शुक्लपक्ष, कृष्णपक्ष व नक्षत्रे : तंत्र, मंत्र व यंत्राशी संबंध - १मानवी जीवनातील सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे मनुष्याचे सुर्य व चंद्र मधील फसलेले, भोगलिप्त व मोहात हुरळुन जाणारे स्थुल अस्तित्व. हे अस्तित्व पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे नाश पावत असले तरी 'मानव स्वतःचे वास्तव तरी कधी स्वाकारतो' हा प्रश्न मरेपर्यंत सुटत नाही. ह्या सुर्य व चद्रांमधील अद्भुत व रहस्यमय नियोजनाचे सुत्रसंचलन नियती देश, काल व दिशांवरुन ठरवत असते. ह्यासंबंधी निवडक माहीती दत्त साधकांसाठी प्रकाशित करत आहोत.

अमावस्या ते पौर्णिमा आणि पौर्णिमा ते अमावस्या अशा कालचक्राचे नियमन करणारी नियती १४ शुक्ल योग, १४ कृष्ण योग व २७ नक्षत्रांच्या साहाय्याने सृष्टीचे नियमन करत असते. ह्या नियतनांतर्गत सर्व प्रकारचे व ८४ लक्ष योनीधिष्ठीत जीवांचे जन्म, पालन व मरणयुक्त कर्मांचे संकलन होत असते. ह्या कालचक्रात मानवी प्रवृत्तीतील तीन अभिव्यक्तींचा समावेश होते. प्रथम दुष्कर्म, दुसरे सत्कर्म व अंतिम अकर्म असे कर्म आध्यात्मिक स्तरावर मानले जातात. ह्या कर्मगतीमध्ये नियतीच्या कालचक्रात्मक पाप पंजरातुन मुक्त होण्याची शक्यता फक्त अकर्मवादी अभिव्यक्तींची आहे. तेच आध्यात्मिक तत्व समजावुन घेत असतात ईतर येड्यागबाळ्यांच हे काम नाही.मानवी जीवनातील सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे मनुष्याचे सुर्य व चंद्र मधील फसलेले, भोगलिप्त व मोहात हुरळुन जाणारे स्थुल अस्तित्व. हे अस्तित्व पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे नाश पावत असले तरी 'मानव स्वतःचे वास्तव तरी कधी स्वाकारतो' हा प्रश्न मरेपर्यंत सुटत नाही. ह्या सुर्य व चद्रांमधील अद्भुत व रहस्यमय नियोजनाचे सुत्रसंचलन नियती देश, काल व दिशांवरुन ठरवत असते. ह्यासंबंधी निवडक माहीती दत्त साधकांसाठी प्रकाशित करत आहोत.

अमावस्या महत्त्व व तंत्र मंत्र यंत्र


कालचक्रात अमावस्येचे सुक्ष्मस्वरुप घोर अंधकाराच्या स्वरुपात गणले जाते. ह्या अंधकारात भ्रमण करणारे आणि अंधारातील सुक्ष्म कर्म करणाऱ्या शक्तींचा समावेश होतो. ज्याप्रमाणे हिंदू संस्कृतीत भगवान श्री हरि विष्णु यांना सुर्योदयाची आवड आहे त्याचप्रमाणे भगवान शिवशंकराला सुर्यास्ताची गोडी असते. हा सुर्यास्त घोर अंधकार आणणारा असतो. त्याअर्थी या अंधकाराला आध्यात्मिक शिवरात्री असेही म्हणतात. भगवान शिव नित्य समाधीस्थ असल्याकारणाने त्यांच्या पाचवा अवतार श्री काळभैरव यांस शिवशंम्भू यांनी अमावस्या ते पौर्णिमा व पौर्णिमा ते अमावस्या याचक्रातील सर्व तंत्र, मंत्र व यंत्र शक्तींची प्रधान देवता म्हणुन घोषित केले.


अमावस्या मुहुर्तात केले जाणारे कर्म दोन प्रकारचे असतात ते खालीलप्रमाणे...  • १. द्युत कर्म
  • २. विद्युत कर्म


१. द्युत कर्म


द्युत कर्म सर्वसामान्य स्तरावर जारण, मारण, मोहन, वशीकरण, उच्चाटन, हातचलाखी, दैवी बंदिश, सर्वप्रकारची बंधन करणे व अघोर बाह्य स्मशान साधना यांचा समावेश होतो. समाजातील बराच मोठा समुदाय अशाप्रकारच्या कर्मांना स्वतःच्या डोक्यावर घेतात. स्वार्थ आणि अज्ञानीवृत्तीतुन जन्माला आलेल्या अशाप्रकारच्या मोहात पडून स्वतःचे व स्वतःच्या कुळाचा नाश झाल्याशिवाय राहात नाही. काही साधकांनी मला ' आम्ही फक्त सत्कर्म व परोपकारासाठीच द्युत विद्येचा वापर करतो ' असे सांगितले. परंतु नियती माध्यमावर जास्त भर देते या तत्वाचं ज्ञान टाळता येत नाही. आम्ही भक्तीमार्गात असलेल्या सर्व साधकांना द्युत कर्मापासुन लांब रहा असे पुर्वापार सांगत आले आहोत. जी काही कामना अभिप्रेत आहे ती दत्त आधिष्ठानामार्फतच पुर्ण करवुन घ्यावी अशीच नितीमत्ता आधोरेखीत आहे.
२. विद्युत कर्म


विद्युत कर्म शाश्वत प्रभावकारक व आध्यात्मिक प्रगतीसाठी अतिउपयुक्त अशी दैवी कर्मप्रणाली आहे. विद्युत कर्म हे परिपुर्ण अंतर्मुखी सत्व, नामतत्व व सद्गुरु कृपेवर आधारीत आहे. विद्युत कर्मांची अभिव्यक्ती असलेले साधक दिर्घकाळानुरुप सहज समाधी अवस्था प्राप्त करुन घेतात. ह्या कर्मांची परिभाषा अमावस्येतील अंधार साम्राज्यावर एकदंतीय शासन करणाऱ्या श्री काळभैरव देवतेची साधना केल्यास सहज सद्बुद्धीतुन प्राप्त होते. आपल्या देहातील आत्मविद्युत चुंबकत्वाला जागृत करुन त्यायोगे शिवस्वामी आत्मानुसंधान साधनेहेतु आपण अकर्मस्वरुपी विद्युत कर्म कले पाहीजे. हे कर्म आपल्या स्वतःच्या आत्मोद्धारासोबतच आपल्या कुळाचाही उद्धार करतात.


अमावस्येतील आध्यात्मिक शिवरात्रीचे आत्मबोधातुन संकलन होणे हेतु श्री काळभैरवाचे आध्यात्मिक उबंटु माध्यमातुन उपासना करावी. विद्युत कर्मातील आत्याधिक स्तरावर येणाऱ्या साधकांना स्वदेहेत नवचैतन्याचा आत्मप्रवाह जाणवत असतो. हेच चैतन्य आपल्या जीवनाचा काया पालट करते. विद्युत कर्माचे प्रमुख चार आचरणात्मक अंगे आहेत त्यात अनुक्रमे आचरण, साधना, भक्तीयोग व सद्गुरुसान्निध्य यांचा समावेश होतो. त्यायोगे संबंधित दत्त आधिष्ठानाची आत्मिक स्वदेहात होते.


अमावस्येच्या सर्व मुहुर्तांमधे सर्वात मोठी व शक्तिशाली अमावस्या म्हणजे शनि अमावस्या आहे. ह्या अमावस्येच्या एकाच रात्री बरेच शाबर मंत्र दसरा, दिवाळी काळात सहज सिद्ध होतात. शनिअमावस्या तंत्र मंत्र व यंत्राच्या कार्यसिद्धिसाठी पुर्वी गावाच्या वेशीवर जाउन साधना करण्याचे प्रमुख मुहुर्त स्थान होते. सोमवती अमावस्येच्या दिवशी केलेली साधना दहापट अधिक फलप्राप्त करुन देते. सोमवती अमावस्येला जर आपण उज्जैनस्थित महाकालेश्वर भस्म आरती घेण्याचा योग असेल तर आवश्य घ्यावी.


' आपल्या भौतिक जीवनातील सुक्ष्म अडचणींवर भगवान महाकालेश्वराच्या कृपेने मात होते 'हा माझा स्वतःचा अनुभव आहे. परंतु महाकालेश्वर भस्मारती घेण्यापुर्वी भैरवगडस्थित भगवान श्री काळभैरव व समोरील श्री स्मशान भैरव डमरालबाबाचे त्यापुर्वी दर्शन घेणे नियतीच्या तत्वाप्रमाणे बंधनकारक आहे.


उज्जैनस्थित संबंधित भैरवगण व वेताळगण हे अमावस्येतील सर्वतोपरी नियंत्रणवादी देवता आहेत त्यांचा आशीर्वाद मिळवणे हे आपलं कर्तव्यच आहे.यंत्रविद्येचे रहस्य व काही अतिशय गुप्त व दुर्मिळ अद्भुत फळ देणारी यंत्र लिखाणाला अनुसरुन सविस्तर, अधिक सखोल, गहन व कुठेही उपलब्ध नसलेली विशेष आध्यात्मिक साधना माहीती लिंक स्वरुपात खालीलप्रमाणे उपलब्ध आहे. दिलेल्या विशेष लिंकचा पासवर्ड हटवण्यासाठी संस्थेत सक्रीय सभासद होणे आवश्यक आहे.


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

आत्मरत्न ( Soul Gem ) म्हणजे काय ? माणुस का भरकटतो ?

त्राटकाद्वारे रोगोपचार ( Tratak therapy ) - १

स्फटिकगोलदर्शन त्राटक ( Crystal Gazing ) - गोलक दिव्यदृष्टी साधना

पितृदोषांबद्दल ( Pitra dosh ) संवेदनशील आणि दैनंदिन जीवनाशी जोडलेलें दुष्प्रभाव ...!

आध्यात्मिक श्रीफळ व चारित्र्यपूजनाचे माहात्म्य ( Spiritual Disciplines )

भगवती महाकाली( Goddess Mahakali ) साधना सुमेरु तत्व विश्लेषण व शक्ति उपासना - १
संपर्क : श्री. कुलदीप निकम
भ्रमणध्वनी : 9619011227


GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीतीAll about Swami Samarth, Real unknown secrets, Step by step Spiritual Growth explained, Build your soul, Boost your life on top. - Visit Website Here !


Embed श्री स्वामी समर्थ योग व गहन आध्यात्मिक मार्गदर्शन on Your Site: Copy and Paste the Code Below