रुद्राक्ष हे भगवान शंकराला फार प्रिय आहे. हे आपण सर्वांस माहित आहे. रुद्राक्षाचे बरेच प्रकार आहेत .जसे एक मुखी, सहा मुखी, पाच मुखी, चार मुखी प्रत्येक रुद्राक्षाच आपलं वैशिष्टय आहे त्याचे गुणधर्म आहेत आणि प्रत्येक रुद्राक्षाचा विनियोग हा निरनिराळया समस्या निवारण्यासाठी, जीवनातील दुःख दैन्य, दारिद्रय, भौतिक, आर्थिक, अध्यात्मिक आणि सामाजिक प्रगती साठी केला जातो.पण बऱ्याच वेळा चुकीच्या मार्गदर्शनाखाली जर आपण चुकीच्या पद्धतीने रूद्राक्ष जर धारण केलं तर त्याचे विपरीत परिणाम देखील व्यक्तीला किंवा साधकाला, धारण करणाऱ्या मनुष्याला भोगावे लागतात. तसे काही आपल्या सोबत घडू नये ह्या कारणास्तव दत्तप्रबोधिनी न्यासद्वारे सिद्ध चारमुखी रुद्राक्ष आपल्या सेवेत दत्तप्रबोधिनी ईस्टोर मध्ये उपलब्ध केलेले आहे.
अनुभव लिंक- योगिनी यंत्र व वास्तुदोष निवारण यंत्र
आजच्या चढाओढीच्या, स्पर्धेच्या वातावरणात पालक आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीला घेऊन चिंतीत दिसतात. भौतिक शैक्षणिक साधनांची मुबलक उपलब्धता असून देखील अपेक्षित बुद्धीमत्तेची कमतरता पालकांच्या चिंतेचा विषय आहे. ह्या समस्येवर अध्यात्मिक मार्गाने रामबाण उपाय म्हणजे सिद्ध चारमुखी रुद्राक्षाचा विनियोग .सिद्ध चारमुखी रूद्राक्ष हे ज्ञानवर्धक, प्रज्ञावृद्धी करणारे आहे. तसेच बाल, वृद्ध आणि महिला वर्गांसाठी अतिशय प्रभावशाली परिणामकारक आहे. नवरात्री-दिवाळी किंवा शाबरी साधना अथवा श्रीदत्त जयंतीच्या शुभ मुहूर्ताच्या पार्श्वभुमीवर हा चारमुखी रूद्राक्ष सिद्ध केला गेलेला आहे.
चारमुखी रुद्राक्षाची अधिष्ठात्री देवता आहे बृहस्पती म्हणजे अर्थात गुरु. तुमच्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या भौतिक व अध्यात्मिक घटनांमध्ये सद्गुरूंचा सहभाग होण्यासाठी सिद्ध चारमुखी रुद्राक्ष धारण केले जाते. सद्गुरूंचे पाठबळ आणि त्यांच पदोपदी सहकार्य आणि कृपा कटाक्ष प्राप्त असेल तर इतर देव - देवता, कुलदेवता, ग्रामदेवता, पितर आहे ह्यांचे सहकार्य जरी नाही लाभले तरी जीवनाची घडी व्यवस्थित राहते व जीवन प्रगतीवर पथावर मार्गक्रमण करते. सद्गुरू कृपा प्राप्ती साठी सिद्ध चारमुखी रूद्राक्ष धारण करणे अनिर्वाय आहे.
रूद्राक्ष का धारण करावे ?
महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे चारमुखी रुद्राक्षावरती भगवान दत्तात्रय स्वामी महाराजांची पुर्ण कृपा असते व रुद्राक्षाची चार मुख म्हणजे महाराजांचे चार श्वान व चार वेदांचे प्रतिकआहे. चारमुखी रुद्राक्ष ज्ञानवर्धक असल्याने लहान मुलांच्या बुध्दीमत्तेत वाढ होण्यासाठी फार महत्वाची भुमिका निभावतो, त्याच्यासाठी चारमुखी रुद्राक्ष फार गरजेचे आहे.
लहान मुलांसाठी सिद्ध चार मुखी रुद्रक्षाचा विनियोग अश्या प्रकारे केला जातो ?
सर्व प्रथम हे ध्यानात घ्यावे सिद्ध चारमुखी रूद्राक्ष लहान मुलांच्या गळ्यात घातले जात नाही. त्याला देव्हाऱ्यात ठेवावा लागतो. अर्थातच दत्तप्रबोधिनीचे जे देवपंचायतन आहे त्याच्या मध्यभागी हे सिद्ध चारमुखी रूद्राक्ष ठेवले जाते. कारण तेथे श्रीदत्त महाराजांचं स्थान आहे. संमभ्रमित होऊन लहान मुलांच्या गळ्यात सिद्ध चारमुखी रूद्राक्ष घातल्यास त्यांना विपरीत परिणाम भोगावे लागतील. कारण लहान मुलांना ऊर्जा सहन होणार नाही.
महिलांसाठी सिद्ध चार मुखी रुद्रक्षाचा विनियोग अश्या प्रकारे केला जातो ?
महिलांनी सिद्ध चारमुखी रुद्राक्ष व्यक्तिगत विनियोगासाठी घेतल्यास सोयर, सुतक, मासिक धर्माचे पालन कटाक्षाने करावे लागेल. त्या काळात रूद्राक्ष शरीरावर धारण करता येत नाही. आरोग्याच्या दृष्टिकोनातून महिला वर्गांसाठी सिद्ध चारमुखी रूद्राक्ष औषधी गुणधर्माचे काम करते. विशेष ज्या महिलांना थायरॉईड आहे. त्यांना ह्या रुद्राक्षाचे धारण करणे अतिशय उत्तम आहे. जो महिला वर्ग अध्यात्मिक अनुसंधानात आहे व ज्यांना अध्यात्मिकतेचे उच्चत्तम पातळी गाठायची असेल, तर त्यांनी आवर्जून सिद्ध चारमुखी रूद्राक्ष धारण करावे. अध्यात्मिक प्रवास जलद गतीने होईल. कारण चार दैवीशक्तीचं अनुसंधान ह्या चारमुखी रुद्राक्षामध्ये आहे. ज्यांना शक्तीस्तंभ असे म्हणतात.
सिद्ध चारमुखी रुद्राक्षाचे प्रथम मुख दशमहाविद्येचं आहे. द्वितीय मुख नवदुर्गांचे आहे. तृतीय मुख साढेतीन शक्तिपीठाचं आहे. चतुर्थ मुख चौसष्ट योगिनींच आहे. भगवती साधनेतसिद्ध चारमुखी रुद्राक्षाचा विनियोग महत्वाचा आहे. भौतिक जीवनामध्ये सर्व सामान्य महिलांना सुरक्षितेच्या भावनेतून शारीरिक संवरक्षणा हेतू सिद्ध चारमुखी रुद्राक्ष धारण करणे आवश्यक आहे .
Link : अनुभव - 4 मुखी रुद्राक्ष
पुरुषांसाठी सिद्ध चार मुखी रुद्रक्षाचा विनियोग अश्या प्रकारे केला जातो ?
पुरुषवर्ग ह्या रुद्राक्षाचा दोन स्तरांवर विनियोग करू शकतात. धर्म, अर्थ, काम, मोक्ष ह्या चार पुरुषार्थाच्या प्राप्तीसाठी सात्विक आचरणाने रूद्राक्ष धारण केल्यास नक्की त्यांचे उद्दिष्ट त्यांना साध्य होते. तसेच त्याच बरोबर साम, दाम, दंड, भेदाची परिभाषा पुरुष वर्गात निर्माण होते. पण ध्यानात ठेवावे घरातील महिलांचे मासिक धर्माचे जे नियम आहेत. त्याचे पालन होणे आवश्यक आहेत. चारमुखी रुद्राक्ष धारण करणाऱ्याला मांसाहाराचे बंधन नाही, पण दारू व घराबाहेरील अनैतिक संबंध ठेवणे वर्ज्य आहे. चारित्र्य पालन बंधनकारक आहे. स्त्री - पुरुष दोघांना चारित्र्य पालन महत्वाचे आहे.
नोंद - सिद्ध चारमुखी रुद्राक्षाचा भौतिक, आध्यत्मिक, सामाजिक, भावनिक समस्या निवारणासाठी व जलद गतीने जीवनाची प्रगती होण्यासाठी सिद्ध चारमुखी रुद्राक्षाचा विनियोग कसा करावा. ह्या संदर्भात दत्तप्रबोधिनी ई स्टोर वर अपलोड केलेला विडिओ आवश्य पाहणे.
ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...
0 Comments