प्रखर दैवीसान्निध्यासाठी पंचकपाल साधना तात्काळ फरक जाणवेल. Panchkapal Sadhana


आजच्या वर्तमानात जर आपण प्रत्येकाच्या अंतर मनात डोकावून पहिले तर प्रत्येक जीव हा कोणत्या ना कोणत्या त्रासात, समस्येत किंवा आपत्तीचा शिकार झालेला आहे. समस्या आर्थिक, सामाजिक, वैयक्तिक, भावनिक,  आध्यात्मिक, नैसर्गिक कोणत्याही स्वरूपात असतात. मनुष्य जखमांचे त्रासांचे व समस्यांचे ओझे वाहत आहे. ह्या सर्व परिस्थितीतून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आध्यात्मिक मार्गावर मार्गक्रमण करणे. ह्या दुःख, त्रासाच्या दलदलीतून बाहेर पडण्यासाठी श्रीदत्त चरणी समर्पित झाल्यास सर्व मार्ग मोकळे होऊ लागतील. सुखी, आनंदी आणि यशस्वी जीवनाचा आनंद घेता येईल. सर्वांगिण त्रासाचा निराकरण हेतू दत्तप्रबोधिनी दैनंदिन पंचकपाल साधना केल्यास तात्काळ अनुभव येतो. 


ज्या साधकांना ह्या साधनेचा अनुभव आलेला आहे त्यांचे अनुभव आपण ह्या लिंकद्वारे अनुभवू शकता जाणून घेता येतील, तसेच दत्तप्रबोधिनीची दैनंदिन पंचकपालसाधनेचे फल स्वरूप तुमच्या लक्षात नक्की येईल आणि तुमच्या जीवनाला कलाटणी मिळेल.

Link - साधकांचे अनुभव


दत्तप्रबोधिनी दैनंदिन पंचकपाल साधनेची मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही साधना अगदी सरल - सोपी आहे. ह्या साधनेला वयाच बंधन नाही. स्त्री - पुरुष दोन्हीही करू शकतात. कोणत्याही समस्या ह्या साधनेने सहज  तात्काळ सुटल्या जातात. सांसारिक जीवनात राहून ही साधना करता येते ही साधना सात्विक, राजसी, तामसी ह्या तिन्ही पद्धतीने करता येऊ शकते. ह्या साधनेला मांसाहार व शाकाहाराचे बंधन नाही. 

मानवाच्या मन, काया, वाच्या शुद्धी करण्याहेतू आणि प्रापंचिक जीवनातील सर्व त्रास दुःख, दैन्य, दारिद्र, समस्या समूळ नष्ट होतात. दत्तप्रबोधिनी दैनंदिन पंचकपाल ही साधना साक्षात श्रीदत्त महाराजांच्या सान्निध्यात होते कोणत्याही देहधारी गुरूच्या मार्गदर्शनाची आवश्यकता भासत नाही. ह्या साधनेतून साधकाच्या स्वभाव वृत्ती शारीरिक क्षमता, वैचारिक पातळी ह्या गोष्टीनुसार उत्तम, कनिष्ठ आणि मध्यम साधक तयार होतात. दास्यभक्ती मार्गातून क्रमशः दत्तदृष्टांत, दत्तकटाक्ष, दत्तपूर्वानुग्रह आणि दत्तअनुग्रह साधकाला साधनेच्या प्रगतीपथावर आरूढ राहून प्राप्त होते.


दत्तप्रबोधिनी दैनंदिन पंचकपाल साधनेचा अनुक्रम खालील प्रमाणे आहे.

 
सद्य स्थितीत घर- घरामध्ये भेडसावणारी समस्या म्हणजे मुलांची शैक्षणिक पात्रता आणि प्रगती. ह्या समस्येचा निवारणासाठी दत्तप्रबोधिनीच्या दैनंदिन पंचकपाल साधेनेत सिद्ध चारमुखी रुद्राक्षाचा विनियोग केला आहे. रुद्राक्ष हे लहान मुलांसाठी बुद्धिवर्धक असल्याने ते महत्वाचे आहे. त्यामुळे पाल्या संबंधित समस्या सुटतील. महिला वृद्धांच्या सुरक्षितेचा विषय अतिशय महत्वाचा आहे त्यांच्यासाठी सिद्ध चारमुखी रुद्राक्ष हे प्रभावी व गुणकारी आहे. पाच जे तत्व आहे. ऊबंटु सामुहीक आणि साप्ताहिक नवनाथीय पारायण आठवड्याच्या दर शनिवारी अवश्य करणे दैनंदिन स्वरूपातील स्मशान पारायण, उतारे, उपाय, तोडगे, यंत्र सिद्धी ह्या पाच गोष्टी दैनंदिन पद्धतीने कराव्यात. 

तपोबल वाढवताना कुटुंबाला मानसिक, शारिरीक, आर्थिक, सामाजिक आणि आध्यात्मिक आधार द्यायचा असतो. तपोबल वाढवताना सर्वसंग परित्यागाची व वैराग्याची भावना  साधकाचे संसारातून मन विरक्त करते. असे न होण्यासाठी संसारातून विरक्त न होता. तपोबल वाढवुन संसाराची सर्वांगीण उन्नती साधण्यासाठी सांगितलेली साधना करा. महाराज दृष्टान्त देतील आणि साधकाला त्यांच्या कर्मातून बाहेर काढतील. अर्थात मुक्त करतील आणि अनुग्रहित करून त्यांचे जीवन कृतर्थ्य करतील आणि सांसारिक लोकांना अश्याच पद्धतीचा साधनामार्ग अपेक्षित आहे.


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...


Post a Comment

0 Comments