प्रतिमा त्राटक Image Tratak - व्यक्तीत विचार संक्रमण करणारी प्राचीन विद्या - Works Quikly


कोणत्याही गोष्टींचा विचार करताना आपल्या नजरेसमोर एक प्रतिमा तयार होते. ज्यावेळी राष्ट्रहिताचा विचार करतो त्यावेळी मांगल्याचं प्रतिक म्हणुन सहजच आपल्या मनात राष्ट्रध्वजाचे प्रतिबिंब उमटते. हेच प्रतिबिंब ज्यावेळी आपलं आचरण ठरतं त्याच वेळी ती प्रतिभा आपले सांस्कृतिक प्रतिकेचे सुत्र ठरते.



प्रतिमा त्राटक या विद्येचा अनुभव घेणे हेतु त्यापुर्वी मुर्ती त्राटकाची साधना होणे महत्वाचे आहे. आपल्या प्रबळ विचारांचे प्रक्षेपण दुसऱ्या व्यक्तीच्या मनावर करणे याला विचार संक्रमण  असे म्हणतात. विचार संक्रमण दोन स्तरांवर केले जाते. 


संक्रमित विचारसारणी खालीलप्रमाणे आहे.


  • १. अंतर विचारसंक्रमण
  • २. बाह्य विचारसंक्रमण

१. अंतर विचारसंक्रमण प्रतिमा त्राटक

अंतर विचारसंक्रमण प्रतिमा त्राटक ही एक अत्यंत गुढ व आपला कायापालट करणारी विद्या आहे. या विद्येत आपण संबंधित कोणत्याही एका देवी - देवता किंवा सद्गुरु महाराजांचे प्रतिमेचे आज्ञेला अनुसरुन त्राटक करतो. या क्रियेमधे सद्गुरु महाराजांच्या मार्गदर्शनाने आपली प्राणशक्ती प्रतिमेत असलेल्या संबंधित आत्मशक्ती प्रतिकेशी जोडली जाते. साधनेतील चित्तलयतेच्या तीव्रतेवर आपल्या स्वभावात हळु हळु बदल होण्यास सुरवात होते. आणि प्रतिमेत असलेल्या महाराजांच्या प्रतिकेशी आपला थेट आत्मसंबंध प्रस्थापित होऊन महाराजांच्या चरणाशी असलेले सात्विक आणि तात्त्विक गुणांचा परीसंचार आपल्या अंतःकरणात होऊन मानवी आचरणाचे भगवत्मय अंतः करणात परिवर्तन होण्यास सुरवात होते.


अंतर विचारसंक्रमण प्रतिमा त्राटक आणि नामस्मरण यांचा परस्पर काय संबंध असतो ?

नामस्मरणात त्यामधे दोन प्रकारचे साधक सहभागी होतात. प्रथमतः जे सद्गुरु महाराजांकडुन नाम ग्रहण करुन आपली आत्मस्थिती दृढ करतात. दुसरे जे स्वईच्छ्येने अथवा दुसऱ्या कोणाचही आचरण करुन स्वतःच्या मनाप्रमाणे वाटेल ते नामस्मरण धरसोड वृत्तीने करतात. यामधे दुसऱ्यापेक्षा प्रार्थमिक साधक काही प्रमाणात आध्यात्मिक गुणांचे मर्यादेच्या चौकटीत राहुन आपल्या समुदायाच्या संस्काराचे पालन करतात. जे अनुग्रही नाहीत ते आध्यात्मिक साधक नाहीत. जे आध्यात्मिक साधक नाहीत ते महाराजांच्या आत्मयादीत सामाविष्ट नाहीत. जे आत्मयादीत नाहीत त्यांचे नामस्मरण करणे अथवा न करणे यास फार महत्त्व मिळत नाही. जे अनुग्रहीत नाहीत त्या साधकांनी नामस्मरण केले असता मानसिक शांती व वरवरचे भौतिक कामनापुर्तीचे अनुभव येत राहातील पण त्याचा अर्थ आध्यात्मिक प्रगतीशी जोडला जात नाही कारण आध्यात्मिक प्रगति फक्त आणि फक्त सद्गुरु शिष्य परंपरेवर अवलंबून असते. बाप मुलगा किंवा मामा भाचा किंवा सासरा जावई ही संसारीक नाती आध्यात्मिक गुरु परंपरेत मानली जात नाहीत.


वरिल माहीतीचा परामर्श घेऊन संबंधित आत्मसंस्कारमय सद्गुरु महाराजांचा अनुग्रह प्राप्त करण्याची खरोखर अत्यंत तीव्र तळमळ आणि आत्मसमर्पण होण्यासारखी अभिव्यक्ती असल्यास आपण प्रतिमा त्राटक विद्येचा सदुपयोग करवुन घेऊ शकता.


ll आप बनें पारदर्शक ते स्वामीं बनें मार्गदर्शक ll


आपण किती प्रामाणिक आणि पारदर्शक आहोत या आधारावर आपल्याला दत्त महाराज सहकार्य करतात. प्रतिमा त्राटकाची प्रतिमेआत असणारी आत्मप्रतिकेची अभीव्यक्तीची छापृ आपल्या ह्दयस्थ अंतःकरणात उमटणे हेतु आपण सर्व प्रथम आपली काया, मन व वाचा शुद्ध व पवित्र ठेवले पाहीजे. त्यायोगे आचरणातही सत्वता यायला पाहीजे. महाराज आपल्यारा मार्गदर्शन करतात पण आत्मशुद्धी झालेल्या साधकांना सर्वात अधी प्राधान्य दिले जाते. जेणेकरुन अनुग्रह मिळाल्यावर आत्मोद्धार होण्यास फार वेळ लागत नाही.


२. बाह्य विचारसंक्रमण प्रतिमा त्राटक

ही विद्या फक्त सत्कार्यासाठीच वापरली जाते.  सद्गुरु महाराजांचे स्वभाव संस्कार नवजात साधकांमधे संक्रमण करणेहेतु हीचा सदुपयोग केला जातो, जे साधक अपार कष्ट भोगत असतात, ह्या हालापेष्टांच्या परिणामाने अवकाळी काही अशुभ घटना घटीत होऊ नये यासाठी विचार संस्क्रमण केले जाते. त्यायोगे आपात्कालीन भयावह स्थिती नियंत्रणात यावी याच हेतुने अंतरिक त्राटक उर्जा बाह्य जगतात प्रसारीत केली जाते.

प्रतिमा त्राटक एक अत्यंत गंभीर आणि परिपक्व मानसिकतेच्या साधकाने करण्यासाठीची आत्मविद्या आहे. अधिक माहीतीसाठी खालील लिंक वर संपर्क करणे.


महत्त्वाची टिप...

संबंधिक साधनाक्रीया संबंधित साधना तज्ञांच्याच मार्गदर्शनाखाली कराव्यात.