मानसिक, सामाजिक, आर्थिक व आध्यात्मिक स्थैर्य प्राप्त होण्याच्या दृष्टिकोनातून दत्तप्रबोधिनी ब्लाँगवर शेकडो बहुमुल्य व प्रात्यक्षिक लिखाणे प्रकाशित केली जात आहेत. ह्या लिखाणांना सामाजिक माध्यमातुन योग्य वर्गीकरणाच्या माध्यमातुन हितोपयोगी वळण मिळावं ; त्याच बरोबर नवनवीन सद्विचार व अनमोल मार्गदर्शन पुस्तकी स्वरुपात उपलब्ध व्हावं यासाठी दत्तप्रबोधिनी प्रकाशनाची स्थापना करण्यात आली.
दत्तप्रबोधिनी प्रकाशनाद्वारे यापुर्वी कधीही व कोणीही उपलब्ध करुन न दिलेले असे स्वयंभु दत्त तात्विक आँन लाईन व आँफ लाईन आध्यात्मिक व्यास पीठ; आध्यात्मिक साधकांसाठी खुले करण्यात आहे आहे. ज्यायोगे साधक दैनंदिन जीवनगतीतुन अपेक्षेपेक्षा अधिक प्रमाणात पुस्तकी शब्दांच्या माध्यमातुन सविस्तर कार्यप्रणाली विस्तारीत रुपात समजवुन घेऊ शकता.
दत्तप्रबोधिनी प्रकाशनाद्वारे संस्थेतील सक्रीय सभासदांना येणाऱ्या लिखाण कौशल्यातुन वर्तमान व भवितव्यातील सर्वांगीण स्वामी जनहीत साध्य होत आहे. ज्यायोगे दत्त संप्रदायात दत्त विभुतींद्वारे प्रत्यक्षदर्शी संजीवन समाधीयुक्त आत्मिक मार्गदर्शन घेण्याची पुर्वानुग्रह आत्मस्थिती दत्तप्रबोधिनी लेखकांना प्राप्त आहे.
दत्तप्रबोधिनी आध्यात्मिक पुस्तके वाचण्यापुर्वी आवश्यक असलेली मानसिकता काय आहे ?
दत्त प्रभुंच्या दास्यभक्तीद्वारे प्रकट होणाऱ्या शब्द ब्रम्हातुन शुद्ध ब्रम्हाचे अवतरण अनुभवण्यासाठी प्रारंभीक स्वरुपात मनाला सद्गुरुंची गोडी असायला हवी. ह्या अंतरिक गोडव्यातुनच संबंधित सुक्ष्म क्रियेबद्दल अंतर्मुख जिज्ञासा प्रकट होते. जिज्ञासेतुनच कृतीची परिभाषा प्रकट होते. कृती घडल्यानंतरच सद्गुरु कर्म अनुभवाला येतात. या सद्गुरु कर्माला ; दत्त कर्म जे अकर्म आहे असे म्हणतात.
त्यायोगे मनाला दत्तभक्तीच्या दृढ निश्चयाशी गाठ बांधा. महाराज एक दिवस हिच गाठ दास्यभक्तीतुन ब्रम्हगाठ करतात. म्हणजेच शब्द ब्रम्हातुन शुद्ध ब्रम्ह व्हाल. यासाठी अगोदर शब्द ब्रम्ह असायला पाहिजेत त्यासाठी दत्तप्रबोधिनी पुस्तके वाचावीत.
दत्तप्रबोधिनी आध्यात्मिक पुस्तके वाचल्यानंतर पुढील आत्ममार्ग क्रमण काय आहे ?
शब्द ब्रम्हातुन शुद्ध ब्रम्हाकडे आत्मप्रयाणाच्या लागलेल्या गोडीला व प्राप्त होणाऱ्या विलक्षण मनःशांतीत उत्तरोत्तर वाढ व्हावी यासाठी खालीलप्रमाणे पर्यायी मार्ग आहेत.
१. पुस्तकाद्वारे प्रकट होणाऱ्या प्रश्नांना आपल्या आध्यात्मिक पब्लिक फोरम वर विचारावेत ; संबंधित जाणकार उत्तरे देतील.
२. दत्तप्रबोधिनी संस्थेत सभासद होऊन संस्थेच्या कम्युनिटी फोरमवर प्रश्न विचारावेत. संबंधिक साधक वर्ग उत्तरे देतील.
३. दत्तप्रबोधिनी संस्थेत सक्रीय सभासद होऊन श्रीमद् परमहंस थोरले स्वामीं महाराज अनुग्रहीत श्री. कुलदीप निकमदादांना प्रश्न विचारुन उपस्थित झालेल्या सर्व शंकांचे यथाशक्ति निरसन करवुन घ्यावेत.
दत्तप्रबोधिनी पुस्तकाद्वारे कोणतेही संसारिक व्यक्तिमत्त्व ; सद्गुरुकृपे आध्यात्मिक चारित्र्याला अनायासे प्राप्त होणे सहज शक्य आहे. त्यासाठी आपल्या आवडीच्या विषयांतर्गत योग्य ते प्रभुत्व मिळवण्यासाठी सदैव प्रामाणिक व पारदर्शक मेहेनत करावी. भगवान दत्तप्रभु स्मतृगामी आहेत. त्यांनी तुम्हाला स्वीकारावं असं वाटत असेल तर दत्त संस्कारक्षम व्हा. मानवी जीवन खुराड्यातच राहातं ; वेळेचा सदुपयोग मानवाला योग्य वेळी बचाव पक्षी मदत करतो. त्यासाठी अधी बरचसं पेरावं लागतं.
ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...
आध्यत्मिक साधना पूर्व तयारी
प्रभुत्ववादी वास्तुशास्त्र
दत्त संप्रदाय व साधन, साध्य, समाधी
अंकशास्त्रातून भाग्योदय
आगामी पुस्तके
प्रभुत्ववादी वास्तुशास्त्र
दत्त संप्रदाय व साधन, साध्य, समाधी
अंकशास्त्रातून भाग्योदय
आगामी पुस्तके
संपर्क : श्री. कुलदीप निकम
भ्रमणध्वनी : 9619011227

All about Swami Samarth, Real unknown secrets, Step by step Spiritual Growth explained, Build your soul, Boost your life on top. - Visit Website Here !
Embed श्री स्वामी समर्थ योग व गहन आध्यात्मिक मार्गदर्शन on Your Site: Copy and Paste the Code Below
