भगवती महाकाली( Goddess Mahakali ) साधना सुमेरु तत्व विश्लेषण व शक्ति उपासना - १

आदिशक्ति दुर्गामातेच्या परमतेजातुन उत्पन्न झालेल्या अनंत शक्ति स्तंभातील एकुण चार स्तंभाचे सुक्ष्म निरिक्षण भारतीय संस्कृतीत शक्ति उपासनेच्या स्वरुपात सर्व सामान्य स्तरावर पाहाण्यास येते. ही शक्ती उपासना एका वर्षात एकुण नऊ वेळा नवरात्र उत्सव स्वरुपात करण्यात येते. शारदीय नवरात्र ही इतर आठ नवरात्रींमधे प्रमुख मानली जाते. त्यायोगे शक्ति साधनेतील अपेक्षित मानसिक तयारी कशी करावी याबद्दल आज दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट माध्यमातून प्रारंभिक स्वरुपातील महत्वाची योग अंगे प्रकाशित करत आहे.



भारतीय संस्कृतीत अत्यंत रहस्यमय पद्धतीने आध्यात्मिक स्थुल, अंतरिक सुक्ष्म व ब्रम्हाण्डीय कारण शरीराचा शोध घेण्याची उत्कंठा असेल तर संबंधित साधकाने भगवान श्री काळभैरव कृपेला अनुसरुन भगवती माता महाकालीचे आत्मचिंतन करणें आवश्यक आहे. ह्या चिंतनाच्या माध्यमातून शांत, सात्विक व पावित्र्यतानुरुप जीवन कसे जगता येईल ? याचे महत्व पटु शकेल. महाकाली माता मुळ स्वभावाने शिवशंभु प्रमाणेच भोळी, शांत, सरळमार्गी, संयमी, भक्तवत्सल, पोषण भरण करणारी व मंगलमयी आदिशक्तीचे दुष्टांसाठी अवतरलेले अतिउग्र रुप आहे. हे रुप दुर्जनांचा नाश करणारे असले तरी सद्गुरुंच्या दासांसाठी परमामृताहुनही गोड असे आहे.

आदिशक्ति दुर्गामातेचे एकुण चार स्तंभ योगी व सिद्ध महात्म्यांच्या साध्यक्षेत्रात येतात ते खालीलप्रमाणे आहे.


  • १. नवदुर्गा
  • २. साडेतीन शक्तिपीठ
  • ३. दशमहाविद्या
  • ४. चौसष्ठ योगिनी माता
आज समाजात शक्तिची तत्वाच्या माध्यमातून उपासना करणाऱ्या साधकांची संख्या बोटावर मोजण्याईतकीही राहीली नाही. कालिका मातेशी चर्चा करणारे साधक माझ्या संपर्कात येऊन, घडणाऱ्या आध्यात्मिक संवादात बहुतांशी सहभागी होत. शक्ति उपासानेतील सुक्ष्म बारकावे व अंतरिक आत्मसंबंधावर तासनतास चर्चा होत असत. परंतु या चर्चेत जे सुमेरु तत्व आदिशक्तीला एका साधकाकडुन नियतीच्या नियमाप्रमाणे अपेक्षित आहे, ते तत्व जर साधक नामातुन साध्य करण्यास अपयशी ठरत असेल तर आदिमातेची कृपा होत नाही. या उलट साधकाच्या सद्बुद्धीलाच ग्रहण लागुन तो आध्यात्मिक आंधळा होऊन पतनाला कारणीभूत होतो.

पतनाच्या मार्गावर अनपेक्षित आत्मक्रमण होऊ नये यासाठीच तत्वांच्या माध्यमातुन कशा प्रकारे भगवती साधना करावी ह्याचे निरुपण करुन देत आहोत. कोणतीही साधना करण्याची उत्सुकता असणं व संबंधित साधना प्रत्यक्षात होणे यातं भु - आकाशाचे अंतर असते. हे अंतर प्रारंभिक स्वरुपात कमी करता आलं पाहीजे. हे अंतर कमी करण्यासाठी भुमी - आकाश तत्वांना व्यापुन राहीलेल्या व परमात्मा व आत्मा यांना जोडणारा सुमेरु बंध अथवा सद्गुरु आपण विसरुन चालणार नाही. जगाच्या पाठीवर कोणताही शक्ति साधक सद्गुरु महाराजांच्या कृपेशिवाय कोणत्याही संप्रदायात, कोणत्याही साधनेत तीळमात्रही प्रगती करु शकत नाही. ही काळ्या दगडावरची शाश्वत रेघ आहे.


आदिशक्ती माता महाकाली भगवान शिव महाकाल सोबत सर्वत्र विचरण करणारी आहे. परमसौभाग्य व परममांगल्याच्या आधिष्ठानातुन भगवान शिव जेथे स्वयंभु तत्वाने उपस्थित असतात त्याच स्थानाला भगवती महाकाली स्वगृह म्हणुन स्वीकार करते. ती ईतर कोणत्याही देह गृहाचा स्वीकार करत नाही. भगवान शिव ज्या देहात सद्गुरु महाराजांच्या चरणकमळांच्या कृपेने होणाऱ्या जीवब्रम्हाचे परिवर्तनशील तत्वाचरण अनुसरुन स्वतः सहज समाधी अवस्थेत स्थान बद्ध होतात. त्यांच देह गृहाचा आदिशक्ती तीच्या १६ विद्या व ६४ कलांचा अविर्भाव करुन स्वतः श्री विद्येच्या रुपात अवतरीत होते. तिच्या पतिचे घरच तिचे घर आहे अशी धारणा असल्याने साधकाचा ती स्वतःच्या अंतरंगात स्वीकार करते.


Mahakali Shakti Upasana Payment Link 👈


शक्तिपात, कुंडलिनी शक्ती जागृती, चक्र जागृती होणे व इतर सर्व समज संसारीक व मुर्ख लोकांचे फक्त गोड गैरसमज आहेत. भगवती माता बावळटांमधे कधीही अवतरीत होत नाही. याउलट जोर जबरदस्तीने शक्तीला जागृत करणाऱ्यांनाच असहनीय असा जोरदार झटका देते अशी कित्येक उदाहरणे आम्ही बघितली आहेत. आदिशक्ती फक्त आणि फक्त शिवतत्वाद्वारेच नियंत्रण केली जाते. इतर गैरसमज दुर करावेत अन्यथा शक्तिपात, कुंडलिनीसारख्या अतिगुंतागुंतिच्या विषयात घुसमटून स्वतःचे जीवन संपवु नयेत. भगवान दत्त महाराजांना दयेची भिक मागाल तर ते माफही करतील पण भगवतीचे शक्ति मंडळ निर्दयी व घोर शासकात्मक आहे. तिथे ज्ञानी, अज्ञानी आणि भक्त, अभक्ताचा फरक होत नाही. जो चुकला त्यास शिक्षा भोगावीच लागते. ह्या सर्व गंभीरतेच्या आधारावर आपण अतिमहत्वाकांक्षी होऊन शक्तिपातसारख्या विषयांकडे लक्ष देऊ नये. अन्यथा पात ऐवाजी पतनच होते ह्याची खात्री होईल. वेळ निघुन गेल्यावर मग रडत बसण्यात काही अर्थ राहात नाही.


ज्याप्रमाणे " दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट " माध्यमातुन दत्त महाराजांना अपेक्षित असलेले आचरण कसे अमलात आणावे, महाराज व आपण अधिक निकट कसे येणार ? आणि आपल्यावर सद्गुरुकृपेचा हात कसा येईल. यासंबंधी प्रात्यक्षिक तत्वविश्लेषण करण्यात येते. त्याचप्रमाणे आदिशक्तीची उपासना कशी करावी ? अशा प्रकारे सद्गुरुकृपे आपण भगवती महाकालीचा आशीर्वाद मिळवु शकतो याबद्दल अधिकाधिक आचरणात्मक संहीता प्रकाशित करणार आहोत.


सर्वसामान्यपणे एका वर्षात एकुण नऊ नवरात्र असतात. एका वर्षातील ३६५ दिवसांचे प्रत्येकी ४० दिवसांचे शक्ति मंडळ असते. एका शक्ति मंडळाची एक नवरात्र असे एकुण नऊ नवरात्र उत्सव आहेत. या उत्सवातील आठवी माळ म्हणजे शारदीय नवरात्र उत्सव. ह्या सर्व माळी एका वर्षाच्या बाराही महीने सुरु असतात.


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...







पितृदोषांबद्दल ( Pitra dosh ) संवेदनशील आणि दैनंदिन जीवनाशी जोडलेलें दुष्प्रभाव ...!


संपर्क : श्री. कुलदीप निकम 
Dattaprabodhinee Author )

भ्रमणध्वनी : +91 9619011227 
Whatsapp Or Sms Only )


GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती




Cure Problems With Divine Powers. 100s Of People Cured ! Chakra Healing balancing. Ancient Indian Science. Based on Ashtaang Yog. Learn Yogic Healing. Types: Learner's Workshops, Stress Management, Divine Karma Cleansing, Mind empowerment, Chakra Balancing. - Visit Website Here !


Embed दत्तप्रबोधिनी न्यास on Your Site: Copy and Paste the Code Below