' आई ' या अभिव्यक्तीचे आध्यात्मिक माहात्म्य- Simple and Easy

नवरात्रीचे दिवस म्हणजे शक्ती उपासनेचे दिवस. आईच्या पुजेचे दिवस. ' खा, प्या, मजा करा, भरपुर पैसे कमवा व मरुन जा ' अशी तामसी वृत्ती विचारश्रेणीवर विजय मिळवण्याचे दिवस. आत्मशक्तीचे महत्व व भक्तीची महत्ता समजण्याचे दिवस तसेच तपश्चर्येचा महीमा व एकता ह्यांचे महत्त्व समजावणारे दिवस. ह्या दिवसात घुमत असलेला साधनेचा सुर पकडुन जीवन समर्पणाच्या संगीताने भरुन कसे टाकता येईल यासाठी दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट माध्यमातून संंबंधित अभिलेख प्रकाशित करत आहोत.


आध्यात्मिक जीवन भौतिकवादाच्या पलिकडील सुक्ष्म जगतावर आपले शाश्वत अस्तित्व प्रकट करणारे आत्मसान्निध्य तर असतेच, त्याच सोबत महाराजांच्या अनंत शक्तींची नियतत्व कार्यप्रणाली यांचे सज्ञानातुन आत्मबोधही होत असतो. ह्या अन्वये सद्गुरु कमळचरणांना वाहुन घेतलेल्या दास्यभक्तीयुक्त उत्तम साधकांना अशा गहन व गुढ सहस्यमय दशमहाविद्या अर्थात श्री विद्या व नवदुर्गा मातांचे परम सान्निध्य सहजच प्राप्त होते. ह्या दशमहाविद्यांची साधना स्वतंत्र स्तरावर विनासद्गुरु मार्गदर्शन कधीही करु नये. दशमहाविद्या व ईतर तीन शक्तीस्तंभ सद्गुरु निष्ठा व त्यांच्या अभिवचनांचे पालन तंतोतंत करण्यात सदैव दक्ष असतात. ईतर कोणत्याही साधन व साध्य आत्मकर्मात त्यांना हस्तक्षेप करणे रुचत नाही. त्यायोगे सदैव सद्गुरु महाराज शरणागत वत्सल या भुमिकेतुन शक्ती उपासना करावी.


' आई ' या अभिव्यक्तीचा आध्यात्मिक तत्वबोध...!


' आई ' हा काही सामान्य शब्द नव्हे. ईतर त्रिपदीयुक्त नामाप्रमाणेच ' आई ' हा शक्तीस्वर आहे. हा स्वर ईतर त्रिपदी तत्वाप्रमाणेच प्रकृती पुरुष शिवतत्वाचा ब्रम्हवाचक आहे. ज्याप्रमाणे भवसागरातील ' भव ' ही संसारीक मानवाचा देहअंत ' शव ' या तत्वाशी जोडलेला आहे. म्हणजेच भवसागरात शव अस्तित्व गणले जाते. अर्थात आत्मशक्तीचा अविर्भाव या तत्वात होत नाही. त्याअर्थी भवसागराचा शेवट ' शव ' असा होतो. त्याच प्रमाणे नारायणाची मातृकाशक्ती ' आ ' चा अविर्भाव भवसागरात झाल्यास भव चे सहजच भक्तीमार्गाद्वारे ' भाव ' या तत्वात परिवर्तन होते. त्यायोगे नारायणी ईश्वरीय शक्तीतील ' ई ' चा आविर्भाव ' शव ' या स्थुल तत्वात होऊन त्याचे शिव असे आत्मतत्वात परिवर्तन होते.


म्हणजेच ज्याप्रमाणे ' भवसागरात " शव " विद्यमान आहे '. त्याचप्रमाणे ' भावसागरात ' शिव ' विद्यमान आहे. ' भव + शव यातुन जेव्हा भाव + शिव यांचे आत्मसंधान होते तेव्हा ' भाव ' मधील ' आ ' व शिव मधील ' ई ' एकत्र येऊन ' आई ' हे शक्तीचे त्रिपदी नाम तयार होते. अशा नामाच्या अखंड स्मरणाने भगवती दुर्गा सहजच प्रसन्न होऊन सद्गुरु महाराजांच्या साक्षीने आपल्या योगक्षेम स्वतः ग्रहण करते. त्यायोगे जीवनअंती सद्भक्ताला परमगती प्राप्त होते. एकुण नऊ नवरात्रीतील प्रथम व ईतर गुप्त नवरात्रीत ' आई ' या तत्वातुन शक्ती साधना यथाशक्ति केल्यास आत्मबोध झाल्याशिवाय राहाणार नाही. असा आमचा विश्वास आहे.


' आत्मा ' म्हणजे काय ?


' आत्मा ' चा मुळ अंतर्मुखी मतीतार्थ ' आत् + मा ' असा आहे. या आत्मतत्वात ' आत् ' या तत्वाचा अर्थ परिपुर्ण अंतर्मुख योगसंधान आहे. तर ' मा ' म्हणजे ' आई ' असा आहे. ' आई ' या तत्वाचा मतीतार्थ वर लिहीलेला आहे. त्यायोगे ' आत्मा ' या तत्वाचा अर्थ ' देहातीत नित्यस्थित असलेली परमचैतन्यमय आदीशक्ती आईच्या स्वरुपात ' असा आहे. ह्या अर्थातुन आपण आपल्या ह्दयात सदैव आत्मबोधक असे गहन नाममंथन करायला हवे. जेणेकरुन स्वतःच्या आत्मबळाची सहजच ओळख होऊन जीवनाचा योग्य अर्थ व दिशास्थान उमगेल.


भोगी संसारीक मानवाच्या छातीत आत्म्याची होणारी दुर्दशा कशी असते ?


आपण ८-१२ वर्षाच्या लहान मुलींना बघुन किती आनंद व्यक्त करतो त्याची मर्यादाच नाही. ह्या आनंदात आपण हेही विसरतो की, ' आपल्या ह्दयात एक चैतन्यमयी शक्ती २४x७ कार्यरत आहे, जीच्या मुळे आपला श्वान, अन्नपचन, मानसिक शक्ती अविलंब तत्पर असते, जी आपल्याकडुन भगवत् आराधनेपलीकडे काहीच मागत नाही. अशा आत्म्याला आपण एकु शकत नाही. बोलु शकत नाही अथवा आत्माही मुक्याची लाथ खाऊन काहीच बोलु शकत नाही. हे तर देहातीत असलेल्या परमतत्वाचे प्रारब्ध व कर्म संचितातुन उत्पन्न झालेले दुर्देव समजावे,
ज्याप्रमणे आपण ' टि.बी. अथवा क्षयरोगग्रस्त रुग्ण पाहुन दुःख व्यक्ती करतो. त्याच प्रमाणे भवसागराच्या भोगी बर्हीमुखी वासना रोगाने आपला ह्दयस्थ आत्माही त्या क्षयरोगी ग्रस्त शरीरयष्टी प्रमाणेच पिंजऱ्यात बंदिस्त आहे. यात अधिकरतर त्या आत्म्याला व्यवस्थित नाक, तोंड, डोळे, हात, पाय आणि साधारण आत्मज्ञानही आलेले नसते, अशाप्रकारे ही आत्म्याची दुरावस्था एका वासनेच्या पिंजऱ्यातली. घरातील आईचा अमानुष छळ करुन कितीही तरी आदिशक्ती उपासना करण्याचा ध्यास घेतलात, तरीही तो प्रयत्न व्यर्थच समजावा. मुळत आध्यात्मिक जीवनाची सुरवात ह्दयस्थ असलेल्या आई कडुनच होते. अशा आईला शिवत्वातुन बळकट केल्यास, ती तुमचेच मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक व आध्यात्मिक रक्षण, भरण व पोषण करेल आणि ते ही आजीवन... सद्गुरु महाराजांच्या कृपेने तर मृत्युपक्षातही आत्मा-परमात्मा एकीकरणातुन आपला स्वतःचा, आपल्या परिवाराचा व कुळाचा उद्धार होणारच. यात दुमत नाही.


अशा तत्वाने आपण सर्व नवरात्रीपुजन प्रामाणिक व पारदर्शक नितीमत्तेने केल्यास आपल्याला न मागता सर्व सहजच प्राप्त होईल व जीवनमार्ग परमसुखाचा ठरेल.

Mahakali Shakti Upasana Payment Link 👈

संपर्क : श्री. कुलदीप निकम 
Dattaprabodhinee Author )

भ्रमणध्वनी : +91 9619011227 
Whatsapp Or Sms Only )
GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती
Cure Problems With Divine Powers. 100s Of People Cured ! Chakra Healing balancing. Ancient Indian Science. Based on Ashtaang Yog. Learn Yogic Healing. Types: Learner's Workshops, Stress Management, Divine Karma Cleansing, Mind empowerment, Chakra Balancing. - Visit Website Here !


Embed दत्तप्रबोधिनी न्यास on Your Site: Copy and Paste the Code Below