आत्मक्रिया योग व सहज समाधि प्रबोधन: तत्वातुन स्वामींना आत्मसमर्पण् करा...! SEO

Dattaprabodhinee Sevaa Trust’ was started in the year 2014 with a vision to create a non-profit humanitarian proficient area for spiritual people to actively engage them in soulistic existences.

ब्रम्ह अंतःकरण कसे बनते ? अनुकरणशील स्वतंत्र सद् मार्ग...!
घरातील देवघर व देव पंचायतन आधिष्ठान - २
नवनाथ ग्रंथ ( Navnath Bhaktisar ) पारायण कसे करावे ? ब्रम्हाण्डीय सामर्थ्य विश्लेषण...!
आत्मरत्न ( Soul Gem ) म्हणजे काय ? माणुस का भरकटतो ?
श्री गोरक्ष किमयागिरी प्रवाह नाथामृत सिद्धग्रंथ व कार्यसिद्धी...!
Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०१७

तत्वातुन स्वामींना आत्मसमर्पण् करा...!


स्वामींना वाहून घ्या ; तत्वाच्या आधारावर मनुष्याने स्वामींना वाहून घेण्याचे कार्य केले म्हणजे समर्पण केले तर एक दिवस स्वामी आपले समर्पण नक्कीच मान्य् करतील. ज्या दिवशी आपल्या समर्पणास महाराजांकडून मंजूरी मिळाली तो दिवस म्हणजे सोनियाचा दिवसच म्हणावा.तत्वांचा अभ्यास कसा करता येईल ?
      
ज्या मुमूक्षुंना तत्वाचा अभ्यास करावयाची प्रमाणिक ईच्छा असेल त्यांनी दत्त्प्रबोधिनी सेवा ट्रस्ट् च्या  blog.dattaprabodhinee.org हया ब्लॉगवर जावून श्री. कुलदीपदादा निकम यांनी लिहीलेल्या तत्व् हया लिंकचा अभ्यास करावा. ज्या वाचकांना मराठी भाषेचे ज्ञान नाही त्यांचेसाठी sadguru.dattaprabodhinee.org हया संकेतस्थळावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या  इंग्रजी भाषेतुन लिंक दिलेल्या आहे. त्या वाचाव्यात.

तत्वांच्या अभ्यासाशिवाय पुढील आत्मक्रमण कसे करायचे ? हे कळणार नाही. तत्वाचे अभ्यासानंतर स्व्कर्मदहन कशाने होईल हे उमगून येईल.कर्मदहन एका जन्मात साधणं सर्वसामान्य् माणसाला शक्य नाही. ८४ लक्ष योनींचे भोग एका जन्मात संपण्यासाठी नवनाथांचा फॉर्म्युला वापरावा लागणार. जे संसारी देहाला शक्य आहे का ? जे जर कळलं तर लक्षात येईल की, सदगुरु महाराज स्वामी कोणाचाही योगक्षेम तात्काळ कधीच स्विकारत नाहीत. त्यासाठी आपली आंतरीक पराकाष्ठा निरंतर दीर्घकाळासाठी पणाला लावली पाहीजे. तीही विनाअट. डोक्यात कोणत्याही अटी व फटी न ठेवता. मगच व्यक्तीमध्ये समर्पणाची अभिव्यक्ती साकारायला सुरुवात होते.

समर्पण वाटतो तितका साधा शब्द् नाही.

जे जे काही माझं आहे, ज्यावर मी माझं म्हणुन स्वामीत्व् गाजवितो, ते ते सारखं महाराजांना समर्पित करीत राहणं, आणि माझं असं काहीच उरु न देणं हे झालं समर्पण . त्यात स्वार्थ आणि निस्वार्थ असं काहीच रहात नाही. समर्पण हे केवळ समर्पण असतं. जिथं शब्द् समजायला कठीण आहे, तिथं त्यामागील भावही आकलन व्हायला अवघड आणि जिथं आकलन व्हायला अवघड तिथं कृतीत येणं हे दुर्गमच. पण एकदा की ही कसोटी जमली की, भंगारालाही सोन्याचा भाव येतो.

महाराज मूर्खांचा नमस्कारही मान्य् करीत नाहीत ! पण त्यासाठी आपलं समर्पण हे महाराजांकडूनही मान्य् व्हायला हवं. त्यांचेकडून ते स्विकृत व्हायला हवं. त्यास त्यांची मंजूरी मिळायला हवी. महाराज तर मूर्खांचा नमस्कारही मान्य् करीत नाहीत…. तर समर्पण तर अनंत योजने लांबच राहीलं. मग काय करायचं ? जिथं प्रश्न् आला तिथंच उत्तरही असतं.

आपल्या समर्पणाला महाराजांच्या स्विकृतीनंतरच पुर्णत: येत असलं तरीही, महाराज आपले समर्पण मान्य् करो अथवा न करो. आपण आपले समर्पणाचे कार्य निरंतर आणि निर्विकार मनाने करीतच रहायला हवे. त्यात सातत्य् हवे.

मी स्वामींचा आणि स्वामी माझे ही भावना निर्माण कशी होईल ?

आपल्या सुख दु:खाची तीव्रता काहीही असो, आपण आनंदी असु अथवा आपल्या घरात आपल्या आई- वडील अथवा भावाचे प्रेत पडलेले असो, आपले आप्त् मरो अथवा जगो, आपल्याला जगण्यासाठी आवश्यक् असलेले अन्न् मिळो अथवा न मिळो, वेळप्रसंगी खायला नाहीच मिळालं तर गवत खाऊन जगावं, गवतही मिळत नसेल तर दगड धोंडे खाऊन जगावं, तेही मिळत नसेल तर हवा पिऊन जगायचं काम पडलं तरी चालेल. तरीही समर्पणाचे हया कामात कुठलाही बदल होता कामा नये.

मी जो जगत आहे, तो स्वामींमुळे जगत आहे. माझा हा जो देह आहे तो केवळ स्वामींमुळेच आहे. माझा जो श्वास चालु आहे, त्याला कारणही स्वामीच आहे. माझ्या जीवनाच्या प्रत्येक क्षणांवर आणि त्या क्षणांतल्या प्रत्येक कणांवर केवळ स्वामींचीच मालकी आहे. मी स्वामींचा आहे. स्वामी माझे आहे. माझा आत्मा त्यांचाच आहे. हया देहातील पंचमहाभुतंही त्यांनीच निर्माण केली, ती आजही विलग झाली किंवा न झाली तरी स्वामींचेच नांव राहील, त्यांचेच गुणगान राहील, त्यांचे नावाशिवाय अन्य् कशाचीही गोडी नाही. ही भावना जर आपल्या वागण्या, बोलण्यातुन, आचरणातुन, आहारा विहारातुन सातत्याने व्यक्त होत राहीली पाहीजे. आपल्या सुख् दुखाच्या पलीकडे आणि आपल्या देहाच्याही पलीकडे जावून समर्पणाचे कार्य नित्य् निरंतर होत राहीले पाहीजे. तेव्हा कुठेतरी, केव्हातरी महाराज सदर समर्पणास स्विकृती देतील. आणि मग हळूहळू का होईना महाराजही आपल्याला वाहून घेतील. महाराज हेच परम सदगुरु तत्व् आहे. दत्त् तत्व आहे.

समर्पणाचे दुसरे नांव वाहून घेणे हे आहे.

ही प्रक्रिया एका महिन्यात दोन महिन्यात, वर्षात दोन पाच वर्षात होणारी नाही. त्यासाठी किती वेळ लागेल काहीच सांगता येत नाही. तिथे कुठल्याही प्रकारे जोर जबरदस्ती किंवा वशिलेबाजी चालणार नाही, तिथं कुठल्याही प्रकारची नाटकं खपवून घेतली जाणार नाही. तिथं ढोंगही चालणार नाही. म्हणुनच प्रामाणिकपणे दत्त भक्ती करायला हवी. कारण जे सत्य् आहे, तेच दत्त् आहे. दत्त् तत्व् हे खडतर आहे. मनाची तयारी देहाची तयारी असेल तरच शक्य. नही तो सब झुठ है. आणि हे सगळं केल्याशिवाय महाराज भेटतही नाहीत. या शिवाय या जगात अन्य् मार्ग नाहीच. असेल तर दाखवून द्या.

अध्यात्मातील धोका

अध्यात्मात अजून एक मोठा धोका आहे. तो म्हणजे इथे एखादेवेळी मुर्खांच्या चुका माफही होतील, पण पढत मूर्खांच्या चुकांना माफी मिळत नाही. आता पुन्हा प्रश्न् आला कि मूर्ख कोण? कोणाला पढतमूर्ख म्हणायचे ? तर तत्वापासुन अनभिज्ञ असल्यामुळे ज्याचेकडून अध्यात्मिक चुका होतात तो मूर्ख. तत्वांचा अभ्यास असुनही जो अध्यात्मिक चुका करतो तो पढतमूर्ख्. कोणतीही इच्छा न बाळगता भक्ती केली, तर महाराज इतकं देतात की झोळीदेखील ओसंडून वहायला लागते. पण तत्वात चुका झाल्यावर प्रायश्चित्त्ही जबरदस्त् असतं.

अध्यात्मिक प्रवास पाय-या पाय-यांचा अध्यात्माचे मार्गावर आत्म् क्रमण करावयाचे असेल तर समर्पण ही पहीली पायरी आहे. पुढील पाय-यांकडे आणि त्यांच्या संख्येकडे मान वर करुन पाहीलं तर आपण पहील्या पायरीवरुनच माघारी फिरु . म्हणुन पुढील पाय-यांची ओळख ही आताच नको. त्या मार्गावर चालता चालता चढता चढता हळूहळू होईल. कधी कधी तर असेही वाटेल की आताच मी पहील्या पायरीवर होतो आणि आताच ब-याच पाय-या चढून आलो. हे अकल्पित कसे काय ? याचं उत्त्र एकच सदगुरु मार्ग खरोखर कल्पनेपलीकडील आहे. सदगुरु महिमा अगाध आहे.

श्री काळभैरव अधिष्ठान ते श्री दत्त् अधिष्ठान पर्यंत आत्म्याचा निर्गुण अभिव्यक्तीव्दारे अंतर्मुख सुक्ष्म् प्रवास हा दीर्घ काळानुरुप निर्धारीत आहे. यात वैराग्य् व आत्मज्ञान हे आपण ठरवून उत्पन्न् करु शकत नाही. हे सदगुरु दास्यभक्तीवर अवलंबून आहे. ज्याचे दिशानिर्देशने फक्त् महाराज ठरवतात.

दास्यभक्ती + आत्मज्ञान + वैराग्य् हे तुमच्या धारणक्षमतेवर अवलंबून आहे. त्यासाठी आपल्या देहाचे भांडे स्वच्छ् +चारित्र्यपूर्ण + अंतर्मुख असावे तरच चिकाटी + सुस्वभाव + संयमातुन स्वामी जवळ येतील .
खरा श्रीमंत तोच ज्याला सदगुरुंची कृपा प्राप्त् आहे. बाकी सगळे कफल्ल्क- भिकारी. म्हणुनच जगात राजश्रीमंतीचा खरा अध्यात्म् महामार्ग हाच आहे. जो दत्त्प्रबोधिनी तत्वातुन ज्ञात होत आहे.

संपर्क : श्री. कैलाशजी जेठे
भ्रमणध्वनी : ९४२१४ ०१०१६ / ८८८८८ ८९५४५

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

तत्व म्हणजे काय ?

आध्यात्मिक उपासनेची सुरवात कशी करावी...?

अंतरीक परिणामकारक वासना बीज कसे ओळखावे ?

नाथपंथातील प्रसिद्ध ध्यानयोग नवनाथ साधना - १ ( Nathpanthi Meditation - 1 )

थोर दत्त विभुती म्हणजे काय ?महत्त्वाची सुचना :

संबंधित पोस्टबद्दल विशेष गोपनीय माहीती फक्त संस्थेच्या अधिकृत सभासदांनाच विनंतीवरुन कळवण्यात येते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Enter your email address:

Delivered by FeedBurner

लोकप्रिय पोस्ट

स्वामीसभासद नोंदणी प्रार्थमिक अर्ज