आध्यात्मिक उपासनेची सुरवात कशी करावी - Step by stepतीळमात्र देहसुखासाठी संसाराच्या रहाटगाडग्यातुन दैनंदिन स्वरुपात अतोनत कष्ट भोगत, जीवनाच्या अंती उकीरड्यावर गतप्राण झालेल्या व संबंधित परीवारासाठी झिजलेल्या संसारीक मानवाची स्मशान राख चार भिंतीच्या घरातही प्रवेश करु शकत नाही. नरकरुपी संसार सागराच्या भौतिक वृक्षावर चढणारे भोगी व्यक्तीत्वाचा अंत हा नरकात पडुनच होतो. ह्या नरकगामी दुरावस्थेतुन योग्य मार्गदर्शनयुक्त महाराजांना अपेक्षित असलेली चारित्र्यसंपन्न आध्यात्मिक अभिव्यक्ती कशाप्रकारे आत्मप्रकट होऊ शकेल या बद्दल दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट संस्थेच्या माध्यमातून संबंधित बहुपयोगी आध्यात्मिक अभिलेख प्रकाशित करत आहोत.नवरात्रीतील शारदिय नवरात्रीसोबत वर्षभरातील ईतर आठ गुप्त नवरात्रि चालीसा शक्तीमंडळ योग धारणेतुन स्वतःच्या प्रकृतीला रुचेल व कालांताराने आत्मपचनी रुजेल अशाप्रकारची साधना आपण लक्षपुर्वक केल्यास आपल्या जीवनातील वर्तमानस्थिती बदलुन मानसिक, शारीरीक, आर्थिक, सामाजिक व आध्यात्मिक प्रगती सहज अनुभवास येते. अशा चाळीस दिवसांच्या शक्तीमंडळाच्या दैनंदिन साधनेतुन प्रकृतीला आत्मबोधक असणारे असे शक्तीवलय आपण आपल्या आभामंडळाच्या स्वरुपात अनुभवु शकतो. त्याचप्रमाणे पुरुषात्मक गुप्त नवरात्रीयुक्त भगवान श्री दत्तात्रेय स्वामी कमळचरण उपासना आपल्या भरकटलेल्या सांसारीक जीव योनीचे आत्मज्ञानाच्या सखोल अनुभवासहीत विनियोगातुन शिवकलेद्वारा शिवतत्वात सामायिकीकरण करते. 


दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट ही ' शिवस्वामी साधकांना आत्मनिर्भर व महाराजांना अभिप्रेत असणारे स्वयंभु दत्ततत्व हितोपदेशक योगिक स्तरीय साधन आत्मकार्यप्रणाली आत्मानुभुतीच्या माध्यमातून पटवुन देणारी ' एक सेवाभावी संस्था आहे. श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु श्री वासुदेवानंद सरस्वती थोरले स्वामीं महाराजांच्या चरणकृपाशीर्वादाने चारित्र्यसंपन्न दत्त भक्तांसाठी आध्यात्मिक स्तरावर अतुलनीय योगसान्निध्य प्राप्ती हेतु योग साधना व नाम साधना ह्या संयुक्त भक्तिमार्ग विद्यमाने दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्टची स्थापना करण्यात आली. आज थोरले स्वामीं महाराज स्वयं समस्त दत्तभक्त उद्धाराहेतु सृष्टीसंरचनात्मक कार्यकारण भावात कार्यरत आहेत.


दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट ही संस्था श्री दत्तात्रेय स्वामी महाराजांच्या अनुशासनावर आणि श्री काळभैरव दादाच्या शासक तत्वावर आधारालेली आहे. संसारीक मानवाला जीवानात सर्वांगीण प्रगतिहेतु मंगलमय दत्त तत्वस्वरुप कल्याणकारी शिव योगाची तर आवश्यकता आहेच परंतु सोबत प्रलयंकारी रुद्राचीही काळभैरव तत्वस्वरुपात शिवयोगाची अंतर्बाह्य शत्रुनाशनार्थ अभिव्यक्तीची गरज आहे. मुळात दत्त महाराज व काळभैरव हे सद्गुरु श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीं महाराजांची सहज तारक व मारक दोन स्वरुपे आहेत. ज्याप्रमाणे महाराजांच्या चरणांजवळ चार श्वान चार वेदांच्या स्वरुपात विद्यमान आहेत व पाठी सद्गुरु कामधेनुमाता गाईच्यारुपात भक्तकल्याणासाठी सदैव तत्पर असते त्याचप्रमाणे काळभैरवाच्या चरणांजवळ दोन श्वान नावाने काळ व वेळ यास्वरुपात सेवारत असतात. सद्गुरु कामधेनुमातेप्रमाणेच देवाच्यापाठी कुबेर व सुमेरु महाराज दत्त भक्तहीतासाठी सदैव सज्ज असतात. 


आध्यात्मिक प्रगतीसाठी सुरवात कशी करावी ?


सर्वप्रथम आध्यात्मिक समज आणि आध्यात्मिक सुनिश्चितता यातील भेद ओळखा. संबंधित समज कधीही बदलु शकते अथवा कोणीही बदलवु शकतं त्यायोगे आपण पथभ्रष्ट होऊन आध्यात्मिक मुळ राजमार्ग प्रवाहापासुन दुर भटकले जाऊ शकता. त्याअर्थी आपली आध्यात्मिक सुनिश्चितता येणे ही सर्वात पहीली पायरी समजावी. आध्यात्मिक सुनिश्चितता येणेसाठी आपल्याला तीन स्तरावर योग्य दिशानिर्देशने स्पष्ट होणे आवश्यक आहे. ते खालीलप्रमाणे आहे.  • १. शिवस्वामी शिस्तप्रिय तत्वता 
  • २. आपल्यातील आणि आपल्या उपास्य सद्गुरुयौगिक देवतेतील प्रकाश अंतर
  • ३. आपले उपास्यदेवतेचे स्व+आधिष्ठान म्हणजे स्वाधिष्ठान१. शिवस्वामी शिस्तप्रिय तत्वता


अनुशासनप्रिय श्री दत्त महाराजांच्या उपासनेत शिस्तपालन हा सात्विक आचरणाचा अविभाज्य घटक आहे. संबंधित स्वामींशिस्त आपल्या जीवनातील मानसिक व बौद्धिक त्रुटी शमन करुन एक आध्यात्मिक परिपक्वता विकसित करते. त्यायोगे आपण आपल्या जीवनातील भुत, वर्तमान व भविष्यात घडणाऱ्या सर्व गोष्टींचे आत्मविश्लेषणात्मक तत्वावरुन सहजच आकलन करु शकतो. त्याअर्थी आपल्या जीवनाच्या पुढिल पायावाटा अधिक स्पष्ट व हेतु साध्य विकसित होतात. आध्यात्मिक शिस्तबद्ध आचरणाने आपल्या आत्म सन्मानात भरीव व आसाधारण वाढ होते. याचे परिणामस्वरुप आचारणातुन आपल्या समाजात सहज प्रतिबिंबित होते. 


२. आपल्यातील आणि आपल्या उपास्य सद्गुरुयौगिक देवतेतील प्रकाश अंतर


' आधळं दळतयं व कुत्रं पीठ खातयं ' अशा भ्रमिक आध्यात्मिक संकल्पनेतुन बाहेर येणे प्राथमिक स्वरुपात महत्वाचे आहे. आपल्यातील व आपल्या उपास्य देवतीतल अंतर आपली मनोदशा, अंतरीक ज्ञान व जीवनात आलेली उपरती या तीन अवस्थांवरुन गणले जाते. उगीचच नसती उठाठेव करुन काहीही उपयोग होत नाही. सोबतच आध्यात्मिक दलालांचाही आश्रय घेणे पुर्णतः बंद करावेत. महाराज स्वयंभु तत्वावरच विराजमान असतात. त्यायोगे स्वतःला शोधुन आपलं आध्यात्मिक मार्ग योग्यरित्या आत्मपरिक्रमित करता आला पाहीजे. 


३. आपले उपास्यदेवतेचे स्व+आधिष्ठान म्हणजे स्वाधिष्ठान


उपास्यदेवतेच्या सद्गुरु तत्वावर यथाशक्ति साधनसंपन्न होण्यासाठी व दत्त आधिष्ठानाची निष्ठा व तत्वे आत्मपचनी येणे हेतु साधन, साध्य व समाधी स्तरावर आत्मचिंतन करता आले पाहीजे. ह्या ध्यानयोगी अवस्थेतूनच आत्मसंधानात्मक शिवयोग सहज प्राप्त होतो. हाच शिवयोग सर्वकामना भस्मांकीत करुन शिवतत्वाची अंतरीक जाणीव करुन देतो. हेच शिवतत्व शिवशक्तीच्या एकत्रीकरणने आधिष्ठानात रुपांतरीत होते. ही योगक्रीया देहातीत व देहबुद्धीच्या पलिकडील आहे. त्यायोगे योग्य ते आचरण वरील प्रमाणे करावेत. 


संपर्क : श्री. कुलदीप निकम 
Dattaprabodhinee Author )

भ्रमणध्वनी : +91 9619011227 
Whatsapp Or Sms Only )


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

आत्मरत्न ( Soul Gem ) म्हणजे काय ? माणुस का भरकटतो ?

त्राटकाद्वारे रोगोपचार ( Tratak therapy ) - १

दत्ततत्व ( साध्य ) व हठयोग ( साधन ) म्हणजे दत्तप्रबोधिनी आचरण ( समाधि )

पितृदोषांबद्दल ( Pitra dosh ) संवेदनशील आणि दैनंदिन जीवनाशी जोडलेलें दुष्प्रभाव ...!

आध्यात्मिक श्रीफळ व चारित्र्यपूजनाचे माहात्म्य ( Spiritual Disciplines )

भगवती महाकाली( Goddess Mahakali ) साधना सुमेरु तत्व विश्लेषण व शक्ति उपासना - १GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीतीCure Problems With Divine Powers. 100s Of People Cured ! Chakra Healing balancing. Ancient Indian Science. Based on Ashtaang Yog. Learn Yogic Healing. Types: Learner's Workshops, Stress Management, Divine Karma Cleansing, Mind empowerment, Chakra Balancing. - Visit Website Here !


Embed दत्तप्रबोधिनी न्यास on Your Site: Copy and Paste the Code Below
0