आत्मक्रिया योग व सहज समाधि प्रबोधन: ज्योती त्राटक ( Jyoti Tratak ) : अत्यंत सहज व सोपी कार्यसिद्धी SEO

Dattaprabodhinee Sevaa Trust’ was started in the year 2014 with a vision to create a non-profit humanitarian proficient area for spiritual people to actively engage them in soulistic existences.

ब्रम्ह अंतःकरण कसे बनते ? अनुकरणशील स्वतंत्र सद् मार्ग...!
घरातील देवघर व देव पंचायतन आधिष्ठान - २
नवनाथ ग्रंथ ( Navnath Bhaktisar ) पारायण कसे करावे ? ब्रम्हाण्डीय सामर्थ्य विश्लेषण...!
आत्मरत्न ( Soul Gem ) म्हणजे काय ? माणुस का भरकटतो ?
श्री गोरक्ष किमयागिरी प्रवाह नाथामृत सिद्धग्रंथ व कार्यसिद्धी...!
Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

सोमवार, ४ जुलै, २०१६

ज्योती त्राटक ( Jyoti Tratak ) : अत्यंत सहज व सोपी कार्यसिद्धी


जेथे प्रकाश आला तेथुन अंधकार गेला, जेथुन अंधकार जातो तेथेच मांगल्य आहे. सर्वच शुभ आहे, तेथे आरोग्य आहे, तेथे धनसंपदा आहे. बुद्धीमध्ये प्रकाश पडताच शत्रुबुद्धी कुंठित होते. शत्रुचा विनाश निश्चितच होतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर व अहंकार हे षडरिपु जीवनात अड्डा जमवुन बसलेले आहेत. जीवनात प्रकाश येताच, ज्ञानरुपी दीप प्रगटताच हे सर्व रिपू नाश पावतात. पापाचे कारण मानवाचे अज्ञान आहे आणि ह्या अज्ञानाच्या अंधकाराला दुर करण्याचे साधन ज्योती त्राटक आहे. माझ्या जीवनत ते ज्योतिलिंग सत्याची जाणीव करुन देते तो शिव आत्मप्रकाश आणतो. अज्ञानाच्या तिमिराला जाळुन टाकतो.


http://blog.dattaprabodhinee.org/2016/07/jyoti-tratak_4.html

असतो मा सत् गमय l तमसो मा ज्योतिर्गमय l मृत्योर्माSमृत गमय l

मानवी जीवनाचा प्रवास असत् मधुन सत् कडे, अंधारातुन प्रकाशाकडे तसाच मृत्यूकडून अमरत्वाकडे झाला पाहिजे. ह्या प्रवासात मानवाबरोबर दिव्या-प्रमाणे जळत राहुन त्यांच्या जीवनमार्गावर प्रकाश पसरविणारे महापुरुष मार्गदर्शक बनुन उभे राहातात.

ज्योती त्राटकाचे दोन भाग खालीलप्रमाणे आहेत.

१. बाह्य ज्योती त्राटक

२. अंतः ज्योती त्राटक

१. बाह्य ज्योती त्राटक

ज्योतिब्रम्ह अथवा ज्योर्तिलिंग ही आध्यात्मिक संज्ञा एकच आहे. या संज्ञेत दिपज्योतीला अढळ आणि शाश्वत असे स्थान शास्त्राने दिले आहे. ज्या अर्थी दिपज्योती अढळ, अनंत आणि अनाकलनीय त्या अर्थी ते सुमेरु तत्व आहे. सुमेरु तत्व आहे म्हणजेच त्याचे उल्लंघन करता येत नाही. ज्या तत्वाचे उल्लंघन होत नाही ते सुमेरु तत्व म्हणजे परमब्रम्ह सद्गुरु तत्व असं समजलं पाहीजे. ह्या तत्वाचा घनिष्ठ संबंध आपल्या मनाशी, देहाशी आणि आपल्या संसाराशी अत्यंत गुढ रहस्यांनी जोडलेला आहे.

दिपज्योती आपल्या घरात तेवत असलेली सुक्ष्म अस्तित्वातील कुलदेवतेची अभिव्यक्ती असते. ज्या घरांमधे कुलदैवत हरवलेले आहे अथवा गहाळ झाले आहे. ज्या लोकांना आपल्या कुलदैवतेची कृपा प्राप्त करण्याची दृढ ईच्छा आहे. आपण आणि आपले कुलदैवत हा अविर्भाव ज्या भक्तगणांमधे दरवळतो त्या साधकांनी ज्योती त्राटक साधना अवगत करावी.

बाह्य ज्योती त्राटक साधनेद्वारा आपण आपल्या ईष्ट देवतेचे निर्विघ्नतेने दर्शन घेऊ शकतो. त्यासाठी सतत ४५ दिवस संबंधित सराव करावा लागतो. आपल्या ध्यान शक्तीत जर काही विशिष्ट मंत्रोच्चारण अथवा नामस्मरण आचरणात आणले तर निश्चितपणे त्राटकाचा अनपेक्षित आधार साधकाला प्राप्त होतो. आपल्या अंर्तमनावरील पापक्लेशाचे जमलेले थर धुवुन टाकण्यात ज्योती त्राटक साधकाला प्राधान्यतः सहाय्यक ठरते. एकदाकी अंर्तमन निर्मळ होऊ लागले असता अनायासे श्री गणपती, श्री सद्गुरु व आदिशक्तीची कृपा होण्यास सुरवात होते. त्याअर्थी पुढिल साधना मार्गक्रमणाकरीता साधक तठस्थ होतो.

२. अंतः ज्योती त्राटक

ह्दयाच्या आत्मगुहेतील अंतःकरणातुन सहज होणाऱ्या ज्योती त्राटकाला अंतः ज्योती त्राटक असे म्हणतात. अंतः ज्योती त्राटक हे बाह्य ज्योती त्राटकाच्या तुलने अत्याधिक पटीने शक्तीयुक्त असते. अंतः ज्योती त्राटकाचा मुळ हेतु साधकाला समाधी अवस्थेपर्यंत पोहोचवणे. ह्या मार्गक्रमणामधे उत्पन्न होणाऱ्या विघ्नांना अनायासे दुर करण्याचे अद्भुत सामर्थ अंताः ज्योती त्राटकात असते. ज्याप्रमाणे बाह्य ज्योती कुलदैवत आणि संंबंधित साधकामधील अंतर कमी करण्याचे काम करते. त्याचप्रमाणे अंतः ज्योती त्राटक परमात्मा आणि आत्मा यांमधील न दिसणारे दुष्ट प्रवृत्तींना नष्ट करुन सरीता सागराला मिळवण्याचे कार्य करते.

अंतःकरण म्हणजे काय ?

आध्यात्मिक साधकाला कोणतीही अंर्तक्रीया करण्यापुर्वी अंतःकरणाचा मतीतार्थ अतिस्पष्टतेने आत्मसात करता आला पाहीजे तेव्हाच घडणाऱ्या सर्व साधनेला काही अंशी सद् चारित्र्याला अनुसरुन अर्थ आहे. अन्यथा उलट्या घागरीवर पाणी ओतणं असं समजावं.

http://blog.dattaprabodhinee.org/2016/07/jyoti-tratak_4.html

अंतः ज्योती त्राटक साधनेत भगवत्मय अंतः करणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे अंतः करण कसे बनते ह्याची परीभाषा समजणें हेतु जिज्ञासु साधकांनी मला प्रत्यक्ष संपर्क करावा. अंतः त्राटक साधनेत साधकाचे सर्व ध्यान आपल्या भृकुटी मध्यावर ठेवले पाहीजे. ज्याअर्थी प्रारंभावस्थेत बर्याच प्रमाणात मानसिक पीडेला सामोरे जावं लागतं परंतु ऐकदा की भगवत्मय अंतःकरण स्फुरायला सुरवात झाली की सर्व प्रकारची आत्मवादळे शांत होऊ लागतात. देहाच्याही पलिकडील आत्मानंदाचा अनुभव साधकाला येऊ लागतो. एका नवीन युगात, जगात आणि देहात आपण प्रवेश करत आहोत असे पारलौकीक आणि सुक्ष्म अनुभव आपल्याला येऊ लागताता.

ज्याअर्थी तन्मयतेने अंतः ज्योती त्राटक करण्यात मग्नता वाढल्यास), साधकाने स्वदेह तुपाच्या आत्मसंज्ञेकडे वळविला पाहीजे. भगवंताला तुपाच्या दिव्याची अतिओढ असते. त्याअर्थी स्वयं अंतः ज्योती त्राटक साधनेत साधकाने स्वतःचा देह संसारीक दहीपासुन ते आध्यात्मिक तुपापर्यंत यथाशक्ति मार्गक्रमित करायाला पाहीजे. समाधी अनुभुती घेता आली पाहीजे.ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

सुर्य त्राटक - एक अद्भुत रहस्यमय विद्या...!

चंद्र त्राटक - चंद्रकोर आणि प्राणशक्तीचा रहस्यमयी संबंध...!

त्राटक विद्या म्हणजे काय ? त्राटक विद्या व साधना महत्व...!


महत्त्वाची सुचना :

संबंधित पोस्टबद्दल विशेष गोपनीय माहीती फक्त संस्थेच्या अधिकृत सभासदांनाच विनंतीवरुन कळवण्यात येते.

संपर्क : श्री. कुलदीप निकम
भ्रमणध्वनी : 9619011227

Click here to subscribe DATTAPRABODHINEE SEVAA TRUST

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Enter your email address:

Delivered by FeedBurner

लोकप्रिय पोस्ट

स्वामीसभासद नोंदणी प्रार्थमिक अर्ज