आत्मक्रिया योग व सहज समाधि प्रबोधन: दत्त उपासना, दत्त संप्रदाय ( Datt Sampraday ) व साधन, साध्य, समाधी SEO

Dattaprabodhinee Sevaa Trust’ was started in the year 2014 with a vision to create a non-profit humanitarian proficient area for spiritual people to actively engage them in soulistic existences.

ब्रम्ह अंतःकरण कसे बनते ? अनुकरणशील स्वतंत्र सद् मार्ग...!
घरातील देवघर व देव पंचायतन आधिष्ठान - २
नवनाथ ग्रंथ ( Navnath Bhaktisar ) पारायण कसे करावे ? ब्रम्हाण्डीय सामर्थ्य विश्लेषण...!
आत्मरत्न ( Soul Gem ) म्हणजे काय ? माणुस का भरकटतो ?
श्री गोरक्ष किमयागिरी प्रवाह नाथामृत सिद्धग्रंथ व कार्यसिद्धी...!
Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

सोमवार, ४ जुलै, २०१६

दत्त उपासना, दत्त संप्रदाय ( Datt Sampraday ) व साधन, साध्य, समाधी


' मानवी देह ' भगवंताने अस्तित्वात आणलेले एक आत्मिक साधन...! ह्या मानवी देहाचा अभ्यास ज्याअर्थी देहधारी मानवाने स्वयं शोधकर्ता होऊन अनुभवात घेतला तर दत्त संप्रदायाचे उद्दिष्ट समजुन घेण्यात यत्किंचितही विलंब लागणार नाही. मानवी देहा जितके अनमोल आणि स्थुलबुद्धीच्याही पलिकडील आत्म तत्व जाणुन घेण्याचे साधन संग्रह या ब्रम्हाण्डात नाही. या अभिव्यक्तीची परिकल्पना जर मनुष्याला आली तर जीव आणि शिव यातील मतांतर आणि चारित्र्यखेद नक्कीच कमी होईल आणि याच जन्मात आपण आत्म साक्षात्काराच्या ऊंबरठ्यावर जाऊन पोहोचु.


http://blog.dattaprabodhinee.org/2016/08/lord-dattatreya.html

दत्त संप्रदायाने अनेक सिद्ध साधु, महात्मे, योगीजन व संतजनांची उत्पत्ती केली. या आत्म उत्कर्षाची साक्ष सर्वात जास्त प्रमाणात महाराष्ट्राची भुमी ठरली. या महाराष्ट्रात प्रत्येक हाकेवर एक संत आहे परंतु या वस्तुस्थितीची जाणीव आज किती लोकांना आहे हा एक प्रश्न आजही आणि भविष्यातही भेडसावत राहील. दत्त संप्रदायाचे अतिविश्लेषणात्मक आत्मप्रयोजन आणि श्री दत्त महाराजांचे अनुशान यांवर नितांत श्रद्धा व आत्मविश्वास जोपासणारे अनेक योगी पुरुष आपल्या जीवनकाळातच संजीवन समाधीला प्राप्त झाले.

श्री दत्त महाराजांची आसीम अनुकंपा आणि तत्वशील नामसाधनेच्या जोरावर योगीजने साधन, साध्य व समाधी यांमधील सुक्ष्मभेद समजुन घेतात. असे योगीजन फक्त आणि फक्त महाराजांच्याच आज्ञेची वाट पाहात असतात. श्री दत्तात्रेय स्वामी महाराज स्वयं आपल्या दासाकडे येऊन त्याचे मार्गदर्शक बनतात. हे मार्गदर्शन प्रत्येक साधकास मिळावं यासाठीच आपण मानसिक पुर्वतयारी होणे हेतु संबंधीत माहीती प्रकाशित करत असतो. जोपर्यंत पशुवृत्तीतुन आपण मानवतावादी होत नाही. जोपर्यतं मानवतावादी जीवातुन आपण आत्मसाधक होऊन तत्वमार्गक्रमण करत नाही आणि जोपर्यत आपण दत्तसाधक होऊन दत्ततत्वदास्यभक्ती करत नाही तोपर्यत आपला उद्धार या जगात अथवा या ब्रम्हांडात कोणीही करु शकणार नाही.

कोणत्याही आध्यात्मिक कार्य, साधना किंवा कुळाचार करण्यापुर्वी आपण नियतीला किती आत्मसात केलं आहे याचा विचार करायला हवा. ज्याअर्थी आपले पितरं, ग्राम दैवत, कुळ दैवत आणि आपले आराध्य दैवत ह्या सर्व शक्तीस्वरुपांच्या नजरेत आपलं काही स्थान आहे का ? असा प्रश्न विचारता आला पाहीजे. जोपर्यंत नियतीसमोर आपली जबाबदारी घेणारे आपले महापुरुष उपस्थित नाहीत तोपर्यंत आपलं कोणतही सत्कर्म फळाला येणार नाही. आपल्या नितीमत्तेचे व चारित्र्याचे गँरेंटी कार्ड जोपर्यत सद्गुरु महाराज होत नाहीत तो पर्यत सात्विक शक्तीवलय आपलं काहीही ऐकणार नाही ही गाठ मनाला बांधुन घेता आली पाहीजे.

साधन, साध्य व समाधी ही आध्यात्मिक जीवनातील प्रार्थमिक समज आहे. साधन म्हणजे मानवी शरीर, साध्य म्हणजे दत्त चरणरज आणि अंतिम अवस्था म्हणजे समाधी...! ह्या सुक्ष्मतेत साधनाचे चारित्र्यपुर्ण आचरणावर महाराजांनी विशेष जोर दिला आहे. त्यायोगे दत्तभक्तांसाठी पाचवा वेद असणारे महाप्रसादीक ग्रंथ श्री गुरुचरित्राची उत्पत्ती केली. श्री गुरुचरित्राचा दिव्य अनुभव येण्यासाठी अर्थयुक्त नामस्मरण, दत्ततत्व आणि सत्व चरित्र आचरणात आणता आलं पाहीजे जेणे करुन महाराजांना आपल्या स्वदेही विराजमान होण्यास आत्ममार्ग मोकळा होईल.

साध्य म्हणजे ' जे आपल्याला साधायचे आहे ते '. आपल्याला काय साध्य करायचयं हे आपण ठरवलं पाहीजे. फेसबुक बाबा, व्हाट्स अप योगी व्हायचयं की अंतर्मुख दास्यभक्त होणार हे आपणच ठरवलं पाहीजे. आपल्या देहात आपला आवाज मोठा असावा याची जर आत्मईच्छा असेल तर प्रामाणिक दत्तभक्ती करावी. ढोंग अथवा कृत्रिम स्वभाव महाराजांना आवडत नाही. जे मुळ आहे तेच सत्य आहे . जे सत्य आहे तेच दत्त आहे. ही आत्मजाणीव यायला हवी. साध्य प्राप्ती मार्गातील ईतर प्रलोभने आपल्याला भ्रमित करतात याची तमा बाळगुन निष्ठुर नियतीला नामामृताद्वारे आपल्यात सामावता आलं पाहीजे.

समाधी म्हणजे ' चित्ताची निर्विकल्प संजीवन अवस्था ' संसारीक मानवाला समाधी शब्द नुसतं ऐकण्यातच " फार मोठं राँकेट सायन्स असणार " असं वाटत असतं. परंतु दत्त संप्रदायात सहज समाधी अवस्था सहजच कशा प्रकारे अवगत करता येते हे साधन व साध्याच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात येते. ईतकी सहज व सोपी आध्यात्मिक वाटचाल क्वचितच ब्रम्हाण्डात शोधुनही सापडणार नाही असे श्री दत्त महाराजांच्या कमळचरणांचे अनंत उपकार आपल्या सारख्या अनेक दत्तभक्तांवर आहे. त्यायोगे जनसमाजाचे हितकल्याण करण्याची निरंतर सद्बुद्धी मिळत राहाते. हे सर्व फक्त महाराजच करवुन घेतात हिच आपली आत्मशांती समजावी...!!!


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...


महाकालेश्वर उज्जैन स्वामीमय सेवा माहिती

त्र्यंबकेश्वर सेवा माहिती

आध्यात्मिक श्रीफळ व चारित्र्यपूजनाचे माहात्म्य

सर्व स्वामींशिवभक्तांसाठी अद्वितीय शिवसाधना पद्धती...!!!

श्री गुरुचरित्राच्या सप्ताहवाचनाच्या पद्धती व संक्षिप्त रसग्रहणमहत्त्वाची सुचना :

संबंधित पोस्टबद्दल विशेष गोपनीय माहीती फक्त संस्थेच्या अधिकृत सभासदांनाच विनंतीवरुन कळवण्यात येते.

संपर्क : श्री. कुलदीप निकम
भ्रमणध्वनी : 9619011227

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Enter your email address:

Delivered by FeedBurner

लोकप्रिय पोस्ट

स्वामीसभासद नोंदणी प्रार्थमिक अर्ज