शरीर रचना विज्ञान ( Body structure ) आध्यात्मिक क्षेत्र- Simple and Easy


शाबरी विद्येत नाथांनी शरीराला ' चौकी ' या नावाने संबोधित केले आहे. ह्या चौकी तत्वात अनूक्रमे देहाचे चार भागात वर्णन केले. त्यात पहीली चौकी आपलं मस्तक, दुसरी चौकी छाती आणि हात, तिसरी चौकी पोटाचा व चौथी चौकी कमरेपासुन पायापर्यंतचा भाग. ह्या विशिष्ट देह रचनेचा वापर नाथांनी देवांशी युद्ध करण्यावेळी पुर्व तयारी होणेसाठी केला.
शाबरी विद्येत नाथांनी शरीराला ' चौकी ' या नावाने संबोधित केले आहे. ह्या चौकी तत्वात अनूक्रमे देहाचे चार भागात वर्णन केले. त्यात पहीली चौकी आपलं मस्तक, दुसरी चौकी छाती आणि हात, तिसरी चौकी पोटाचा व चौथी चौकी कमरेपासुन पायापर्यंतचा भाग. ह्या विशिष्ट देह रचनेचा वापर नाथांनी देवांशी युद्ध करण्यावेळी पुर्व तयारी होणेसाठी केला.
आपणही जन्म घेतल्यापासुन मरेपर्यंत संघर्षच करत असतो. आपल्या जीवनातील हा संघर्ष योग्य दिशेने व्हावा आणि शेवट मंगलमय होऊन आत्मशांती मिळावी या हेतुने सद्गुरु महाराजांची कृपा अनिवार्य असते. अन्यथा जीवनाची घडी पुर्णतः विसकटुन जाते व देहाचा अंत तीव्र दुःख, असहनीय पीडा व अपुर्ण ईच्छ्येने होणार यात दुमत नाही. त्यायोगे संबंधित विषयाला अनुसरुन ' दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट ' च्या माध्यमातून आपलं शरीर रचनेतील सुक्ष्म विज्ञानावर माहीती प्रकाशित करत आहे. जेणेकरुन दत्त भक्तांना स्वतःस समजुन घेण्याच्या दृष्टिकोनातून एक नवीन समज येईल व मार्गपरायण होईल.

मानवी अर्भकाचे गर्भावस्थेत कशाप्रकारे अजपाजप व श्वाससंगोपन होते ते मागील आत्मरत्न या भागात प्रकाशित केले आहे. त्यायोगे गर्भधारणेच्या वेळी संबंधित अर्भकात होणाऱ्या बदलांची माहीती दिली आहे. यापुढे मानवी शरीर जन्माला आल्यावर त्यास बालकाचे रुप प्राप्त होते. सर्वप्रथम जन्माला येतास बालक का रडते ? यामागे आध्यात्मिक कारण असे आहे की, मृत्यू प्राप्तीच्या वेळी लिंग देह भौतिक पीडा भोगुन पाप पुण्याच्या आधारावर पुढील मार्गक्रमण करतो. ह्या मार्गक्रमणात संसारीक जीवाला प्रेतलोक व पितर लोक आणि आग्निहोत्रा नदीतुन प्रवाहीत व्हावे लागते. संंबंधित मार्गातील असहनीय कष्ट भोगायला आल्यामुळे जीव रडकुंडीला येतो व रडत बसण्याचा ध्यास घेते. हा ध्यास ज्या वेळेस पुनर्जन्मास येतो त्यावेळी नियतीकडुन मिळालेल्या अजपाजप मंत्राद्वारे वचनोक्त अर्भकरुपात शरीर धारण करतो. सरासरी नऊ महीने वचनोक्त मंत्रोच्चारण करुन भौतिक जगात प्रवेश करताना मोह, माया व कलिच्या स्पर्श प्रवेशामुळे पुर्ववत रडत असणाऱ्या जीवयोनीत परावर्तित होतो त्यायोगे जन्माला आल्यावर हसण्याऐवाजी अथवा शांत राहाण्याऐवाजी रडायला सुरवात करतो. ह्या संबंधी न रडणार्या बालकांचे अनुसाधन वैद्यकीय माध्यमातून विसंगत असते. तो मात्र एक वैद्यकीय नैसर्गिक अपवाद आहे. ईतर साधारण जन्म हे बालकाच्या रडण्यानेच होत असतात.


जन्माला येणाऱ्या बालकाचे आध्यात्मिक दृष्टिकोनातून शरीर रचना हा विषय अत्यंत गोपनीय विषय आहे. ज्या साधकांना प्रामाणिक व पारदर्शक मानसिकतेने साधना करण्याची जिज्ञाना आहे त्यांच्याचसाठी लाभदायक आहे. गर्भावस्थेतुन जन्माला येणाऱ्या बालकाला त्या घरातील संबंधित संस्कारांनी परिपुर्ण करण्यात येते. त्याही पलिकडे शरीर रचनेच्या माध्यमातून अपेक्षित संस्कार १% ही आजच्या काळात करण्यात येत नाही. ह्याचे प्रमुख कारण म्हणजे संबंधित आई वडिलांचा तत्वाशी आणि आध्यात्मिक सुक्ष्म देहाशी नसलेले तादम्य. त्योयोगे परंपरेतच शरीररचनेच्या सुक्ष्म विज्ञानाचे प्रसारण होऊ शकले नाही. आजची वस्तुस्थिती अशी की बहुतांशी साधक स्वदेह सुक्ष्म अज्ञानापोटी भरकटत आहेत आणि त्यांचे गुरुही संबंधित अज्ञानामुळे त्यांना सावरु शकत नाहीत.


शरीर रचना विज्ञान दोन भागात विभागलेले आहे. ते खालीलप्रमाणे आहे.

  • १. अंतरीक सुक्ष्म देह
  • २. बाह्य आभात्मक देह

१. अंतरीक सुक्ष्म देह

आपल्या देहात एकुण अंतरीक सोळा सुक्ष्म कला आहेत. ह्या षोडश कलांचे यथार्थ ज्ञान झाल्याशिवाय कोणत्याही साधकाला आध्यात्मिक प्रगती करता येत नाही. हे ज्ञान भरमसाठ पुस्तके वाचुन अथवा आध्यात्मिक घुसखोरांकडुन होत नाही. त्यासाठी स्वतःच्या प्रकृतीला आत्मबुद्धीने ( देहबुद्धीने नाही ) समजुन घ्यावे लागते. जेणेकरुन आपल्या योनीची गती अंतर्ध्यानात अनुभवास येते. तेव्हाच खर्याअर्थाने आध्यात्मिक प्रगती होईल. ईतर कोणताही शोर्टकट आध्यात्मात नाही. उगीच स्वतःची फसवणूक करणं टाळावं. आपल्या स्थुल देहात अंतःकरण, पंचप्राण, पंचकोष, पंचमहाभुते ही एकुण सोळा तत्वे आहेत. ह्या तत्वांचा लय आत्मलिंगात जोपर्यंत होत नाही तो पर्यंत कोणीही आध्यात्मिक प्रगती तिळमात्रही करु शकत नाही.

रामरक्षा स्तोत्र पाठात " रामोः चित्तलयः सदा भवतु l भो रामुमद्धर ll अशा प्रकारे बुधकौशिक ऋषींना भगवान शंकराने सांगितले त्याचाच अर्थ असा आहे की, ' माझ्या चित्ताचा लय षोडशतत्वात होउन माझा उद्धार व्हावा याअन्वये भगवान राम माझा उद्धार करोत '. सर्व महापुरूषः, सिद्ध पुरुष, सत्पुरुष हे षोडशकलाधिष्ठीत असतात. त्यामुळे त्यांच्या अंतर्मनात शिवशक्ती स्वतः संसाराचा चौपट डाव मांडतात व नियतीला लाजवतात. 



२. बाह्य आभात्मक देह

आपल्या देहात आपले आभामंडळ ( Orra ) परावर्तित करण्याचे मुळ स्त्रोत म्हणजे आपले चैतन्य. आपल्या चैतन्याच्या गुहेत अतिशक्तीशाली आत्म चैतन्य स्थित असते. ह्या आत्म चैतन्याच्याच माध्यमातुन आपण आपल्या देहातील सात चक्रांना अनुभवु शकतो अथवा स्पर्श करु शकतो. ईतर कोणताही मार्ग नाही. आभात्मक देहात आपल्या अंतर्गत असलेल्या सात चक्रांचा, संबंधित मातृका बीज मंत्रे आणि कुंडलिनी शक्तीचा उल्लेख होतो.

ही शरीर रचनेतील आध्यात्मिक दृष्टिकोनातील क्षेत्र तत्वता आहेत. बाह्य आभात्मक देह संबंधी अधिक माहीतीसाठी साधकांनी प्रत्यक्ष संपर्क करावा.


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...






पितृदोषांबद्दल ( Pitra dosh ) संवेदनशील आणि दैनंदिन जीवनाशी जोडलेलें दुष्प्रभाव ...!



0