शिवलिंगातुन स्वयंभु प्रकटीकरण व शिवलिंगातच अंतर्ध्यान ( विसर्जन ) होणाऱ्या श्री भस्म गणपतीचे सद्गुरुकृपेने दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्टद्वारे दर वर्षाच्या माघी व भाद्रपद शुक्लपक्ष चतुर्थीला स्वयंप्राणप्रतिष्ठीत स्थापना करण्यात येते. भगवान गणपतीच्या या दुर्लभ ; याअधी कुठेही ; कोणीही व कधीही न उल्लेखलेल्या शिवब्रम्ह तत्वाची सर्वसामान्य प्रार्थमिक ओळख दत्तप्रबोधिनी सभासदांसाठी दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट माध्यमातुन प्रकाशित करत आहोत.
दत्तप्रबोधिनी योगतत्वातील सद्गुरुमय आधिष्ठाने खालीलप्रमाणे आहेत.
- १. श्री गणपती आधिष्ठान ( ब्रम्हाण्डीय द्वारपाल )
- २. श्री काळभैरव आधिष्ठान ( ब्रम्हाण्डीय क्षेत्रपाल )
- ३. श्री दत्त आधिष्ठान ( निर्गुणातीत सद्गुरु दत्ततत्व )
१. श्री गणपती आधिष्ठान ( ब्रम्हाण्डीय द्वारपाल )
माघ व भाद्रपद महीन्यात सक्रीय सभासदांच्या योगसंधानातुन स्थापित होणाऱ्या श्री भस्म गणपतीचे महत्व सर्वांगीण आध्यात्मिक प्रगती बरोबरच मानसिक, शारीरिक, आर्थिक व सामाजिक स्तरावर अनुभवण्यात येते. दोन्ही पक्षात येणाऱ्या गणेश चतुर्थी निमित्ताने दत्तप्रबोधिनी योगतत्वाच्या आधारावर आपण स्वगृही श्री भस्म गणपतीची स्थापना करत आहोत. संबंधित दैवत स्थापनेला अनुसरुन सद्गुरु आधिष्ठानाची तात्त्विक नियमावली पुर्ण करणे बंधनकारक आहे ज्यायोगे देवतेच्या निष्ठा व आस्थेचे शाश्वत रक्षण होऊ शकेल. संबंधित श्री गणेशाची स्थापना पद्धती गुप्त असुन त्याचे शिवलिंगातील विसर्जनही गुप्तरुपातुन केले जाते. ज्या तत्वाची वाच्यता कुठेही करण्यात येत नाही.
श्री नग्न भैरव व महाबुद्धी माता कृपादानाच्या संयुक्त विद्यमानाने श्री मयुरेश्वर गजाननाचे आवाहन श्री भस्म गणपतीत होऊन सद्गुरुकृपेचा अनुभव आज निवडक सक्रीय दत्तप्रबोधिनी साधक घेत आहेत. त्यायोगे त्यांची सर्वांगीण अभीव्यक्ती जनमानसात प्रभावीकारक आत्मस्थितीत उठुन दिसणे तर स्वाभाविकच आहे. गुप्त व शांतरितीने स्थापले जाणारे भस्म गणपती संधान ; सोबत त्याचे आपल्या घरातील माघ व भाद्रपद महीन्यातील सान्निध्य चैतन्यात अनपेक्षितपणे भर करुन देते त्याचा आपल्या सुक्ष्म अभीव्यक्तीवर फार मोठा होकारार्थी परीणाम दिसुन येतो. देवाचे विसर्जनही गुप्त व शांत पद्धतीने संबंधित साधनेच्या अंतर्गत केले जाते ज्यायोगे दैवत आवागमनाचा अभ्यास दत्तप्रबोधिनी सभासदांना होऊ लागतो.
२. श्री काळभैरव आधिष्ठान ( ब्रम्हाण्डीय क्षेत्रपाल )
शिवब्रम्ह वाचक श्री भस्म गणपतीचा ब्रम्हाण्डीय द्वारपाल म्हणुन तात्विक संबंध श्री काळभैरव आधिष्ठानाशी जोडलेला आहे. अद्वैत सिद्धांताच्या आधारावर सगुणरुपाने पाहता सर्व विविध रुपाने नटलेले आहे पण निर्गुण रुपाने सर्व सगुणरुप धारण करण्यापुर्वी निर्गुण व निर्गुणातीत आहेत हेच जाणुन घेण्यासाठी श्री काळभैरव आधिष्ठानाच्या माध्यमातुन श्री गणपतीचा राखणदार असणाऱ्या श्री नग्नभैरवाचे आवाहन स्थापनेपुर्वी करण्यात येते. जेणेकरुन दत्तप्रबोधिनी साधकाला स्वस्वरुपाची खरी ओळख पटेल व त्यातुन श्री गणेशाचे सद्गुरुंना अपेक्षित असलेले सगुण व निर्गुणरुप निदर्शनास येईल.
श्री काळभैरवनाथ आधिष्ठानाद्वारे चौसष्ठ भैरव ; चौसष्ठ योगिनी माता ; सव्वा लाख वेताळ व सव्वा कोटी किर्ती मुख व ईतर दैत्य आणि अनंत पिशाच्च शक्तींचे ब्रम्हाण्डीय योजन अमलात येते. यापैकी चौसष्ठ भैरवांचे प्रत्येकी आठ गणांचे आठ अष्ट भैरव त्यातील नग्न भैरव देवता एक असे अध्ययन केले पाहीजे. नग्न भैरवनाथांचे दिगंबरस्वरुप व सद्गुरुमय अनुभुती येण्याहेतुने श्री गणेशाची भस्म धारणेतुन अभिव्यक्ती प्रकट झाली पाहीजे. आपल्या आयुष्यात १२ ही महीने श्री गणेशाचे सत्व सतत आत्मसंधानातुन प्रकट होणेसाठी श्री काळभैरव आधिष्ठानांतर्गत आत्म सक्रीय असणाऱ्या श्री नग्न भैरवनाथांना अनन्य भावाने ; कोणत्याही अटी व मानसिक फटी न ठेवता शरण गेले पाहीजे. तरच परीपक्व व योग्य आत्मिक मार्ग प्रकृतीला अनुसरुन योग्य वेळी मिळु शकतो.
३. श्री दत्त आधिष्ठान ( निर्गुणातीत सद्गुरु दत्ततत्व )
श्री दत्त आधिष्ठानाचा आत्मिक संबंध श्री महाबुद्धी मातेला अनुसरुन आहे. त्यायोगे आपल्या बुद्धीत प्रकट होणाऱ्या सद्गुरुंच्या आत्मसंवेदनांचे अंतरीक प्रभावकारक विश्लेषण दत्तप्रबोधिनी साधक करतात. शाश्वत सद्बुद्धी येण्याच्या दृष्टीकोनातून सद्गुरुंच्या महाबुद्धी शक्तीचे आवाहन श्री भस्म गणपतीच्या स्थापनेत पुजीले जाणाऱ्या श्री महाबुद्धी मातेकडून करण्यात येते. जेणेकरुन मनाची निर्रथक चंचलता कमी होऊन देवाच्या सेवेत आपलं मन, काया व वाचा सहज जाणीवपूर्वक स्थिर होऊ शकेल. त्यायोगे दत्तप्रबोधिनीतील श्री दत्त आधिष्ठानाचे प्रार्थमिक आकलन होण्याची पुर्व तयारी अनुभवास येते.
श्री भस्म गणपतीतील महाबुद्धी मातेच्या चरणकृपेने साधकाचे दुरबुद्धीतुन बुद्धीकडे; बुद्धीतुन महाबुद्धीकडे; महाबुद्धीतुन सद्बुद्धीकडे व सद्बुद्धीतुन आत्मबुद्धीकडे अमावस्या ते पौर्णिमेला कलेकलेने वाढणाऱ्या चंद्रकलेप्रमाणे बौद्धिक वाढ होते. ह्या बौद्धिक वृद्धीला अनुसरुन श्रीगुरु महाराज साधकाचा आत्मोद्धार ठरवतात. आध्यात्मिक जीवनात सगुण व निर्गुणाच्याही पलिकडील असणाऱ्या बौद्धिक आत्मसंवेदनेची पार्श्वभूमी अपेक्षित असल्यास श्री दत्त आधिष्ठानांतर्गत दत्त जीवन + सुंदर चरित्र + परोपकारी वृत्ती आत्ममार्ग अनुसरुन श्री भस्म गणपतीचे सर्वांगीण आवाहन केले पाहीजे.
अनंत ब्रम्हाण्डात जे कधीही भस्म होऊ शकत नाही ते तत्व सर्वत्र भस्माच्याच निर्गुण रुपात प्रकट झालेले आहे. असे भस्म माहात्म्य अनुभव घेण्याहेतुन दत्तप्रबोधिनी शिवब्रम्हवाचक श्री भस्म गणपतीचे सक्रीय सभासदांनी यथा शीघ्र आवाहान करुन स्वतःचे व आपल्या घरातील ईतर कृतज्ञ सदस्यांचे आत्मप्रगतीकारक दत्त आधिष्ठानाद्वारे भैरवोत्थान आवश्य करवुन घ्यावे...!
ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...
दत्तप्रबोधिनी शिवब्रम्ह वाचक श्री भस्म गणपती रहस्य !
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील प्रत्यक्ष डोळस भेद कसा करावा...?
आत्मरत्न ( Soul Gem ) म्हणजे काय ? माणुस का भरकटतो ?
अंतरीक परिणामकारक वासना बीज कसे ओळखावे ?
गणपती अथर्वशीर्षातुन ( Ganapati Atharvshirsh ) गजाननाचे आवाहन कसे करावे ?
महाकालेश्वर भस्म आरती ( Mahakaleshwar Bhasma Aarti ) आध्यात्मिक महत्व.