आत्मक्रिया योग व सहज समाधि प्रबोधन: श्री बाणेश्वर् महादेव मंदीर सिल्लोड येथील दत्तप्रबोधिनीची रात्रप्रहर सामुहिक मासिक शिवसाधना : प्रथम पुष्प् दि.13.10.2017 SEO

Dattaprabodhinee Sevaa Trust’ was started in the year 2014 with a vision to create a non-profit humanitarian proficient area for spiritual people to actively engage them in soulistic existences.

ब्रम्ह अंतःकरण कसे बनते ? अनुकरणशील स्वतंत्र सद् मार्ग...!
घरातील देवघर व देव पंचायतन आधिष्ठान - २
नवनाथ ग्रंथ ( Navnath Bhaktisar ) पारायण कसे करावे ? ब्रम्हाण्डीय सामर्थ्य विश्लेषण...!
आत्मरत्न ( Soul Gem ) म्हणजे काय ? माणुस का भरकटतो ?
श्री गोरक्ष किमयागिरी प्रवाह नाथामृत सिद्धग्रंथ व कार्यसिद्धी...!
Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

सोमवार, १६ ऑक्टोबर, २०१७

श्री बाणेश्वर् महादेव मंदीर सिल्लोड येथील दत्तप्रबोधिनीची रात्रप्रहर सामुहिक मासिक शिवसाधना : प्रथम पुष्प् दि.13.10.2017


दिनांक 30.9.2017 आश्विन शु.दशमी अर्थात विजयादशमीच्या सुमुहूर्तावर श्री बाणेश्वर् महादेव मंदीर सिल्लोड येथे श्री काळभैरव अधिष्ठानाची स्थापना करण्यात आली.


Navratri utsav related internal unknown facts.spirituality,soul,philosophy,meditation practice,meditation techniques,chakras,trataka,Shiva (Hindu God),chanting,parapsychology,astral projections,tantra and mantras

सिल्लोड हया सध्याचे औरंगाबाद जिल्हयात असलेल्या तालुका मुख्यालयाचे ठिकाणास प्राचीन इतिहास आहे.सदर गावाचे पूर्वीचे नांव शिवनितापूर असल्याचा उल्लेख प्राचीन ग्रंथात आहे.  सिल्लोड हे निजामशाहीच्या राजवटीत भोकरदन तालुक्यात होते. येथील जुन्या गावठाणाच्या वेशीबाहेर डाव्या बाजुस असलेल्या प्रशस्त् आवारात श्री बाणेश्वर हया नावाने ओळखले जाणारे प्राचीन हेमाडपंथी शिवमंदीर आहे. मंदीराचे बांधकाम दगडी चिरेबंदी असल्याने आजही मंदीर सुस्थितीत आहे.

जुन्या मुख्य् मंदीराचे दगडी हेमाडपंथी शैलीने कोरीव नक्षीदार खांबावर समर्थपणे उभ्या  असलेल्या सभामंडपामध्ये एक दगडी शिलालेख मंदीरास भेट देणा-याचे लक्ष वेधुन घेतो. हा शिलालेख मोठया आकाराचा आहे. त्याचे वाचन करता यावे या हेतुने तो पांढ-या रंगाचे पेंटने ठळक करण्यात आलेला आहे. हया शिलालेखाच्या काही भागाचे कालौघात नुकसान झालेले असले तरी ते अल्प्स्व ल्प् असल्याने मूळ मजकुराचे वाचनात फारशी बाधा येत नाही. हा शिलालेख पाली भाषेतील असावा असे येथील पुजा-याशी याबाबत चर्चा केली असता त्यांनी सांगितले. या मंदीराचा  काही काळ पुरातत्व् विभागामार्फत अभ्यास झाला असावा असेही पुजारी महोदयांनी सांगितले. पण मंदीराजवळ सदरची वास्तू पुरातत्व् विभागाचे अखत्यारीत असल्याबाबत कोणताही फलक दिसुन आला नाही. मात्र् एकंदरीत हे मंदीर अंदाजे 2000 वर्ष इतके प्राचीन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिलालेखावरील भाषेचा उलगडा होत नसला तरीही त्याचे वाचन करण्याचा प्रयत्न् केला असता, त्यातुन हे मंदीर एका राजाने नाथपंथी सिध्द् पुरुषाकडून अध्यात्मिक तत्वांचा पुर्णपणे अभ्यास करुन, स्थापित करुन घेतलेले असावे असा बोध होतो.

शिलालेखावरील मजकूराचे अनुषंगाने तशी तेथे वस्तुस्थिती आढळून आली. कारण हया मंदीराचे पुजारी नाथपंथी गोसावी आहेत. सदर वारसा त्यांचेकडे वंशपरंपरेने चालत आलेला आहे. तसेच मंदीराचे समोरील आवारात काही जुन्या नाथपंथी सिध्द् पुरुषांच्या समाध्या आढळून येतात. तसेच मंदीर परिसरात एक प्राचीन चौकोनी शिवलिंग एका ओटयावर ठेवलेले दिसुन आले.पण सदरचा ओटा हे शिवलिंगाचे मूळ स्थापित स्थान नसावे.  हया चौकोनी शिवलिंगाचे अध्यात्मिकदृष्टया फार महत्व् आहे. कारण हे शिवलिंग शाबरी शक्तिने युक्त्आ हे. त्यामुळे हया शिवलिंगाच्या भोवती चार चौकी पूर्वीच्या काळी असावी. म्हणजेच हया शिवलिंगाच्या चार रक्षक देवता श्री गणपती, श्री मारुती, श्री काळभैरव आणि श्री नरसिंहदेव असाव्यात. त्यापैकी येथे दोन देवता श्री गणपती आणि श्री दास मारुती हयांच्या प्राचीन मूर्ती भग्नावस्थेत आढळून येतात. कालौघात हया मंदीराचे मोठे अध्यात्मिक नुकसान झालेले असावे. त्यात मंदीराचे मूळतत्व् नष्ट् झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.


Navratri utsav related internal unknown facts.spirituality,soul,philosophy,meditation practice,meditation techniques,chakras,trataka,Shiva (Hindu God),chanting,parapsychology,astral projections,tantra and mantras

उर्वरीत दोन देवतांच्या मूर्त्या तेथे आढळून येत नाहीत. मंदीराचे समोर उतरत्या पाय-यांची बारव आहे. त्या बारवेची बांधकाम वैशिष्टयपूर्ण बांधकाम शैली पहाताच मनात घर करुन जाते. एकूणच हया ठिकाणचे तत्कालीन महात्म्य् हे दैदीप्यमान असावे यात शंकाच नाही. म्हणुन या मंदीराचे पुरातत्व्वि भागाकडून संशोधन झाल्यास त्यावर प्रकाशझोत पडू शकेल. मंदीराचे मूळ गर्भगृह जमीनीच्या पातळीपेक्षा खोल असल्याने, भगवान शंकराचे दर्शनासाठी मुख्यसभामंडपातुन गर्भगृहात जाणेसाठी पाय-यांचा वापर करावा लागतो. गर्भगृहात कमालीची शांतता आहे. त्यामुळे येथे ध्यानधारणा केल्यास आत्मानुसंवाद जलद होऊ शकेल असे हे पवित्र ठिकाण आहे.

असो  शहर व  परिसरात नकारात्मक उर्जेचा –हास होवून चैतन्य् निर्मिती होणे, नगरातील आणि नगर परिसरातील लोकांचे स्वआत्मबळात वाढ होणे, शिवस्वामी आत्मानुसंधान करुन, मनुष्य् जीवन अध्यात्मिकदृष्टीने सार्थकी लावणे तसेच परिसरातील लोकांचे अध्यात्मिक, पर्यावरण संतुलन सारख्या ज्वलंत आणि  राष्ट्रहितकारक प्रश्नांवर सदगुरुकृपेने सामाजिक उपाययोजना अनुषंगाने हया प्राचीन शिवमंदीरात महिन्यातुन किमान एक दिवस परिसरातील लोकांनी एकत्र जमून रात्रप्रहर सामुहिक शिवसाधना केल्यास वरील हेतुसिध्दी होण्यास चालना मिळेल यादृष्टीने दत्तप्रबोधीनी सेवा ट्रस्ट् मुंबई यांचे मार्गदर्शनानुसार तेथे प्रत्येक महिन्याचे 13 तारखेला रात्रप्रहर सामुहिक साधना करण्याचे नियोजन स्थानिक भाविकांनी केले. सामुहिक सेवेचे वैज्ञानिक महत्व् तर सर्वश्रुतच आहे.त्यानुसार सदर शिवसाधनेचे पहिले पुष्प् दि. 13.10.2017 रोजी सदगुरु महाराजांचे चरणी भावपूर्वक समर्पित करण्यात आले. हया रात्रप्रहर सामुहिक शिवसाधनेस तरुण व अध्यात्मिक- सामाजिक दृष्टया हितकारक उपक्रम राबविण्यास इच्छुक मंडळींची लक्षणीय उपस्थिती होती. ही रात्रप्रहर शिवसाधना एकूण चार चरणात होती. त्यात मुख्यत्वे श्री स्वामी समर्थ, श्री काळभैरव नामस्मरण, काळभैरवाष्टक एकादश आवर्तने आणि श्रीधर स्वामी विरचित श्री शिवलिलामृत हया ग्रंथाचे सामुहिक पारायण इ. सेवेचा समावेश होता. रात्री 8-30 वाजता सुरु केलेली ही साधना दि. 14.10.2017 रोजी पहाटे 5.30 वाजेपर्यंत पुर्ण
झाली.
        
सदर प्रतिमासिक रात्रप्रहर सामुहिक साधनेचे सकारात्मक्  परिणाम येत्या काळात उत्तरोत्त्र अनुभवास येतील यात शंकाच नाही.यापेक्षा अधिक काय लिहावे. सदगुरुचरणार्पणमस्तु.

संपर्क : श्री. कैलाशजी जेठे
भ्रमणध्वनी : ९४२१४ ०१०१६ / ८८८८८ ८९५४५

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

श्री काळभैरव माहात्म्य

ब्रम्ह अंतःकरण कसे बनते ? अनुकरणशील स्वतंत्र सद् मार्ग...!

अंतरीक परिणामकारक वासना बीज कसे ओळखावे ?

नाथपंथातील प्रसिद्ध ध्यानयोग नवनाथ साधना - १ ( Nathpanthi Meditation - 1 )

थोर दत्त विभुती म्हणजे काय ?महत्त्वाची सुचना :

संबंधित पोस्टबद्दल विशेष गोपनीय माहीती फक्त संस्थेच्या अधिकृत सभासदांनाच विनंतीवरुन कळवण्यात येते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Enter your email address:

Delivered by FeedBurner

लोकप्रिय पोस्ट

स्वामीसभासद नोंदणी प्रार्थमिक अर्ज