छत्रपती शिवरायांच्या पवित्र पद्स्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील किल्ले, गड व दुर्ग ( भौगोलिक दृष्ट्या ) संबंधित देवस्थानांच्या संवर्धनाहेतु दत्तप्रबोधिनी न्यास माध्यमातून दुर्गप्रबोधिनी आध्यात्मिक उपक्रम राबवण्यात येत आहे.
Please Like Facebook Page Link : Durgprabodhinee
Link : register.durgprabodhinee.org
गड किल्ल्यांची नैसर्गिक (भौतिक ) बाजु जितकी आपल्याला नयनरम्य, साहसपुर्ण आणि अभ्यासात्मक वाटते तितकीच अथवा त्यापेक्षाही अधिक रहस्यमयी आध्यात्मिक बाजु आहे आणि जी वेळ काळाच्या ओघात आपल्या सर्वांसमक्ष लोप पावत चालली आहे. छत्रपतीं व शुर मावळ्यांच्या प्रखर दैववादापासुन आपण दुरावत चाललो आहोत याकारणास्तव ही आत्मिक पोकळी भरुन काढण्याहेतुने दुर्गप्रबोधिनी आध्यात्मिक उपक्रमाची सुरवात आपण लवकरच करत आहोत.या उपक्रमांतर्गत ' गडपुरुषांच्या शोधात ' ह्या प्राथमिक मोहीमेचा प्रारंभ करत आहोत. या मोहीमे अंतर्गत आपण आपल्या गड किल्ल्यांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील देवस्थान ईतिहास, माहात्म्य, स्थापनेचे वैशिष्टये, जीर्ण देवस्थानांचे संवर्धन, खंडीत झालेल्या दैवि शिळांचे संवर्धन, देवस्थानी होणाऱ्या साधनेचे महत्व आणि सुक्ष्म गडपुरुषांची ( राखणदारांची ) दैवीशक्ती व गडावरील पावित्र्य जोपासण्यासाठी त्यांची मदत घेणे. ईत्यादी आध्यात्मिक उपक्रम राबण्यात येणार आहेत.
महाराजांच्या पवित्र स्मृतीला अनुसरुन ईच्छ्युक दुर्गप्रेमी, दुर्गरक्षक आणि दुर्ग संवर्धक भक्त गणांनी दुर्गप्रबोधिनी आध्यात्मिक उपक्रमात सहभागी व्हावे.
प्रवेश विनामुल्य आहे त्यायोगे सदस्य सहभाग नोंदणीहेतु खालीलप्रमाणे दिलेला अर्ज इच्छुकांनी भरुन पाठवावा.
Link : register.durgprabodhinee.org
श्री गुरुदेव दत्त
दत्तप्रबोधिनी न्यास

0 Comments