नवनाथ ग्रंथ ( Navnath Bhaktisar ) पारायण कसे करावे ? ब्रम्हाण्डीय सामर्थ्य विश्लेषण - Step by step


ज्याप्रमाणे भक्ताची भक्ती ही निःसीम असेल तर त्याला भगवंताचे दर्शन घडल्याशिवाय राहत नाही. श्री गुरुचरित्र, श्री ज्ञानेश्वरी, श्री दासबोध, श्री दुर्गा सप्तशती आदी धार्मिक ग्रंथांबरोबर श्री नवनाथ ग्रंथाचे अंतःकरण पुर्वक वाचन केल्यास अद्भुत व चमत्कारिक अनुभव येऊन संकट निवारणाचे आश्वासन नाथ महाराज आपल्याला प्रेमपुर्वक करवुन देतात.


कविराज धुण्डीसुत मालू नरहरी यांनी १८१९ मध्ये ' श्री नवनाथ भक्तिसार ' हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथराजात ४० अध्याय व ७६०० ओव्या आहेत. या ग्रंथातील कुठला अध्याय वाचल्यावर साधकाला त्याचे नेमके काय फलित आहे हे ४० व्या अध्यायात कविराजाने लिहुन ठेवले आहे. मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, जालंधरनाथ, कानिफनाथ, चर्पटीनाथ, अडबंगनाथ, भर्तरीनाथ, रेवणनाथ आणि चौरंगीनाथ अशा नवनारायणांचे नवनाथ रुपातील भक्तिसार ग्रंथ आहे. निःसीम भक्ती, तपश्चर्या, धर्माचरण, सद्गुरुनिष्ठा, वैराग्य, सन्मार्ग, भावसामर्थ्य व दत्त चरितरज आदि गुण असतील तर सर्वसामान्य माणसालाही भगवंताचे दर्शन घडू शकते या तत्वावर अलख दाखला नाथ महाराजांनी समाजाला मिळवुन दिला.

ग्रंथ म्हणजे काय ? नाथ ग्रंथ व ब्रम्ह ग्रंथी ह्यांचा काय संबंध ?

बहुतेक साधक पारायण करतात, सर्व क्रीया यथाशक्ति व्यवस्थित होण्याचा कुशक प्रयत्नही करतात. परंतु आपण पारायण करताना सुक्ष्म गोष्टींचे अध्ययन विसरतो. निर्रथक घोकमपट्टी केल्यास ब्रम्ह अनुभव युक्त आध्यात्मिक आत्मानुभव येत नाही. फक्त मानसिक समाधान होते जे आत्मप्रचितीसाठी पुरेस नाही. पारायण, ग्रंथ, ग्रंथी, अंतर्मुखता, चित्तायाम, सुक्ष्मदृष्टी व मतीतार्थ ही सर्व तत्वे पारायणकाळात ऐकमेकांशी जोडलेली असतात. ह्या तत्वांचा अनुभव जोपर्यंत सामुहीक स्तरावर आपल्याला येत नाही तोपर्यंत कोणतेही वाचन काही उपयोगाचं नाही.आपल्या जीवनातील अनमोल क्षण निव्वळ अज्ञानाच्या आधारावर फुटक जाऊ नयेत त्याअर्थी ग्रंथ आचरणाची निवडक माहीती देत आहे.


ग्रंथ शब्द हा ग + रं + अथ या तत्वाचे सामुहीकीकरण आहे. ' ग्रंथ ' या शब्दब्रम्हात ग म्हणजे आदिपुज्यम् गणार्ध्यक्षम् अर्थात श्री गणपती, रं बीज हे शिव अथवा रुद्राचे मातृकाशक्ती बीज आणि अथ हे प्रकृतीची अभिव्यक्ती आहे. आपण सहजच कोणताही शब्द जीभ उचलुन बोलत असतो पण त्याचा मतीतार्थ जाणुन घेण्याचे कष्ट करत नाही. हेच तर भारतीय संस्कृतीचे दुर्दैव आहे. ' ग्रंथ ' ब्रम्हशब्दाचा मतीतार्थ ध्यानात घेता ग्रंथ म्हणजे शिवचरण अथवा सद्गुरुचरण असा अर्थ समजुन चित्ता रुजवुन घ्यावा. त्याअर्थी महात्म्यांनी भुतकाळत " ग्रंथ हेच गुरु " अशी आत्मबोधक तत्वनियती समजावुन दिली.




ग्रंथ आणि ग्रंथी हे फार गहन तत्व निरुपण आहे. थोडक्यात वस्तुस्थिती लिहीण्याचा प्रयत्न करत आहे. ग्रंथाच्या वरील मतीतार्थाला अनुसरुन ग्रंथीचे अस्तित्व ग्रंथ पारायण करणाऱ्या साधकाच्या देहात गणले जाते. त्याअर्थी अनुक्रमे ब्रम्हग्रंथी, विष्णुग्रंथी व रुद्रग्रंथी आत्मवर्णित आहेत. ग्रंथ पारायण करत असताना दोन स्तरावर वाचन करण्यात येते ते खालीलप्रमाणे आहे.

  • १. भौतिक कामनेसाठी पारायण विधी
  • २. आध्यात्मिक प्रगतीसाठी पारायण विधी

१. भौतिक कामनेसाठी पारायण विधी

ज्या साधकांना भौतिक प्रकारचे त्रास आहेत ते पारायण पाठ करत असताना वैखरी वाणीचा वापर करावा लागतो. वैखरी वाणी म्हणजे स्थुल वाणी जी सर्व सहज ऐकु शकतात. ह्याअर्थी आपल्या सभोवताली आणि आपल्या घरातील नकारार्थी असलेल्या स्पंदनांचा नायनाट केला जातो. अपेक्षित फलप्राप्ती होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला संबंधित पारायण सेवा करावीच लागते. हे सर्वस्वी संबंधित नकारात्मक उर्जेच्या तीव्रतेवर अवलंबुन आहे. ईतर सर्व विधी समान आहेत. त्यात विशेष फेरबदल नाही.


२. आध्यात्मिक प्रगतीसाठी पारायण विधी

नाथांनी या आत्महेतुवर विशेष भर दिला आहे. ज्या साधकांना सद्गुरु अनुग्रहाची प्राप्ती, पाप क्लेशाचा विध्वंस, अज्ञानाचा अंधकार नाहीसा करणे, दुरदृष्टी, ब्रम्हज्ञान, सद्गुरुतत्व ज्ञान, लोक परलोकाचे पारलौकीक अस्तित्व अनुभव व भ्रमण, जीवन्मुक्ती अवस्था प्राप्ती, शिवजीव ऐकता होणे. प्रकृतीपुरुषाचे ब्रम्हाण्डीयकरण होणे. देहबुद्धीतुन विदेही आत्मबुद्धीत मार्गक्रमण करणे आणि भुत, वर्तमान व भविष्यज्ञान प्राप्त होणे यासाठी अंतर्मुख पारायण करावे लागते.

मुळात पारायण हा शब्द ' परायण ' या शब्दाचा अपभ्रंश आहे. परायण करणे म्हणजेच मुळात आध्यात्मिक प्रगतीसाठी अंतर्मुख होणे असा आहे. ग्रंथ तत्वाचे अंतर्मुखीकरण करुन ते आत्मसंयमाद्वारे पचवुन आचरणात आणल्यास ग्रंथीसमुहाचा ज्ञान आपल्याला सद्गुरु करवुन देतात. त्यासाठी सर्व दत्तभक्तांनी आपले चारित्र्य पवित्र आणि आचरण उत्तम ठेवले पाहीजे.



नाथ म्हणजे काय ?

नाथ शब्दाचा प्रादुर्भाव नाथृ धातुपासुन झाला. नाथृ म्हणजे तपातुन तापांची समाप्ती करुन दैवीसान्निध्य यथा ऐश्वर्थ प्राप्त करुन घेणे. अतः ज्यापासुन ऐश्वर्य, आशीर्वाद व कल्याण होते ते नाथा आहे. नाथ शब्दाचा सामान्य अर्थ स्वामी, प्रभु, मालक, सद्गुरु महाराज असा आहे. त्याचबरोबर  न+ अथ अर्थात नाही म्हणजेच ज्याच्या पलिकडे काहीही नाही. कोणतेही तत्व नाही. जर कोणी ह्या पुरुषप्रकृती आणि पिंडब्रम्हांडाच्या पलिकडे आहेत तर ते नाथ आहेत.

मला बरेच साधक अर्थिक समस्येसाठी काही खात्रीचे साधन अथवा उपासना आहे का ? असे विचारत असतता. त्यासाठी नवनाथ ग्रंथातील दुसरा अध्याय अर्थिक चिंता दुर होण्यासाठी वाचावा. ज्यांना अर्थिक समस्या असेल मग ती स्त्री असेल, पुरुष असेल त्यांनी भक्तीभावाने किमान ६ महीने रोज हा अध्याय वाचावा. महिला वर्गाने फक्त मासिक पाळीच्यावेळी काहीही करु नये. फक्त मानसिक नामस्मरण चालु ठेवावेत. मुलामुलींचे विवाह लवकर जुळणेंहातु नवनाथ ग्रंथातील २८ वा अध्याय वाचावा. सर्व नियम आणि आचरण लक्षात ठेवुनच कृती करावी.


संपुर्ण ग्रंथ पारायण आध्यात्मिक प्रगतीसाठी करण्याची तीव्र ईच्छा असल्यास साधकांनी निःसंकोच संपर्क करावेत. सर्व माहीती येथे प्रकाशित करणे शक्य नाही. 


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

दुःख कष्ट दारिद्रयाचे निराकरण करेल हा सिध्द चार मुखी रुद्राक्ष. दोन दिवसात फरक जाणवेला

तुमच्या घरी दुष्ट शक्तींचा प्रवेश टाळा. आजच लावा सिद्ध चौसष्ट योगिनी यंत्र.

अत्यंत प्रभावकारक घरातील नकारात्मक ऊर्जा नाशक श्री गृह वास्तुदोष निवारण यंत्र

प्रखर दैवीसान्निध्यासाठी करा अशी पंचकपाल साधना तात्काळ फरक जाणवेल.

वाहन सुखाचा मंत्र सिद्ध हनुमान यंत्र - सुरक्षा कवच