शरीरात आत्म्याचे वास्तव्य असलें म्हणजे शरीर कार्यक्षम बनते. आत्मा हा दिसत नाही, पण शरीर त्याच्याशिवाय चालणार नाही. त्याचप्रमाणे मानवी जीवनात महाराजांचे वास्तव्य होय. समाज धारणेत सद्गुरु महाराज आत्म्याप्रमाणेच आहेत. ते ज्या समाजात नसतील तेथे अव्यवस्था, अनाचार, अनीति, विपत्ती व दुर्दैव बलवत्तर असतेच असे समजावं. मग तो समाज कुठलाही असो. टोकीयोपासुन ते ईंग्लंडपर्यंत व दक्षिण ध्रुवापासुन ते उत्तर ध्रुवापर्यंत सर्व या तत्वात सामाविष्ट आहेत. दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट माध्यमातून शेगावस्थित महाराजांचे दुर्लभ व रहस्यमयी माहीती संबंधित साधकांच्या अभ्यासाकरीता प्रकाशित करत आहे. जेणेकरुन महाराज व त्यांचे भक्त यांमधील जवळीक अधिकाधिक वाढेल. आत्मोद्धाराला पोषक असे वातावरण होईल.
श्री गजानन महाराज हे एक संतरत्न वर्हाडांत शेगाव ( शिवगाव ) येथे होऊन गेले. ते २३ फेब्रुवारी १८७८ रोजी प्रथमतः ऐन तारुण्यावस्थेत शेगावीं दिसले. त्यावेळी गजानन महाराज तेथील साधु देवीदास पातुरकर यांच्या मठाबाहेर पडलेल्या उष्ट्या पत्रावळीतील कण वेचुन खात होते. गाईगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणाचे पाणी पिऊन ते निघुन गेले. बार्शी येथील ब्रम्हनिष्ठ श्री. गोविंदमहाराज टाकळीकर यांचे शेगावीं महादेवाच्या मंदिरात किर्तन प्रसंगी टाकळीकरांच्या बेफाम असलेल्या घोड्याच्या चौपायात श्री गजानन महाराज ब्रम्हानंदी निमग्न होऊन निजलेले आढळले...! गोविंद महाराजांनी त्यांची योग्यता ओळखुन पुजा केली व त्यांची महती शेगावनिवासी जनतेस कळवली. महाराजांनी तेथे पुष्कळ सद्गुरुलीला केल्या.
महाराज हे तारुण्यावस्थेतील दिगंबरवृत्तीतील सिद्धकोटीला प्राप्त झालेले सिद्धपुरुष होते. वाटेल ते खावे, कुठेही पडुन राहावे व कुठेही संचार करावा अशा रितीने ते बाह्यदृष्टीस लीला दाखवत असत. ' गणिगण गणांत बोते ' असें अहर्निश भजन करत असत. त्यांना लोक बहुमोल वस्त्रे, अलंकार, पैसे व खाद्यपदार्य अर्पण करत; पण ते सर्व तेथेच टाकुन देत व कोठेंही निघुन जात. भक्तजनांना त्यांच्या सहवासाने मनःशांती, ईश्वरी लीला व आत्महीतोपदेश कळुन येई. तारीख ८-९-१९१० रोजी ईश्वरी नामाच्या गजरात समाधीस्त झाले. शेगावं येथे ज्या ठिकाणी श्री गजानन महाराजांनी देह ठेविला, तेथेचं ' श्री गजानन महाराज संस्था ' स्थापन झाली.
महाराजांचे ओवीबद्ध चरित्र श्री दासगणुमहाराजांनी २१ अध्यायांत ' श्री गजानन विजय ' या नावाने रचलें. हा ग्रंथ सर्वसाधारण जनसमुहाला सहज समजेल इतक्या सोप्या भाषेत लिहीला आहे. श्री दासगणु महाराजांची काव्यशक्ती अत्यंत ओघवती असल्याकारणाने, प्रत्येक अध्याय प्रथमपासुन शेवटपर्यंत वाचीत असताना, असे वाटते कि, ' आपण भवसागरात नावेंत बसलो व आत्मप्रवाह उतरणीचा आहे '. श्री दासगणु महाराज हे जन्मजाथा कवी आहेत. भक्तीरसाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे त्यांचे काव्य गंगेप्रमाणे उभय लोकी आनंद देणारें आहे. त्यांचा सिद्ध लेखणीतुन चित्रित झालेले हे श्री गजानन महाराजांचे चरित्र वाचताना चित्त निर्व्यापार होते.
महाराज गण मंत्रात रात्रंदिवस भजनतल्लीन असत. ' गणिगण गणात बोते ' या नामाचा मतीतार्थ अत्यंत गहन तर आहेच त्याचबरोबर आत्मसंधानाच्या दृष्टीने अतिरहस्यमयी सुद्धा आहे. या नामात ' गणिगण ' या तत्वात प्रकृतिपुरुष अव्यक्तरुपात सामावलेले आहे. त्यायोगे प्रकृतीपुरुष म्हणजे शक्तीशिवाचे नियतीतील सुत्रसंचालन आहे. ' गणात ' या तत्वात सहस्त्रारस्थित दत्ततत्वयुक्त सद्गुरु महाराजाच्या गणसमाजाचे सत्व आधोरेखित आहे. आत्मोद्धार होण्याहेतुने या अनंत आकाशगंगेत फक्त गुरुतत्वच परमसहाय्यक आहेत असा अर्थ निहीत आहे. ' बोते ' यातील मतीतार्थ अद्वैताशी निगडीत आहे. चांगलं, वाईट व शुद्ध अशुद्ध व योग्य अयोग्य ही सर्व मानवी स्थुलवृत्तीची लक्षणें आहेत. त्यायोगे मनुष्य आत्मस्वरुपात खंडीत होत असतो. अशी द्वैतावस्था त्यागणें हेतु महाराज भक्तांना निमग्न अवस्थेत भजन ऐकवीत.
गणिगण गणांत बोते म्हणजे प्रकृतीपुरुषात्मक शक्तीशिवस्वरुप स्वयं सद्गुरुचरणरज गुरुतत्वात अद्वैतस्वरुपात सामावलेले आहे.
ज्या साधकांना मुमुक्षूत्व अथवा सद्गुरु महाराज प्राप्तीची ओढ अपेक्षित आहे त्यांनी सप्ताह स्वरुपात ग्रंथ पोथीचे पारायण करावेत. संंबंधित ग्रंथज्ञानाच्या समग्र आत्मधारणेसाठी ईच्छुक असणाऱ्या भाविकांनी दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्टशी प्रत्यक्ष संपर्क करावेत.
संसारीक
लोकांसाठी अनुभवसिद्ध व सोपी साधना - २
महाराज हे तारुण्यावस्थेतील दिगंबरवृत्तीतील सिद्धकोटीला प्राप्त झालेले सिद्धपुरुष होते. वाटेल ते खावे, कुठेही पडुन राहावे व कुठेही संचार करावा अशा रितीने ते बाह्यदृष्टीस लीला दाखवत असत. ' गणिगण गणांत बोते ' असें अहर्निश भजन करत असत. त्यांना लोक बहुमोल वस्त्रे, अलंकार, पैसे व खाद्यपदार्य अर्पण करत; पण ते सर्व तेथेच टाकुन देत व कोठेंही निघुन जात. भक्तजनांना त्यांच्या सहवासाने मनःशांती, ईश्वरी लीला व आत्महीतोपदेश कळुन येई. तारीख ८-९-१९१० रोजी ईश्वरी नामाच्या गजरात समाधीस्त झाले. शेगावं येथे ज्या ठिकाणी श्री गजानन महाराजांनी देह ठेविला, तेथेचं ' श्री गजानन महाराज संस्था ' स्थापन झाली.
' गणिगण गणांंत बोते ' या नवाक्षरी सिद्धनामाचे स्वरुप...!
महाराज गण मंत्रात रात्रंदिवस भजनतल्लीन असत. ' गणिगण गणात बोते ' या नामाचा मतीतार्थ अत्यंत गहन तर आहेच त्याचबरोबर आत्मसंधानाच्या दृष्टीने अतिरहस्यमयी सुद्धा आहे. या नामात ' गणिगण ' या तत्वात प्रकृतिपुरुष अव्यक्तरुपात सामावलेले आहे. त्यायोगे प्रकृतीपुरुष म्हणजे शक्तीशिवाचे नियतीतील सुत्रसंचालन आहे. ' गणात ' या तत्वात सहस्त्रारस्थित दत्ततत्वयुक्त सद्गुरु महाराजाच्या गणसमाजाचे सत्व आधोरेखित आहे. आत्मोद्धार होण्याहेतुने या अनंत आकाशगंगेत फक्त गुरुतत्वच परमसहाय्यक आहेत असा अर्थ निहीत आहे. ' बोते ' यातील मतीतार्थ अद्वैताशी निगडीत आहे. चांगलं, वाईट व शुद्ध अशुद्ध व योग्य अयोग्य ही सर्व मानवी स्थुलवृत्तीची लक्षणें आहेत. त्यायोगे मनुष्य आत्मस्वरुपात खंडीत होत असतो. अशी द्वैतावस्था त्यागणें हेतु महाराज भक्तांना निमग्न अवस्थेत भजन ऐकवीत.
गणिगण गणांत बोते म्हणजे प्रकृतीपुरुषात्मक शक्तीशिवस्वरुप स्वयं सद्गुरुचरणरज गुरुतत्वात अद्वैतस्वरुपात सामावलेले आहे.
ज्या साधकांना मुमुक्षूत्व अथवा सद्गुरु महाराज प्राप्तीची ओढ अपेक्षित आहे त्यांनी सप्ताह स्वरुपात ग्रंथ पोथीचे पारायण करावेत. संंबंधित ग्रंथज्ञानाच्या समग्र आत्मधारणेसाठी ईच्छुक असणाऱ्या भाविकांनी दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्टशी प्रत्यक्ष संपर्क करावेत.
ह्या
पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...