आपल्या मनात उठणार्या क्रीया - प्रतिक्रिया दुसऱ्या काही नसुन काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार इत्यादींचा संपुर्ण विकारसमुह आहे. हे भौतिक अथवा क्षणिक सुखप्राप्ती करीता उत्तेजित होतात आणि कृतीशील मानवाला नरकाच्या गुहेत ढकलुन देतात. अशा सर्व आसक्तींचा मार्ग बदलणें म्हणजेच त्राटक विद्या असे म्हणतात. मनाला संस्कारक्षम बनवण्यासाठी त्याला प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. आणि ती प्रशिक्षण प्रक्रिया म्हणजे त्राटक साधना...!



त्राटक विद्येचे दोन प्रकार पडतात...!
- १. बाह्य त्राटक
- २. अंतर त्राटक
सुरुवातीला त्राटक साधना ही थोडी कष्टदायक असतेच, थोडा त्रास सहन करावाच लागतो.
१. बाह्य त्राटक
हि साधना स्थुल चक्षुंच्या मदतीने केली जाते. ह्या साधने आरंभी साधकाला एकटक न पापणि लवता किमान ३ मिनीटे ठरवलेल्या वस्तुवर नजर रोखता आली पाहीजे. ह्या क्रीयेत चक्षुंना कोणत्याही प्रकारची हानी होता कामा नये. कष्ट सहन करण्यालाच तितीक्षा असे म्हणतात. सुखासीन व्यक्ती पुरुषार्थ हरवुन बसतात तर त्राटक साधनेने पुरुषार्थ प्रबळ बनविला जातो.
ह्या विद्येस प्राणाकर्षण विद्या असेही म्हणतात. संबंधित मुर्ती अथवा प्रतिमेवर सर्व लक्ष केंद्रित करुन मनाचा लय प्राणशक्तीत केला जातो त्यायोगे आपल्या चैतन्यशक्तीत अनाकलनीय वाढ होते व तात्काळ पारलौकिक जगताचे अनुभव आपल्याला येण्यास सुरवात होते. प्रतिमा, मुर्ती, ज्योती आणि ईतर त्राटक साधनेने आपल्या नजरेला नवीन उर्जा नवे चैतन्यमय विचार प्राप्त होऊ लागतात. ह्याचा संबंध आपल्या देहातीत दुर्गुणांशी असलेल्याना आपल्या वागणुकीत विलक्षण बदल होऊन जीवनातील न दिसणाऱ्या दुःखांचे निराकरण होते. आपली मानसिक, शारीरिक, सामाजिक, आर्थिक आणि आध्यात्मिक विघ्ने दुर होऊन राजमार्ग प्राप्त होऊ शकतो.
बाह्य त्राटकाद्वारे ज्याप्रमाणे स्थुल वस्तूंच्या मागे दडलेले सुक्ष्म चैतन्य अनुभवास येऊ लागते त्याच प्रमाणे आपल्या सभोवताली असलेले आपले नातेवाईक, मित्रवर्ग आणि ईतर व्यक्तीरेखांचेही आपल्याला सुक्ष्म आकलन होऊ लागते. ज्याअर्थी भविष्यात संबंधित विषय फसवणूक टळण्यास आपल्याला मदत होत असते. बाह्य त्राटक विद्या अत्यंत शक्तीमय आणि अनपेक्षित अनुभव प्रदान करणारी विद्या आहे.
बाह्य त्राटकाचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत.
- १. मुर्ती त्राटक
- २. ज्योती त्राटक
- ३. स्फटिकगोल ( crystal gazing ) त्राटक
- ४. प्रतिमा त्राटक
२. अंतर त्राटक
ही साधना सुक्ष्म चक्षुंच्या मदतीने केली जाते. बाह्य त्राटकाच्या तुलनेत साधकाला अंतर त्राटकात काहीही धोका नसतो. अंतर त्राटकाची सुरवात आरंभावस्थेत किमान २० मिनीटांपासुन करण्यात येते. ज्या साधकांना योगक्रीया शिकण्याची ईच्छा असते त्यांना अंतर त्राटक साधना किमान ४००० तास करावीच लागते. ह्या साधनेने आपला पुरुषार्थ प्रबळ होतोच पण सोबत दैवि सान्निध्यातही अमोघ वाढ होते.
अंतर त्राटक साधनेने देहातील शुद्धीकरणावर प्रार्थमिक दृष्ट्या भर दिला जातो. हे शुद्धीकरण स्थुल देहाच्याही मुळाशी असलेल्या सुक्ष्म देह, कारण देह, वैश्विक देह याच सोबत देहातील सहा चक्रांना प्रभावित करतात. ज्यायोगे साधकाचे अंतर बाह्य मन निर्मळ होऊन भगवतचरणी चित्तलयाला सुरवात होते. बाह्य त्राटकाच्या तुलनेत अंतर त्राटक अनंत पटीने अधिक ताकदवान असते. भगवंताची खरी ओळख करवुन देणारे ऐकमेव अग्रेसर विद्या सदन म्हणजे अंतर त्राटक साधना...!
आत्मसाक्षात्काराची तीव्र ईच्छा असलेल्या साधकांनी अंतर त्राटकावर विशेष भर दिला पाहीजे. अंतर त्राटकाचे प्रकार खालीलप्रमाणे दिले आहेत.
- १. अंतर सुर्य त्राटक
- २. सोम त्राटक
- ३. रुद्राग्नि त्राटक
- ४. ह्दय त्राटक
- ५. प्रतिबिंब त्राटक
- ६. चित्तबिंदु त्राटक
- ७. अंतर ज्योती त्राटक
- ८. ॐकार त्राटक
- ९. नासिकाग्र त्राटक
- १०. त्राटकाद्वारे कुंडलीनी जागृती
महत्त्वाची टिप...
संबंधिक साधनाक्रीया संबंधित साधना तज्ञांच्याच मार्गदर्शनाखाली कराव्यात.
संपर्क : श्री. कुलदीप निकम
( Dattaprabodhinee Author )
( Dattaprabodhinee Author )
भ्रमणध्वनी : +91 9619011227
( Whatsapp Or Sms Only )
( Whatsapp Or Sms Only )
ह्या
पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...
ज्योती त्राटक : अत्यंत सहज व सोपी कार्यसिद्धी !
श्री काळभैरव माहात्म्य - Real unknown secrets explained

Cure Problems With Divine Powers. 100s Of People Cured ! Chakra Healing balancing. Ancient Indian Science. Based on Ashtaang Yog. Learn Yogic Healing. Types: Learner's Workshops, Stress Management, Divine Karma Cleansing, Mind empowerment, Chakra Balancing. - Visit Website Here !
Embed दत्तप्रबोधिनी न्यास on Your Site: Copy and Paste the Code Below
