आत्मक्रिया योग व सहज समाधि प्रबोधन: दत्तप्रबोधिनीची स्वयंभू श्री नागेश्व्रर शिवस्वामी रात्रप्रहर सामुहिक साधना : प्रथम पुष्प् दिनांक 3.9.2017...जामगाव ता मेहकर जि बुलढाणा SEO

Dattaprabodhinee Sevaa Trust’ was started in the year 2014 with a vision to create a non-profit humanitarian proficient area for spiritual people to actively engage them in soulistic existences.

ब्रम्ह अंतःकरण कसे बनते ? अनुकरणशील स्वतंत्र सद् मार्ग...!
घरातील देवघर व देव पंचायतन आधिष्ठान - २
नवनाथ ग्रंथ ( Navnath Bhaktisar ) पारायण कसे करावे ? ब्रम्हाण्डीय सामर्थ्य विश्लेषण...!
आत्मरत्न ( Soul Gem ) म्हणजे काय ? माणुस का भरकटतो ?
श्री गोरक्ष किमयागिरी प्रवाह नाथामृत सिद्धग्रंथ व कार्यसिद्धी...!
Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

गुरुवार, ७ सप्टेंबर, २०१७

दत्तप्रबोधिनीची स्वयंभू श्री नागेश्व्रर शिवस्वामी रात्रप्रहर सामुहिक साधना : प्रथम पुष्प् दिनांक 3.9.2017...जामगाव ता मेहकर जि बुलढाणा


सामुहिक साधनेच्या लहरी जवळपास पाच किलोमीटर इतक्या अंतरावर पसरतात आणि वातावरणातील नकारात्मकता नष्ट् करुन सकारात्मकता निर्माण करतात. हे वैज्ञानिक सत्य् महर्षी महेश योगी यांनी 1993 मध्ये जगासमोर आणले. पण हीच गोष्ट् हजारो वर्षापूर्वी ॠषी आणि मुनींनी सांगितली होती. तीच प्राचीन परंपरा दत्त्प्रबोधिनी सेवा ट्रस्टने ऊबुंटू हया दैनिक प्रहरी सामुहिक नामस्मरण् साधनेव्दारे सुरु ठेवली आहे. आणि तिचे दृश्य् परिणाम हळूहळू समोर येत आहे.दत्त्प्रबोधिनी सेवा ट्रस्ट् मुंबई आणि मा. कुलदीपदादा निकम यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणेने स्वयंभू श्री नागेश्वर् शिवस्वामी मंदीर जामगांव ता. मेहकर जि. बुलडाणा येथे रात्रप्रहर मासिक सामुहिक शिवसाधना सुरु करण्यात आली. सदर साधनेचे पहिले पुष्प् दिनांक 3.9.2017 रोजी म्हणजेच भाद्रपद शु. व्दादशी, हया रविप्रदोष योगावर सदगुरु महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आले. रविवार हा श्री काळभैरव महाराजांचा दिन. त्यातही प्रदोषाचा पर्वकाळ म्हणजेच दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल.

हया रात्रप्रहर सेवेसाठी जनजागृती करण्याचे काम सुमारे दीड महिन्यांपासुन सुरु होते. हयासाठी blog.dattaprabodhinee.org  हया वेबसाईटवर, फेसबुक आणि whattsapp हया सोशल साईटवर लोकांना माहिती व्हावी यासाठी पोस्टस् टाकण्यात आल्या. त्याला लोकांचा उदंड प्रतिसादही मिळाला. तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचण्याचे काम आमचे स्थानिक प्रतिनिधी म्हणुन श्री. दिपक बद्रीनारायण गाडगे यांचेकडून करण्यात येत होते. ते त्यांनी चोखपणे पार पाडले होते.

अखेर तो दिन ऊगवला. मंदीराचे सभागृह आणि सभागृह आवारात लोकांना सेवेसाठी बसण्याची व्यवस्था केलेली होती. तसेच जनरेटरची देखील सुविधा हाताशी ठेवलेली होतीच. रात्री 8.30 वाजता श्री काळभैरवांची आरती झाली. आरतीनंतर सर्व साधक रात्रप्रहर साधनेसाठी आसनस्थ् झाले.

नुकताच पक्ष्यांचा किलबिलाट थांबलेला होता. वातावरणात सगळीकडे शांतता पसरायला सुरुवात झाली. प्रकाशाचे साम्राज्य् लोपून, सगळीकडे काळोख निर्माण व्हायला लागलेला. आणि साधकांच्या मुखातुन निघणारे श्री स्वामी समर्थ हया सदगुरु अनुग्रहित तारकमंत्राचे सुरेल आणि घनगंभीर स्वर् वातावरणात दुरदुर पसरायला लागले.

श्री स्वामी समर्थ म्हणजे श्रीपद विराजित भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझे मीपण भस्म् करुन, स्वयंभू शिव तत्व् सदगुरुकृपे अंकित करा. अशा परम गुरुच्या चरणकमल कृपेने वेद,वेदोक्त्, वेदांत आणि त्याही पलीकडील सदगुरु तत्वज्ञान सहजच प्राप्त् होते. हया जपाने आसमंतात निराळेच चैतन्य् निर्माण व्हायला लागले. हे कर्णमधुर भगवन नामाचे स्वर् कानावर पडल्यावर आजुबाजुच्या गावातील ग्रामस्थांची पाऊले देखील हळूहळू मंदीराकडे वळायला लागली. काही कुतूहल म्हणुन तर काही नामाच्या ओढीने देखील.
     
                      स्वामी चरणी लीन विनम्र् मती येता l अवघी सृष्टी आत्म् रंगली सहजता llस्वामी नामाच्या जपानंतर निरंजन समाधीत लीन भगवान शंकराच्या प्रलंयंकारी स्वरुप असलेल्या, श्री काळभैरव महाराजांच्या ओम काळभैरवाय नम: हया तारकमंत्राचे नामस्मरण् सुरु झाले. भगवान शंकराला नंदीगण, शिवगण आणि भैरवगण अत्यंत प्रिय असतात. कधीही शंभुचे पुजन करावयाची उत्सुकता असल्यास श्री काळभैरवाला शरण जाणे अत्यावश्यक असते. त्यासाठी श्री काळभैरव जपाचे प्रयोजन जेणेकरुन पुढील शिवपूजन निर्विघ्न् रुपात पार पडते. श्री काळभैरवाचा वरील मंत्र हा दत्त्प्रबोधिनीच्या उबुंटू मध्ये नियमित जपल्या जातो.


http://blog.dattaprabodhinee.org/2017/09/ratra-prahar-sevaa1.html

साधकांच्या मुखातुन तर पूर्वीपेक्षाही अधिक उच्चाराने मंत्र्स्वर् निघायला सुरु झाले. वातावरणातील चैतन्य् तर अधिकच सजग व्हायला लागले. त्याचप्रमाणे साधकांचे आणि श्रोत्यांचे अंत:करणही रोमांचित व्हायला लागले. अंतकरणातील चित्त्वृत्ती प्रफुल्लित व्हायला लागल्या. काही साधकांना  तर अष्टभाव जागृतीची अनुभूती व्हायला लागली. जाणिव नेणिवेच्या सिमेवर हा नामजप जावून पोचला. तसे पाहीले तर  श्री स्वामी समर्थ आणि ओम काळभैरवाय नम: यांचा मूल अर्थ एकच. दोन्हीही साक्षात अग्निबीजंच. एक सौम्य् तर दुसरे धगधगीत. एक साक्षात सदगुरु तर एक सदगुरुंचा दास. वरकरणी दिसायला व्दैत पण सुक्ष्म् रुपात अव्दैतच. जीव आणि शिवाचे व्दैत संपून अव्दैत निर्माण व्हावे आणि त्यायोगे निर्माण झालेले चैतन्यातुन आचरणात्मक् चरित्रशील समाज निर्मिती सहज शक्य् आहे.

त्यानंतर आदीशंकराचार्य विरचित श्री काळभैरवाष्टकाचे आवर्तनांना सुरुवात झाली. आजुबाजूच्या वस्तीवरील पेंगुळलेले शेतकरी वर्गही हळूहळू मंदीरावर पोचला होता. काळभैरवाष्टकाच्या आवर्तनांनी वातावरणातील नकारात्मक् शक्तिंचा आवेग कमी झाल्याचे जाणवत होते.


साधारणत: रात्री साडेदहाचे सुमारास श्रीधर स्वामी विरचित श्री शिवलिलामृत हया ग्रंथाचे पठण सुरु झाले. एकेका अध्यायाबरोबर जगन्नियंत्या शिवतत्वाचा महिमा अधोरेखित होत होता. भगवान शिवाची भक्तीप्राप्ती असलेल्या शिवभक्तांना ज्ञान आणि वैराग्याची जोड मिळणे हेतु शिवतत्व् समजून घेणे अत्यावश्यक आहे. ग्रंथाचे शक्यतो कुणीही रात्रप्रहरात पारायण करण्यास धजावत नाही. पण हया ठिकाणी रात्रकालीन सामुहिक एकदिवशीय पारायण सुरु होते. सगळीकडे भाव आणि भक्तिचा मेळा झाल्याचे जाणवत होते. पहाटे 5.30 वाजेपर्यंत ही रात्रप्रहर साधना अव्याहतपणे सुरु होते. हया साधनेस सर्व वयोगटातील सर्व जाती धर्माचे स्त्री पुरुष उपस्थित होते. सर्वांचा उत्साह हा शेवटपर्यंत कायमच होता.

रात्रप्रहर साधनेचा समारोप दत्त् महाराजांचे काकड आरतीने करण्यात आला. केलेली सर्व साधना सदगुरु महाराजांचे चरणी अर्पण करण्यात आली.  प्रसाद ग्रहण केल्यानंतर जमलेली सर्व मंडळी पुढील महिन्याचे तीन तारखेला येण्याचे देवास अभिवचन देवून मार्गस्थ् झाली.

दत्तप्रबोधीनी सेवा ट्रस्टने यावेळी सामुहीक सेवेची संरचना दत्त महाराजांनी जनहितार्थ सुधारीत करुन दिली आहे. तत्वाच्या संधानातुन स्वकर्माचे दहन आणि त्यानंतर अध्यात्मिक साधना ही दत्त्प्रबोधीनीने नेमून दिलेली प्राथमिक आत्मिक पायरी आहे.

हया नुसार अध्यात्मिक मार्गावर आत्मक्रमण करताना श्री काळभैरव अधिष्ठान मार्गे शिवतत्व् जाणून घेवून, दत्त् तत्वाकडे आत्मक्रमण करणेसाठीची इच्छुक साधकांची अध्यात्मिक तयारी करवून घेणे हे हया रात्रप्रहर साधनेचा खरा उददेश् आहे.

हया आत्मिक पायरीवर जो तपून निघतो, ज्याचं अस्तित्व् स्थुल देहापलीकडे जावून, अभंग अभिव्य्क्तीत सहज प्रकट होते. त्यालाच सदगुरुकृपा प्राप्त् होते. मग साधकाला अनुग्रह असो की नसो. त्याला गुरुदीक्षा असो कि नसो. याने काहीही फरक पडत नाही.

कारण गुरुदीक्षा सगुणकारक तर सदगुरुदीक्षा निर्गुणकारक आहे. ती निर्गुणातुनच आत्मिक संधानानेच प्रकट होते. त्यागतीने साधक सगुणातुन निगुर्णाकडे पोहोचलेला पाहिजे. तरच ब्रम्हानंदी सदगुरु अनुग्रह प्राप्त् होवू शकतो. इतर दुसरा कोणताही मार्ग वेद, वेदोक्त् अथवा वेदांताआधारावर नाही.

आपणही हया मासिक दत्त्प्रबोधिनी रात्रप्रहर सामुहिक साधनेस उपस्थित राहून प्रचिती घेवू शकता.

संपर्क : श्री. कैलाशजी जेठे
भ्रमणध्वनी : ९४२१४ ०१०१६ / ८८८८८ ८९५४५

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट सभासदत्व उपयुक्तता...!

श्री काळभैरव माहात्म्य

स्वयंभु श्री नागेश्वर शिवस्वामी रात्रप्रहर सेवा माहात्म्य...

सर्व स्वामींशिवभक्तांसाठी अद्वितीय शिवसाधना पद्धती...!!!

संसारीक लोकांसाठी अनुभवसिद्ध व सोपी मानस पुजा- १ ( Easy Meditation - 1 )महत्त्वाची सुचना :

संबंधित पोस्टबद्दल विशेष गोपनीय माहीती फक्त संस्थेच्या अधिकृत सभासदांनाच विनंतीवरुन कळवण्यात येते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Enter your email address:

Delivered by FeedBurner

लोकप्रिय पोस्ट

स्वामीसभासद नोंदणी प्रार्थमिक अर्ज