वीर्य स्तंभन साधनेद्वारे कुंडलिनी जागरणाची हि विधी अतिशय दुर्लभ आहे. Kundalini Jagran in Marathi


समर्थ रामदास स्वामींनी नर देह उत्तमाचा देह अशी संज्ञा व्यक्त केली आहे. संसारिक आणि आध्यात्मिक जीवनात आपलं शरीर सुदृढ व बलवान असणं अतिशय महत्वाचं आहे. अशा स्थितीत आपल्या आध्यात्मिक साधनेतुन आपण चार हि पुरुषार्थ अर्थात धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाची होते. या व्यतिरिक्त कुंडलिनी जागरण आणि चक्र साधना हि एक अभुतपुर्व योगक्रिया आहे. 


कुंडलिनी जागरण क्रियायोगात वीर्य अर्थात धातु संग्राहाचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. या संबंधी धातु संग्रह होण्यासाठी म्हणजे वीर्य स्तंभित होण्यासाठी वीर्य स्तंभन साधना Virya Stamabhan Sadhana केली जाते. 


या साधनेतुन आपलं वीर्य संग्रह वाढुन विलक्षण शारिरीक आणि मानसिक बळाची प्राप्ती होते. या बळाच्या स्वानुभवातुन आपण आपले भौतिक आणि आध्यात्मिक जीवन आनंदाने व्यतित करु शकतो. 

वीर्य स्तंभनाने आपल्या देहातील धातु संग्रह ऊर्ध्वगामी होऊन ऊर्ध्वरेता योगक्रीयेला प्राप्त होतो व शरीर वज्रासारखे दृढ बनते. याचा उपयोग कुंडलिनी जागरणावेळी होतो. त्यायोगे सर्पिणी शक्ती आपल्या मुलाधार चक्राजवळ उभी झाल्यास तीची असीम व प्रचंड ऊर्जा सहन करण्याची ताकद धातु संग्रहामुळे शरीरामधे असते. अशा जागरण क्रीयायोगाचा आपण आत्म साक्षात्कार वृत्तीने प्रत्यक्ष दर्शन घेता.



आपल्या देहातील षट चक्र भेदनादी क्रीया कुंडलिनी जागरणाद्वारे सिद्ध होतात त्यासाठी आपले शरिर वज्रासारखे मजबुत असणे महत्त्वाचे आहे. आपल्या साधन, साध्य आणि समाधी तुन नामस्मरणादी साधनेचा विनियोगातुन वीर्य स्तंभन साधना केल्यास ईह परलोक सुखाची प्राप्ती होते.




ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...




Post a Comment

0 Comments

0