श्रीपाद श्रीवल्लभ श्री गुरुचरित्र पारायण 3 दिवसात कसे करावे सोबत सप्ताहवाचनाच्या पद्धती व संक्षिप्त रसग्रहण - Step by step


महाराष्ट्रीयन साधकांच्या नित्य वाचनात श्री ज्ञानेश्वरी, श्रीमत् दासबोध, श्री शिवलिलामृत, सप्तशती, एकनाथी भागवत, मनाचे श्लोक, भागवत व रामायणाबरोबरच श्री गुरुचरित्राचेही महत्वाचे स्थान आहे. श्री गुरुचरित्र हा एक सिद्धमंत्ररुप व महाप्रसादिक ग्रंथ आहे.


भक्तीमार्गातील अथवा नामस्मरणमार्गातील स्वकर्मच्युती हा शास्त्रोक्तदोष तो नाहीसा करुन जनतेला स्वकर्माच्या ठिकाणी अभियुक्त करुन भक्तीप्रणव करण्याकरिता आणि अंतकरणात त्याग व निर्भयता उत्पन्न करण्याकरीता श्री गुरुचरित्राचा अवतार झाला आहे.


हा सिद्ध ग्रंथ अंतःकरणाने वाचला तर हितकारक ठरतोच परंतु सप्ताहीक पद्धतीने वाचला तर त्वरीत फळ देतो. असा साधकांचा अनुभव आहे. सकाम वाचकांनी तंत्र पाळले पाहीजे.


" अंतःकरण असता पवित्र l सदाकाळ वाचावें गुरुचरित्र ll"


हा आदेश भक्तीप्रेमाने वाचणार्या निष्काम साधकांनाच आहे.


श्री गुरुचरित्राचे स्वरुप सिद्धमुनी व नामधारक यांच्यातील संवादात्मक असुन, त्यात सुमारे सात हजाराहुन जास्त ओव्या आहेत. इहलौकिक व पारलौकिक सामर्थ साधण्याचा हा सर्वश्रेष्ठ सद्मार्ग आहे.


श्री गुरुचरित्राच्या सप्ताहवाचनाची पद्धती...!

श्री गुरुचरित्र सात दिवसांत वाचायचे असल्यास दर दिवशी वाचण्यासाठी असलेल्या ५३ अध्याय पोथीतील क्रम असा आहे. ९/२१/२९/३५/३८/४३/५३.... ५२ अध्याय असलेल्या पोथीचा क्रम असा आहे. ७/१८/२८/३४/३७/४२/५१.

श्री गुरुचरित्र तीन दिवसात वाचायचे असेल तर पहिल्या दिवशी २४ पुर्ण, दुसऱ्या दिवशी ३७ पुर्ण व तीसर्या दिवशी ५३ पुर्ण असा क्रम ठेवावा. एका दिवसात समग्र श्रीगुरु चरित्र वाचणारे ही साधक आहेत. पोथी वाचताना गुरुवारी मृतसंजीवनीचे अध्याय वाचू नयेत.


सर्वसाधारणपणे श्री गुरुचरित्र वाचनाचा प्रारंभ शनिवारी करुन शुक्रवारी समाप्ती करावी. कारण शुक्रवार हा श्रीपाद श्रीवल्लभ यांचा निजानंदगमनाचा दिवस असतो. अन्यथा भक्तीभाव निर्माण झाल्यावर केव्हाही वाचाले तरी चालेल. मुहूर्त, वार वगैरे बघण्याची गरज नाही. पोथी वाचताना सोवळे जरुर पाळावेत.





विशिष्ट संकल्पांच्या पुर्तीसाठी श्री गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते. सप्ताहासाठी ऐकांताचे स्थळ निवडणें. वाचनापुर्वी दत्तमुर्तीसमोर पुर्वेला किंवा उत्तरेला तोंड करुन बसावें. दत्तमुर्ती आपल्या डाव्या किंवा उजव्या बाजुला असेल असे बसावे. सोबत एक रिक्त आसनही आपल्या उजव्या बाजुला हंथरुन ठेवणे. दत्तमुर्ती नसेल तर पाटावर संपुर्ण तांदुळ ( न तुटलेले ) ठेउन सुपारी ठेवावी व सुपारी ठिकाणी महाराजांचे आवाहन करणे. 

सप्ताहवाचनापुर्वी विधियुक्त संकल्प सोडावा. त्या सात दिवसात ब्रम्हचर्य पाळावे. संध्याकाळी उपवास करावा. शक्यतो सोहळ्याने वाचावे. रात्री भुमीशायी देवाजवळच चटईवर झोपणे. डाव्याकुशीवर झोपले असता संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात.


सप्ताहपुर्ण झाल्यावर, सुपारीतुन दत्त महाराजांचे विसर्जन करणें. आणि नैवेद्य दाखवुन समाराधना करणें. वाचनास बसल्यावर मधेच आसन सोडुन ऊठु नये. त्यावेळी ईतरांशी बोलु नये. सप्ताहकाळात हविष्यान्न घ्यावेत. सप्ताहाचे सात दिवस नित्य प्रातःकाळी काकड आरती, संध्याकाळी प्रदोषारती व रात्री शेजारती करावी. दुपारच्या महापूजेत पोथीची पुजा करताना शक्य तर महानैवेद्यात घेवड्याची भाजी असावी.



वाचन स्पष्ट असावेत... ऊगीचच लवकर उरकण्याच्या हेतुने पाठ करु नयेत. स्थुल अक्षरांतुन व्यक्त होणाऱ्या तत्वाकडे लक्ष असणे महत्त्वाचे...!

श्री गुरुचरीत्र संक्षिप्त रसग्रहण....!

सर्व प्रथम "पारायण" करणे म्हणजे नक्की काय करणें हा प्रश्न कधीच तत्ववेत्ता साधकांकडुनही विचारण्यात किंवा उल्लेख ही केला गेला नाही. आज आम्ही अमुक पारायण केले म्हणजे अमुक आकडेवारी गाठली ही महत्त्वाची, की जी योगक्रिया केली त्याचं मर्म आणि सखोलता साधली ती महत्त्वाची...! हा प्रश्न नेहमीच मला पडतो.


श्री गुरुचरित्र सिद्धमंत्रग्रंथ हा पाचवा वेद आहे. या गुरुतत्वाचे अपेक्षित सत्व फलिभुत होणेसाठी त्याअधी सर्व अपेक्षित मानसिक व शारीरिक पुर्वतयारी होणे अतिमहत्वाचे असे मला वाटते.




"पारायण" या शब्दाचा नेमका अर्थ काय...?

पारायण हा शब्द "आत्मपरायण" तत्वाची अभिव्यक्ती आहे. "पारायण" याचा आ+परा+आयण असा अर्थ होतो. यात "आ" म्हणजे नारायणातील "आ" स्वरशक्ती. "परा" आपल्या शरीरातील नाभीवाणी अथवा नारायणाची वाणी जी पश्यंतीच्या पुढे स्थित आहे आणि निगम वाणीच्या आलिकडे आहे. "आयण" म्हणजे आवाहन करणे.

"पारायण म्हणजे नारायणाच्या परावाणीचे आवाहन असा अर्थ आहे"
श्री गुरुचरित्राचे पारायण करणे याची अभिव्यक्ती ईतकीही समजणेहेतु सरळही नाही.

श्री गुरुचरित्राचे पारायण करणेआधी "श्रीगुरुचरित्र" या षडाक्षरी तारक मंत्राचा अर्थ समजावून घेणे ही प्रार्थमिकता असावी. उदा. विशालकाय वटवृक्षाचे अस्तित्वाची सुरवात एका बीजातुन होते. त्याच प्रमाणे श्रीगुरुचरित्र सिद्धग्रंथाचे अवलोकनात्मक अध्ययन प्रथमतः षडाक्षरी नामातुनच करणे योग्य...!


"श्री गुरुचरित्र" या शब्दब्रम्हाचा मतीतार्थ असा कि, हे परब्रम्ह यतिराज श्रीपाद श्रीवल्लभ सद्गुरु महाराज, माझ्या अज्ञानरुपी अंधःकाराचा समुळ नाश करुन माझे दास्यभक्तीयुक्त आचरण पवित्र व चारीत्र्य संपन्न करा.

सप्ताहकाळ वाचनात अथवा महाराजांच्या दत्तउपासनेत "सात" आकड्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सद्गुरु शिष्य परंपरेला अनुसरुन ७ हा अंक दास्यभक्तीला अनुसरुन आहे. देहातीत सप्तपाताळ व षट्चक्र + सहस्त्रार एकूण सात चक्रांना अनुसरुन आहे.



श्री गुरुचरित्राचा पाठ अंतर्मुखी होऊन केल्यास आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते आणि संकल्पयुक्त बर्हीमुखी होऊन केल्यास इहलौकीक वैभव प्राप्त होते.


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

दुःख कष्ट दारिद्रयाचे निराकरण करेल हा सिध्द चार मुखी रुद्राक्ष. दोन दिवसात फरक जाणवेला

तुमच्या घरी दुष्ट शक्तींचा प्रवेश टाळा. आजच लावा सिद्ध चौसष्ट योगिनी यंत्र.

अत्यंत प्रभावकारक घरातील नकारात्मक ऊर्जा नाशक श्री गृह वास्तुदोष निवारण यंत्र

प्रखर दैवीसान्निध्यासाठी करा अशी पंचकपाल साधना तात्काळ फरक जाणवेल.

वाहन सुखाचा मंत्र सिद्ध हनुमान यंत्र - सुरक्षा कवच