सीकेपीं ची कुलस्वामिनी विंझाई मातेचे दुर्लभ स्थान Drone Shots Included Kuldevi Vinzai Mata


भगवती विंझाई माता चांद्रसेनीय कायस्थप्रभुची कुलस्वामिनी आहे. हे देवीचे जागृत स्थान आहे आणि ही भगवती साक्षात विंध्यवासींनीचा अवतार आहे. दुर्गेचे रुप आहे. श्रीकृष्णाची मोठी बहीण जिचा कंसाने वध करण्याचा प्रयत्न केला पण तसे न घडता ती साक्षात विंझाई देवीच्या रूपात तिचे प्रगटीकरण झाले आहे. तिने कंसाला आकाशवाणीच्या रूपाने सांगितले होते की तुझा वध श्री कृष्णाच्या हातून होईल. तीच ही विंझाई माता. ताम्हिणी येथे देवीचे अतिशय जागृत असे स्थान आहे. ह्या मंदिराचा जिर्णोउध्दार गावकऱ्यांनी सन 1977 साली केला आहे.


You Tube Link : सीकेपीं ची कुलस्वामिनी विंझाई मातेचे दुर्लभ स्थान Drone Shots Included

ह्या मंदिराचा इतिहास चारशे ते साढे चारशे वर्षा पूर्वीचा आहे. ताम्हिणी पासून मूळ स्थान जे देवीचे आहे ते दरी मध्ये रस्त्यापासून अठरा किलोमीटर आहे. भगवतीच्या बाजूला काळभैरव भगवंताचे मंदिर आहे.शिवशवक्तीच शाश्वत रूप आहे .त्यांचं प्रथम दर्शन घेणे बंधनकारक आहे.कुलस्वामीनीच्या दर्शन आधी मग ती भवानी माता महालक्ष्मी माता किंवा यमाई माता असु दे ह्या सर्वांच्या आधी पूजनीय जे आहेत ते काळभैरव देवता आहे.मंदिरात खंडोबा दक्षिणेश्वर कालिकामाता सोबत काळभैरव महाराज विराजमान आहे.सुट्टीच्या दिवशी तुम्ही येथे येऊन मातेचे दर्शन घेऊन तिची कृपा प्राप्त करू शकता. भक्तांनासाठी आई गावात येऊन राहिली आहे. तसेंच तीच मूळ स्थान आहे त्याचे दर्शन आपण ड्रोन फुटेजच्या माध्यमातुन घेऊ शकता. नवरात्रीच्या हेतूने आम्ही हे चित्रीकरण केले आहे. 



विंध्यवासिनी मातेची पूजा आपण विंझाई मातेच्या स्वरूपात केली तर नक्किच आपले कष्ट दूर होतात आणि आपल्याला मनोवांच्छित सिध्दी प्राप्ती होते. मंदिरा जवळ यज्ञकुंडात हवानात्मक विधी येथे केल्या जातात. मूळ मंदिरात गणपती बाप्पा आणि आईचे मनोहारी रूप तुम्ही डोळा भरून पाहू शकता. बाजूला शंभूनाथांचे शिवलिंग आहे. लक्ष्मी रूपा मध्ये कमळा मध्ये भगवती माता विराजमान आहे .सरस्वती मातेचं मोहक रूप तुम्ही पाहणार आहात.तसेच मंदिरात श्री यंत्राची स्थापना आहे.आईच्या दर्शनासाठी दुरून दुरून साधक वर्ग व भक्तगण येतात. आईच्या चरणी त्याच्या इच्छा आकांशा समर्पित करतात. आई सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते. आपण सर्वांनी नक्क्की एकदा तरी येथे यावे भगवती विंझाईचे दर्शन घ्यावे तुम्हाला दर्शनाचा विलक्षण अनुभव येईल.

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...



Post a Comment

0 Comments