नासिकाग्र त्राटक ( Nosetip Tratak ) - सुषुम्नेतील राजमार्गद्वार कसे ओळखावे ? - Step by step


आयुष्यभर संसारीक मनुष्य स्वतःच्याच दृष्टीने स्वतःच्या नाकावर ईच्छ्या, महत्वाकांक्षा, द्वेष, राग, अहंकार, दंभ व कपट यांसारखे कितीतरी दुर्गुणांच साम्राज्य जोपासतो. ह्या सर्व क्षणभंगुर रिपु नभांमधुन योगसाधनेची वास्तविक स्वभुमी नासिकाग्रावर कशी दिसेल ? हाच मोठा प्रश्न आहे. नासिकाग्रावरील घुटमळत असणाऱ्या सर्व रिपु दुर्गुणांचा नाश करुन स्वतःची योगक्रीयात्मक स्वदेह भुमिका समजण्यासाठी नासिकाग्र त्राटकाबद्दल निवडक माहीती देत आहोत.

आयुष्यभर संसारीक मनुष्य स्वतःच्याच दृष्टीने स्वतःच्या नाकावर ईच्छ्या, महत्वाकांक्षा, द्वेष, राग, अहंकार, दंभ व कपट यांसारखे कितीतरी दुर्गुणांच साम्राज्य जोपासतो. ह्या सर्व क्षणभंगुर रिपु नभांमधुन योगसाधनेची वास्तविक स्वभुमी नासिकाग्रावर कशी दिसेल ? हाच मोठा प्रश्न आहे. नासिकाग्रावरील घुटमळत असणाऱ्या सर्व रिपु दुर्गुणांचा नाश करुन स्वतःची योगक्रीयात्मक स्वदेह भुमिका समजण्यासाठी नासिकाग्र त्राटकाबद्दल निवडक माहीती देत आहोत.

त्राटक विद्येतील ईतर प्रकारांपेक्षा नासिकाग्र त्राटक योगक्रीया शिकण्यासाठी मोलाची भुमिका बजावण्याचे काम करते. नासिकाग्र त्राटकात आपल्या नाकापासुन ते खाली गुद्द्वारापर्यंतचा प्रदेश नासिकाग्र त्राटक साधनेत प्रभावित होत असतो. नासिकाग्र त्राटक साधना करण्यापुर्वी साधकाला स्वशरीर ज्ञान असणे बंधनकारक आहे. प्रारंभीक अवस्थेत संबंधित त्राटकात एकटक ध्यान केंद्रित करुध नये कारण यापुर्वी बर्याच साधकांनी अतिशयोक्ती व हट्टापायी प्रयत्न केला परंतु डोकेदुखी, चक्कर येणे, डोक जड होणे, डोळ्यावर ताण येणे अशा तक्रारी प्रार्थमिक स्तरावर पाहाण्यास येतात.


आध्यात्मिक साधनेत आपल्या हंसःसोहं अजपाजप होणाऱ्या नासिकाग्र ते नाभी स्थानापर्यंत प्राणवायु प्रवाहीत होणे व परत नासिकाग्रातुन बाहेर येणे हा श्वासोच्छ्यवास सुरळीत, नियमित व जितका हळुवार होत राहील तितका नासिकाग्र त्राटक साधनेसाठी देह वस्तुस्थिती उत्तम समजावी. सर्दी, खोकला व तत्पुर्वी डोकेदुखी असल्यास उपहासात्मक संबंधित साधना करुन नये. आपल्या नाकातुन ईडा व पिंगला नाडी मार्फत प्राणवायुचे आवागमन होत असते तर याच उलट योग साधनेच्या सिद्धावस्थेत योगीजनांचे ईडा व पिंगला श्वासोच्छ्यवास विसर्जित होऊन सुषुम्नेच्या माध्यमातुन प्राणशक्तीचे आवागमन होते. ईडा व पिंगला यांचा संंबंध आपल्या स्थुल देहाशी आहे तेथे प्राणवायुच्या आधारावर स्थुल देह कार्यक्षम असतो. ही क्रिया अधोमुखी म्हणुन गणली जाते.


योगीजने सिद्धावस्थात उद्ध्वमुखी प्राणोत्कर्षन करतात. ह्या प्राणशक्तीच्या आत्मसंचयाचे प्रमुखस्थान नासिकाग्र आहे. या अवस्थेत ईडा व पिंगला समांतर अवस्थेत येऊन सुषुम्न नाडी जागृत होते. ह्या सुषुम्नच्या तुरियावस्थेतुन मार्गक्रमण करत असताना साधक सहज समाधीचा अनुभव क्षणोक्षणी घेत असतो. ईडा व पिंगला यांची निष्क्रियता म्हणजेच आध्यात्मिक भाषेत सुर्य व चंद्राच्या पलिकडे साधकाचे अस्तित्वात पोहोचते. या आत्म संज्ञेला आध्यात्मात सिद्धावस्था असे म्हणतात. ही सिद्धावस्था ह्दयस्थ आत्मा आकाश व्यापुन पुन्हा प्राणशक्तीच्या स्वरुपात नासिकाग्रावर स्थिर होऊन व्यापक राहाते. ही आत्मानंदाची परिभाषा येथे यथाशक्ति लिहीत आहे पण माझा आनंद मी शब्दात व्यक्त करु शकत नाही. तो तर स्वतः अनुभवास येणं महत्वाचं...!



नासिकाग्र त्राटकातील योग अंगांचा साधनेपुर्वी सावधानता पुर्वक अभ्यास करणे आवश्यक आहे. संबंधित योगअंगे खालीलप्रमाणे आहेत...


  • १. नाकाचा अग्रभागाचे तत्व चिंतन
  • २. भ्रुकुटी मध्यावर दृष्टी स्थिरता
  • ३. प्राणवायुचा अंतर्गत नाडीप्रवाह संधान
  • ४. ह्दय प्रदेशातील प्राणशक्ती व प्राणवायु यांचा परस्पर संबंध
  • ५. नामी स्थानातील अधोमुखी अमृत कुंभ व प्राणवायु संबंध
  • ६. स्वाधिष्ठान चक्र स्थित ' वं ' बीजात्मक प्राणशक्ती व प्राणवायुचा संबंध
  • ७. मुलाधार चक्र स्थित ' लं ' बीजात्मक प्राणशक्ती व प्राणवायु संबंध

सृष्टीतील स्वर्ग, मृत्यु व पाताळ लोकाचे देहांतर्गत अस्तित्व अनुभवण्यास नासिकाग्र त्राटक साधना करावी. ह्या माध्यमातून देहातीत योगसंचार करण्याची सिद्धी प्राप्त होते. माझा स्वतःचा महाराजांच्या कृपेने पाताळ भ्रमणाचा अनुभव आहे. नासिकाग्र त्राटक साधनेची पुर्व तयारी होणे हेतु बराच अंतर्मुखी अभ्यास अपेक्षित आहे. त्यायोगे संबंधित ईतर आध्यात्मिक लिखाण लक्षपुर्वक समजुन घ्यावीत. याच सोबत बर्हीमन अंतर्मुख होणेहेतु अत्यंत बळकटीयुक्त आत्मसंधान शिवात्मक होणे महत्वाचे आहे.

संबंधित त्राटक साधनेत फक्त नाकाच्या टोककडे पाहात राहील्याने हेतु साध्य होणार नाही. याउलट वृत्तीचा प्रवाह बाहेरच होईल, म्हणजे मनाची वृत्ती बर्हीमुखीच राहील व मुख्य उद्देशाला बाधक असे हे वर्तन ठरेल. त्योगे नासिकाग्र स्थिर करणे म्हणजे नासिकाग्र पाहाणे नसुन आपल्या बर्हीदृष्टीचा प्रवाह अंतर्गत योगप्रवाहाशी एकत्रीकरणातुन सुक्ष्ममार्गाचे आत्मावलोकन करणे असा आहे. उगीचच नको ते गैरसमज करुन घेणे टाळावेत. ही क्रीया ज्यापद्धतीने वाचनात सुलभ वाटते तशी कृतीत आणण्यास काही आठवड्यांचा कालावधी अपेक्षित आहे. जेणेकरुन आपल्या देहस्थित मज्जातंतुंवर विशेष सुक्ष्म दाब पडुन ब्रम्हरुप तेजाचा अविर्भाव होतो. अशाप्रकारे संंबंधित दर्शन करत राहील्याने ब्रम्हानंदाचा अनुभव होऊन अनेक प्रकारच्या दुःखांचा नाश होऊन जीवनात तत्व तठस्थ भुमिका येऊ लागते.



महत्त्वाची टिप...

संबंधिक साधनाक्रीया संबंधित साधना तज्ञांच्याच मार्गदर्शनाखाली कराव्यात.