आत्मक्रिया योग व सहज समाधि प्रबोधन: स्वयंभु श्री नागेश्वर शिवस्वामी रात्रप्रहर सेवा माहात्म्य...जामगाव ता मेहकर जि बुलढाणा SEO

Dattaprabodhinee Sevaa Trust’ was started in the year 2014 with a vision to create a non-profit humanitarian proficient area for spiritual people to actively engage them in soulistic existences.

ब्रम्ह अंतःकरण कसे बनते ? अनुकरणशील स्वतंत्र सद् मार्ग...!
घरातील देवघर व देव पंचायतन आधिष्ठान - २
नवनाथ ग्रंथ ( Navnath Bhaktisar ) पारायण कसे करावे ? ब्रम्हाण्डीय सामर्थ्य विश्लेषण...!
आत्मरत्न ( Soul Gem ) म्हणजे काय ? माणुस का भरकटतो ?
श्री गोरक्ष किमयागिरी प्रवाह नाथामृत सिद्धग्रंथ व कार्यसिद्धी...!
Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

शनिवार, १३ ऑगस्ट, २०१६

स्वयंभु श्री नागेश्वर शिवस्वामी रात्रप्रहर सेवा माहात्म्य...जामगाव ता मेहकर जि बुलढाणा


एके रात्री पुजारींना मंदीराच्या दरवाजाच्या लोखंडी गजांच्या फटीतुन अक्राळविक्राळ रुद्राक्षधारी केसाळ हात आत आलेला दिव्याच्या उजेडात दिसला . पण पुजारी घाबरले नाही . असा प्रकार सलग दोन तीन वेळा घडल्यावर त्यानी देवाना दर्शनाची विनंती केली . ह्या साक्षात्काराने त्याना विरक्ती आली.स्वयंभु शिवलिंग जागृत झालेल्या सिद्ध स्थानावर सुक्ष्म देहधारी शिवयोगींचे ध्यानदर्शन पुण्यात्म्यांना लाभले आले. शिवतेजाने प्रकटलेले शक्तीस्वरुप ब्रम्ह मुहुर्तात प्रकाशाच्या स्वरुपात स्वयंभु शिवलिंगाच्या सभोवताली सहज व्यापुनी सर्वांना दर्शन देत असे. 

श्री विष्णु वामन बोरकर महाराज कणका ता . मेहकर यांच्या आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारची त्यावेळी पंचक्रोशीत ख्याती होती . बोरकर महाराजांनी श्री कोंडू जेठेजींना स्वयंभू शिवलिंगाचा जलाभिषेक करुन त्याच्या चारही बाजुस दगडगोट्यांचा पोवळा बांधण्यास सांगितले. काही दिवसातच आठ बाय आठचा देवाचा गाभारा बांधला . देवाच्या मंदीराचा कळसारोहण आणि प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम झाला . यथावकाश मंदीरांची वास्तु आकारास आली .ह्या कामी पिंप्रीमाळी , खानापुर ,जामगाव  आणि मेहकर येथील ग्रामस्थांची मोलाची मदत मिळाली . व त्यांचे सहकार्य आजही अव्याहत सुरु आहे. हे मंदीर मेहकर ते मोळा रोडवर मेहकर पासुन २ कि मी अंतरावर जामगाव ता मेहकर जि बुलढाणा येथे ग न ९३ मध्ये ४०० चौ मी क्षेत्रावर स्थित आहे .शिव मंदीराची उभारणी झाल्यानंतर पिंप्रीमाळी गावातील एक सर्वसंग परित्यागी गृहस्थ श्री त्रिंबकराव धोंडु झोरे हे मंदीरावर पुजारी म्हणुन राहु लागले . त्यावेळी हे मंदीर लोकवस्तीपासुन दुर निबिड जंगलात असल्यासारखे होते . श्री त्रिंबकदादा त्यावेळी गाभाऱ्यातच झोपायचे तेथेच देवाचे ध्यानात रात्री बसायचे . एके रात्री पुजारींना मंदीराच्या दरवाजाच्या लोखंडी गजांच्या फटीतुन अक्राळविक्राळ रुद्राक्षधारी केसाळ हात आत आलेला दिव्याच्या उजेडात दिसला . पण पुजारी घाबरले नाही . असा प्रकार सलग दोन तीन वेळा घडल्यावर त्यानी देवाना दर्शनाची विनंती केली . ह्या साक्षात्काराने त्याना विरक्ती आली . सकाळी हा प्रकार त्यानी श्री कोंडु जेठे याना सांगितला. व ते अचानक मंदीर सोडुन तालुक्यात दुर्गबोरी ह्या सप्तर्षीपैकी एक असलेल्या दुर्वास ऋषीन्चे स्थानी असलेल्या शिवमंदीरात वास्तव्यास गेले . त्यानंतर ते सध्याचे वाशिम जिल्ह्यातील रिसोड जवळ असलेल्या कवठा ह्या गावी राहु लागले . त्या गावात ते महाराज म्हणुन मान्यता पावले . त्यांचे मृत्यूनंतर गावातील लोकानी त्यांचे समाधी मंदीर बांधले आहे. 
महाशिवरात्री आणि त्रिपुरारी पोर्णिमा हे दोन उत्सव थाटाने साजरे होवु लागले . महाशिवरात्रीला महाप्रसादाचे वाटप होते . हा भंडारा देखील नवलच म्हणावा असा आहे. ह्याचे कुणाला निमंत्रण नसते . तसेच दरवर्षी त्यात ५ किलोने वाढ करतात . प्रसादासाठी आलेल्या सर्व लोकाना हा महाप्रसाद पुरुन उरतो . 

ह्या मंदीरावर काहीतरी समाजविधायक आणि आध्यात्मिक जनजागृतीचे कार्य व्हावे असे श्री कैलास जेठे याना वाटत होते . पण जागेचा प्रश्न होता . तो जामगावचे ग न ९३ चे शेतकरी श्री शेख बिराम शेख फरीद आणि त्यांचे भाउ मो गौस शे फरीद यानी सोडविला . त्यानी मंदीरास जागा उदारमनाने उप्लब्ध करुन दिली . ह्या कामी श्री ईब्रहिम भाई कुरेशी यानी स्वत: पुढाकार घेतला . हा फार मोठा चमत्कारच म्हणावा लागेल . शिव मंदीराचे गर्भगृहात काळभैरव अधिष्ठानाची सन २०१७ च्या पहिल्या श्रावण सोमवारी स्थापना झाली . आणि त्यातुन रात्रप्रहर सेवेची संकल्पना साकारास आली .दत्तप्रबोधिनी आध्यात्मिक सेवा ट्रस्टच्या माध्यमातुन दर महीन्याच्या ३ तारखेला सामुहीक स्तरावर स्वयंभु शिवस्वामी रात्रप्रहर सेवा साकारली आहे.

सेवा उद्दिष्टे...

१. स्वआत्मबळ वाढवणें. शिवस्वामीआत्मानुसंधान करुन आपलं जीवन सार्थक करणें.

२. सत् पात्री दुःखी पिडीत लोकांना स्वामीअनुभूतीच्या माध्यमातुन कोणतेही अर्थकारण, राजकारण आणि दंभकारण न करता सामुदायिक स्वामीमय सेवेच अनन्यसाधारण महत्त्व पटवुन देणें. यथाशक्ति सद्गुरु स्वामींमहाराजांचा हेतु आणि व्याप्ती समजावुन देणे.

३. केंद्र, मठ आणि मंदिराच्या संकुचीत मनोवृत्तीत न अडकता आणि कोणत्याही अज्ञानी मंडळाच्या राजकारणाला बळी न पडता, त्यातुन बाहेर पडुन घरगुती प्रश्न, आध्यात्मिक प्रश्न, पर्यावरण संतुलनाचा प्रश्न आणि राष्ट्रहीत सुरक्षेच्या प्रश्नांवर सद्गुरुकृपे उपायाहेतु एकत्र येऊन सामुदायिक स्वामीमय रात्रप्रहर सेवा करणें.

सेवा अधिष्ठान...

१. आत्मअवलोकनात्मक स्वामीमय त्रिकालसंध्या करणें.

२. आत्मबळ वाढवणें हेतू सद्गुरुस्वामीं अधिष्ठानाचा स्वगृही न्यास करणें.

सेवा धोरणें...

१. सामुदायिक स्वामीमय सेवा विनामुल्य आहे.

२. सद्गुरु स्वामीमहाराज आणि त्यांच्या भक्तगणांमध्ये कोणतेही प्रकारचे माध्यम नाही. साधकाचे सर्व चित्त गाभाऱ्यात असायला हवे.

रात्रप्रहर सेवा नियोजन...

सामुहीक सेवा नियोजन स्वरुप खालीलप्रमाणे...

स्वामीमय सेवेत.... अनुक्रमे संध्याकाळी ठिक ७ वाजता शिवस्वामी रात्रप्रहर सेवेचा प्रारंभ आहे.

रात्रप्रहर सेवा एकुण चार चरणात विभागलेली आहे.

१. श्री स्वामी समर्थ... सामुहीक नामस्मरण

२. श्री काळभैरव... सामुहीक नामस्मरण

३. श्री काळभैरवाष्टक... सामुहीक आवर्तनात्मक पाठ

४. श्री शिवलीलामृत सामुहीक पाठ... ( संपूर्ण )

रात्रसेवा सकाळी ४.०० च्या सुमारास पुर्ण होते.


संपर्क : श्री. कैलाशजी जेठे
भ्रमणध्वनी : ९४२१४ ०१०१६ / ८८८८८ ८९५४५

महत्त्वाची टिप : 

बुलढाणा, अकोला, वाशिम , यवतमाळ,अमरावती, जळगाव , हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, बीड व मध्यप्रदेश सीमा जवळील शिवस्वामीं भक्तांसाठी सामुदायिक रात्रप्रहर सेवा प्रवासानुरुप अगदी सोयीस्कर आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Enter your email address:

Delivered by FeedBurner

लोकप्रिय पोस्ट

स्वामीसभासद नोंदणी प्रार्थमिक अर्ज