आत्मक्रिया योग व सहज समाधि प्रबोधन: श्री नागेश्वर् शिवस्वामी मंदीर जामगांव ता. मेहकर जि. बुलडाणा... सामुहिक रात्रप्रहर शिवसाधना SEO

Dattaprabodhinee Sevaa Trust’ was started in the year 2014 with a vision to create a non-profit humanitarian proficient area for spiritual people to actively engage them in soulistic existences.

ब्रम्ह अंतःकरण कसे बनते ? अनुकरणशील स्वतंत्र सद् मार्ग...!
घरातील देवघर व देव पंचायतन आधिष्ठान - २
नवनाथ ग्रंथ ( Navnath Bhaktisar ) पारायण कसे करावे ? ब्रम्हाण्डीय सामर्थ्य विश्लेषण...!
आत्मरत्न ( Soul Gem ) म्हणजे काय ? माणुस का भरकटतो ?
श्री गोरक्ष किमयागिरी प्रवाह नाथामृत सिद्धग्रंथ व कार्यसिद्धी...!
Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

सोमवार, ३० ऑक्टोबर, २०१७

श्री नागेश्वर् शिवस्वामी मंदीर जामगांव ता. मेहकर जि. बुलडाणा... सामुहिक रात्रप्रहर शिवसाधना


प्रत्येक महिन्याचे 3 तारखेला स्वयंभू श्री नागेश्वर् शिवस्वामी मंदीर जामगांव ता. मेहकर जि. बुलडाणा येथे सामुहिक रात्रप्रहर शिवसाधना आयोजित केली जाते.
       
दि. 3.11.2017 वार शुक्रवार म्हणजेच कार्तिक शुध्द् चतुर्दशी अर्थात त्रिपुरारी पोर्णिमा हया पवित्र दिवशी देखील स्वयंभू श्री नागेश्वर् शिवस्वामी मंदीर जामगांव ता. मेहकर जि. बुलडाणा येथे दत्तप्रबोधीनी सेवा ट्रस्ट् मुंबई यांचे मार्गदर्शन व प्रेरणेतुन मासिक सामुहिक रात्रप्रहर शिवस्वामी साधनेचे तिसरे पुष्प् गुंफण्यात येणार आहे.हा दिवस अतिपवित्र आहे. कारण हयाच दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुर हया असुराचा वध केला होता. हया विजयाचा आनंद म्हणुन संपूर्ण भारतातील प्राचीन शिवमंदीरात पूर्वीपासुन दीपोत्सव् साजरा करण्याची भारतीय परंपरा आहे. हया परंपरेस अनुसरुन हया दिवशी मंदीरात दीपोत्सव् साजरा करण्यात येणार आहे. हयाच दिवशी वैकुंठ चतुर्दशीचा दुग्ध् शर्करा योग आहे. अशी आख्यायिका आहे की, हया  दिवशी श्री महाविष्णु आणि देवाधिदेव श्री शिवशंकर हे एकमेकांना भेटतात.
     
Meditation,Lord Dattatreya Upasana,Spiritual Ubuntu, Six chakra purification, Yogkriyaa, naamsmaran, Parayan upasana, Pitrudosh solutions, All Tratak Upasana.

हया रात्रप्रहर शिवसाधनेतुन, श्री काळभैरव अधिष्ठानाचे माध्यमातुन शिवतत्व् आणि त्यायोगे श्री दत्तात्रेय स्वामी महाराज यांचे तत्वप्राप्तीतुन सदगुरु महाराजांच्या अनुग्रहाने मानवी आत्म्याला त्याचे मूळ निवासस्थान असलेल्या चिदाकाशातील कैवल्यधामाप्रत पोचण्यासाठी मूळ दत्तपूर्वानुग्रह स्थिती प्राप्त् करुन देणे हा तर आहेच. पण हया अध्यात्मिक प्रबोधाबरोबरच मानवी भौतिक जीवनास तत्वाच्या माध्यमातुन योग्य् आकार देणे हा आहे.
        
हया रात्रप्रहर साधनेत उपस्थित साधकांना शिवस्वामीनामाची गोडी लागावी म्हणुन आजपावेतो श्री स्वामी समर्थ, श्री काळभैरव महाराज यांचे मंत्रांचे नामस्मरण , श्री काळभैरवाष्टकाचे एकादश आवर्तन आणि श्रीधर स्वामी विरचित शिवलिलामृत हया अमृतमयी ग्रंथाचे सामुहिक पारायण असा साधनाक्रम पुर्ण करण्यात येत होता. ही तर केवळ अध्यात्माची तोंडओळख होती. आता येत्या शिवसाधनेपासुन त्यामध्ये पुढील बाबींचा समावेश करण्यात येणार आहे :-
  • स्वआत्मबळात वाढ करणे साठी क्रियामार्गदर्शन.
  • सामुहिक स्वामीमय सेवेचे महत्व् साधकांना पटवून देणे आणि त्याची व्याप्ती समजावून सांगणे.
  • मठ- मंदीराच्या चाकोरीत न अडकता त्यातुन बाहेर पडून घरगुती प्रश्न्, अध्यात्मिक प्रश्न्,पर्यावरण संतुलनाचे प्रश्न्, आणि राष्ट्रीय प्रश्नांवर सदगुरुकृपे उपायहेतु एकत्र येवून, सामुदायिक स्वामीमय रात्रप्रहर सेवा करणे.

उपरोक्त् उददीष्टपूर्ती हेतु रात्रप्रहर साधनेत पुढीलप्रमाणे मार्गदर्शन केल्या जाणार आहे :

1) तत्वाचं आपल्या मानसिक,शारिरीक, आर्थिक, सामाजिक आणि अध्यात्मिक जीवनात असलेल्ं महत्व् साधकांना परिचित करुन देणे. सर्व प्रकारच्या दैविक, भौतिक आणि अध्यात्मिक दोषांचे समूळ निराकरण तत्वाच्याच माध्यमातुन होते. ज्यामुळे जीवनात विलक्षण शांतीचा अनुभव येवून, आपला आत्म्- विश्वास सदगुरु महाराजांप्रती अधिकच दृढ होतो.व त्यांना आत्म् समर्पण कसे करावे ? याबाबत ज्ञान अवगत होते.  तिथून पुढे कधीही आपल्याला कोणत्याही मध्यस्थाची अथवा कर्मकांडाची गरज भासत नाही याची जाणीव होते.

2) तत्व् आचरण होण्यासाठी आपण नियमांच्या चौकटीत बसायला हवे. म्हणुन मनुष्याच्या कोणत्या सवयी नियमांच्या आड येतात याची माहिती साधकांना करुन देणे.सदर सवयींचे दैनिक जीवनातुन उच्चाटन केल्यास मानवी जीवनाचा कायापालट झाल्याशिवाय रहात नाही.तसेच कौटुंबिक जीवनात निर्माण होणारे वाद आणि कलह संपुष्टात येतील . 

3)अध्यात्मिक अनुभव आणि प्रगती हवी पण ती डोळस व प्रत्यक्ष प्रत्ययास येणे शक्य् असल्याच्या आधारावरच असली पाहीजे. त्यासाठी योग्य् माध्यमाची आवश्यकता असणे अनिवार्य आहे. मनाला दैवी आधार प्राप्त् करणेसाठी माध्यम्अं धश्रध्देला पोषक असल्यास दैवी सानिध्य् लाभणार नाही. त्यामुळे श्रध्दा आणि अंधश्रध्दा यातील फरक साधकांना समजावून सांगणे. जेणेकरुन बुवा-बाबा-भगतांच्या आंधळया प्रलोभनांना बळी पडणे टाळून मनाला परिपक्व् मानसिक अवस्था प्राप्त् करुन देणे सहज शक्य होईल. जेणेकरुन कोणत्याही परिस्थितीशी समांतर राहून, साक्षी भावाने स्वामी प्राप्तीला वाहून घेणे सुलभ होईल. त्यायोगे मानवी जीवन प्राप्तीचे अंतिम ध्येय साध्य् होणे दृष्टीक्षेपात येईल.

4) मानवी मन हे डोळयांनी दिसत नाही. पण ते कार्य् करते म्हणुनच आपण त्याचे परिणाम अनुभवतो. आपल्या चांगल्या आणि वाईट कृतीस मन जबाबदार असते.म्हणुनच मनाला योग्य् उपदेशाआधारे दीर्घकालीन वाटचाली अंती अंतर्मुख केले पाहीजे जेणेकरुन मानवाचे 80 टक्के दु:ख आणि शारिरीक व मानसिक व्याधी दुर होतील. म्हणुन मन अंतर्मुख करण्यासाठी आवश्यक् अशा अध्यात्मिक साधन व यौगिक क्रिया कलापांची माहिती श्री. कुलदीप दादा निकम, दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट् मुंबई यांचे अनुभवी मार्गदर्शनातुन  सुयोग्य् वेळी उपलब्ध् करुन दिले जाईल.

5)  श्री काळभैरव नामस्मरण व श्री काळभैरवाष्टकाचे सामुहिक आवर्तनातुन साधकांचे आंतरिक विचारामध्ये बल निर्माण होते. जीवनविषयक दृष्टीकोन विशाल होतो. नकारात्म्क शक्तींपासुन व दृष्ट् शक्तींपासुन बचाव होतो. अंतर्बाहय शत्रुंच्या पकडीतुन मनुष्य् दुर जातो.प्रकृतीगर्भातील सर्व मानवी समस्यांचे निराकरण श्री काळभैरव महाराजांचे कृपेने शक्य् होते.  त्यामुळे श्री काळभैरव महात्म्याशी साधकांचा परिचय करुन देणे.

6) दत्तप्रबोधिनी सदगुरु ज्ञानाआधारे आत्म्यास सदगुरु महाराजांचे पुर्वानुग्रह स्थिती प्राप्त् होईल यादृष्टीने अर्थयुक्त नामस्मरण्,स्वकर्म् दहन आणि अध्यात्मिक साधना साधकांकडून घडवून आणणे जी की प्राथमिक आत्मीक पायरी आहे.


Meditation,Lord Dattatreya Upasana,Spiritual Ubuntu, Six chakra purification, Yogkriyaa, naamsmaran, Parayan upasana, Pitrudosh solutions, All Tratak Upasana.

दत्तप्रबोधिनी योगमार्ग सदगुरुंच्या अधिष्ठानावर म्हणजे श्री दत्तमहाराजांचे अनुशासन व श्री काळभैरव शासनावर आधारीत आहे. जेथे साधकाला सगुणातुन निर्गुणात सहज प्रवेश मिळतो. व सदगुरुंशी अनायसे शाश्व्त आत्मसंधान जोडले जाते.तरी हया सामुहिक रात्रप्रहर साधनेसाठी उपस्थित राहण्यास इच्छुकांनी कृपया दि. 3.11.2017 रोजी सायंकाळी 6.00 वाजेपावेतो श्री नागेश्वर् शिवस्वामी मंदीर जामगांव ता. मेहकर येथे उपस्थित रहावे. सदरचे मंदीर हे मेहकर ते मोळा हया मार्गावर असुन मेहकरपासुन 2 कि मी अंतरावर आहे. येण्यासाठी एस टी बस आहेत. साधनेसाठी येताना कृपया आपले बसण्यासाठीचे आसन, शिवलिलामृत ग्रंथ, आणि रात्रीचा आपले जेवणाचा डबा सोबत घेवून यावा. हिवाळयाचे दिवस असल्याने ज्यांना थंडीचा त्रास होतो अशा भाविकांनी पुरेसे गरम कपडे सोबत बाळगावे. 

सदरची साधना निशुल्क् आणि सर्वांसाठी खुली आहे. येण्यापूर्वी किमान 24 तास अगोदर आमचे स्थानिक प्रतिनिधी श्री दिपक बद्रीनारायण गाडगे रा. मेहकर यांचे भ्रमणध्वनी क्रमांक 9420561053 वर कृपया नांव कळवावे, ही विनंती.  जेणेकरुन आम्हाला आपलेसाठी बैठक व्यवस्था, चहापाणी इ. ची व्यवस्था करणे सोईचे होईल. साधनेत व्यत्यय् येवू नये यासाठी कृपया लहान मुले, आजारी आणि अतिवृध्द् व्यक्ती यांना सोबत आणण्याचे टाळावे. काही अडचणी अथवा समस्या असल्यास निराकरणहेतु माझे भ्रमणध्वनी क्र. 9421401016 वर संपर्क करावा.

आपला नम्र्

कैलास कोंडु जेठे,
श्री नागेश्वर शिवमंदीर जामगांव
तसेच दत्त्प्रबोधीनी सेवा ट्रस्ट् मुंबई करीता.

अध्यात्मिक माहिती व समस्या निराकरण हेतु blog.dattaprabodhinee.org हया वेबसाईटवर विविध अध्यात्म्कि विषयांवर लेख उपलब्ध् आहेत. कृपया नियमित वाचन करुन, जीवनात आमुलाग्र् बदल सुनिश्चित करावा.

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

श्री काळभैरव माहात्म्य

ब्रम्ह अंतःकरण कसे बनते ? अनुकरणशील स्वतंत्र सद् मार्ग...!

अंतरीक परिणामकारक वासना बीज कसे ओळखावे ?

नाथपंथातील प्रसिद्ध ध्यानयोग नवनाथ साधना - १ ( Nathpanthi Meditation - 1 )

थोर दत्त विभुती म्हणजे काय ?महत्त्वाची सुचना :

संबंधित पोस्टबद्दल विशेष गोपनीय माहीती फक्त संस्थेच्या अधिकृत सभासदांनाच विनंतीवरुन कळवण्यात येते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Enter your email address:

Delivered by FeedBurner

लोकप्रिय पोस्ट

स्वामीसभासद नोंदणी प्रार्थमिक अर्ज