श्री स्वामी समर्थ योग व गहन आध्यात्मिक मार्गदर्शन: दत्त्प्रबोधिनची स्वयंभू श्री नागेश्वर शिवस्वामी मंदीर जामगांव येथील मासिक सामुहिक रात्रप्रहर शिवसाधना : पुष्प् दुसरे दिनांक 3.10.2017 SEO

 स्वामी साधक सदस्यता घेऊन "दत्तप्रबोधिनीकर" व्हा...!

ब्रम्ह अंतःकरण कसे बनते ? अनुकरणशील स्वतंत्र सद् मार्ग...!
घरातील देवघर व देव पंचायतन आधिष्ठान - २
नवनाथ ग्रंथ ( Navnath Bhaktisar ) पारायण कसे करावे ? ब्रम्हाण्डीय सामर्थ्य विश्लेषण...!
आत्मरत्न ( Soul Gem ) म्हणजे काय ? माणुस का भरकटतो ?
श्री गोरक्ष किमयागिरी प्रवाह नाथामृत सिद्धग्रंथ व कार्यसिद्धी...!
Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu
LIVE सुरु असलेले वाचन
चालु आठवड्यातील वाचलेली निवडक लिखाणे
चालु महिन्यातील वाचलेली निवडक लिखाणे

दत्त्प्रबोधिनची स्वयंभू श्री नागेश्वर शिवस्वामी मंदीर जामगांव येथील मासिक सामुहिक रात्रप्रहर शिवसाधना : पुष्प् दुसरे दिनांक 3.10.2017


सुर्य उगवल्यामुळे दिवसास प्रारंभ होतो. सुर्योदय आणि सुर्यास्त् ही सुर्याची दैनिक निरंतर जगास दृश्यमान असलेली अभिव्यक्ती आहे.प्रत्यक्षात सुर्य उगवतही नसतो आणि मावळतही नसतो. तो एकाच ठिकाणी स्थित असतो. हे सर्वांनाच माहिती आहे तरीही  रोज उगवणा-या सुर्यास आपण नमस्कार करतोच ना ! . पण तो नमस्कार उगवत्या सुर्यास नसुन त्याचे शाश्वत् अभिव्यक्तीस असतो.  तसंच परमात्म् स्वरुपाचे देखील आहे.
                
                कागत लिखै सो कागदी, को व्यवहारि जीव I
                आतम द्रिष्टि कहां लिखै, जित देखो तित पीव


सुर्य उगवल्यामुळे दिवसास प्रारंभ होतो. सुर्योदय आणि सुर्यास्त् ही सुर्याची दैनिक निरंतर जगास दृश्यमान असलेली अभिव्यक्ती आहे.प्रत्यक्षात सुर्य उगवतही नसतो आणि मावळतही नसतो. तो एकाच ठिकाणी स्थित असतो. हे सर्वांनाच माहिती आहे तरीही  रोज उगवणा-या सुर्यास आपण नमस्कार करतोच ना ! . पण तो नमस्कार उगवत्या सुर्यास नसुन त्याचे शाश्वत् अभिव्यक्तीस असतो.  तसंच परमात्म् स्वरुपाचे देखील आहे.

कागदांवर लिहीण्यात आलेली शास्त्रे आणि परमात्म्याच्या स्वरुपाबाबतच्या बाबी हया केवळ दस्तावेज आहे. तो कोणत्याही जीवाचा व्यवहारीक अनुभव नाही. आत्मदृष्टीने प्राप्त्  अनुभव कुठेही लिहीलेला रहात नाही. जिकडे पहावे तिकडे परमात्माच दिसतो आहे. आणि त्याचेवरुन दृष्टीच हटत नाही तर मग लिहीण्याच्या फंदात कोण पडेल.

आजच्या युगाची शोकांतिका

कोंबडयाची बाग ही सुर्योदयाची प्रक्रिया प्रारंभ झाल्याची सुचना आसमंतातील मनुष्यादी प्राणीमात्रांस मिळावी हया दृष्टीने त्याचेकडून झालेली स्वाभाविक क्रिया आहे. तथापि काही लोक मात्र कोंबडे झाकून ठेवून निवांत झोपी जातात. कशासाठी ॽदिवस उगवूच नये यासाठी ॽ कोंबडा हा सदर प्रक्रिया प्रारंभ झाल्याच्या क्रियेचा केवळ संदेशवाहक आहे ही साधी बाबही अशी लोक समजून घेत नाही. हीच आजच्या युगाची फार मोठी शोकांतिका आहे. अध्यात्मिक मार्गावर मनुष्य् स्वेच्छेने कधीच येणार नाही
        
वर्तमान जगात मृत व्यक्तीस खांदा देवून, स्मशानापर्यंत पोचविणे हे पुण्यकर्म समजल्या जाते. पण जिवंत असुनही परिस्थ्‍िातीने हतबल होवून, जगणे नकोसे झालेल्या माणसाला आधार देताना मग हीच माणसे शंभर वेळा विचार करताना बघुन प्रत्यक्ष परमात्म्याच्याही अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. जिथे वेळ निघुन गेल्यावर प्रत्यक्ष परमात्म्यालाही विसरणारी लोकं आहेत तिथं माणसांचा काय विचार व्हावा ॽ
       
जिथे माणसांकडून माणसाची अपेक्षा संपून जाते,पुर्वकर्माच्या गणितावर निष्ठुर नियतीच्या फटक्यांनी जिवंत माणूस जेव्हा जिवंतपणे संपण्याच्या स्थितीला येतो, मायेच्या एका हुंकारावर त्याचे अस्तित्व्न ष्टप्राय होण्याचे स्थितीस येते  त्याचवेळी तो एकतर मृत्यूस आपणहून मिठी मारतो किंवा जगाच्या त्या परमनियंत्याला शोधुन एकवेळ त्याला भेटीन, मोडक्या तोडक्या वाणीने  साकडे घालीन हया इच्छेने अध्यात्म मार्गावर वाटचाल करायला लागतो. त्या अगोदर नाही. कां ॽ तर त्याचं सर्वकाही सुरळीत चाललेलं असतं ना ! सुखाच्या भ्रांतीत असताना माणसाचं मन काहीच मानत नाही. अगदी ईश्वरसुध्दा. मग तुमची आमची गोष्टच काय ॽ.

                माया गया जीव सब, ठारी रहै कर जोरिI
                जिन सिरजय जल बुंद सो, तासो बैठा तोरि I

मायेच्यासमोर, भ्रमासमोर प्रत्येक मनुष्य् हात जोडून उभा आहे. पण ज्यापरमात्म्याने हया प्रकृतीची ( त्या प्रकृतीचा माया हा एक छोटा अंश आहे )  रचना केली त्याचेशी मात्र्आ पण फारकत घेतली, त्यामुळे आपली ही दशा झाली आहे. हे फक्त तेव्हाच कळते ज्यावेळी मायाच मनुष्याचा जीव घ्यायला निघते.

सदगुरु महाराज हेच पतितांचे कैवारी आहेत

अशा उदविग्नावस्थेत अध्यात्म मार्गावर वाटचाल सुरु झाल्यावर,मग त्याला कळायला लागते की, परमात्म्याकडे आपली फिर्याद थेट पोचत नाही. किंवा ती फिर्याद पोचायला आपली तेवढी पात्रता नाही. मग तो काय करतो, अधिक आर्त साद घालायला सुरुवात करतो. मग विश्वातील सदगुरु तत्व कुठूनतरी कसेतरी त्याला ज्ञात होते. तो हया परमदयाळू अमर अविनाशी  सदगुरुतत्वाची आळवणी करतो. मानवाला मग सदगुरुकडून करुणा आणि समतेची थोडीशी मेहेरनजर मिळते. सदगुरु आणि परमात्मा यांबददल थोडेफार कळायला लागते. त्याला सदगुरुंचे निर्गुण स्वरुपाची थोडीफार जाणीव व्हायला लागते. त्याचेशिवाय आपलं कुणीच हया जगात नाही ही भावना बळावली की, सदगुरु आवश्यकता आणि सदगुरुंची व्यापकता लक्षात यायला लागते. मग तो सदगुरु आणि परमात्म्याचे गुणगान गावू लागतो. त्याच्यासारखाच कुणी दु:खी, दीन होवून लाचारपणे दिसला कि त्याला तो सदगुरु आणी परमात्म्याविषयी सांगून, त्याच्या नामातुन मिळणा-या आनंदाविषयी अनुभूती घेण्यास सांगतो. आणि मग एकएक करता करता तो अनेक जीव अध्यात्ममार्गावर आणायला सुरुवात करतो. आणि  या माहौलमध्ये तो टिकून राहीला तर केव्हातरी हयाच करुणेआधारे सदगुरु ईश तत्वाच्या  प्राप्तीच्या अनुषंगाने त्या मनुष्यास सगुणातुन हलकेच निर्गुणात घेवून जातात. निर्गुणातुन मग आत्म्याच्या मूळ घरी घेवून जातात. मग तिथेच काय तो कायमचा विश्राम. कुठेही येणे नाही किंवा जाणे नाही. सदगुरुंचा महिमा असाच आहे, ज्याकडे पाहून देवादिकांना देखील लाजेने मान फिरवावी लागते.

                गुरु किया है देह का, सतगुरु चीन्हा नाही I
                भवसागर के जाल में, फिर फिर गोता खाहि I

सदगुरु नाम हेच खरे त्यापुढे सगळे खजिनेही फिके ज्या मानवाने मनाच्या मस्तीत गात्रसुखांच्या शय्येवर लोळत असताना, परमात्म्याच्या अस्तित्वालाच मानने ही अंधश्रध्दा समजली होती, जो मदिरा आणि मदनिका यांच्या नशेमध्ये गुंग होण्याचा आजवर प्रयत्न करीत होता तोच मनुष्य सदगुरुंनी दिलेल्या नामाच्या उत्तरोत्तर वाढत जाणा-या शाश्वत नशेमध्ये धुंद व्हायला लागतो. आणि  सुरुवातीला मनुष्य नामनशा करतो पण नंतर नामच त्याला परमानंदाच्या नशेमध्ये लोळवायला लागतं. आणि परमतत्व त्याला हलकेच कळायला लागतं.  काय म्हणावं याला ॽ मंडळी इथे सगळे मंत्र बोध होतात, जगातल्या सगळया सौंदर्यवतींचे सौंदर्यही फिके आहे, जगातले सगळे खजिनेही तुच्छ आहेत.

                शब्द गुरु का शब्द है, काया का गुरु काय I
                भक्ति करे नित शब्द् की, सदगुरु यो समुझाय I

कामचलावू अध्यात्म, कल्पनेचा ईश्वर आणि मोक्षाचा भ्रम पण हया जगात सत्य तुम्हाला कोणी सांगत नाही, ज्यात सांगणा-याचा मतलब आहे अशाच गोष्टी सांगितल्या जातात, त्याच ख-या आहेत अशा ठसविल्या जातात. सत्य झेलण्याचीही कोणाची ताकद नाही. सत्याच्या रस्त्यावर तुम्ही एकटे असता, कारण तिथे तुमची कुणाशीही स्पर्धा नसते. कलियुगात मायेचा जोर इतका आहे की, तो सत्य स्विकारायला तयार होत नाही. सत्य माहित असुन देखील. त्यामुळे सत्याकडे नेहमीच पाठ फिरविली जाते. आणि जे आपल्याला गोड वाटेल अशाच गोष्टीकडे माणुस वळतो, सगळे धंदे करुन अध्यात्म होत असेल तर करायला पाहतो. आणि अशा लोकांसाठी हल्ली आधुनिक युगात कामचलावू अध्यात्म नावाचा विशेष प्रकार फोफावत चालला आहे. त्याचा चांगला धंदेवाईक जोरही बसला आहे.हे लोक आज करोडो नव्हे तर अब्जावधीच्या संपत्तीवर लोळण घेत आहेत. इथे कल्पनेचाच ईश्वर आणि मोक्षही कल्पनेचाच आहे.त्यामुळेच इथे मार्केटींगच्या जोरावर लाखोंचा मेळा आहे.

                जो गुरु ते भ्रम न मिटै,भ्रान्ति न जिसका जाय I
                सो गुरु झुठा जानिये, त्यागत देर न लाय I

हे संत कबीर यांनी सांगितलंय. पण त्याकडे सोईस्कर् दुर्लक्ष केल्या गेलंय आणि आजही दुर्लक्षच केल्या जातंय. उध्दार एखादयाचाच होतो समुहाचा नाही पण मानवी मनातले परिवर्तन हे समुहाने होत नाही. आजवर कुठल्याही संतांनी मानवी समुहाचे थवेच्या थवे उध्दारले नाहीत. तर त्या थव्यांमधुन एखादाच त्यासाठी पात्र ठरला. 

भक्तीने उपजती कोटयानुकोटी l त्या पैलतिरी पाहीला एखादा ll

मग तो एखादा शोधण्यासाठी त्या संताला, महापुरुषाला किती आटापिटा करावा लागतो. किती मेहनत घ्यावी लागते हयाला तोड नाही.

सामुहिक साधनेचे महत्व्


सुर्य उगवल्यामुळे दिवसास प्रारंभ होतो. सुर्योदय आणि सुर्यास्त् ही सुर्याची दैनिक निरंतर जगास दृश्यमान असलेली अभिव्यक्ती आहे.प्रत्यक्षात सुर्य उगवतही नसतो आणि मावळतही नसतो. तो एकाच ठिकाणी स्थित असतो. हे सर्वांनाच माहिती आहे तरीही  रोज उगवणा-या सुर्यास आपण नमस्कार करतोच ना ! . पण तो नमस्कार उगवत्या सुर्यास नसुन त्याचे शाश्वत् अभिव्यक्तीस असतो.  तसंच परमात्म् स्वरुपाचे देखील आहे.

नवनाथांचे चरित्र वाचताना समजून आले की, नवनाथांनी 84000 सिध्द आपल्या तोडीचे तयार केले होते. त्यासाठी त्यांनी त्या काळात किती भ्रमंती केली असेल ॽआज आम्ही सामुहिक सेवेसाठी माणसं जमवताना एका महिन्यात फेसबुक, व्हाटस ऍ़प, हाईक सारख्या सोशल मिडीया माध्यमातुन, तसेच प्रत्यक्ष देखील अशी एकूण गोळाबेरीज केली असता लक्षात येते की आपण एका महिन्यात साधारणत:80,000 लोकांपर्यंत पोचलो . एवढया प्रचंड संख्येशी संवाद साधुनही पुढीलसाधनेला किती नवीन साधक येतात तर फक्त आठ किंवा नऊ. हयाची टक्केवारीच काढायची ठरवली तर ती येते 0.01 टक्‌के फक्त. मग त्यापैकी किती लोक कायम टिकणार आणि त्यातुन किती अध्यात्ममार्गावर आत्मक्रमण करुन अंतिम ध्येयापर्यंत पोचणार ॽ याबददलच्या पुढील टक्केवारीची कल्पनाच न केलेली बरी. हया पार्श्वभुमीवर नवनाथांचे कार्य त्या काळात किती श्रेष्ठ होते हे लक्षात येते. तात्पुरत्या भक्तीच्या ओढीने हजारो लोकं जमवता येतील. पण भक्ती ही बाहयमनाची उपज असल्याने ती कायम टिकून रहात नाही ही खरी गोम आहे. भक्तीतुन आत्मज्ञान आणि वैराग्य निर्माण झालं पाहीजे. तर जमेल. पण ते निर्माण होणं हे थोडीच मानवाच्या हाती आहे. बरं तिथं जोर जबरदस्ती करुनही जमत नाही. त्यासाठी चित्ताचा लय होणे आवश्यक आहे. पण  ते तर फक्त आणि फक्त  सदगुरु महाराजांची कृपाच करु शकते. अन्य कुठलाही उपाय या जगात दुसरा नाही.

                        जाति बरन कुल खोय के, भक्ति करै चितलायI
                        कहै कबीर सतगुरु मिलै, आवागमन नशाय I


वरवरची श्रध्दा कधीही कोणालाही फळत नाही.क्षणिक अनुभव समाधानी बनवेल.परंतु अनुभूती आणि आत्मप्रगती यात फरक आहे. तो ओळखण्यासाठी आणि आत्मप्रगती चाखण्यासाठी योग्य श्रवण व संकिर्तन असायला हवे. बंडखोर मनाला हलकेच आत वळवायला लागतं.  जे आज आधुनिक युगात बोटावर मोजणा-या व्यक्तींनाच प्राप्त होतं. कारण बाकीचे संसाराच्या मायावी मृगजळालाच वास्तव मानुन त्यामागे धावत सुटतात. अध्यात्म नेमकं काय आहे आणि त्यातुन स्व- स्वरुपाची ओळख करुन घेवून परम- आत्म स्वरुप कसे जाणावे याचे प्राचीन विज्ञान आज कुणालाही नकोसे आहे. कारण ते अंधश्रध्देवर आधारीत नाही. तिथे खोटा माणुस आणि खोटी तत्वे लगेच नागडी होतात. अध्यात्माच्या मार्गावर वाटचाल करताना म्हणुनच तत्वाचा अभ्यास होणं अत्यंत अनिवार्य आहे. कारण तेच तत्व सृष्टी निर्मीती अगोदर पासुनच कार्यरत आहे, ज्याला कुणीही भस्म करु शकत नाही. तत्वाचा अभ्यास असेल तर पुढे जाता येईल. नाहीतर इंचभरही पुढे सरकणं मुश्किल आहे.   तसेच  श्रध्दा आणि अंधश्रध्दा यात नेमका काय फरक आहे हे जाणून घेणे देखील गरजेचे आहेच. कारण हा फरक कळाला तर आपण जगाच्या बाजारपेठेत टपून बसलेले भोंदु लोकांच्या जाळयात सापडणार नाही.जगाच्या प्रवाहाच्या उलटया दिशेने अध्यात्म आहे. तिथे मुंडक्यावर आपटया खावून खावून काही तरी कितीतरी वर्षांनी हाती लागतं. सदगुरुंच्या परिसस्पर्शाने कायापालट होतो

दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्टने सदगुरु महाराज परंपरेतील अध्यात्माची ही ज्ञानगंगा blog.dattaprabodhinee.org हया संकेतस्थळावर विविध लिंकव्दारे जनतेसाठी खुली करुन दिली आहे. हया लिंकचे मागील काही महिन्यांमध्ये मी शांतपणे सखोल वाचन, मनन आणि चिंतन केले. दिलेली साधना आचरणात आणण्याचा प्रयत्न् केला. साधना आणि कर्मदहनाव्दारे स्व् देहात, अंतरंगात आणि अध्यात्मिक जीवनात कमालीचा बदल झाला, सदर बदलाआधारे भौतिक जीवनाची परिभाषाच बदलून गेली. आज नितांत शांत आहे. जवळ काहीही नसुनही काहीच अपेक्षा उरली नाही. सदगुरु महाराजांचे नुसते स्मरण् जरी केले तरी डोळयातुन आनंदाश्रु ओसंडून येतात. मनुष्य् हा लोखंडाप्रमाणे असतो, जोवर सदगुरुच्या आशिर्वादरुपी परिसाने त्याचे सोन्यात रुपांतर होत नाही तोवर तो जीवनाचे ध्येय गाठूच शकत नाही. सदगुरुंचा आशिर्वादरुपी परिसस्पर्श हा अंतर्मुखी आत्मसंयोग आहे.

सामुहिक साधनेचे प्रयोजन


सुर्य उगवल्यामुळे दिवसास प्रारंभ होतो. सुर्योदय आणि सुर्यास्त् ही सुर्याची दैनिक निरंतर जगास दृश्यमान असलेली अभिव्यक्ती आहे.प्रत्यक्षात सुर्य उगवतही नसतो आणि मावळतही नसतो. तो एकाच ठिकाणी स्थित असतो. हे सर्वांनाच माहिती आहे तरीही  रोज उगवणा-या सुर्यास आपण नमस्कार करतोच ना ! . पण तो नमस्कार उगवत्या सुर्यास नसुन त्याचे शाश्वत् अभिव्यक्तीस असतो.  तसंच परमात्म् स्वरुपाचे देखील आहे.

हाच अनुभव निदान काही लोकांना मिळावा, आपण ज्या भुमीत जन्मलो तेथील काही किलोमीटर परिसरातील नकारात्मक उर्जा कमी व्हावी, मानवी मनात सकारात्मक बदल होवून, निर्माण झालेल्या ईश्वरी चैतन्याचा लाभ समाज मन घडून, राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागण्याच्या  हया हेतुने दत्त्प्रबोधिनीच्या मार्गदर्शनाने आणि श्री. कुलदीपदादा निकम यांचे सहकार्याने स्वयंभू श्री नागेश्वर् शिवस्वामी मंदीर जामगाव येथे मासिक सामुहिक रात्रप्रहर शिवसाधना सुरु केली.

 दि. 3.10.2017 रोजी हया साधनेचे दुसरे पुष्प् सदगुरु महाराजांचे चरणी समर्पित करण्याचा आम्ही एक अल्पसा प्रयत्न् केला. हया दुस-या पुष्पामध्ये आम्हाला एक लक्षात आले की, भक्तीच्या ओढीने आलेला प्रत्येकच जण प्रवाहात टिकून रहात नाही. काही साधक आमच्या रात्रप्रहर सामुहिक साधनेच्या पहिल्या पुष्पाचे वेळी उपस्थित होते, पण ते  दुस-या पुष्पाचे वेळी ते आले नाहीत त्यांची काही कारणे वर नमूद केल्यापैकीच असणार यात शंकाच नाही. ज्यावेळी महाराजांना वाहून घेणार किंवा कसे हे सांगण्याची निर्णायक वेळ येते त्यावेळी मात्र् फार म्हणजे फारच कमी लोक पुढे येतात. जे मागे सरकतात, ते कर्मगतीस अनुसरुन पतन पावतात. जे पुढे येतात ते नाथांच्या फार्म्युल्याप्रमाणे ठोकरा खात का होईना अध्यात्मिक प्रगतीपथावर आत्मक्रमण करतात.
      
त्यांची टक्केवारी कमी जरी असली तरी उभ्या आयुष्यात किमान एक तरी साधक घडविला हे दत्त्दरबारात सांगता येईल आणि त्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे साक्षीदारही तेथेच आपल्या पाठीमागे उभे राहून त्याला दुजोरा देतील. तो दिवस खरा भाग्याचा ठरेल यासाठीच हा सारा अटटाहास चालु आहे. हया सदगुरु कार्यात आमच्या मनात कुठेही अहंकाराची भावना निर्माण होणार नाही. कारण जे काही करतात ते सदगुरु महाराज करतात आणि तेच आमचेकडून करुन घेतात हीच वृत्ती जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत कायम रहावी हीच सदगुरुचरणी प्रामाणिक प्रार्थना आहे.

जो अनन्यभावे शरण मजसी I पाहिल मुक्तीचा सोहळा I जिंकिल जीवनकला I जो मजवरी विसंबला I
खरे तर ही रात्रप्रहर सामुहिक शिवसाधना ही दत्तप्रबोधिनी तत्वाच्या माध्यमातुन श्री काळभैरव अधिष्ठानाच्या मदतीने शिवतत्व् आणि त्याहुन पुढे श्री दत्तात्रेय स्वामी यांचे तत्वप्राप्तीतुन सदगुरु महाराजांच्याअनुग्रहाने आत्मा कैवल्यपदाला( आत्म्याचे मूळ घरी) पोचण्याची स्थिती प्राप्त् होण्यासाठी आत्म्याला पूर्वानुग्रह स्थिती प्राप्त् करुन देणे आवश्यक आहे. त्या उददेशाने प्रेरीत आहे. मोक्षमार्गाचा प्रवास हा धसमुसळेपणानं होत नाही. त्यासाठीचा साचा काटेकोर आहे. तत्वात कुठेही तडजोड नाही. हा झाला सरळसोपा भक्तीमार्ग. ज्यात भटकावाची शक्यता कमी आहे. पण संकल्पना प्रत्यक्षात यायला वेळ लागतो. वेदनाशामक गोळी घेतल्यावर तातडीने दुखणे बरे होते. पी हळद आणि हो गोरी हे तत्व् अध्यात्मास लागू होत नाही. कारण इथे संकल्पना प्रत्यक्षात उतरायला वेळ लागतो. श्रध्दा आणि सबुरीने घेतल्यास 1 तप जातं. हे समजून घेणं जरुरी आहे. इंद्रीयांचे भोग माणसाला कधीच समाधान देत नाही. हे उमजून ज्याचे मन त्यांच्याबददल विरक्त बनते त्याला माणूस म्हणून जगण्याची पहीली अक्क्ल येते. यात तो टिकला तरच पुढे बुध्दीत हळूहळू वाढ होते आणि योग्य् संगतीमध्ये येवून आजवरच्या कर्मांचा घोर पश्चात्ताप होतो. बाकी सर्व नंतर नाहीतर तो तसाच मरतो वेळेअभावी. कारण अक्क्ल आली पण शरीराचं काय त्याचे क्षणाक्षणाला विघटनच होत असलयाने ते एकदिवस नियत श्वास संपल्याने शरीर साथ सोडतं. पण मानवी जीवनाचे परमात्म्याने नियत केलेले मूळ ध्येय आणि मिळालेले श्वास याचं गणित दत्त्प्रबोधिनीने हठयोग मार्गाचा वापर अध्यात्मकार्यात करुन सोडवता येते आणि मिळालेले श्वास संपण्यापूर्वी अंतिम ध्येयापर्यंत पोचता येते हे सांगण्याचा यशस्वी प्रयत्न्  अध्यात्मिक वृक्षाचे आकृतीबंधातुन स्पष्ट केले आहे. हया हठयोगातील प्राथमिक बाबींचा सध्या आम्ही काही मोजके सदस्य्स क्रियतेच्या अधीन राहून अभ्यास करीत आहोत. आणि त्यातील ब-याचशा  बाबी व्यवस्थिपणे पचनी उतरत असल्याचे समाधानही मिळत आहे.

रात्रप्रहर सामुहिक साधनेच्या पहिल्या पुष्पाचे वेळी बरीचशी मंडळी ही साधना कशी आहे हे बघण्यासाठी आलेली होती. यावेळी मात्र ही साधना बघणेसाठी कुणीही प्रेक्षक नव्हते. कारण जे प्रेक्षक होते ते आजच्या साधनेत सहभागी झालेले होते. आणि ते श्री स्वामी समर्थ हया दत्त्महाराजांचे सगुण नाम आणि श्री काळभैरव हया मोक्षमार्गाचे प्रवासातील मार्गदर्शक देवतेच्या नामस्मरणात गुंग होवून, श्री शिवलिलामृत हया ग्रंथात नमूद शिवतत्वाच्या रुपाशी आत्मपरिचय करुन घेण्याचा प्रयत्न करीत होते. आजच्या साधनेस पूर्वीच्या साधनेपेक्षा अधिक धार आल्याचे जाणवत होते. पूर्वीपेक्षाही आजच्या सेवेने वातावरण भारुन निघाल्याचे जाणवत होते.  आजच्या साधनेस पूर्वीच्या साधनेपेक्षा अधिक चांगला प्रतिसाद मिळाला होतो. हे कार्य फार मोठे आणि गहन आहे. एका किंवा दोन प्रयत्नात आमुलाग्र बदल होणार नाही. होणारा बदल हा अत्यंत संथगतीने होणार आहे. पण शाश्वत होईल यात शंकाच नाही. त्या आत्मपहाटेस होईल खरा काकडा सदगुरु महाराजांच्या कृपाशिर्वादाने मायेच्या काळयाकुटट रात्रीच्या अंधारातुन दत्ततत्वाचा  मानवी आत्म्यास प्रबोध हया रात्रप्रहर साधनेतुन होईल, याची पुर्ण खात्री आहे.  ज्यायोगे त्यात सहभागी होणा-या मानवाचे अध्यात्मिक जीवन अधिक बहरेल आणि पर्यायाने त्याचे भौतिक जीवन देखील ख-या अर्थाने आकारास येईल आणि मग होणारी आत्मपहाट ही दत्त्महाराजांचे चरणपादुकांना खरा काकडा ठरेल. त्या दिवसाची वाट मी आतुरतेने पहात आहे.

संपर्क : श्री. कैलाशजी जेठे
भ्रमणध्वनी : ९४२१४ ०१०१६ / ८८८८८ ८९५४५

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

स्वामीसभासद नोंदणी प्रार्थमिक अर्ज

GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती