राण, अपान, समान, व्यान व उदान हे प्रमुख रुद्र आपले सुक्ष्मदेह सुत्रसंचलन हेतु कारणीभुत आहेत. आपल्या देहात एक विद्युत चुंबकीय तत्व अस्तित्वात असते. हे विद्युत चुंबकीय तत्व आपल्या देहांतर्गत असलेल्या चैतन्यशक्तीची प्रवाहवाहीनी आहे.

सर्व श्री दत्त क्षेत्रे व सद्गुरु महाराजांच्या समाधीची रोज सकाळी काकडा आरती घेण्याची पुरातन परंपरा आहे. हा काकडा करणे म्हणजे काय...?  याचा अभिप्राय समजावुन घेणे महत्त्वाचे आहे. श्री दत्तात्रेया स्वामीं महाराजांची काकडा आरती प्रभात काळी घेण्याची परंपरा आहे. प्रभातकाळीच का म्हणुन महाराजांची काकडा आरती केली जाते आणि त्याचा आपल्या शरीराशी आणि आत्मानुसंधानाशी काय संबंध आहे हे जाणुन घेतल्याशिवाय सद्गुरु कृपा होणे केवळ अशक्यच समजावेत.

देहांतर्गत असलेली अविद्या, वासना बीज, माया व तामसी वृत्तींना नाम रुद्राग्नित दहन करणे व महाराजांच्या दत्त स्वरुपाचे शाश्वत स्मरण होता येईल असे आत्मस्नेह जागृत करणे. याचा अर्थ काकडा करणे असा आहे. हा काकडा प्रभात काळीच केला जातो याचे तात्त्विक कारण असे की, मनुष्य जन्माला आल्यापासुन मरेपर्यंत झोपाच काढत असतो. सद्गुरु कृपायोगाला अनुसरुन जर त्याची झोप मोडलीच तर आत्म प्रभात होणार हे निश्चितच...! ही आत्मप्रभात होताना मनोमय कोषाचा चित्त संधानात्मक सदुपयोग करता दत्त ध्यानशिखर गाठता आले पाहीजे. हे ध्यानयोग सिद्ध होणे हेतु आपल्या देहांर्गत प्राण, अपान, समान, व्यान व उदान यांचा योग अथवा ऐकत्रीकरण करता आले पाहिजे.

देह स्थित श्वासात्मक ईडा व पिंगला नामक नाडी व्यतिरिक्त सुषुम्ना नाडी असते, हीच ब्रम्हांडीय नाडी अथवा नील सरस्वती असे संबोधले जाते. ह्या नाडीत आपल्या देहस्थित रुद्रांचा सद्गुरुकृपे प्रवाह होणे म्हणजे हंसः सोहं अर्पण करणे असा अर्थ होतो.


आपल्या देहस्थित एकूण ११ रुद्रांपैकी प्राण, अपान, समान, व्यान व उदान हे प्रमुख रुद्र आपले सुक्ष्मदेह सुत्रसंचलन हेतु कारणीभुत आहेत. आपल्या देहात एक विद्युत चुंबकीय तत्व अस्तित्वात असते. हे विद्युत चुंबकीय तत्व आपल्या देहांतर्गत असलेल्या चैतन्यशक्तीची प्रवाहवाहीनी आहे.

मणिपूर चक्र अतिरहस्यमय आणि शरीराचे केंद्रस्थान आहे. हंसः सोहं आजपाजपाचे परीचालन येथुनच कार्यान्वित होते. हंसः अजपाजप मानवाला जन्माला येण्यापुर्वीच गर्भधारण अवस्थेत असताना प्राप्त होतो. आपल्या श्वासांचे संक्रमण सुनिश्चित कालावधीपर्यंत सुव्यवस्थित राहाणे हेतु ब्रम्हदेवाने हंसःत्मक बीजाचे अंतर्भुत नियोजन रचले. ज्या वेळी सद्गुरुकृपा होऊन भाव पालटला जातो तेव्हा हंसःचे स्वरुप सोहं आत्मनियोजनावर सक्रिय होते. आणि मानव हळुहळु सिद्धावस्थेला प्राप्त होतो.

मणिपूर ह्या चक्राचे अतिसामर्थ्य आहे. जे आपली मानवी बुद्धी कधीच प्रकट करु शकत नाही. संबंधित काकडा, प्राणशक्ती व ईतर रुद्र, हंसः सोहं अजपाजप, देहातील अग्नि तत्वाचे नियंत्रण आणि आध्यात्मिक सिद्धावस्था वगैरे ही सर्व उद्घोषणे मणिपुर चक्र साधनेशी निगडीत आत्मतत्वे आहेत ज्याचा आपण पारदर्शक व प्रामाणिक वृत्तीने अभ्यास केला पाहीजे.

मणिपूर चक्र साधना

आत्मप्राप्तीहेतु ही प्रथम पायरी समजावी. मुलाधार व स्वाधिष्ठान हे चक्र साधन सत्वाची गंभीरता व सद्गुरु चरण प्राप्तीच्या सुदृढ निश्चयावर भर देतात तर मणिपुर चक्र सद्गुरु चरणांपर्यंत पोहोचण्याचा आत्म मार्ग प्रकाशित करते. आत्म प्रकाश येणे म्हणजेच अज्ञानरुपी अंधाराचे समुळ उच्चाटन होउन आत्मज्ञान व आत्मबळात वाढ होणे.

मणिपूर चक्र ब्रम्हांडाचे द्वार आहे. हे द्वार उघडणे हेतु मुलधार व स्वाधिष्ठानाची प्रबळ तत्वप्राप्ती असायला हवी. आपण जो सुर्य आकाशात बघत आहोत तेच ते मणिपुर चक्र जे आपल्या नाभीत स्थित आहे. या चक्रातील अग्नित्रिकोण अधोमुखी असल्यामुळेच आपण संसारात रमतो व ओझरता बैल होऊन मरतो.

साधना क्रिया व रुद्र ध्यानयोग

जेवणाच्या सरासरी २ तासानंतर सुरुवातीला २० मिनिटे रात्री झोपण्यापूर्वी आपल्या झोपण्याच्या ठिकाणी आसनस्थ होणे. सोबत एक भरलेल्या पाण्याचा ग्लास जवळ ठेवणे. नाथपंथातील प्रसिद्ध ध्यानयोग साधना - ३ मधे सांगितल्याप्रमाणे आपली चैतन्यावस्था धारण करा.

एकदाकी चैतन्य अवस्था धारण केल्यास आपले गुदद्वाराची जागा हळुहळु वरच्या दिशेला खेचण्याचा प्रयत्न करा. गूदद्वार आकूंचन करण्याच्या क्रियेला मुलबंध असे म्हणतात. मुलबंधचा चांगला अभ्यास करा. मुलबंध धारण करताना लिंगमुळाकडील जागा आपोआप वरच्या दिशेला ओढली जाते. कृपया मुलबंध साधनेवेळी सोडु नये.

समांतराने आपली नाभीसुद्धा आतल्या बाजुस खेचुन धरावी. नाभीबंध व मुलबंध यथाशक्ति धारण करा.

संबंधित मणिपुर चक्राची देवता रुद्र असल्याने यास्थानी आपण  आपल्या बंद डोळ्यांसमोर " श्री स्वामी समर्थ महाराज आसनाधिस्थ आहेत व सोबत दोन्ही बाजुस श्री काळभैरव व श्री बटुक भैरव ऊभे आहेत" अशी प्रबळ धारणा करा. धान धारणा करताना हाताची ज्ञानमुद्रा असावी.

ही प्रार्थमिक क्रीया आहे. धारणा करुन दम भरल्यास हळुहळु लक्ष श्वासावर केंद्रित करा. आपला मुलबंध हळुहळु सोडा व दोन्ही तळहात ऐकमेकांना घासुन कपाळाला स्पर्श करा. डोळे उघडा.संबंधित ध्यानसिद्धी अनुसरुन सविस्तर, अधिक सखोल, गहन व कुठेही उपलब्ध नसलेली विशेष आध्यात्मिक साधना माहीती लिंक स्वरुपात खालीलप्रमाणे उपलब्ध आहे. दिलेल्या विशेष लिंकचा पासवर्ड हटवण्यासाठी संस्थेत सक्रीय सभासद होणे आवश्यक आहे.

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

मणिपूर चक्र शुध्दी ( Manipur Chakra Purification ) व दैनंदिन आध्यात्म

पितृदोषांवर दुर्लभ माहीती व रहस्य उजागर...!

नवनाथ ग्रंथ पारायण कसे करावे ? ब्रम्हाण्डीय सामर्थ्य विश्लेषण...!


आत्मरत्न म्हणजे काय ? माणुस का भरकटतो ?


बाधिक वास्तुसाठी काय उपाययोजना कराल ? नवीन वास्तु विकत घेण्यापुर्वी काय खबरदारी घ्याल ?


त्राटक विद्या म्हणजे काय ? त्राटक विद्या व साधना महत्व...!


संपर्क : श्री. कुलदीप निकम
भ्रमणध्वनी : 9619011227

GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती

 स्वामीसभासद नोंदणी प्रार्थमिक अर्ज

DATTAPRABODHINEE MEMBERSHIP

त्रैमासिक / 3 Months

१००१ रु
 • वास्तु दोषांवर तोडगे
 • बाहेरील बाधेवर उपाय
 • घरातील सुधारित देवघर
 • पितृदोषांवर उपाय
 • अपेक्षित दैवी साधना
 • आँनलाईन समुदाय पाठिंबा
Subscribe

DATTAPRABODHINEE MEMBERSHIP

आजीवन / Life Time

२५,००० रु
 • वास्तु दोषांवर तोडगे
 • बाहेरील बाधेवर उपाय
 • घरातील सुधारित देवघर
 • अपेक्षित दैवी साधना
 • पारायण कृती मार्गदर्शन
 • कुलदैवत साधना
 • पितृदोष विशेष उपाय
 • दुर्लभ आध्यात्मिक माहिती
 • नोकरी, धंदा पुष्टी साधना
 • नाम साधन मार्गदर्शन
 • अंतरिक गुप्त साधना माहिती
 • श्री काळभैरव विशेष साधना
 • श्री यंत्र साधना
 • श्री शंकराचार्य मुलाखत
 • विशेष वैयक्तिक साधना मार्गदर्शन
 • प्रश्नांचे तात्काळ निरसन
 • उग्र साधना मार्गदर्शन
 • विशेष आत्मानुसंधान
 • योगशक्ती प्रकटीकरण
 • क्रीयायोग
 • नादब्रम्ह साधना
 • नाम प्राणायाम
 • गुप्त पीठ साधना
 • दत्तप्रबोधिनी लेखनात्मक संधी
 • अंतरिक गुप्त साधना माहिती
 • आँनलाईन समुदाय पाठिंबा
 • 100% MONEY BACK GUARANTEE
Subscribe

सहामाही / 6 Months

२००१ रु
 • वास्तु दोषांवर तोडगे
 • बाहेरील बाधेवर उपाय
 • घरातील सुधारित देवघर
 • अपेक्षित दैवी साधना
 • पारायण कृती मार्गदर्शन
 • कुलदैवत साधना
 • पितृदोष विशेष उपाय
 • दुर्लभ आध्यात्मिक माहिती
 • नोकरी, धंदा पुष्टी साधना
 • आँनलाईन समुदाय पाठिंबा
Subscribe

वार्षिक / 1 Year

३००१ रु
 • वास्तु दोषांवर तोडगे
 • बाहेरील बाधेवर उपाय
 • घरातील सुधारित देवघर
 • अपेक्षित दैवी साधना
 • पारायण कृती मार्गदर्शन
 • कुलदैवत साधना
 • पितृदोष विशेष उपाय
 • दुर्लभ आध्यात्मिक माहिती
 • नोकरी, धंदा पुष्टी साधना
 • नाम साधन मार्गदर्शन
 • अंतरिक गुप्त साधना माहिती
 • श्री काळभैरव विशेष साधना
 • श्री यंत्र साधना
 • श्री शंकराचार्य मुलाखत
 • आँनलाईन समुदाय पाठिंबा
Subscribe
LIVE सुरु असलेले वाचन
चालु आठवड्यातील वाचलेली निवडक लिखाणे
चालु महिन्यातील वाचलेली निवडक लिखाणे

 लोकप्रिय पोस्ट

 
श्री स्वामी समर्थ योग व गहन आध्यात्मिक मार्गदर्शन Group
Facebook Group · 26 members
Join Group
भगवान श्री सद्गुरु दत्तात्रेय स्वामीं महाराजांच्या चरणकमळांच्या शुभाशीर्वादाने त्यांच्या मुमूक्षुत्व असलेल्या भक्तगणांना तत्व, कर्मदहन व आध्यात्मिक सा...