आत्मक्रिया योग व सहज समाधि प्रबोधन: श्री काळभैरव माहात्म्य SEO

Dattaprabodhinee Sevaa Trust’ was started in the year 2014 with a vision to create a non-profit humanitarian proficient area for spiritual people to actively engage them in soulistic existences.

ब्रम्ह अंतःकरण कसे बनते ? अनुकरणशील स्वतंत्र सद् मार्ग...!
घरातील देवघर व देव पंचायतन आधिष्ठान - २
नवनाथ ग्रंथ ( Navnath Bhaktisar ) पारायण कसे करावे ? ब्रम्हाण्डीय सामर्थ्य विश्लेषण...!
आत्मरत्न ( Soul Gem ) म्हणजे काय ? माणुस का भरकटतो ?
श्री गोरक्ष किमयागिरी प्रवाह नाथामृत सिद्धग्रंथ व कार्यसिद्धी...!
Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

बुधवार, ३ ऑगस्ट, २०१६

श्री काळभैरव माहात्म्य


श्री काळभैरव हे दहा भैरवांचे अधिपती. त्रिदेवांच्या चरणापाशी आदिशक्ती आहे. आदिशक्तीच्या पायाशी श्री काळभैरव आहेत. श्री काळभैरवाच्या अधीन काळ आणि वेळ आहे. काळवेळेच्या अधीन नियती आहे. हे सर्व सदगुरुंच्या अधीन आहेत. आणि श्री काळभैरव सदगुरुंचा दास आहे.  जगन्नियंत्या भगवान शिवाची ती प्रलयंकारी उजवी बाजु. त्यांचे महात्म्य धर्ममार्तंडानी लपवून ठेवलय. हा देव ज्याची वज्रदाढ दंत नीलवर्णीय आहे. ज्याची काया सर्वात मोठी आहे. जो प्रत्येक युगाचा अंत करणारा आहे. असा हा शामवर्ण भैरव ज्यास प्रत्येक कार्यात स्मरण करुन कार्यारंभ करतात.


http://blog.dattaprabodhinee.org/2016/08/lordkalbhairav.html


         काळभैरव साधनेमुळे प्रकृतीगर्भात मानवाला ग्रासणारे पितृदोष , नजरदोष ,ग्रहबाधा ,शत्रूबाधा ,भुत प्रेत पिशाच्चबाधा ,करणी ,भानामती , तसेच ईंद्र, कलि ,माया निर्मित संकट मालिकांपासुन मुक्तता मिळते. मायेची तोड फक्त श्री काळभैरवच आहेत. तो महारुद्र असल्याने आदिपुरूष म्हणता येईल. त्याची कठोर साधना साधकाला सर्व दैत्य,पिशाच्च शक्तींवर एक हुकुमी सत्ता मिळवुन देते. पण दासाचीही पात्रता तशीच असावी लागते. हे दैवत विधिलिखितही अडवतं. श्री काळभैरव शैतानी शक्तीना नाचविणारे एकमेव ज्वलंत दैवत आहे.  हे विवेकशील सय्यमी आणि पारदर्शी चारित्र्य ही प्राथमिक पात्रता. तिथे व्याभीचार लबाडी आणि खोटेपणास थारा नाही. अशा लोकांसाठी श्री काळभैरव उग्र दैवत आहे. मृत्युपेक्षाही भयानक आहेत. या उलट सदगुरुदासांसाठी ते प्रेमळ आणि भक्तवत्सल आहेत. ते घरातील वास्तुपुरुषापासुन ते कुलदेवतेच्या दैत्यमुखापर्यंत कोणालाही कुठेही आणि कसेही क्षणात संपवु शकतात. गोस्वामी तुलसीदास यांनी देखील भैरवयातना भोगल्या आहेत. त्यांच्या निर्व्याज साधनेने गमावलेला आत्मविश्वास पुन्हा प्राप्त होतो. मनात भय रहात नाही. आंतरिक विचारात बळ येते. जीवनाचा दृष्टीकोण विशाल होतो. शैतानी शक्तीपासुन आत्मरक्षा होते. अंतर्बाह्य शत्रूच्या पकडीतुन मनुष्य दुर जातो. आध्यात्मिक जीवनात रुची निर्माण होते. कठिण कार्य सहज पूर्ण होतात. आपल्या जीवनावर आपले वर्चस्व निर्माण होते. काली मातेची साधना योग साध्य होतो. सदगुरु हे कामधेनु आहेत. श्री काळभैरव तत्व सदगुरु अधीन असल्याने सदगुरु यौगिक सूक्ष्म हस्तपादुका माळेने दश भैरवांची जप साधना केल्यास सर्व लक्ष्मींची प्राप्ती होते. पण श्री काळभैरवांच्या लेखी चुकीला माफी नाही.

         श्री काळभैरव यांनी  मृत्यु , देवराज ईंद्र , ब्रम्हदेव , नृसिंहदेव आणि भगवान विष्णु यांचा गर्वहरण केले. लोकानाच काय तर साधु योगिजनांना देखील त्यांचा अभ्यास होवु शकला नाही. श्री काळभैरव हे मोक्षप्राप्तीसाठीचे श्री दत्त अधिष्ठान हृदयात तयार करतात. श्री काळभैरव स्वाधिष्ठानाला वळसा घालुन सदगुरुंकडे आणि त्यायोगे दत्त महाराजांकडे जाण्याचा मार्ग नाही.  हा मार्ग अत्यंत कठीण. जिगर असेल तरच मार्गक्रमण शक्य आहे. शनी देव हा काळभैरव देवांचा सर्वात मोठा भक्त आहे . श्री काळभैरव देवांची रामदास स्वामी यानी आरती लिहिलेली आहे. पण आता ती शोधुनही सापडत नाही.


http://blog.dattaprabodhinee.org/2016/08/lordkalbhairav.html


         श्री काळभैरव जितका सिद्ध योग्यांचा तितकाच महाचांडाळांचाही आहे. म्हणुनच प्रामाणिक आणि पारदर्शी रहावे. श्री काळभैरव दैवत सुक्षम देहातील वासनेची कर्म नष्ट करतात. काळभैरवाना क्षेत्रपाल असेही म्हणतात. क्षेत्र म्हणजे शरीर व पाल म्हणजे पालन करणारा. तो कर्म आणि अकर्माच्या गोंधळातुनही सोडवितो . ॐ काळभैरवाय नम: हा देवाचा जपमंत्र आहे जो दत्तप्रबोधिनी संस्थेच्या सामुदायिक आध्यात्मिक ऊबंटु साधनेत जपला जातो. जपासाठी रुद्राक्षमाळा वापरतात. स्फटिक माळही चालते. महिला देखील हा जप करु शकतात. प्रामाणिक असल्यावर देवापुढे स्त्री पुरुष हा भेद रहात नाही. भैरवप्रहर रात्री १२ ते पहाटे ३ असा आहे. ह्या प्रहरात भैरवसाधना अधिक प्रभावी आणि परिणामकारक ठरते. तप, जप आणि ध्यान मार्गात अग्रेसर होत असताना प्रथमदर्शनी बाह्य आवरणात्मक शुद्र शक्ती विविध रुपं आणि स्वरुपाद्वारे साधकाला भटकाव उत्पन्न करतात. हे अतिशय भयानक मायाजाळ आहे. त्यातुन सहज योग्य मार्ग तदृप शक्ती कधीही सापडु देत नाही. याला आंतरिक चकवा असे म्हणतात. ह्या चकव्यापासुन साधकाला काळभैरव दुर ठेवतात. काळभैरवाची सेवा केल्यास मृत्युनंतर पिशाच्च योनी कशी मिळेल ? त्यांची सेवा हा मृत्युवर विजयप्राप्तीची सुवर्णसंधी आहे. 

पंचमहाभुतांपलिकडे शिवतत्व आहे. साधकाला श्री काळभैरवनाथ श्री दत्तकृपेने तिथे घेउन जातात. श्री काळभैरवाची सेवा केल्यास शिवाची साधना आवश्यकता नाही. ती आपोआप साध्य होते. श्री काळभैरव यांचे प्राचीन मंदीरात गेल्यावर देवाच्या मुर्तीकडे एकटक पहावे. सात्विकता डोळ्यात भरुन येईल. भैरवोत्थान केवळ पद्मासनातच साध्य होते. 

मोरगाव येथील गणेश मंदीराच्या अकरा पाय- या अकरा भैरवाच्या प्रतीक आहेत. 

१ प्रमुख - श्री काळभैरव 
२ उपप्रमुख - बटुकभैरव 
३ समायोजक - स्वर्णाकर्षण भैरव
४ अष्टभैरव - स्मशानभैरव 
५ नग्नभैरव 
६ मार्तण्डभैरव 
७ कपालभैरव 
८ चंडभैरव 
९ सन्हारभैरव 
१० क्रोधभैरव
११ रुरुभैरव http://blog.dattaprabodhinee.org/2016/08/lordkalbhairav.html


श्री काळभैरव पाताळवासी आहेत. त्याना दक्षिणेश्वर असेही म्हणतात. नक्षत्रे त्यांच्या आज्ञेची प्रकर्षाने वाट पहातात. त्याना प्रसन्न केल्यास नक्षत्रांचे फळ तुमच्या खिशात. श्री काळभैरवाच्या आज्ञेशिवाय कोणत्याही सूक्ष्मक्षेत्रात प्रवेश नाही. नकारात्मक उर्जा डोक्यात आणि शरीरास जाणवत असेल तर सलग सहा महिने श्री काळभैरव साधना करावी. त्याची साधना निर्गुणात सरस बनविते. आध्यात्मिक प्रगतीसाठी सगुणातुन निर्गुणात अनासक्तीने पदार्पण आवश्यक आहे. श्री काळभैरवांचा विनाअट ध्यास घेता आला पाहिजे. त्यांचा ध्यास लावाल तर कर्तव्यनिष्ठा देखील ठेवावी लागेल. धरसोडवृत्ती ठेवल्यास ते भाव देणार नाहीत. त्यावर जावुन जबरदस्ती विनवणी कराल तर उरली सुरली सुखशांती गमावुन बसाल. ईथे कधीही मानस स्तरीय मजामस्ती आणि ईतर अवहेलना करु नये. नेहमी जमेल तितके दत्तसाच्यात बसण्याचा प्रयत्न करावा.

श्री काळभैरवांची अनुभूती येणे ही आत्ममार्ग निर्धोक सुरु असल्याची पुष्टी करते. श्री काळभैरवाच्या कक्षेत आल्याशिवाय नशिबाचे चक्र फिरत नाही. ईतर देव देवी बघ्याची भुमिका घेतात . पण भैरवनाथ प्रामाणिक आणि तळमळीला धावुन येतात. मन हृदय आणि नियती स्वच्छ हवी. सदगुरुभक्ती सुख दु:खाच्या पलीकडे गेल्यास दैव सदभक्ताला जीवनाच्या आपदास्थितीत पाठीशी घालतं. आध्यात्मिक जीवनात घोर साधना सात्विक वैराग्यपुर्ण व सदगुरु अधिष्ठानयुक्त असतात. ह्या साधना सहज समाधी ह्या अंतिम ध्येय  योगापर्यंत घेवुन जातात.

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...


महत्त्वाची सुचना :

संबंधित पोस्टबद्दल विशेष गोपनीय माहीती फक्त संस्थेच्या अधिकृत सभासदांनाच विनंतीवरुन कळवण्यात येते.

संपर्क : श्री. कुलदीप निकम
भ्रमणध्वनी : 9619011227


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Enter your email address:

Delivered by FeedBurner

लोकप्रिय पोस्ट

स्वामीसभासद नोंदणी प्रार्थमिक अर्ज