भगवान श्री सद्गुरु दत्तात्रेय स्वामीं महाराजांच्या चरणकमळांच्या शुभाशीर्वादाने त्यांच्या मुमूक्षुत्व असलेल्या भक्तगणांना तत्व, कर्मदहन व आध्यात्मिक साधनेच्या योग पार्श्वभूमीद्वारे कोणत्याही मध्यस्थीशिवाय सद्मार्गात उच्च स्तरावर निर्विघ्न व निर्गुणातुन आत्ममार्गक्रम करण्याच्या उद्दीष्टाने दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट संस्थेची स्थापना झाली. दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट च्या माध्यमातून नोव्हेंबर २०१४ पासुन प्रार्थमिक स्वामीमय सामुहीक नामस्मरण व पारायण साधना सुरु करण्यात आली.
दत्तभक्तीतुन आध्यात्मिक जीवन कसं जगावं ; याची प्रारंभीक तात्विक विचारसरणी सर्व संबंधित लिखाणातुन नमुद केलेली आहे ज्यायोगे दत्तप्रबोधिनी तत्व माध्यमातुन साधकाला दत्त पुर्वानुग्रह प्राप्त होण्यासाठी संस्थेच्या सक्रिय सभासदत्वाच्या पार्श्वभूमीवर दुर्लभ व सखोल मार्गदर्शन करण्यात येते. ज्यायोगे साधकाला अंतरिक सद्गुरु सामर्थ्याची जाणीव होऊन सहज आत्मोद्धाराची प्रचीती येते. दत्तप्रबोधिनीची कार्यप्रणाली व आचरण पुर्णपणे दत्त महाराजांच्या अनुशासन व काळभैरव शासनावर आधारलेली आहे. व्यक्ती विशेष माहात्म्यासाठी आध्यात्मिक जीवनात स्थान कुठेही स्थानांकण व स्थिरांकण नाही.
आध्यात्मिक लिखाणांच्या माध्यमातून जनहितकार्य सरळमार्गी व एकसुत्रीस्वरुपात राबवले जात आहे ज्यायोगे निवडकच पण प्रामाणिक व पारदर्शक संतप्रवृत्तीमय साधक दत्तप्रबोधिनी तत्वात सामावले जात आहेत. आध्यात्म अर्थात अध्ययन आत्म्याचे हा पाठीचा कणा दत्त तत्वातुन आध्यात्मिक देहात कसा ताठ उभा राहील यासाठी निरनिराळ्या साधनांचे कार्यक्रम राबावले जात आहेत. उदा. ऊबंटू, रात्रप्रहर सेवा, सामुहीक नामस्मरण वगैरे...
सेवा उद्दिष्टे...
- १. स्वआत्मबळ वाढवणें. शिवस्वामीआत्मानुसंधान करुन आपलं जीवन सार्थक करणें.
- २. सत् पात्री दुःखी पिडीत लोकांना स्वामीअनुभूतीच्या माध्यमातुन कोणतेही अर्थकारण, राजकारण आणि दंभकारण न करता सामुदायिक स्वामीमय सेवेच अनन्यसाधारण महत्त्व पटवुन देणें. यथाशक्ति सद्गुरु स्वामींमहाराजांचा हेतु आणि व्याप्ती समजावुन देणे.
- ३. केंद्र, मठ आणि मंदिराच्या संकुचीत मनोवृत्तीत न अडकता आणि कोणत्याही अज्ञानी मंडळाच्या राजकारणाला बळी न पडता, त्यातुन बाहेर पडुन घरगुती प्रश्न, आध्यात्मिक प्रश्न, पर्यावरण संतुलनाचा प्रश्न आणि राष्ट्रहीत सुरक्षेच्या प्रश्नांवर सद्गुरुकृपे उपायाहेतु एकत्र येऊन सामुदायिक स्वामीमय रात्रप्रहर सेवा करणें.
सेवा अधिष्ठान...
- १. आत्मअवलोकनात्मक स्वामीमय त्रिकालसंध्या करणें.
- २. आत्मबळ वाढवणें हेतू सद्गुरुस्वामीं अधिष्ठानाचा स्वगृही न्यास करणें.
सेवा धोरणें...
- १. सामुदायिक स्वामीमय सेवा विनामुल्य आहे.
- २. सद्गुरु स्वामीमहाराज आणि त्यांच्या भक्तगणांमध्ये कोणतेही प्रकारचे माध्यम नाही. साधकाचे सर्व चित्त गाभाऱ्यात असायला हवे.
या विषयाला अनुसरुन संबंधित पोस्टस् पहा.
संपर्क : श्री. कुलदीप निकम
भ्रमणध्वनी : 9619011227