ऐसी बात बोल l जो कभी कोई न कहें झूठ llऐंसी जगह बैठ l जो कभी कोईं न बोले उठ़ ll
आध्यात्मिक साधनेत एकाच ठिकाणी बसुन अथवा उभे राहुन साधनारत होण्याची ईच्छा असणाऱ्या साधकांसाठी आसनाचें दिग्बंधन व आध्यात्मिक आसनाचा कायापल्प समजावुन घेणे महत्त्वाचे आहे.
बरेच आध्यात्मिक साधक पारायण, ध्यान व नामजपावेळी एकाच ठिकाणी बसुन साधना करण्यासाठी प्रवृत्त होतात पण काही क्षणांतच झोप येणे, अंगाला खाज सुटणे, शिंका येणे, जखडल्यासारखे वाटणे, मानेवर अचानक भार येणे, जांभई येणे, खोकला येणे व सर्दी सुरु होणे ईत्यादी सारखे अनेक प्रकार घडतात. या सर्व प्रकारांचा काही प्रमाणात भोतिकवादाशी तर बहुतांशी आध्यात्मवादाशी अतिनिकटचा संबंध असतो. या बैठक प्रयत्नात साधनारत होण्यास सुरु झाल्यास अनेक अनपेक्षित अडचणीं उद्भवतात. आपण या सर्व गोंष्टींचे जो पर्यंत कृतिशील विचारात्मक आचरण करणार नाही तोपर्यंत सर्व वरील लक्षणांच्या आधारावर अनुभव येतच राहाणार...!
बैठकीचे आसन
आपण कोणत्या देवतेची उपासना, कोणत्या कार्यासाठी करणार आहात यासाठी वेगवेगळ्या आसनांचे आध्यात्मिक दिशानिर्देशने आहे. संसारीक लोकांसाठी बैठकीचे आसन ऊनी वस्त्राचे असायला हवे. ब्रम्हाण्डीत क्षेत्रात निरंतर होणाऱ्या उर्जेचा प्रवाह पारायण, ध्यान, नामजप, होमहवन व मंत्रजपाच्या माध्यमातून आपल्या पंचभुतात्मक देहात प्रवाहीत व्हावा, ही ऊर्जा स्वदेहात प्रवाहीत होत असताना सप्तपाताळात आकर्षली जाऊ नये म्हणुन तिला अवरोध होणे हेतु आसनाचा वापर केला जातो. ही चैतन्य ऊर्जा निरंतर अंतरंगात प्रवाहीत होत राहावी जेणेंकरुन पुढील नामसाधनेत या ऊर्जेचा वापर होऊन पुन्हा नवीन ऊर्जा आधिक तीव्रतेने संक्रमित करता यावी यासाठी योगी पुरुष आसनाबरोबरच काही ईतर विशिष्ट आत्मपरीवलनें वापरात आणत असतात. त्यांसंबंधी काही निवडक माहीती खालीलप्रमाणे मांडत आहे.
आध्यात्मिक आसनाची पुर्वतयारी का व कशी करावी ?
आपण स्थुल ऊनी वस्राला सरासरी जास्तीतजास्त २ इंच ऊंची होईल ईतके जाड स्थुल आसन तयार करायला पाहीजे. हे आसन ईतर कोणत्याही व्यक्तीने वापरात आणु नये. एक आसन एक साधक असे शास्त्र वचन पाळणे. स्थुल आसनाचा रंग संंबंधित नामजप कर्माशी जोडलेला आहे. मंगलमय कर्म करणें हेतु आसन रक्तवर्णिय अथवा लाल रंगाचे असायला हवे. साधना पुर्ण झाल्यावर जागेवरुन उठल्यावर लगेच आसनाची व्यवस्थित घडी घालुन ते झाकुन ठेवावेत.
आध्यात्मिक आसन म्हणजे स्थुल आसनासाठी तयार करण्यात आलेले अदृश्य चुंबकीत व नकारात्मक ऊर्जेला प्रतिकारात्मक अशी आध्यात्मिक नामस्पंदने...! ही स्पंदने तयार होण्यासाठी सुरवातीस बराच कालावधी द्यावा लागतो. एकदा की स्पंदनांची कार्यप्रणाली आपल्या सभोवताली अनुभवास आली असं समजावं की, आपल्या अंतरीत यथाशक्ति ब्रम्हाण्डीय उर्जेचा प्रवाह होण्यास सुरुवात झाली आहे. आध्यात्मिक आसन जो पर्यंत जागेत होत नाही तोपर्यंत त्रासदायक चुळबुळ चालुच राहाणार. त्यायोगे आपण आसनाधिष्ठ कवच दैव ग्रहण केले पाहीजे. ह्या कवचप्राप्तीने आपण २४ तास १२ महीने एका सुसरक्षित अशा आत्मसंवेदनात्मक आभा मंडळात वावरत असतो. ते आभामंडळ सर्वसाधारण सुक्ष्म मंडळाच्या तुलनेत अनेक पटीने शक्तिशाली असते. ह्या आत्मसंवेदनात्मक आभामंडळाच्या सुक्ष्म शक्ती आपले मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक व आध्यात्मिक स्थैर्य वाढवुन आणि संरक्षण करतात.

आध्यात्मिक आसनांची अभिव्यक्ती खालीलप्रमाणे...!
- १. सर्व प्रथम सचैल स्नान करुन भस्म धारण करणें. ( हे सर्व साधारण भस्म नसुन नाथपंथीय भस्मावर व भस्मसंस्कारावर चांगल्या प्रकारे प्रतिसाद देणारे आहे ) यासंबंधी अधिक माहीतीसाठी संपर्क करावा.
- २. भस्म संस्कारानंतर आसनाचे भस्माने पुजन करणें
- ३. आसनाधिस्थ होण्यापुर्वी आसनाला सर्व बाजुने मंत्रोच्चाराने बांधुन घेणे. जेणेकरुन कोणतीही नकारात्मक उर्जा आसनाच्या आवारत प्रवेश करणार नाही.
- ४. आसनाचे सदेह दिग्बंधन करणे. आसनाचा आपल्या सुक्ष्मदेहाशी संबंध प्रस्थापित करणे.
- ५. संबंधित साधनेच्या अंती ' केलेल्या साधनाफळाचा अंगीकार करवुन घेणे ' जेणेंकरुन ईंन्द्रआदी देव अथवा राक्षस आपले कर्मफळ चोरु शकत नाहीत.
- ६. आसनावरुन उठताना संबंधित आध्यात्मिक आभामंडळ आपल्यासोबत व्यापुन घेणे.
- ७. आसनाला प्राणोपासनेतुन वंदन करुन पुन्हा पुर्ववत घडी करुन झाकुन ठेवणे.
- १. संसारीक लोकांसाठी स्थुल वस्त्रासन.
- २. योगी जनांसाठी शाबरी सुप्तदर्भासन.
- ३. सिद्धपुरुषांसाठी कमलासन.
- ४. महासिद्धपुरुषांसाठी सोहंsहंसासन.
- ५. परमसिद्ध महापुरुषांसाठी सहस्त्रारासन.
आसनासंबंधीत काय करु नये...!
- १. आपल्या आसनाला ईतरांनी स्पर्श करु नये याची काळजी घेणे
- २. आसनावर मासिक पाळीच्या महीलेची सावली पडु देऊ नये.
- ३. सोयरे सुतकात आसनाला स्पर्श करु नये.
- ४. ऊनी आसना व्यतिरिक्त कोठेही बसुन जप करु नये.
ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...
बाधित वास्तुसाठी सोपे घरगुती उपाय. - Works Quikly
संपर्क : श्री. कुलदीप निकम
( Dattaprabodhinee Author )
( Dattaprabodhinee Author )
भ्रमणध्वनी : +91 9619011227
( Whatsapp Or Sms Only )
( Whatsapp Or Sms Only )

Cure Problems With Divine Powers. 100s Of People Cured ! Chakra Healing balancing. Ancient Indian Science. Based on Ashtaang Yog. Learn Yogic Healing. Types: Learner's Workshops, Stress Management, Divine Karma Cleansing, Mind empowerment, Chakra Balancing. - Visit Website Here !
Embed दत्तप्रबोधिनी न्यास on Your Site: Copy and Paste the Code Below
