उष्णता व कफ ( पित्त ) व्यथा जाण्यासाठी उपाय : ३ दिवसात अनुभव जाणवेल. Body heat Acidity upay todage


मानवी देहाचे स्थुलस्तरीय सुत्रसंचलन अत्यंत जटील व अनपेक्षितरित्या कार्यरत असते. आध्यात्मिक साधना साध्य व समाधी अवस्था प्राप्ती हेतु स्थुल देहाचे प्रारंभिक स्वरूपात सुस्थिर असणे स्व - स्वरुपाची ओळख होण्यासाठी अतिमहत्वाचे आहे.


जसजसे स्थुल देहाचे वयोमान वाढत जाते तसेतसे आधी व्याधींचेही अस्तित्व तयार होते. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत सहनशीलतेचा अंत झाल्यावरच मानव स्वतःला सावरण्यासाठी हात पाय मारु लागतो अन्यथा नाही. 


ज्यांना वारंवार कफ होतो व औषधे घेऊनही तो कमी होत नाही अशांना श्री समर्थ रामदास स्वामींनी रचलेले पुढील स्तोत्र श्रीं चरणांचे स्मरण करुन मनोभावे वाचावे. समर्थांना एकदा कफाची व्यथा झाली त्यावेळी त्यांनी हे अष्टक रचुन मारुतीचा धावा केला आणि त्यानंतर त्यांची ही व्यथा मारुतीकृपेने नष्ट झाली. अर्थात सद्गुरुंच्या अनन्य भक्तांना या अष्टकाचा शीघ्र अनुभव येईल.

सर्वसामान्यपणे मानवाला खालीलप्रमाणे तीन गोष्टींची पदोपदी गरज असतेच..



यापैकी १ व ३ क्रमांकाचे लिखाण दत्तप्रबोधिनी ब्लाँगवर तत्पुर्वीच केले गेले आहे. आज क्रमांक २ वर महत्वाचे दोन उपाय देतो. 


शारीरिक उष्णता व कफ यांचा परस्पर आपल्या प्रकृतीशी घनिष्ठ संबंध असतो. काही वेळा वैद्यकीय सल्लामार्फत शरिरातील व्याधी निराकरण होत नाहीत त्यासाठी खालीलप्रमाणे उपाय अतिउपयुक्त ठरेल. 


शरीरातील उष्णता कमी होण्यासाठी 

मंत्र : गंगाय गुंगवा गुंगवा ॐ

हा गंगामातेचा मंत्र आहे


दररोज एक माळ १०८ जपाची रोज फिरवावीत व अनुभव कळवावा. 


कफाची व्याधी जाण्यासाठी 

ज्यांना वारंवार कफ होतो व औषधे घेऊनही तो कमी होत नाही अशांना श्री समर्थ रामदास स्वामींनी रचलेले पुढील स्तोत्र श्रीं चरणांचे स्मरण करुन मनोभावे वाचावे.


समर्थांना एकदा कफाची व्यथा झाली त्यावेळी त्यांनी हे अष्टक रचुन मारुतीचा धावा केला आणि त्यानंतर त्यांची ही व्यथा मारुतीकृपेने नष्ट झाली. अर्थात सद्गुरुंच्या अनन्य भक्तांना या अष्टकाचा शीघ्र अनुभव येईल.


हे अकरा श्लोकांचे अष्टक पुढीलप्रमाणे आहे -

अष्टक 


फणिवर उठवीला वेग अद्भुत केला 
त्रिभुवनजनलोकी कीर्तीचा घोष केला
रघुपति उपकारें दाटले थोर भारें
परम धिर उदारें रक्षिले सौख्याकारें ll १ ll

सबळ दळ मिळालें युध्य ऊदंड जालें

कपिकटक निमालें पाहतां यश गेलें
परदळशरघातें कोटिच्या कोटि प्रेतेँ
अभिनव रणपातें दुःख बीभीषणातें ll २ ll

कपिरिसघनदाटी जाहली थोर आटी

म्हणउनि जगजेठी धांवणी च्यारि कोटी
मृत्यविर उठवीले मोकळे सीध जाले
सकळ जन निवाले धन्य सामर्थ्य चाले ll ३ ll

बहु प्रिय रघुनाथा मुख्य तूं प्राणनाथा

उठवि मज अनाथा दूरी सारुनि वेथा
झडकरि भिमराया तूं करी दृढ काया
रघुविरभजना या लागवेगें चि जाया ll ४ ll

तुजविण मज पाहे पाहतां कोण आहे

म्हणउनि मन माझें रे तुझी वास पाहे
मज तुज निरावीलें पाहिजे आठवीलें
सकळिक निजदासांलागि सांभाळवीलें ll ५ ll

उचित हित करावें उधरावें धरावें

अनुचित न करावें तां जनीं येश घ्यावें
अघटित घडवावें सेवकां सोडवावें
हरिभजन घडावें दुःख तें वीघडावें ll ६ ll

प्रभुवर विरराया जाहली वज्रकाया

परदळ निवटाया दैत्यकूळें कुटाया
गिरिवर उतटाया रम्य वेशें नटाया
तुज चि अलगटाया ठेविलें मुख्य ठाया ll ७ ll

बहुत सबळ साठा मागतों अल्प वांटा

न करित हितकांटा थोर होईल तांठा
कृपणपण नसावें भव्य लोकीं दिसावें
अनुदिन करुणेचें चिन्ह पोटी वसावें ll ८ ll

जळधर करुणेचा अंतरामाजि राहे

तरि तुज करुणा हे कां न ये सांग पाहे 
कठिण ह्दय जालें काय कारुण्य गेलें
न पवसि मज कां रे म्यां तुझे काय केले ll ९ ll

वडिलपण करावें सेवकां सांवरावे

अनहित न करावें तुर्त हाती धरावें
निपट चि हटवादें प्रार्थिला शब्दभेदें
कपि घन करुणेचा वोळला रामवेधें ll १० ll

बहुत चि करुणा या लोटली देवराया

सहज चि कफकेतें जाहली वज्रकाया
परम सुख विळासे सर्व दासानुदासें
पवनमुज तोषें वंदिला सावकाशें ll ११ ll

महत्त्वाची सुचना -

दररोच सकाळी होणाऱ्या त्रासाच्या तीव्रतेच्या आधारावर ५, ११, २१ अशी अवर्तने करावीत. 

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...


दासबोध निरुपण...समास दुसरा - गणेशस्तवन

दत्त संप्रदाय व साधन, साध्य, समाधी



दासबोध परमतत्वाचे आत्मनिरुपण कसे करावे



0