श्री स्वामी समर्थ योग व गहन आध्यात्मिक मार्गदर्शन: दत्तप्रबोधिनीची स्वयंभु श्री नागेश्वर शिवस्वामी रात्रप्रहर मासिक सामूहिक शिवसाधना दिनांक 3.12.2017 SEO

 स्वामी साधक सदस्यता घेऊन "दत्तप्रबोधिनीकर" व्हा...!

ब्रम्ह अंतःकरण कसे बनते ? अनुकरणशील स्वतंत्र सद् मार्ग...!
घरातील देवघर व देव पंचायतन आधिष्ठान - २
नवनाथ ग्रंथ ( Navnath Bhaktisar ) पारायण कसे करावे ? ब्रम्हाण्डीय सामर्थ्य विश्लेषण...!
आत्मरत्न ( Soul Gem ) म्हणजे काय ? माणुस का भरकटतो ?
श्री गोरक्ष किमयागिरी प्रवाह नाथामृत सिद्धग्रंथ व कार्यसिद्धी...!
Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu
LIVE सुरु असलेले वाचन
चालु आठवड्यातील वाचलेली निवडक लिखाणे
चालु महिन्यातील वाचलेली निवडक लिखाणे

दत्तप्रबोधिनीची स्वयंभु श्री नागेश्वर शिवस्वामी रात्रप्रहर मासिक सामूहिक शिवसाधना दिनांक 3.12.2017कबीर सुमिरन सार है, और सकल जंजालI l आदि अंत मधि सोधिया, दूजा देखा कालI ll

सुमिरन स्मरणाचे महत्व :-

कैवल्यपदाला पोचलेले महात्मा संत कबीर स्मरणाचे महत्व सांगताना म्हणतात की, ईश्वराचे स्मरण हेच सर्वांचे सार आहे. बाकी विनाकारण भुलभुलैय्या आहे. विश्वाचा आरंभ,मध्य आणि अंताचे वेळेला देखील विचार केला तर लक्षात येईल की, भटकणारे मन ईश्वराचे नामस्मरणाच्या भुलीव्दारे अंतर्मुख होवून, आत्म्याचे शेजारी येवून बसेल. व त्यातुनच  परम सत्याचा शोध लागेल. आणि त्या सत्याचा शोध हाच आत्मज्ञानाची व त्यायोगे परमानंदाची प्राप्ती आहे .  आत्मज्ञान प्राप्तीव्दारे आत्मा मायेची व अज्ञानाची कक्षा ओलांडून निर्गुणात म्हणजे सदगुरु महाराजांचे सत्ताप्रांतात प्रवेश करतो, व स्थुल देहातील आत्मा आणि ब्रम्हांडाचे नियमन करणारा परम आत्मा हा एकच असल्याचा साक्षात्कार होतो. हया साक्षात्काराने आत्मा ख-या अर्थाने जीवन्मुक्त होवून, मोक्षपदास होईल. हया ठिकाणी सर्व प्रकारच्या चिंता, दु:ख संपुष्टात येवून, पुर्णत्वाची प्राप्ती होते.व आत्म्याचे प्रकृतीगर्भातील आवागमन कायमचे संपुष्टात येते.  बाकी उर्वरीत सर्व काही जन्ममरणाच्या चक्राला बांधलेले राहील. पुन्हा पुन्हा निर्माण होत राहील आणि पुन्हा पुन्हा अंतास पोचत राहील.

रात्रप्रहर साधनेचा आधार :  सदगुरु श्री थोरले स्वामी महाराज, संत कबीर, सदगुरु साटम महाराज आदी महापुरुष जे सदगुरु अनुग्रहमार्गे मोक्षपदाला जावून, सदगुरु महाराजांचे चरण पादुकांमध्ये विलीन झाले. तोच सदगुरुंचा आत्मज्ञानमार्ग हा दत्तप्रबोधीनी आध्यात्मिक साधनेचा राजमार्ग आहे. त्या तत्वावरच दत्तप्रबोधीनीची रात्रप्रहर साधना आधारीत आहे. स्वत्वाच्या शोधातुन आत्मरत्न शोधण्याचा  हा मार्ग असल्याने, क्षुल्लक  शंखशिंपल्यांच्या मोहापासुन साधक आपोआपच दुर रहातो. व पर्यायाने सांसारिक चिंता,  वंचनांपासुन साक्षीभावाने अलिप्तता साधतो. हा सदगुरु महाराजांचाच प्रताप आहे.

रात्रप्रहर साधना उददेश:स्वयंभु श्री नागेश्वर शिवस्वामी मंदीर जामगांव ता. मेहकर जि. बुलडाणा येथे दिनांक 3.9.2017 पासुन आजपावेतो रात्रप्रहर शिवसाधना सुरु आहे. श्री काळभैरव अधिष्ठानाच्या मदतीने शिवतत्व व त्यानंतर सदगुरु महाराजांच्या अनुग्रहाआधारे दत्ततत्व असा हा आध्यात्मिक आत्ममार्ग पार पाडण्यासाठी आत्म्यास पूर्वअनुग्रह आत्मस्थिती प्राप्त होणेसाठी ही मासिक रात्रप्रहर साधना सुरु आहे.

त्रिपुरारी पोर्णिमेची रात्रप्रहर साधना : दिनांक 3.11.2017 अर्थात वैकुंठ चतुर्दशी आणि त्रिपुरारी पोर्णिमा हया दुग्धशर्करा योगावर तत्वातुन श्री शिव- श्री काळभैरवादी दैवतांची सत्वजागृती कशा प्रकारे होते याचा मूर्तीमंत अनुभव सदर मंदीरात सदगुरुकृपायोगे दत्तप्रबोधिनीच्या सक्रिय साधकांनी हयाची देही हयाची डोळा घेतला. कारण सदगुरुकृपायोगेच गहन अध्यात्मिक रहस्ये  दृष्टीक्षेपात व अनुभवाच्या कक्षेत येतात, तत्पूर्वी ते आकलनाच्या कक्षेबाहेरच असतात हे सत्य  आहे. अर्थात सदरचा अनुभव हा सदगुरु मार्गातील असल्याने केवळ सदगुरु अधिष्ठानाची तात्विक नियमावली पुर्ण करणा-या दत्तप्रबोधीनीच्या प्रस्तुत साधनेस अनुपस्थित इतर सक्रिय साधकांखेरीज इतरांकडे  त्याची वाच्यता करता येणार नाही. 

श्री दत्त जयंतीची रात्रप्रहर साधना :माहे डिसेंबर महिन्याची रात्रप्रहर साधना दि. 3.12.2017 रोजी होती. हया साधनेस देखील दत्तजयंतीचा दुर्मिळ मुहूर्त मिळणे हा देखील श्री गुरुकृपायोगच म्हणावा लागेल. रात्री ठीक 8.00 वाजता आरतीस सुरुवात झाली. जणु काही गाणगापुरी दत्तदरबारी वास्तव्याचीच अनुभूती मिळाली. हा स्थूल आणि सुक्ष्मातील अनुभव वर्णनातीत आहे. आरतीनंतर श्री स्वामी समर्थ आणि श्री काळभैरवांचे हवनयुक्त  नामस्मरण करण्यात आले. सगळीकडे पंचतत्वांचे ईश्वरीय चैतन्य निर्माण झाले होते. मध्यरात्रीपासुन ते पहाटे ब्रम्हमुहूर्तापर्यंत श्री शिवलिलामृत हया दिव्यग्रंथाचे सामुहिक पारायण करण्यात आले. सदर रात्रप्रहर साधनेची सांगता सदगुरु तत्वांचे सदगुरु श्रीदत्तमहाराजांचे काकड आरतीने करण्यात आली. हया साधनेमुळे परिसरात श्री काळभैरवादी देवतांच्या दैवी सान्निध्याची उपस्थिती असल्याची साक्ष मनाला पटत होती. उपरोक्त दोन्ही साधनांच्या वेळी आलेले दिव्य अनुभव हयांची वाच्यता दत्त्प्रबोधिनी तत्व आणि सक्रियतेच्या मुददयांस बांधिल असल्याने येथे करता येणार नाही.  

रात्रप्रहर साधनेचे मासिक वेळापत्रक आणि कार्यपध्दती :स्वयंभु श्री नागेश्वर  शिवस्वामी मंदीर जामगांव हे बुलडाणा जिल्हयातील मेहकर तालुक्यामध्ये, मेहकर हया गावापासुन उत्तरेस मेहकर ते मोळा रोडवर आहे. मेहकरपासुन मंदीराचे अंतर 2 कि.मी. आहे. साधनेसाठी येण्याकरीता राज्यपरिवहन मंडळाच्या मेहकर ते मोळा बसेस सुरु असतात. ही साधना प्रत्येक महिन्याचे 3 तारखेला सायंकाळी 6.00 वाजेपासुन सुरु होते. एकूण चार चरणात ही साधना विभागली आहे.


  • प्रथम चरण : श्री स्वामी समर्थ सामुहिक नामजप एकादश माळी
  • व्दितीय चरण : श्री काळभैरव मंत्र सामुहिक नामजप एकादश माळी
  • तृतीय चरण : श्री काळभैरवाष्टक ‍ आर्वतनात्मक एकादश पाठ
  • चतुर्थ चरण : श्री शिवलिलामृत ग्रंथ सामुहिक पारायण


सदर साधना श्री काळभैरव अधिष्ठान आणि श्री दत्त अनुशासन यावर आधारलेली असुन, सर्वांसाठी खुली व निशुल्क आहे. सदर साधनेचे नियोजन श्री दिपक बद्रीनारायण गाडगे रा. मेहकर मोबाईल क्र. 9420561053 यांचेकडे असुन, ते श्री काळभैरवांचे दैनिक पुजारी आहेत .  त्यांना श्री काळभैरवांची कृपायोगे श्री नागेश्वर् मंदीर जामगांव येथे मंदीर निर्माणाच्याही पुर्वीपासुन अस्तित्वात असलेल्या सदर गावाचे दिव्य् महापुरुषांची कृपा प्राप्त् असल्याने ते ही जबाबदारी देहमर्यादेचा अडसर न येवू देता अगदी हसतमुखाने पार पाडीत असतात.

हया साधनेसाठी उपस्थित राहण्यास इच्छुक व्यक्तिंनी कृपया वरील भ्रमणध्वनी क्रमांकावर किमान एक दिवस अगोदर संपर्क साधुन कळवावे. जेणेकरुन बैठक व्यवस्थेचे नियोजन करणे सुलभ होते. साधनेस येताना सोबत एकवेळ जेवणाचा डबा आणावा किंवा स्थानिक असल्यास घरुनच भोजन करुन यावे. पिण्याचे पाणी व चहाची व्यवस्था मंदीरातर्फे निशुल्क उपलब्ध आहे. सदर साधनायोगे ब-याच साधकांना आलेले अनुभव विलक्षण आहेतच. सदर अनुभवांचे कथन करणे वृथा प्रसिध्दीच्या मोहापायी टाळत आहोत. पण स्वत: उपस्थित राहून स्वानुभव घेतल्यास ते अधिक संयुक्तिक ठरेल. सध्या येथे मुंबई, ठाणे, औरंगाबाद, वाशिम, बुलडाणा हया जिल्ह्या  मधुन भाविकांची उपस्थिती असुन, महिलावर्गाची संख्या लक्षणीय आहे.

अध्यात्मिक साहित्याची ऑनलाईन उपलब्धतेबाबत माहिती: 

 सदर मंदीराचे स्थानमहात्म्य ,  रात्रप्रहर साधना आणि दत्तप्रबोधिनी तत्वांची ओळख ‍ होणेसाठी google वर मराठीमध्ये श्री स्वामी समर्थ योग व गहन अध्यात्मिक मार्गदर्शन असे टाईप करावे. सदर वेबसाईट google च्या पहिल्या पानावरच आहे. किंवा blog.dattaprabodhinee.org सर्च करावे. तेथे अध्यात्मविषयक अंकशास्त्र, मंत्रशास्त्र, वास्तुशास्त्र, दत्तप्रबोधिनी योग,नामस्मरण-पारायण, त्राटक, संतांची दुर्मिळ माहिती, देव्हारा संरचना, पितृदोष, सांसारिक लोकांसाठी विविध साधना, गोरक्ष साधना, षटचक्र साधनाध्यानयोग, अष्टांगयोग,हठयोग, दैनिक सामुहिक उबुंटू प्रहरी नामसाधना, श्री दत्त उपासना, श्री काळभैरव साधना व महात्म्य , श्रध्दा व अंधश्रध्दा यातील भेद कसा ओळखावा, अध्यात्मिक अंधश्रध्दा आणि बुवाबाजी भगतगिरीला बळी न पडता अध्यात्मिक प्रगतीयोग कसा साधता येईल ॽ हया व  इतर  विविध विषयांवर दुर्मिळ सदगुरु ज्ञानमार्गाची माहिती उपलब्ध ‍ असुन सदर  लिंकचे वाचन हे भौतिक व अध्यात्मिक जीवन उंचावण्याकरीता स्व  व्यक्तिमत्वात अंतर्बाहय कायापालट होणेसाठी अत्यंत उपयोगी आहे. सदर ब्लॉगची भाषा ही आत्मिक असल्याने प्रथम वाचनात दुर्बोध वाटते. पण वारंवार वाचनाअंती आकलन व्हायला लागते. सततच्या ध्यासामुळे लेखामधील अक्षरांमागे सदगुरु महाराजांना अपेक्षित असलेली अभिव्यक्ती देखील प्रकटू लागते.  

शंका समाधान व प्रश्नोत्तरांसाठी फोरम :--- link

वाचकांच्या शंका समाधानासाठी हया वेबसाईटवर फोरम उपलब्ध आहे. त्यावर विविध अध्यात्मिक प्रश्न विचारता येतील. याशिवाय दत्तप्रबोधिनी सदस्यत्वासाठी काय कार्यपध्दती अनुसरावी ॽ याबाबत देखील लिंकवर माहिती आहे.

सोशल साईटवरील अध्यात्मिक साहित्याची उपलब्धता :

दत्त्प्रबोधिनीच्या सर्व लिंक श्री नागेश्वर संस्थान जामगांव हया फेसबुक पेजवर देखील वाचनासाठी उपलब्ध असुन, दर आठवडयास किमान 20 हजार वाचक हया पेजला भेट देत असतात. आणि स्वत:च्या स्थुल देहातुन आत्मशोध घेण्याचा प्रयत्न करीत असतात. अर्थात हे काही दिवसात, अथवा काही महिन्यात पुर्ण होणारी प्रकिया नसुन, त्यास किती कालावधी लागू शकेल हे सदगुरुकृपाच निश्चित करते.

रात्रप्रहर साधनेची भविष्यकालीन अपेक्षा   

जेथे जेथे म्हणुन शरीर आहे. तेथे तेथे ब्रम्ह आहे, आणि त्यास झाकोळणारी, बुध्दीभेद करणारी मायाही आहे. मायेमुळे  दु:ख आहे. पण याबाबत सुखांच्या भ्रमांमध्ये लिप्त आपणांस देहाचे भोग अधीन झाल्याने भान उरले नाही. म्हणुन हयापासुन दुर होण्यासाठी प्रत्येकाने आपल्या सत्यरुपाचा सदगुरु नामाआधारे मनास भुलवून शोध घेतला पाहिजे. हे रुप अशारिरीक व आंतरिक आहे आणि याच रुपात प्रत्येकाने रहावे. म्हणजेच विश्वाचे परम सत्य परमात्म स्वरुपाचा परीस सापडेल. जो सर्व भौतिक कक्षेतील व कक्षेबाहेरील विज्ञान नियमांचा परम तत्वाधार आहे.ते सत्याचेही परम सत्य आहे . तापुन तापुन उरलेले भस्म आहे. ही चिरंतन आनंदाची अवस्था प्राप्त करुन घेण्यासाठी हाच थेट मार्ग आहे. अन्य् कुठला मार्ग दृष्टीक्षेपातही नाही. म्हणुनच या मार्गाची किमान ग म भ न तरी भाविकांना कळावे यासाठी हा रात्रप्रहर साधनेचा प्रपंच चालु आहे. हीच सदगुरु सेवा आहे. हाच आत्म्‍योग आहे. या योगे एकाजरी व्यक्तीला सदगुरु तत्व +कर्मदहन+ साधना+ योग मार्गे आत्मस्वरुपाचा साक्षात्कार झाला तर तीच मोठी उपलब्धी राहील हीच माफक अपेक्षा आहे. तोच दिवस आत्मप्रौढीच्या विनाशाचा अर्थात मुक्तिचा राहील. सामुहिक साधनायोगे परिसरातील नकारात्मक् शक्तिंचा –हास आणि त्यायोगे सामाजिक व वैयक्तिक मनशुध्दी साध्यता तर दिवसेंदिवस वृध्दींगत होणारच आहे.

संपर्क : श्री. कैलाशजी जेठे
भ्रमणध्वनी : ९४२१४ ०१०१६ / ८८८८८ ८९५४५

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

शिव साधना ( Shiv and Evil ) व पिशाच्चशक्तीसंबंधी सुक्ष्मज्ञात वास्तविकता...!

ब्रम्ह अंतःकरण कसे बनते ? अनुकरणशील स्वतंत्र सद् मार्ग...!

अंतरीक परिणामकारक वासना बीज कसे ओळखावे ?

दत्तप्रबोधिनी शिवब्रम्ह वाचक श्री भस्म गणपती स्थापना- Simple and Easy

थोर दत्त विभुती म्हणजे काय ?


GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती

स्वामीसभासद नोंदणी प्रार्थमिक अर्ज

GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती