श्री स्वामी समर्थ योग व गहन आध्यात्मिक मार्गदर्शन SEO

श्री स्वामी समर्थ योग व गहन आध्यात्मिक मार्गदर्शन

 स्वामी साधक सदस्यता घेऊन "दत्तप्रबोधिनीकर" व्हा...!

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu
LIVE सुरु असलेले वाचन
चालु आठवड्यातील वाचलेली निवडक लिखाणे
चालु महिन्यातील वाचलेली निवडक लिखाणे

गुरुवार, १३ सप्टेंबर, २०१८

व्यवहारीक भगवद्गीता काय आहे ? जीवनात विनियोग करण्याचे फायदे काय आहेत ?


एक परमरहस्यमय ग्रंथ, वास्तविकतेने गीतेचे माहात्म्य वैखरी वाणीने वर्णन करण्यास कोणीही समर्थ नाही. वेदांचे सार व जीवन जगण्याची कला भगवंताने काव्यस्वरूपात संस्कृत भाषेतुन गायली आहे. गीतेचा मुळ आशय ईतका गहन आहे की, जन्मभर निरंतर अभ्यास करत राहीले तरीही, अंत लागणे अशक्य ! प्रत्येक दिवशी नवनवीन तत्व प्रकट होऊ लागतात ; त्यामुळे भगवद् गोडी निरंतर दाटुन येते. 


दुसऱ्या ग्रंथात बहुधा थोड्या जास्त प्रमाणात संसारीक विषय मिसळलेले असतात. गीतेत भगवंताने एक अनुपम शास्त्र सांगितले आहे. 

श्रीमद् भागवत व श्रीमद् भगवद् गीता यातील सुक्ष्म परस्पर प्रार्थमिक आत्मिक संबंध कोणता ?

माझ्या जीवनात भगवंताने केलेल्या लीला व उपकारांची वाच्यता होणे कठीणच आहे तर परमग्रंथाचे सुक्ष्म कथन कसे होईल ; हा विचार करण्यासारखा विषय आहे. तरीही दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट माध्यमातून आज सद्गुरुकृपेस्तव आपल्या समक्ष महत्वाचे आत्मिक अनुसंधान करत आहे. 

श्रीमद् भागवत व श्रीमद् भगवद् गीता यातील परस्पर संबंध खालीलप्रमाणे तीन मुद्द्यांद्वारे समजुन घेता येईल.

१. श्री मद् भागवत ग्रंथ ओळख ! 
२. श्री मद् भगवद् गीता ग्रंथ ओळख !
३. श्रीमद् भागवत व श्रीमद् भगवद् गीता यातील परस्पर संबंध ! 

१. श्री मद् भागवत ग्रंथ ओळख ! 

भागवत ग्रंथराज म्हणजेच परमब्रम्ह भगवान श्रीकृष्णाचे शरीर आहे. ज्याप्रमाणे याअधी दत्तप्रबोधिनीत सांगितल्याप्रमाणे जसे भगवान शिवचे शरीर शिव गण, नंदिगण व भैरव गण असतात. त्याचप्रमाणे भागवत हे श्रीकृष्णाचे शरीर आहे. ब्रम्हर्षी शुक मुनींनी राजा परिक्षितकडे सुपुर्द केलेली हे अमृतराज कुंभ ; जे स्वर्गादी देवतांनाही प्राप्त होणे शक्य नाही. अशा सद्गुरुकृपेद्वारे संसारीक मानवाला अभुतपुर्व असा पारलौकीक व परमपुजनीय आध्यात्मिक राजमार्ग प्रस्थापित करुन दिला. ज्यायोगे असंख्य भक्तगणांचा कमी वेळेतच आत्मोद्धार झाला. 

२. श्री मद् भगवद् गीता ग्रंथ ओळख!

आपल्या सर्वांनाच अवगत आहे की, भगवंताने अर्जूनाला कुरुक्षेत्रात कौरव - पांडव युद्ध सुरु होण्यापुर्वी मधल्या युद्ध सीमेवर सांगितलेली संस्कृत काव्यमयी लीला आहे. 

भगवद्गीतेत भगवंताने अर्जुनाद्वारे अथवा गीता वाचकाद्वारे स्थुल व वैखरीयुक्त आत्मिक भुमिका न धारण करण्याचे विशद केले. त्यायोगे खालीलप्रमाणे त्याची भुमिका व उद्दिष्ट व्यक्त केली गेली आहेत. अ. वरील चित्राद्वारे दाखवलेल्या रथाचे प्रतीरुप आपले मानवी स्थुल शरीर आहे. 

ब. रथाला जोडलेल्या घोड्यांना भगवंताने ईंन्द्रीयांची उपमा दिली आहे. 

क. रथाला जोडलेल्या घोड्यांच्या लगामास मनाचा आत्मबोध प्रकट केला आहे. 

ड. रथाच्या घोड्यांची लगाम ज्या सारथीच्या हातात आहे ; तो म्हणजे आपला सद्गुरु अथवा देव किंवा भगवंत ; यात तुम्ही सगुणाद्वारे कोणतेही रुप द्या ; तरीही मुळ चैतन्य हेतु मार्ग पुरस्कर ( नियती कार्यकारण भाव ) आरुढ परमात्माच विद्यमान आहे. 

ई. भगवंत सारथीच्या पाठीमागे रथावर तो अद्वैत पुरुष जीव आहे. जो जीवनाच्या युद्ध भुमित स्वतःचे अस्तित्व गमावुन बसला आहे. 

या जीवाचे पुर्वजन्म व प्रारब्ध अकर्मवादी असल्याकारणाने भगवंताची शाश्वत साथ मार्गदर्शक स्वरुपात मिळाली. 

क. या रथावर आत्मा - परमात्म्याच्या आवाहनाने अंजनीसुत मारुती स्थुलदेहाचा रक्षणकर्ता आहे. जो धर्म अधर्म, न्याय अन्याय व नीती अनीती मधील तापांपासुन सद्गुरुमय दासाचे रक्षण करतो. 

३. श्रीमद् भागवत व श्रीमद् भगवद् गीता यातील परस्पर संबंध ! 

ज्याप्रमाणे प्रत्येक नाण्याच्या दोन बाजु असतात ; त्याच प्रमाणे भगवतकार्यही सर्व अणुरेणू व्याप्तच असते. 

श्री मद् भागवत हे समाधी साधन आहे तर श्री मद् भगवद् गीता ही जीवन जगण्याचे सर्वश्रेष्ठ व्यवहारीक साधन आहे. 

भागवत ही आध्यात्मिक जीवनात मरण्याची उत्तम कला आहे तर गीता भौतिक जीवनात जगण्याची उत्तम व्यवहारीक कला आहे. 

मानवी जीवनात गीतेतुन भागवत ग्रंथाचा विनियोग साधावा तर भागवत ग्रंथातुन आपल्या अंतरंगात भगवद् गीतेचं अनुकरण साधावं. अशा धारणेद्वारे मानवी जीवन हमीपुर्ण आशादायी व इह - परलोकास प्राप्त होते.

व्यवहारिक भगवद्गीता काय आहे ?

लक्ष्मीपती महाविष्णुस्वरुप पद्मनाभस्वामींनी गायलेल्या गीतेचा मुळ दोन भागात अर्थबोध होतो. तो खालीलप्रमाणे आहे. 

१. सांख्य योग
२. कर्म योग १. सांख्ययोग

भगवंताने सांगितलेल्या सांख्ययोगाची परीभाषा विदेही - सर्व चराचर अणुरेणु व्याप्त असलेली आहे. हा योग अद्वैत कर्माच्या सिद्धांतावर आधारलेला आहे ; ज्याद्वारे मनुष्य स्वतःच्या जीवनात कर्म - दुष्कर्म - अकर्म साक्षीभावाने जीवन अनुभवतो. अर्थात तो ईंद्रीयवेधी कर्मबंधनातुन निवृत्त असतो. या जीवा शिवाच्या बैलजोडीस काही लोक सक्तीचा संन्यास असे नाव निरुपण देतात जे मुळात चुकीचे आहे. 

चारित्र्यसंपन्न दत्त विभुतीं सांख्य योगातील अतिसुंदर उदाहरणे प्रस्थापित करतात. त्यांचा अभ्यास करावा. 

२. कर्म योग 

भगवंताने दुसरा मार्गक्रमण निष्काम कर्मयोग दिला आहे. ज्या आधारे मनुष्य त्याच्या जीवनकाळात घडणाऱ्या घटनांना आत्मसमर्पणाच्या भुमिकेतुन सद्गुरु दास्यभक्तीमार्गाद्वारे आपल्या आत्मिक अनुसंधानासोबत जोडतो. ज्या निष्काम कर्मयोगात संबंधित मानवाला अथवा पतितांना सकाम - कामना अर्थात वासनेचा प्रादुर्भाव नसतो. अशा समर्पणवादी आयुष्याला दैविक सान्निध्याद्वारे अंतरिक कलाटणी मिळुन मानव सर्वसामान्य जीवनातुन सुक्ष्म स्तरावर योगी जीवन व्यतीत करतो. 

उदा. नारळ आतुन पाण्याने भरलेलं असतं.परंतु जेव्हा ते सुकतं तेव्हा आतुन सर्व बाजुंनी वेगळं होतं अर्थात ईंद्रीय देहाचा अस्त होउन आध्यात्मिक उर्र्ध्वगमी होतो. 

वरील दोन्ही सांख्य योग व कर्म योगाचे उद्दिष्ट एकच आहे असं तुम्हाला आता कळलं असेल. परंतु भुमिका अर्थात मार्गक्रमणात फरक आहे. जो ज्याच्या त्याच्या प्रकृतीला झेपेल असा स्वीकारावा. 


संबंधित पोस्ट अनुसरुन सविस्तर, अधिक सखोल, गहन व कुठेही उपलब्ध नसलेली विशेष आध्यात्मिक साधना माहीती लिंक स्वरुपात खालीलप्रमाणे उपलब्ध आहे. दिलेल्या विशेष लिंकचा पासवर्ड हटवण्यासाठी संस्थेत सक्रीय सभासद होणे आवश्यक आहे.

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

संपर्क : श्री. कुलदीप निकम
भ्रमणध्वनी : 9619011227

GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती

गुरुवार, २४ मे, २०१८

प्रबोधिनी एकादशी : दत्तमार्गीय आत्मबोध


कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे आषाढ महिन्यात योग निद्रीस्त सत्पुरुष अथवा दत्त विभुतींना चार महिन्याच्या दिर्घ सुप्तावस्थेतुन जागृत करण्याचा दिवस. प्रबोधन म्हणजे जागृत करणे म्हणुन त्यांना प्रबोधन नामकरण करण्यात आलं. स्मतृगामी दत्त भगवंताचे दासरक्षणापोटी आवाहन करणे ; यासाठी दत्त विभुतींना आत्मियतेतुन स्थानबद्ध करणारी व करवुन घेणारी शक्ती अर्थात दत्तप्रबोधिनी ; एकादशी युक्त करण्यात आली. आपल्यातील शिव तत्व जागृत व्हावे व स्वजबाबदारीचे भान यावे यासाठी हंसः सोहं तत्वांतर्गत नियतीने आपल्याला झोपवले. खरे पाहता दत्त भगवंताला जागवणे म्हणजे स्वतःला जागवणे. 

शुक्रवार, १८ मे, २०१८

जागतिक दत्त कार्यारंभ : दत्तप्रबोधिनी प्रकाशन


मानसिक, सामाजिक, आर्थिक व आध्यात्मिक स्थैर्य प्राप्त होण्याच्या दृष्टिकोनातून दत्तप्रबोधिनी ब्लाँगवर शेकडो बहुमुल्य व प्रात्यक्षिक लिखाणे प्रकाशित केली जात आहेत. ह्या लिखाणांना सामाजिक माध्यमातुन योग्य वर्गीकरणाच्या माध्यमातुन हितोपयोगी वळण मिळावं ; त्याच बरोबर नवनवीन सद्विचारअनमोल मार्गदर्शन पुस्तकी स्वरुपात उपलब्ध व्हावं यासाठी दत्तप्रबोधिनी प्रकाशनाची स्थापना करण्यात आली.

शनिवार, २४ फेब्रुवारी, २०१८

भौतिक व्यवहारात आध्यात्मिक प्रक्षेपण कसे कराल ? त्याचा फायदा काय ?


आयुष्यात स्थुल वृत्तीलाच निर्धारित चौकट समजण्याची घोडचुक करणाऱ्या मानवाला विहिरीतल्या बेडकाप्रमाणेच जीवन जगावं व तसंच मरावं लागतं. त्याची सीमा त्याने स्वतः ओढुन घेतलेल्या अज्ञानाच्या पाघंरुनाप्रमाणे असते ज्यात त्याची वेळ गेल्यावर पश्चात्ताप अथवा अंत होतो.

शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०१८

उष्णता व कफ ( पित्त ) व्यथा जाण्यासाठी उपाय


मानवी देहाचे स्थुलस्तरीय सुत्रसंचलन अत्यंत जटील व अनपेक्षितरित्या कार्यरत असते. आध्यात्मिक साधना साध्य व समाधी अवस्था प्राप्ती हेतु स्थुल देहाचे प्रारंभिक स्वरूपात सुस्थिर असणे स्व - स्वरुपाची ओळख होण्यासाठी अतिमहत्वाचे आहे.

जसजसे स्थुल देहाचे वयोमान वाढत जाते तसेतसे आधी व्याधींचेही अस्तित्व तयार होते. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत सहनशीलतेचा अंत झाल्यावरच मानव स्वतःला सावरण्यासाठी हात पाय मारु लागतो अन्यथा नाही. 

गुरुवार, २२ फेब्रुवारी, २०१८

ठ़गेगिरी अथवा फसवेगिरीपासुन बचावासाठी उपाय - Simple and Easy


प्रत्येक व्यक्तीला जीवनात सर्वांगीण प्रगतीची कमी जास्त प्रमाणात आशा असतेच. त्यायोगे जनमानसात 'व्यक्ती रेखा' अनंत संकटांना स्वबळाद्वारे लढा देऊन यशस्वी सुद्धा होतातच. परंतु त्यांच्या सभोवताली वावरत असणारे त्यांचे स्वकीय व परकीय नातलग, मित्र मंडळ आणि व्यावहारिक चिकित्सक त्यांच्याशी दुट्टप्पी भुमिकेद्वारे घातपाती कारस्थाने करताना विश्वासघात तृर करतातच ; ज्यायोगे आपली जीवनकाळातील झालेली बहूतांशी मेहेनत फुकट जाते.

अशी वेळ येण्यापुर्वी संबंधित ठग्यांकडुन फसवणूक न व्हावी यासाठी खालीलप्रमाणे काही महत्वपुर्ण उपाय दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट माध्यमातून देत आहोत. 

बुधवार, २१ फेब्रुवारी, २०१८

नजर लागू नये यासाठी उपाय - १


एखाद्या वाईट नजरेच्या व्यक्तीची दृष्टी जर लहान बालकावर, मोठ्या व्यक्तीवर, पशु पक्षी अथवा ईतर सुंदर वस्तुवर पडली म्हणजे त्याचे काय परीणाम होतात याची सर्वसामान्य कल्पना सर्व जणांना येत असते. दत्तप्रबोधिनी तत्वाधारे वाईट नजर कशाप्रकारे उतरवता येते हे पुढील प्रमाणे देत आहोत. 

दृष्ट लागणे म्हणजे निरोगी व समृद्ध मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक व आध्यात्मिक परिस्थितीत विस्मयकारक दुःखद बदल घडतात. उदा. लहान बालके आजारी पडणे व सतत रडणे, प्रौढ व्यक्तीला दृष्ट लागणे म्हणजे अपचन विकार, भुक मंदावणे व अर्थिक नुकसान आकस्मितरित्या होणे, गाई म्हशींचे दुध आटणे अर्थात त्यांच्या आचळातुन रक्त निघु लागणे, दृष्ट लागणे म्हणजे एखादी सुंदर वस्तु अगर मुर्ती भंग पावणे. संबंधित त्रासातुन सहज मुक्तिप्राप्ती हेतु दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट द्वारे मांडलेल्या डोळस व परीणाम कारक उपाय योजना पुढील प्रमाणे साधाव्यात.

गुरुवार, १ फेब्रुवारी, २०१८

Samarth Ramdas Swami Manache Shlok MP3


मनाला अस्थिरता, द्वंद्व अथवा अस्वस्थतेपासुन तात्काळ मुक्ती मिळवुन देण्यासाठी खालीलप्रमाणे कमीतकमी कोणतीही एक क्लीप दररोज दिवसातुन कमीतकमी एकदा तरी अवश्य ऐकावी. सरासरी ३ ते ६ महिन्याच्या उपरांत स्वतःत थोडाफार बदल होत असलेला अनुभवास येईल. 

Old Bhakti Geet MP3शनिवार, २७ जानेवारी, २०१८

दत्तप्रबोधिनीची स्वामीमय सामूहिक रात्रप्रहर सेवा


सामुहिक साधनेचे महत्व:

जेव्हां १०० लोक एकत्रितपणे साधना करतात तेंव्हा त्यांच्या लहरी जवळजवळ ५ कि.मी. पर्यंत पसरतात आणि नकारात्मकता नष्ट करून सकारात्मकता निर्माण करतात. 

आइन्स्टाईनने शास्त्रीय दृष्टिकोनातुन सांगितले आहे की एका अणुचे विघटन केल्यास तो त्याच्या शेजारील अनेक अणूंचे विघटन करतो त्यालाच आपण अणुविस्फ़ोट म्हणतो. 

हीच गोष्ट आपल्या ऋषी-मुनीनी आपल्याला हजारो वर्षांपूर्वी सांगितली आहे की पृथ्वीवरील केवळ ४% लोकच ध्यान करतात, त्याचा फायदा उर्वरीत ९६% लोकांना होतो. 

शनिवार, २० जानेवारी, २०१८

कुलदैवत उत्पत्ती व योग्य जागर पार्श्वभूमी - १


शिवतत्वाच्या अनुशंघाने योग्य कुलदैवत कुळाचार ( सगुण व निर्गुण ) कशा पद्धतीने ; कोणाच्याही मदतीशिवाय पुर्णत्वाला कसे पोहोचवता येईल; याहेतुने दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट माध्यमातून कुलदैवत साधना व साध्य अतिदुर्लभ माहिती देत आहोत. 

 स्वामीसभासद नोंदणी प्रार्थमिक अर्ज