ध्यान साधना कशी करावी, नाथपंथातील प्रसिद्ध ध्यानयोग नवनाथ साधना - १ ( Nathpanthi Meditation - 1 ) - Works Quikly


नाथपंथात प्राणायाम आणि त्रिवेणी बंधाबरोबरच ध्यानयोगालाही अतिशय महत्त्व दिले गेले आहे. मुळात ध्यान व समाधी या अष्टांगयोगाच्या शेवटच्या दोन अवस्थेवरच नाथपंथाची उभारणी झाली. नाथपंथाचे महावाक्य "अलख निरंजन" याकडे लक्ष दिले तर " कधीही न लखलखणारा जीवनमुक्त शिव" ह्या रहस्यमय मतितार्थाने सिद्धावस्था प्राप्त करून घेणे, असाच या पंथाचा जय आदेश आहे.

आत्मानुभव येण्यासाठी साधकांना प्राणायाम व नामस्मरण द्वारा मन स्थिर करता येऊन असे निर्विकार मन आत्मचिंतनाकडे लावता यावे हे सहज शक्य आहे. या सोप्या विचारसरणीवर नाथपंथाने जोर दिला. कृपया साधकांनी योग्य वाटेल तो प्राणायाम फक्त २० मिनिटे काही महीने दररोज नेमाने करवा. मन स्थिर व निर्विचार होणे हेतु सहा महीन्याचा कालावधी अपेक्षित आहे. या काळात मन चंचल व अस्वस्थ होईल. सात्त्विक आहार करावा. सर्व काळजी चिंता सोडुन द्यावी. परमेश्वर प्राप्तीत जीवन व्यतित होत आहे अशी धारणा करावी. यम, नियम वैगरे राजयोगाच्या प्रार्थमिक पायऱ्या वरील कृतीत अंतर्भूत होतात असे समजावे.



अशा भुमिकेत मन स्थिरता येत असल्यास ध्यानाचा टप्प्या टप्याने अभ्यास करावा. या ध्यानाभ्यासा करीता पहाटेची वेळ फार योग्य आहे.

महत्त्वाची टिप -

गुरुमुखातुन ज्ञात झालेल्या तीन ध्यानयोगांपैकी प्रथम क्रियेचा प्रपंच करीत आहे तरी कृपया वाचकांनी व साधकांनी फक्त आत्मोद्धाराहेतुच क्रियेचा अवलंब करावा. काही प्रश्न असल्यास प्रत्यक्ष संपर्क करावा.

ध्यानक्रिया विधी व धारणा -

पहाटे लवकर उठुन सचैल स्नानाने शुचिर्भुत व्हावेत. सवयीअनुसरुन चहा काँफी घेण्यास हरकत नाही. नंंतर परत आपल्या अंथरुणावर भिंतीला टेकून बसावे. डोळे मिटून घ्यावेत व श्वासोच्छवास स्थिर करावा. नंतर असा प्रबळ विचार करावा कि, आपले शरीर अग्नीने भस्मसात झाले आहे व त्या शरीराचा सांगाडा आपण आपल्या चक्षुंनी पहात आहोत. अशा अवस्थेत असे वाटते कि शरीरांतर्गत बंदिस्त झालेले तुमचे चैतन्य आता मुक्त झाले आहे. या संसाराची आस, माया लोभ, द्रव्यलालसा, स्त्रीसुख वगैरे सर्व देहान्तर्गत देहाच्या नाशाबरोबर वरील क्षणिक भाव नष्ट होऊन असे भावातीत व विश्वभान नसलेले चैतन्य मी आहे, असा विचार करावा.

या देहामुळेच मला अनंत यातना, अपमान, दारिद्रय, व्याधी व हव्यास जोडला होता. माझ्या कुटुंबासाठी, नातेवाईकांसाठी मुलांच्या सुखासाठी किती हालापेष्टा भोगल्या. तो देह आता भस्मिभुत झाला आहे. आता जो मी चैतन्यरुपी त्याच्या दृष्टीने जगत व जीव म्हणुन काही नाहीच. जे काही आहे ते फक्त चैतन्य...! ध्यानक्रिया या स्वरुपाची असावी. या विचारसरणीत बदल मुळीच करु नका.


अशाप्रकारे एकप्रवाही ध्यान झाले पाहीजे. अन्य विचार मनात येऊ लागले ते देहांतर्गत आहेत. मला तर देहच नाही मग विचार कुठले...? अशी प्रज्ञा निर्माण होऊन अन्य विचार बंद पडतात व ध्यानाच्या परिपक्व अवस्थेत देह भस्मिभूत झाला आहे ही भावनाही मावळुन जाते. चैतन्याचे ठिकाणी अन्य काहीही नाही असा अनुभव येतो व माझे आसे निरंजन रुप आहे याची ओळख पटुन साधक धन्य होतो.

ही साधना अशुभ अगर भयानक आहे हे मानण्याचे काहीच कारण नाही देहाशी चैतन्याचा संबंध घडणे हीच मुळात अशुभ गोष्ट आहे. आपले जे चैतन्य स्वरुप त्याचा अनुभव येणे ही भयानक गोष्ट नसुन, ती आनंदाची व मांगल्याची स्थिती आहे असे समजावेत. ८ ते १५ दिवस अशा पद्धतीने ध्यान केल्यास जे काही दिव्य अनुभव येतील व मनास जी शांती वाटेल, त्याचे वर्णन न करता त्या अवस्थेत जाऊन स्वतःच त्याचा अनुभव घ्यावा, ऐवढेच सांगत आहे.


सुरवातीला सरासरी २० मिनिटे ध्यानधारणा करावीत. ध्यानावस्थेतुन 

बाहेर येतेवेळीस ( डोळे उघडण्यापुर्वी ) श्वासांच्या गतीवर लक्षकेंद्रीत करावेत. दोन्ही तळहात घासुन जी उर्जा उत्पन्न होईल ती डोळ्यांवर दोन्ही तळहाताने स्पर्श करावीत आणि हळुहळू डोळे उघडावेत.

मानस पुजा संबंधित पोस्टस् पहा.



ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

दुःख कष्ट दारिद्रयाचे निराकरण करेल हा सिध्द चार मुखी रुद्राक्ष. दोन दिवसात फरक जाणवेला

तुमच्या घरी दुष्ट शक्तींचा प्रवेश टाळा. आजच लावा सिद्ध चौसष्ट योगिनी यंत्र.

अत्यंत प्रभावकारक घरातील नकारात्मक ऊर्जा नाशक श्री गृह वास्तुदोष निवारण यंत्र

प्रखर दैवीसान्निध्यासाठी करा अशी पंचकपाल साधना तात्काळ फरक जाणवेल.

वाहन सुखाचा मंत्र सिद्ध हनुमान यंत्र - सुरक्षा कवच



0