नाथपंथातील प्रसिद्ध ध्यानयोग नवनाथ साधना - ३ ( Nathpanthi Meditation - 3 ) - Step by stepआपल्या देहात शरीरात षट् चक्र ( मुलाधार चक्र ते आज्ञा चक्र ) ही आध्यात्मिक उर्जा केंद्रे म्हणुन स्थित आहेत. या उर्जा केंद्रांना जागृतीकरण हेतु वैराग्यमय भक्ती आणि कडक सद्गुरु अनुशासनाची आवश्यकता असते. आपल्या देहात एकुण ७२००० नाड्या आहेत त्यात ईडा, पिंगला आणि सुषुम्ना यांना सर्वात जास्त महत्त्वाचे स्थान आहे. ईडा व पिंगला नामक नाडी देहब्रम्ह हंसात्मक बीज मंत्रातुन जगत परीचालीत करते तर सुषुम्ना नाडी अथवा ब्रम्हांडीय नाडी चैतन्य जगताचे सुक्ष्म कार्यकारण भाव चालायमान करते.


दत्तप्रबोधिनी उपासना मार्ग - श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य श्री कृष्णानंद विद्याभारती स्वामी महाराज

नाथपंथात प्रार्थमिक स्तरांवरील साधकांनी हठयोगाच्या आधारे सर्वप्रथम सद्गुरु अनुग्रह प्राप्त केला. गुरु आदेशावरुन जीवनाची पहीली १२ वर्षे यौगिक क्रिया व नामसाधनेच्या माध्यमातुन सर्व शरीर शुद्धीकरण केले त्यात अनुक्रमे - स्थुल शरीर, सुक्ष्म शरीर, कारण शरीर व वैश्विक शरीर असा उल्लेख होतो. शरीर शुद्धीकरणाला अनुसरुन सर्व प्रथम अनुक्रमे चित्त शुद्धी, भगवत्मय अंतःकरण शुद्धी, शरीरस्थित नाड्या शुद्धी व षट्चक्र शुद्धीवर प्राधान्यतः भर दिला.


सद्गुरु आज्ञेला अनुसरुन प्रथम तप पुर्ण करुन अर्थात साधन-साध्य-समाधी साठी आत्मनियोजन आखणी झाल्यावर नामधारक ब्रम्हचर्य अवस्थेत तपुन निघालेल्या देहरुपी ईश्वरी साधनेचा साध्यप्राप्ती म्हणजेच श्री दत्तात्रेय महाराजांचे चरणरज प्राप्ती हेतु नाथपंथाचा जो मुलभुत पाया आहे त्या धान, धारणा व समाधी अवस्थेची सुरवात होते.


दत्त संप्रदायात बरेच संप्रदाय सामावलेले आहेत. त्यात नाथपंथाचे एक विशिष्ट अनुशासन व तत्वपालन आध्यात्मिक जीवनात मोलाची कामगिरी धारण करतात. सर्व आत्मउद्घोषणा सद्गुरु आस्था व निष्ठेवर कार्यन्वित होतात. नाथपंथाची कार्यप्रणाली व सिद्धांत खरोखर व्यक्तकरणेहेतु शब्दांच्याही पलिकडील दैदिप्यमान अभिव्यक्ती आहे.
खालील ध्यानयोग क्रीया १ व २ च्या तुलनेने थोडी सहज व सोपी आहे. 

कृपया मात्र साधना फळप्राप्तीहेतु शुद्ध शाकाहारी राहाणे व सोयरे सुतक पाळणे बंधनकारक आहे.

महत्त्वाची टिप -


गुरुमुखातुन ज्ञात झालेल्या तीन ध्यानयोगांपैकी तृतीय क्रियेचा प्रपंच करीत आहे तरी कृपया वाचकांनी व साधकांनी फक्त आत्मोद्धाराहेतुच क्रियेचा अवलंब करावा. काही प्रश्न असल्यास प्रत्यक्ष संपर्क करा.


ध्यानक्रिया विधी व धारणा -  • सकाळी लवकर उठावे. स्नान वगैरे आटपुन घेणे. सवयीला अनुसरुन ईच्छा असल्यास चहा काँफी घेतली तरी चालेल. नंतर आपल्य अंथरुणावर सहज भिंतीला टेकुन बसा व शरीर मोकळे सोडा.
  • डोळे मिटून घ्यावेत व असा प्रबळ विचार करावा की आत्मतत्वा व्यतिरिक्त ईतर कसलेच अस्तित्व नाही. त्याच वेळी आपल्या शरीराला श्रीफळ अथवा ज्याला आपण नारळ असे म्हणतो त्या नारळाची धारणा करा. स्वदेह नारळ ( श्रीफळ ) आहे अशी प्रबळ कल्पना करा.
  • या नारळातील अंतर्भुत परीस्थितीची तुम्हाला ओळख होण्यास सुरवात होईल. ज्याप्रमाणे नारळात खोबर्याची जलाने भरलेली वाटी असते व ती आतुन नारळाला चिकटलेली असते त्याचप्रमाचे आपलं शरीरही आतुन विषयविकारांना चिकटले आहे अशी जाणीव होते. त्याअर्थी आपल्यातील चांगले व वाईट गुण आपल्या नजरेसमोर येतात.
  • नारळाआतुन चिकटलेल्या वाटीला अर्थात नश्वर शरीराला आतुन चिकटलेल्या वासनारुपी चित्ताला सर्व बाजुंनी वेगळं करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी दैनंदिन नामस्मरणाचा आधार घ्यावा लागतो. अशी प्रबळ धारणा करा की, सर्व चित्तवृत्ती एका जागी ( ह्दय ) एकवटलेली आहे.
  • ज्याप्रमाणे नारळाआतील वाटी सुकल्यानंतर ती परत कधी आतुन नारळाला चिटकत नाही. स्वतंत्र असते. मुक्त असते. त्याचप्रमाणे माझा नाशवंत देह संसारात असुनही मी संसारापासुन अलिप्त आहे. अंतर्मुखी ह्दयस्थित सद्गुरुला शरण आहे आणि महाराज कधी मला परत या वासनारुपी देहाला चिटकु देणार नाहीत.
  • या ध्यानस्थितीतुन बाहेर येताना प्रथम आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करणे. नंतर भृकुटीमध्यावर सद्गुरु महाराजांचे कृतज्ञतापुर्वक दर्शन घेणे. दोन्ही तळ हात ऐकमेकांना घासुन, निर्माण झालेल्या उर्जेने डोळे व कपाळ स्पर्श करणे. मग हळुहळू डोळे उघडणे.
  • सर्व प्रथम ही ध्यानक्रीया २० मिनिटे करावीत. हळुहळु सराव वाढवावा. काही प्रश्न असल्यास प्रत्यक्ष संपर्क करावा.
संबंधित ध्यानसिद्धी अनुसरुन सविस्तर, अधिक सखोल, गहन व कुठेही उपलब्ध नसलेली विशेष आध्यात्मिक साधना माहीती लिंक स्वरुपात खालीलप्रमाणे उपलब्ध आहे. दिलेल्या विशेष लिंकचा पासवर्ड हटवण्यासाठी संस्थेत सक्रीय सभासद होणे आवश्यक आहे.

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

महाकालेश्वर उज्जैन स्वामीमय सेवा माहिती

दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट सभासदत्वाचे फायदे !

दत्त संप्रदाय व साधन, साध्य, समाधी

सर्व स्वामींशिवभक्तांसाठी अद्वितीय शिवसाधना पद्धती...!!!

श्री गुरुचरित्राच्या सप्ताहवाचनाच्या पद्धती व संक्षिप्त रसग्रहणसंपर्क : श्री. कुलदीप निकम
भ्रमणध्वनी : 9619011227


GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीतीAll about Swami Samarth, Real unknown secrets, Step by step Spiritual Growth explained, Build your soul, Boost your life on top. - Visit Website Here !


Embed श्री स्वामी समर्थ योग व गहन आध्यात्मिक मार्गदर्शन on Your Site: Copy and Paste the Code Below