भगवान शंकराची भक्तीप्राप्ती असलेल्या शिवभक्तांना ज्ञान आणि वैराग्याची जोड़ मिळणे हेतु शिवतत्व समजुन घेणे अतिमहत्वाचे ठरते.
भगवान शंकराला नंदीगण, शिवगण आणि भैरवगण अत्यंत प्रिय असतात. कधीही शंम्भुचे पुजन करण्याची उत्सुकता असल्यास सर्वात अधी श्री काळभैरवाला शरण जावं. त्यायोगे पुढील शिव पुजन निर्विघ्नरुपात पार पडते. मनोवांछित फलप्राप्तीही सुलभ होते.

श्री काळभैरव पुजन तीन स्तरांवर करता येते.
१. आध्यात्मिक ऊबंटू ( सामुहीक श्री काळभैरव नामस्मरण )
दररोज सकाळी ६ वाजल्यापासुन श्री स्वामी समर्थ रात्रप्रहर सामुदायिक सेवामाध्यमातुन SPIRITUAL UBUNTU सामुदायिक सेवा ६ वेळचक्रात षट् म्हणजे ६ चक्रशुद्धीकरण हेतु दिवसभरातून ६ वेळा सामुहीकस्तरावर फक्त १ माळ जप ७०० हून अधिक साधक करत आहेत.
🔘आध्यात्मिक ऊबंटू नित्य वेळ. ( रेडीओ टाईम )
👉👉👉वेळ चुकली सामुहीक सेवा चुकली.
⏩संबंधित प्रश्न फक्त स्वामीमय सामुदायिक रात्र प्रहर सेवेतच विचारावेत.
***२. श्री काळभैरवाष्टक स्तोत्र ( संस्कृत )
व्यालयज्ञ_सूत्रमिंदू_शेखरं कृपाकरम्|

***३. श्री काळभैरव पाठ ( मराठी )
कृपया हा श्री काळभैरवपाठ एकदा तरी वाचा... प्राचीन आणि अद्भुत आहे.
भगवान शंकराला नंदीगण, शिवगण आणि भैरवगण अत्यंत प्रिय असतात. कधीही शंम्भुचे पुजन करण्याची उत्सुकता असल्यास सर्वात अधी श्री काळभैरवाला शरण जावं. त्यायोगे पुढील शिव पुजन निर्विघ्नरुपात पार पडते. मनोवांछित फलप्राप्तीही सुलभ होते.

श्री काळभैरव पुजन तीन स्तरांवर करता येते.
१. आध्यात्मिक ऊबंटू ( सामुहीक श्री काळभैरव नामस्मरण )
- 🔵 प्रथम मंत्र... ll ॐ काळभैरवाय नमः ll
- 🔵 द्वितीय मंत्र... Il श्री स्वामी समर्थ ll
🔘आध्यात्मिक ऊबंटू नित्य वेळ. ( रेडीओ टाईम )
- सकाळी... ६ वाजता ठिक🕕 ( १ माळ अथवा सरासरी वेळ )दररोज
- सकाळी... ९ वाजता ठिक🕘 ( १ माळ अथवा सरासरी वेळ )दररोज
- दुपारी... १२ वाजता ठिक🕛 ( १ माळ अथवा सरासरी वेळ )दररोज
- दुपारी... ३ वाजता ठिक🕒 ( १ माळ अथवा सरासरी वेळ )दररोज
- संध्याकाळी... ६ वाजता ठिक🕧 ( १ माळ अथवा सरासरी वेळ )दररोज
- रात्री... ९ वाजता ठिक🕘 ( १ माळ अथवा सरासरी वेळ )दररोज
- ▶सामुहीक प्राथनेसाठी स्थानबंधन नाही.
- ▶सामुहीक प्रार्थनेसाठी परिस्थितीबंधन नाही.
👉👉👉वेळ चुकली सामुहीक सेवा चुकली.
⏩संबंधित प्रश्न फक्त स्वामीमय सामुदायिक रात्र प्रहर सेवेतच विचारावेत.

***२. श्री काळभैरवाष्टक स्तोत्र ( संस्कृत )
ll श्री काळभैरवाष्टक ll
देवराज्य_सेव्यमान_पावनाघ्रिपंकजम्
व्यालयज्ञ_सूत्रमिंदू_शेखरं कृपाकरम्|
नारदादि_योगिवृंद वंदितं दिगंबरम्
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे|
भानुकोटिभास्करं भवाब्दितारकं परं
नीलकण्ठमीप्सिथार्थ_दायकं त्रिलोचनम|
कालकाल_मम्बुजाक्षमक्ष_शूलमक्षरं
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे|
शूलटंक_पाशदण्ड_पाणिमादिकारणं
श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम|
भीमविक्रम प्रभुं विचित्र तांडवप्रियं
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे|
भुक्तिमुक्ति_दायकं प्रशस्तलोकविग्रहं
भक्तवस्तलं स्थितं समस्तलोकविग्रहं|
विनिकण्वन्मनोज्ञ्_हेम्_किंकिणीलस्तकटिं
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे|
धर्मसेतू_पालकं त्वधर्ममार्ग्_नाशकम्
कर्मपाशमोचकम् सुशर्मदारकम् विभुम्|
स्वर्णवर्ण_शेष्_पाश_शोभितांगमण्डलं
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे|
रत्नपादुकाप्रभाभिराम_पाद_युग्मकम्
नित्यमद्वितीयमिष्ट दैवतं निरंजनम्|
मृत्यु दर्प नाशनं करालदंष्ट्र मोक्षणम्
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे|
अट्टहास_भिन्नपद्म_जाण्ड्_कोश_संततिं
दृष्टिपात_नष्टपाप_जालमुग्र_शासनं
अष्टसिद्धिदायकं कपालमालिकाधरं
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे|
भूतसंघनायकं विशालकिर्तीदायकं
काशिवास_लोकपुण्यपापशोधकं विभुम्|
नितिमार्गकोविदम् पुरातनम् जगत्पतिं
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे|
कालभैरवाष्टकम् पठन्ति ये मनोहरं
ज्ञानमुक्ति साधनम् विचित्रपुण्यवर्धनम्|
शोक_मोह्_दैन्य_लोभ_कोपताप्_नाशनम्
प्रयान्ति कालभैरवांघ्रिसन्निधिम् नरा धृवम्
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे l
ll ईति श्री आद्यशंकराचार्यविरचितं काळभैरवाष्टकम संपुर्णम् ll

***३. श्री काळभैरव पाठ ( मराठी )
कृपया हा श्री काळभैरवपाठ एकदा तरी वाचा... प्राचीन आणि अद्भुत आहे.
ll श्री काळभैरव पाठ ll
ॐ नमो श्री गजवदना । गणराया गौरीवंदना ।।
विघ्नेशा भवभय हरणा । नमन माझे साष्टांगी ।।1।।
नंतर नमिली श्री सरस्वती । जगन्माता भगवती ।।
ब्रम्हकुमारी विणावती । वियादात्री विश्वाची ।।2।।
नमन तसे गुरुवर्या । सुखनिधान सद्गुरुराया ।।
स्मरुनी त्या पवित्र पाया । चित्तशुद्धि जाहली ।।3।।
थोर ऋषिमुनी संतजन । बुधगण आणि सज्जन ।।
करुनी तयांसी नमन । ग्रंथरचना आरंभली ।।4।।
पूर्वकाळी एकदा अगस्त्य ऋषी । भेटले कार्तिकेयस्वामींसी ।।
नमस्कार करुनी तयांसी । प्रश्न विचारु लागले ।।5।।
तेहतीस कोटी देव असती । प्रत्येक आपणच श्रेष्ठ म्हणती ।।
सामान्य माणसाची मती । गुंग होऊनी जातसे ।।6।।
गाणपत्य म्हणती गणपती । शाक्त म्हणती महाशक्ति ।।
स्मार्त म्हणती पशुपती । वैष्णव म्हणती श्रीविष्णु ।।7।।
नाना देव नाना देवता । प्रत्येकाची ज्येष्ठश्रेष्ठता ।।
आपापल्या परीने भक्ता । आकर्षुनी घेतसे ।।8।।
हा श्रेष्ठ की तो श्रेष्ठ । कोण कोणाहुनी कनिष्ठ ।।
हे न कळल्याने स्पष्ट । मन संभ्रमी पडतसे ।।9।।
कोणी म्हणती कालभैरव । हाच खरा महादेव ।।
तयाचे कृपेने सदैव । सकल कल्याण होतसे ।।10।।
कालभैरव हा देव कुठला । कसा त्याचा उद्भव झाला ।।
हें जाणण्याची मला । आतुरता फार लागली ।।11।।
तरी आता कृपा करुनी । कोणता देव श्रेष्ठ सर्वांहुनी ।।
ते मज सांगावे समजावुनी । उपकार मोठे होतील ।।12।।
तेव्हां स्कंदानीं अगस्तीसी । जी कथा सांगितली अपूर्वसी ।।
ती सांगतों सर्वासीं । म्हणे श्री काळभैरवकृपा प्रसादें ।।13।।
सुमेरू पर्वतावरी एकेकाळीं । ब्रह्मादि सकळ देवमंडळी ।
चर्चा करीत होती बसली । तेव्हां काय जाहलें ।।14।।
ऋषी आणि मुनीजन । सर्वानी एकत्र जमून ।
सुमेरूवरी केलें आगमन । घेतलें दर्शन देवांचें ।।15।।
ब्रह्मदेवासी हात जोडून । त्यानी केला एक प्रश्न ।
" देवांमाजी सर्वश्रेष्ठ कोण । प्रभो आम्हां सांगावे "।।16।।
तेव्हां त्या ब्रह्मदेवाने । स्वसामर्थ्याच्या अहंकाराने ।
आणिक अतिशय अविचाराने । उत्तर दिलें झडकरी ।।17।।
मी संपूर्ण सृष्टीचा निर्माता । स्वयंभू अनादि ब्रह्म असतां ।
माझी असामान्य श्रेष्ठता । स्वयंसिध्दच आहे कीं ।।18।।
ब्रह्मदेवाची गर्वोक्ति ऐकून । क्रोधायमान झाले ऋतुनारायण ।
म्हणाले," हें आहे तुझें अज्ञान । सत्य तूं न जाणसी ।।19।।
मी विश्वाचा पालनकर्ता । मीच सृष्टीचा नियंता ।
मीच गतिशक्तीचा कर्ता । प्रत्यक्ष यज्ञस्वरूप मी ।।20।।
मी आहे परमज्योती । मीच आहे परागती ।
केलिस सृष्टिची उत्पत्ति । माझ्याच प्रेरणेने तूं ।।21।।
अर्थात तूं श्रेष्ठ नसून । मीच आहे श्रेष्ठ जाण ।
स्वतःकडे घेसी मोठेपण । काय तुला म्हणावें "।।22।।
झालें, ऐसें जुंपलें भांडण । " मीच श्रेष्ठें " म्हणती दोघेजण ।
शेवटीं " वेदांसी विचारूं आपण "। असें त्यांनीं ठरविलें ।।23।।
ऋग्वेद आणि यजुर्वेद । सामवेद आणि अथर्ववेद ।
यांच्याशीं केला वादविवाद । " श्रेष्ठ देव कोण असे ? "।।24।।
ऋग्वेद म्हणे " ज्याचे पासून । सर्वांचें होते प्रवर्तन ।
ज्यांत भूतमात्रांचा विलय जाण । तोच रुद्र श्रेष्ठ असे "।।25।।
यजुर्वेद म्हणे विचार करून । योगद्वारें होतें ज्याचें अर्चन ।
यज्ञयागांचा स्वामी स्वयंप्रमाण । शिव तो श्रेष्ठ जाणावा ।।26।।
साम म्हणे " ज्यामध्यें विश्वाचें भ्रमण । योगीजन करिती जयाचें ध्यान ।
ज्याच्या तेजें ब्रह्मांड उजळे पूर्ण । एक त्र्यंबक श्रेष्ठ तो " ।।27।।
अथर्व देई तसेच उत्तर। म्हणे " जो भक्तांचे दु:ख करी दूर।।
तोच कैवल्यरूप श्रीशंकर। श्रेष्ठ असे सवांर्हुनी " ।।28।।
वेदांचे उत्तर ऐकून । ब्रह्मा आणि नारायण ।।
दोघांनीही संतापून । निंदा केली शिवाची ।।29।।
तोंच अमूर्त प्रणव सनातन । मूर्त स्वरूप करूनी धारण ।।
म्हणे स्वयंज्योती शंकर भगवान । सर्व देवांत श्रेष्ठ असें ।।30।।
तरीही दोघांचे भांडण । संपले नाही मुळीच जाण ।।
दूर होईना त्यांचे अज्ञान । तेव्हा चमत्कार जाहला ।।31।।
दोघांच्या मध्ये एक विराट । दिव्य प्रकाशज्योत झाली प्रगट।।
त्या ज्योतीचा लखलखाट । विश्वव्यापी भासला ।।32।।
हां हां म्हणता ज्योतिर्मंडली । एक बालकाकृती दिसु लागली ।।
दिव्य तेजप्रभा आगळी । मुखावरी विलसतसे ।।33।।
वर्ण शुद्धनिलांजनासमान । त्रिनेत्र विचित्र नागभूषण ।।
त्रिशूळ वाजवी खणखण । शिवाचा अंशावतार तो ।।34।।
ज्याला बघुनी प्रत्यक्ष काळ । भयभीत होई कांपे चळचळ ।।
कालभैरव नावे सकळ । संबोधती तयाला ।।35।।
दुष्टांचे करी तो दमन । यास्तव ’ आमर्दक ’ नामाभिधान ।।
भक्तांचे पाप करी भक्षण ।। म्हणूनी पापभक्षक तो ।।36।।
’ कालराज ’ हेही नाव त्याचे । रक्षण करी तो काशी क्षेत्राचें ।।
पारिपत्य करुनी पाप्यांचें । शासन घोर करीतसे ।।37।।
अंगी विश्वोद्धारक शक्ति । त्रिलोकी जयाची थोर कीर्ती ।।
ऐसी पाहूनी बालमूर्ति । ब्रह्मदेव त्यासी बोलला ।।38।।
माझ्या पांचव्या मुखापासुनी । जन्म तुझा झाला म्हणोनी ।।
मला आता शरण येउनी । शुभाशिर्वाद घेई तू ।।39।।
भणाणले ब्रम्हदेवाचे मस्तक । शिवनिंदा करी पाचवे मुख ।।
ऐकुनी त्याची बकबक ।। काळभैरव क्रुद्ध जाहला।।40।।
भव्य रूप प्रगट केले । अक्राळ विक्राळ आगळे ।।
डोळे लालेलाल झाले । जळत्या निखार्यासारखे।।41।।
मग त्या काळभैरवानें । डाव्या करंगळीच्या नखाने ।।
ब्रह्मदेवाचे शिर छाटिले रागाने । अपराध केला म्हणोनी ।।42।।
तेव्हा त्या ब्रह्मदेवाचे डोळे । एका क्षणात चक्क उघडले ।।
आणि त्यांनी हात जोडीले । चुकलो चुकलो म्हणोनी ।।43।।
नारायणेंही तेंच केले । भैरवस्तुती स्तोत्र गाईले ।।
दोघांनाही सत्य ज्ञान झालें । प्रत्यक्ष शिव प्रगटले ।।44।।
देवांनी केली पुष्पवृष्टी । आनंदे भरली सर्व सृष्टि ।।
श्रीशंकराची दयादृष्टि । अभय देई दोघांना ।।45।।
शिव म्हणे ब्रह्मदेवाला । आणि यज्ञस्वरूपी नारायणाला ।।
मीच हा अवतार घेतला । अज्ञान दूर करायासी ।।46।।
अष्टभैरव माझे अंशावतार । काळभैरव हा सर्वाहुनी थोर ।।
त्याची तीन स्वरूपे अगोचर । जाणते तेच जाणती ।।47।।
महाकाळ,बटुकभैरव । तिसरा स्वर्णाकर्षणभैरव ।
तयावरी ठेविती भक्तीभाव । त्यांचे कल्याण होतसे ।।48।।
क्षेत्रपाल,ईशानचंडेश्वर । मृत्युंजय,मंजुघोष,अर्धनारीश्वर।
नीलकंठ,दंडपाणी,दक्षिणामूर्तिवीर । अवतार माझेच असती ते।।49।।
काळभैरवाची करतील भक्ती । त्यांची होईल कामनापूर्ती ।।
विघ्नेदु:खें दूर होती । सत्य सत्य वाचा ही ।।50।।
मग म्हणे काळभैरवासी । तूं जरी माझा अवतार अससी ।।
तरीही स्पष्ट सांगतो तुजसी । सत्य ते सत्य मानावे ।।51।।
ब्रह्मदेवाचे पाचवे मुख । माझी निंदा करी नाहक ।।
म्हणुनी फक्त तेंच मस्तक । कापिंलेस तूं कोपाने ।।52।।
क्रोधाग्नि पेटता मनी । विवेकबुद्धि भस्म होउनी ।।
घडती पापें हातुनी । अविचारी अनर्थ होतसे ।। 53।।
तू वागलास अविचाराने । तुझ्या त्या दुष्कृत्याने ।
ब्रह्महत्येच्या महापातकाने । ग्रासिले असे तुजलागी ।।54।।
ब्रम्हहत्येचे पाप अघोर । दुष्परिणाम त्याचे थोर ।।
कोणी कितीही असो बलवत्तर । पापमुक्त न होई ।।55।।
जो कोणी महापातक करी । तो तो जातो नरकपुरी ।।
अनंत युगे दु:ख भारी । भोगणे प्राप्त होतसे ।। 56।।
जेव्हा महापातकी प्राणी । मुक्त होतो नरककुंडातुनी ।।
त्याला वृक्षवेली शिळा योनी । सप्त लक्ष वर्षे लाभते ।।57।।
त्यानंतर कीड, मुंगी जीव योनी । सात हजार वर्षे कष्ट भोगुनी ।
पशुपक्षादि अनेक जन्म घेऊनी । दु:ख भोगी अपार ।।58।।
हे शिवाचे भाषण ऐकुनी । काळभैरव घाबरला मनीं ।।
म्हणे मुक्त व्हावया पापातुनी । काही उपाय सांगावा ।। 59।।
शिव म्हणे मग त्यासी । एक उपाय सांगतो तुजसी ।।
पृथ्वीवरील ती वाराणसी । अविमुक्त तें क्षेत्र असे ।।60।।
त्या क्षेत्राचे रक्षण । चण्डिका करिती रात्रंदिन ।।
त्या सर्वांचे नामाभिधान । ऐक आता सांगतो ।।61।।
दुर्गा उभी दक्षिणेला । अंतरेश्वरी नैऋत्येला ।।
अंगारेश्वरी पश्चिमेला । सुसज्ज असे सर्वदा ।। 62।।
भद्रकाली असे वायव्येला । भीमचंडी उभी उत्तरेला ।।
महामत्ता ईशान्यदिशेला । क्षेत्ररक्षण करितसे ।।63।।
उर्ध्वकेशी सहित शंकरी ।। पूर्व दिशेचे रक्षण करी ।।
अध:केशी आग्नेय कोनावरी ।। लक्ष ठेवी अखंडित ।।64।।
ऐसे ते काशीक्षेत्र जाण । भूलोकी असे पवित्र पावन ।।
तेथील पंचगंगेत करिता स्नान । पापक्षालन होतसे ।।65।।
देवदेवता, यक्ष किन्नर । नाग, सिद्ध आणि विद्याधर ।।
पिशाच्चें आणि नारीनर । होती पापमुक्त तिथें ।।66।।
त्या क्षेत्री तु जाशील जेव्हा । पापमुक्त तुही होशील तेव्हा ।।
वंद्य होऊनी सर्व देवा । सुखें तेथे राहशील ।।67।।
घ्यावयासि आतां प्रायश्चित्त । कापलेले मस्तक घे हातांत ।।
काशीला जा भिक्षा मागत । पापमुक्त व्हाया ।।68।।
ऐसे बोलुनी क्षणात । कैलासपती झाले गुप्त ।।
काळभैरव तिन्ही लोकात । भ्रमण करु लागला ।।69।।
तो पुढे पुढे चाले जरी । महापातक त्याचा पाठलाग करी ।।
येता वाराणशीच्या वेशीवरी । पाप तेथेच थांबले ।। 70।।
काळभैरव प्रवेशिता काशीक्षेत्री । हातांतील शीर पडले खालती ।।
त्या स्थळा " कपालमोचन " म्हणती । तीर्थ प्रसिद्ध झाले तें ।।71।।
काळभैरव झाला तेथील । शहराचा मुख्य कोतवाल ।।
दैवत थोर काशीतील । सर्वाहुनी ठरला श्रेष्ठ तो ।।72।।
आधीं दर्शन काळभैरवाचे । नंतर श्रीकाशीविश्वेश्वराचे ।।
ऐशापरी वागती तयांचे । सकल पाप जातसे ।।73।।
कार्तिक मास तो पवित्र । वद्य अष्टमी पवित्र फार ।।
काळभैरवाचा अवतार । शुभदिनी त्या जाहला ।।74।।
कोणतीही अष्टमी , चतुर्दशी । रविवार किंवा मंगळवार दिवशी ।।
शरण जावे काळभैरवासी । करावी पूजाप्रार्थना ।।75।।
तोतो होतो प्रसन्न ज्याला । दु:ख चिंता नसते त्याला ।।
अशुभ अमंगल जाते लयाला । सकल सिद्धी लाभती ।।76।।
होते इच्छित दीर्घायु संतती । मिळते स्थावरजंगम संपत्ती ।।
काळभैरवाचे महात्म्य किती । आणि कैसे वर्णावे ।।77।।
शत्रुभय आणि चोरभय । समूळ निश्चये नष्ट होय ।।
म्हणुनी तयाचेच पाय । धरावे भक्तिभावाने ।।78।।
वैभवशिखरीं भक्त चढे । दिनोदिनी लौकिक वाढे ।।
त्यासी पाहता काळ दडे । काळभैरवाच्या धाकाने ।।79।।
राजलक्ष्मी आणि राजमान्यता । मिळे समाजांत मानमान्यता ।।
काळभैरवाच्या सत्य भक्ता । उणे न पडे काहींही ।।80।।
स्कंदस्वामींचे भाषण ऐकुनी । समाधान पावले अगस्तीमुनी ।।
काळभैरवस्मरण करीत मनी । स्वस्थानी गेले आनंदे ।।81।।
यास्तव जोडुनी दोन्ही हस्त । म्हणावे काळभैरव वरद स्तोत्र ।।
जपावा काळभैरव मंत्र । निशिदिनी मनीं अखंड 82।।
ऐसे करील जो सहामास । काळभैरव प्रसन्न होईल त्यास ।।
देव भक्तांचा होतो दास । स्वंयसिद्ध सत्य हे ।।83।।
कोणी रंक असो वा राव । हृदयी धरुनी दृढभाव ।।
प्रार्थना करिता काळभैरव । धाउनी येई संकटी ।।84।।
सदा ठेवुनी सद्वर्तन । करिती जे काळभैरव स्मरण ।।
तयांसी साक्षात शंकर भगवान । प्रत्यक्ष दर्शन देतसे ।। 85।।
भैरवाचे कराया पूजन चिंतन । काळवेळेचे नसे बंधन ।।
स्त्रीपुरुषांनी त्यासी निशिदिन । भक्तिभावे भजावे ।।86।।
घरींदारी, कचेरीत, । वाटेत किंवा प्रवासात ।
नामस्मरण करावे अखंडित । तेणे कल्याण होतसे ।।87।।
काळभैरव होता प्रसन्न । पळते पाप आणि दैन्य ।।
मिळते विपुलधनधान्य । ऐसे सामर्थ्य तयांचे ।।88।।
अघोरीविद्या, मंत्रतंत्रशक्ती । भैरवभक्तांसी कधी न बाधती ।।
स्तोत्र हे जेथे पठण करिती । तेथें भुतेखेते न राहती ।।89।।
काळभैरवासी नित्य स्मरता । बंदिवासातुन होते मुक्तता ।।
येते हाती राजसत्ता । ऐसा समर्थ देव तो ।।90।।
ॐ असितांगभैरवाय नम:। ॐ रुरुभैरवाय नम:।।
ॐ चंडभैरवाय नम:। ॐ क्रोधभैरवाय नम:।।91।।
ॐ उन्मत्तभैरवाय नम:।ॐ कपालीभैरवाय नम:।।
ॐ भीषणभैरवाय नम:। ॐ संहारभैरवाय नमो नम:।।92।।
ॐ महाकाळा, महाकोशा। महाकाया, विश्वप्रकाशा ।।
मत्ता, महेशा, सर्वेशा । काळभैरवाय नमो नम: ।।93।।
संहाररूपा, खट्वांगधारका । कंकाळा, पापपुण्यशोधका ।।
सुराराध्या, तापहारका । काळभैरवाय नमो नम: ।।94।।
लोलाक्षा, लोकवर्धना । लोस्याप्रिया, श्वानवाहना ।।
भुतनाथा, भुतभावना । काळभैरवाय नमो नम: ।।95।।
हे श्री देवाधिदेवा । कराल वदना, काळभैरवा ।।
कृपाशिर्वाद नित्य असावा । पदीं लीन जाहला ।।96।।
कुटुंबातील सर्व व्यक्ती । त्यांसी दीर्घायुष्य, आरोग्य, शक्ति ।।
बुध्दि, किर्ती, संपत्ती । देऊनी वंश वाढवी ।।97।।
जाऊं आम्ही जेथें जेथें । कार्यसिध्दी होवो तेथें ।।
मनी कुविचार भलभलते । येऊं नको देऊं तूं ।।98।।
श्री सद्गुरुस्वामीं कृपेसाठी । तुझ्या पायी घाली मिठी ।।
अपराध पापें कोटीकोटी । क्षमा त्यांची करावी ।।99।।
घरीं नांदो सतत शांतता । पडूं नये कशाची कमतरता ।।
योगक्षेमाची नसावी चिंता । हेंच देंवा मागणे ।। 100।।
शके अठराशे सत्याण्णवासी । माघमासी कृष्णपक्षीं ।।
चतुर्दशी महाशिवरात्रीसी । ग्रंथ पूर्ण झाला हा ।।101।।
श्री काळभैरवचरणार्पणमस्तु ।। शुभं भवतु ll
भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे.
सप्ताह-पारायण पध्दति... Click for Shiv-Lilamrut download here.
कोणत्याही सोमवारी सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन ११ बेलाची पाने पिंडीवर वहावीत व शंकराचे यथाशास्त्र दर्शन घेऊन " मी शंकराना प्रसन्न करून शांति, समाधान, आनंद ( जी इष्ट कामना असेल ती बोलून ) प्राप्त करण्यासाठी श्रीशिवलीलामृत पोथीचे ७ दिवसात पारायण करणार आहे तरी हे कार्य भगवान् श्रीशंकरानी कृपा करून पूर्ण करून घ्यावे." अशी प्रार्थना करावी व तेथे किंवा स्वत:च्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीलामृत पोथी वाचावी. शूचिर्भूत असावे.
- सोमवार - अध्याय १ व अध्याय २
- मंगळवार - अध्याय ३ व अध्याय ४
- बुधवार - अध्याय ५ व अध्याय ६
- गुरुवार - अध्याय ७ व अध्याय ८
- शुक्रवार - अध्याय ९ व अध्याय १०
- शनिवार - अध्याय ११ व अध्याय १२
- रविवार - अध्याय १३ व अध्याय १४
रविवारी रात्री १५ वा अध्याय वाचला तरी चालेल न वाचला तरी चालेल. रविवारी रात्रीच्या आपल्या जेवणाच्या पात्राचा नैवेद्य शंकराला दाखवावा व तेच उद्यापन समजावे.
पारायण करताना दीवा तेवत ठेवावा. रविवारी शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरापुढे यथाशक्ति तांदूळ व पैसे ठेवावेत. शैव संप्रदायी साधूला कमीत कमी २१ रु. दक्षिणा व पांढरेशुभ्र वस्त्र दान द्यावे.
पोथी मोठयाने वाचली तरी चालेल. इतरांनीही ऐकावी. रविवारी वाचन पूर्ण झाल्यावर १०८ वेळा ॐ नम: शिवाय मंत्राचा जप करावा ( जमल्यास रोज जप करावा ).
ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...
ही दत्तप्रबोधिनी लिँक जपुन ठेवा. यात सर्व Youtube Live व Facebook Live चर्चा माहीती संग्रह जतन केलेला आहे.
दत्ततत्व ( साध्य ) व हठयोग ( साधन ) म्हणजे दत्तप्रबोधिनी आचरण ( समाधि )
दत्त संप्रदाय व साधन, साध्य, समाधी
शिव साधना व पिशाच्चशक्तीसंबंधी सुक्ष्मज्ञात वास्तविकता...!
श्री गुरुचरित्राच्या सप्ताहवाचनाच्या पद्धती व संक्षिप्त रसग्रहण
संपर्क : श्री. कुलदीप निकम
( Dattaprabodhinee Author )
भ्रमणध्वनी : +91 9619011227
( Whatsapp Or Sms Only )
( Whatsapp Or Sms Only )

Cure Problems With Divine Powers. 100s Of People Cured ! Chakra Healing balancing. Ancient Indian Science. Based on Ashtaang Yog. Learn Yogic Healing. Types: Learner's Workshops, Stress Management, Divine Karma Cleansing, Mind empowerment, Chakra Balancing. - Visit Website Here !
Embed दत्तप्रबोधिनी न्यास on Your Site: Copy and Paste the Code Below
