अंतरीक परिणामकारक वासना बीज कसे ओळखावे - Step by step


ईतिहासात काही रणसंग्राम घडले तर ते फक्त वासनेच्या बीजातुन मग ते रामायण असो की महाभारत. देहांतर्गत लपुन घाव घालणारी वासना संसारीक व आध्यात्मिक अपरिपक्व जीवाचे अनायासे घोर नुकसान तर करतेच, त्याचबरोबर भविष्यातील उर्वरीत जीवन अंधकारमय करुन ठेवते. चारित्र्यपुजनाच्या साधनेत सर्वात मोठी आणि अत्यंत घातक परिणामकारक ' वासना बीज ' हे रिपु गणातील सहज अंगलट येणारे महामायेचा विकृतीकारक वियोग आहे. ह्या वासनेच्या अधीन होऊन आध्यात्मिक जीवनाचा अंत न होणे हेतु संबंधित रिपुगणातील वासनाबीजाची सुक्ष्म ओळख ' दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट ' माध्यमातून प्रकाशित करत आहोत. 


आध्यात्मिक जीवन दत्त तत्वाच्या माध्यमातून प्रगतीपथावर येण्याहेतुने आपलं आचरणं, भक्तीमार्ग व सत्संग या तीन गोष्टींची प्रार्थमिक स्तरावर आवश्यकता असते. संबंधित आध्यात्मिक नामस्मरणाच्या प्रारंभावस्थेत ८४ लक्ष योनी फिरत असणाऱ्या जीवाने वासनामय शरीर जेव्हा मानवी जन्मात येते तेव्हा सर्व गत जन्मातील वासनेचे अधःस्थान मानवी बुद्धीत तीव्रतेने उफाळुन येते. या अंतर्गत योगक्रीयेची आपल्याला जराही जाणीव होत नाही. जेणेकरुन आपण वासनेच्या अधीन होऊन अतिमहत्वाकांक्षी बनतो. त्यायोगे जीवनात आपल्या हातुन घडत असणाऱ्या कळत नकळत कर्मांची ओळख राहात नाही. सर्व योनीतील पाप व पुण्य ज्या वेळी समान स्तरावर येते तेव्हा मानवी शरीर प्राप्त होते. ह्या शरीरातील गतजन्मातील स्वभाव, कर्म व पिंड पुनरावृत्ती होत असल्याकारणाने मानवी ईच्छ्याशक्ती प्रबळ होत असते. ह्या ईच्छ्याशक्तीला वासनेच्या बीजाचा स्पर्श घडल्यास सद्बुद्धीची विपरीत बुद्धी होण्यास फक्त एक क्षण पुरेसा आहे


वासना म्हणजे काय ?

वासना या शब्दाचा अर्थ ' वास + न + आ ' असा आहे. ह्यात ' वास ' म्हणजे घर करुन राहाणे, ' न ' म्हणजे नकारार्थी उर्जा व ' आ ' म्हणजे नारायणाची परमशक्ती असा आहे. त्याअर्थी ' वासना म्हणजे देहांतर्गत परमात्मा नारायणाचे अद्वैतवाद लपवुन स्वतःचे घर बनवणारी नकारात्मक उर्जा ' ह्या वासनेच्या प्रवाहात संसारीक जीवांसोबत आध्यात्मिक साधकही सहज वाहुन जातात. परमार्थिक मार्गातील साधक वासनेचे लपलेले डावपेच ओळखु शकत नाही. जे साधक ओळखतात तेच टप्याटप्याने अंतरिक प्रगती करु शकतात. पंढरपूरस्थित भगवान श्री हरी विठ्ठल मुर्तीकडे पाहीले असता, कमरेवर हात ठेवलेले आपण पाहीले आहे. त्यामागे भवसागरात काळसमुद्राचा प्रवाह कमरेपर्यंतच आहे. स्वतःच्या कमरेवर दोन्ही हात ठेऊन भगवंत वासना बीजास ओळखुन त्याचा नाश करा असे मर्म सुचवत आहे.

जन्म घ्यावा लागे l वासनेच्या संगे ll ह्या ओवीत पुनर्जन्म फक्त वासनेच्याच बीजाने होतो याचे समर्पक तत्व आहे. अशा वासना बीजाचे अंतरंगात होणाऱ्या अतिक्रमणामुळेच जीवनाचे संतुलन बिघडते. मानवी देहात वासना बीजाची स्थाने ठराविक ठिकाणीच आहेत. देहातील षटचक्रस्थित लिंगदेहात्मक शिवलिंगस्थाने अनुक्रमे आज्ञा चक्र ( कपाळ प्रदेश ), अनाहत चक्र ( ह्दय प्रदेश ) व मुलाधार चक्र ( गुद् द्वार प्रदेश ) ह्या तीन स्थानी परमशिवशक्तीच्या आवेगाला अज्ञानरुपी अंधकाराने व्यापुन वासना बीज देहात रममाण होत असते. अशा अज्ञानरुपी अंधकाराचे समुळ ज्ञानज्योतीमय आत्मप्रकाशाने नाश झाल्यावरच वासनेच्या बीजाची चांगली ओळख होईल, त्यायोगे वासनेच्या बीजाचे यथार्थ ज्ञान झाल्यास त्याचे बोथट वार परत आपल्या प्रकृतिवर होत नाहीत. आपण सतर्क व सावध स्वरुपातील अभिव्यक्ती दत्त तत्वातुन अनुभवु शकतो. असे चारित्र्ययुक्त आत्मसंधान चिरकाल टिकणारे व उत्तरोत्तर वाढत असणारे असे आहे.वासनाच्या बीजाचे देहांतर्गत एकुण तीन प्रकार पडतात.खालीलप्रमाणे आहे.


  • १. काम वासना
  • २. विषय वासना
  • ३. प्रेत वासना१. काम वासना व संबंधित सुक्ष्म आत्मविश्लेषण

देहांतर्गत काम वासना उत्तेजना गत् ८४ लक्ष योनी फिरत येणार्या जीवाचे लिंग देह उत्सर्जन योगक्रीयेचे अभिन्न क्षणभंगुर योगअंग आहे. ही काम वासना मानवी देहात बौद्धीकस्तरावरुन कमीतकमी १०० ते १००० पटीने उफाळुन येते. एकमात्र बुद्धीवादी मानवी देहात बरेच रहस्यमयी तत्वे अविर्भुत आहेत. काम वासना हा विषयोपभोग मानवी स्थुलदेहाचा सर्वात परिणामकारक अधोमुखी मार्गसंक्रमण आहे. काम वासनेच्या प्रवाहात संसारीक जीव अनायासे अथवा आसक्तीने प्रवाहीत होऊन नरकात तर पडतातच सोबत द्युत कर्माच्या अत्याचारी मालिकेने पुढील मानवी जन्म सुद्धा गमावतात. अशा काम वासनेच्या शांत व विनम्र संभ्रमित प्रकोपातुन बाहेर येण्याहेतुने काम वासना बीजाचे मुळ स्थान आपल्या देहात स्वाधिष्ठान चक्रावर ओळखावे. त्याअर्थी स्वतःच्या कर्मांना सत्कर्महेतु योग्य आवर घालता येईल.


२. विषय वासना व संबंधित सूक्ष्म आत्मविश्लेषण

देहांतर्गत मानसिकतेत सतत उठणारे हव्यास अथवा अतिलालचीपणायुक्त विचार म्हणजे विषय वासना. ह्या विषय वासनेची सर्व जबाबदारी अत्यंत चंचल अशा बर्हीमनाची आहे. हेच बर्हीमन विविध प्रलोभनात फसुन आपलं जीवन विस्कळीत करते. ह्या बर्हीमनाच्या चंचलतेला बुद्धीच्या आधीन आणता आले पाहीजे.विषय वासनेचे देहांतर्गत स्थान म्हणजे आज्ञा चक्रस्थित कपाळ प्रदेश आहे. आपल्या बर्हीमनाला बुद्धीआधीन आणल्यास सद्बुद्धीची जाणीव येऊ लागते व तेव्हा विलक्षण असा आत्मानंद प्राप्त होऊ लागतो. हा आनंद शब्दात वर्णन करणे शक्य नाही.

३. प्रेत वासना व संबंधित सुक्ष्म आत्मविश्लेषण

संसारीक लोकांना या वासनेबद्दल ज्ञान नसते. प्रेत वासना म्हणजे देहबाह्य सुक्ष्म तामसी शक्तींकडुन होणारे देहाचे कामुक शोषण अथवा बाधा. ह्या वासनेत संबंधित गृहस्थ सदस्यांनी कोणतीही खबरदारी अथवा नियम न पाळता केलेल्या द्युत कर्मांचे परिणाम स्वरुप प्रेत वासना परीणाम उद्भवतात. हा विषय आजही बहुतांशी लोकांच्या जीवनाशी जोडलेला आहे. त्याचे परिणाम घरातील सदस्यांच्या मानसिक, शारिरीक व आध्यात्मिक आरोग्यावर होत असतात. अशा प्रेत वासनाचे मानवी देहात मुळ स्थान देहांतर्गत असणारा गुद् द्वार प्रदेश आहे. अशाप्रकारची प्रेत वासना प्रार्थमिक स्तरावर कामुक शोषणातुन सुरु होउन कालांतराने प्रेत अथवा पिशाच्च बाधेत परावर्तित परिणामस्वरुप होते. संबंधीत गृहस्थ सदस्यांनी याबद्दल गांभीर्याने विचारविनिमय करायला पाहीजे.

वासना बीजाचे समुळ भस्मसंस्कार कसे करावे ? याबद्दल अधिक माहीतीसाठी ' दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट ' शी संपर्क करणे. 


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

दैविक आत्मोपचारिक उपायानुरुप साधकांचे स्वलिखित अनुभव पोस्ट ( Sadhak Experience Documented )

ही दत्तप्रबोधिनी लिँक जपुन ठेवा. यात सर्व Youtube Live व Facebook Live चर्चा माहीती संग्रह जतन केलेला आहे.

आध्यात्मिक उपाय व तोडगे संबंधित पोस्टस्

देवी उपासना संबंधित पोस्टस्

वास्तुशास्त्र संबंधित पोस्टस्


संपर्क : श्री. कुलदीप निकम 
Dattaprabodhinee Author )

भ्रमणध्वनी : +91 93243 58115
Whatsapp Or Sms Only )Cure Problems With Divine Powers. 100s Of People Cured ! Chakra Healing balancing. Ancient Indian Science. Based on Ashtaang Yog. Learn Yogic Healing. Types: Learner's Workshops, Stress Management, Divine Karma Cleansing, Mind empowerment, Chakra Balancing. - Visit Website Here !

Embed दत्तप्रबोधिनी न्यास on Your Site: Copy and Paste the Code Below

0