नवनारायाणांप्रमाणेच ज्ञान नारायणही नाथ संप्रदायात गणले जातात. ८४००० नाथपंथीय सिद्धगोरक्ष अनुयायींनी नाथ संप्रदायाचा प्रसार अखंड आणि समृद्ध सद्गुरु परंपरा अबाधीत राहावी यासाठी योग व मोहिनी या विद्यांसोबतच आणिमादि अष्टसिद्धी सद्गुरु महाराजकृपे प्राप्त करुन जनहित साधण्यास केला. श्री गोरक्ष किमयागिरी प्रवाह ह्या अत्यंत गहन अशा नाथशास्त्राचे माहात्म्य व त्याद्वारे आपल्या जीवनचा उद्धार होण्यासाठी सद्गुरु मालु कवींनी हा ग्रंथ जनसामान्य अज्ञानी व प्रामाणिक आध्यात्मिक जीवनात प्रारंभिक अवस्थेत असणाऱ्या जड जीवांसाठी करवुन दिला.
श्री गोरक्ष किमयागिरी प्रवाह सिद्धग्रंथाचे आत्मविवेचन करण्यापुर्वी मानसिक तयारी म्हणुन दत्त तत्वाचा प्रारंभिक स्वरुपात मनाच्या स्थिरतेसाठी नामावलोकनात्मक अभ्यास करावा. अर्थात सद्गुरु महाराजांच्या चरणकृपेशिवाय दैवत नाही ही स्पष्ट धारणा आपल्या अंतरी अनुभवास येणं महत्वाचं...! ईतर कोणतेही माध्यम ह्या अनंत ब्रम्हांडातील नियतीच्या पलिकडील दैवतांना प्रसन्न करु शकत नाही. एकमात्र सुमेरु आणि देहातीत महामेरु सद्गुरु महाराजच आपल्या आत्म्याचा संबंध प्रत्यक्ष परमात्म्याशी जोडु शकतात. ईतर दुसरे कोणतेही अधिकृत माध्यत अस्तित्वात नाही. यातत्वाची आचरणात्मक गाठ आपल्या अंतरी बसायला हवी. जेणे करुन दत्त तत्व, नाथतत्व व भैरव तत्व यांमधील सद्गुरु तत्वसाम्यतेने आपण सहजच परमतत्वाच्या नजरेत येऊ शकतो.
श्री गोरक्ष किमयागिरी प्रवाह सिद्धग्रंथातील सर्व मंत्रांचे व्यापक स्पष्टीकरण येथे देणं शक्य नाही. ह्या ग्रंथाच्या आत्माकलनयुक्त समग्र पठणाने काव्य ओवींचा मतितार्थ आपल्या अंतरी प्रतिबिंबीत होऊन संबंधीत वाताकर्षण विद्या, विभक्तास्त्र, हनुमन्त विद्या, स्पर्श मंत्र, भैरव मंत्र, लक्ष्मी तंत्र, कष्टोद्धरण आणि चित्तलय संस्करण संंबंधित अभ्यासाची सहजच गोडी उत्पन्न होते. ज्याअर्थी योगसाधनेत ध्यानधारणा व नामसाधनेच्या माध्ममातुन आपली अगाध आध्यात्मिक प्रगती होऊन आत्मज्ञान प्राप्ती होत असते. ह्या सर्व साधनेत सद्गुरु महाराजच आपल्याला आपल्या प्रामाणिक आणि पारदर्शक नितीमत्तेला अनुसरुन सहकार्य करतात.
हठयोग साधना, गोरक्ष योगपद्धती व योगबिंदू ईत्यादी नाथपंथीय योगविषयक अभ्यासाच्या अध्ययन हेतु नित्य पठणात श्री गोरक्ष किमयागिरी प्रवाह ग्रंथ असायला हवा. नाथांमधे सर्वश्रेष्ठ सद्गुरु महाराज शिवगोरक्ष दत्त चरणांच्या भक्तीभावावर आरुढ आणि सद्गुरु तत्व आचरणातुनच सर्व विद्या, त्रिविध शक्ती, सहज सिद्धी प्राप्त होण्याचे योगमार्ग आहेत. ईतर कोणताही आध्यात्मिक मार्ग साधकाला तारक अथवा प्रगतीकारक नाही. शाबरी विद्येचा अभ्यास शाबरी सिद्धमंत्राद्वारे अनुष्ठानातुन पुर्ण व्हावा यासाठी नाथ महाराजांनी सद्गुरु तत्वावरच जोर देऊन प्रत्येक शाबरी मंत्राच्या पुर्वी गुरु सुमेरुमाला मंत्र म्हणण्याचे नियम बांधुन दिले. जेणेकरुन सर्व योगक्रिया गुरु आधिष्ठानाच्याच माध्यमातुन शक्तीसंपन्न व्हाव्यात. त्यायोगे तत्व नियंत्रणात राहुन जनहीत साधण्यास मदत होईल.
नाथशक्तीचे एका नाथयोगी महाराजांचे माहात्म्य येथे आज सांगु ईच्छितो ते असे, ' प्रत्येक श्वावण वंद्य षष्ठीच्या दिवशी नाथपंथीय महन्त व नंगे गोसाईंचे मेळावे भरत असत. ह्याच मेळाव्यातील आमच्या परिचयाचे गुरुशिष्य साधक वर्गाचा माझ्याशी वार्तालाप होत असे. ईंद्रजाल प्रयोग, रसायन शास्त्र व औषधींवर प्रभुत्व असलेले योगीजने पाहाण्यात असत. त्यातील सर्वात आनंददायक आणि तितकेच रहस्यमयी एका सिद्धयोगी महापुरुषाच्या साधक शिष्यांसोबत माझी बैठक झाली. त्यात त्यांनी लोकांना होणाऱ्या देह व मानसिक आजारांच्या उपचाराहेतु त्यांच्या गुरु महाराजांची अभुतपुर्व तपश्चर्या कशी झाली ते व्यक्त केले.
ह्या तपश्चर्येत गुरुमहाराज घोर जंगलात जाऊन एका ठिकाणी जमीनीत सरासरी ६ फुटाचा खोल खड्डा करवुन घेत असत. त्या जमीनीतील खड्ड्यात स्वतः अन्नपाणी ग्रहण न करता लागोपाठ २१ दिवस सलग वृक्ष संभाषणाची मणिबंधन साधना करत असत. परिणामी अमावस्येच्या रात्री त्याच्या सभोवताली परीसरात असणारे सर्व वृक्ष सुक्ष्म देहाने त्यांच्या जवळ येऊन सर्व माहीती गुरु चरणी प्रकट करत असे.
त्यायोगे गुरु महाराज विविध रोग उपचारावर कोणत्या वृक्षाच्या पंच अंगांचा औषधोपचार म्हणुन काय उपयोग आहे, ह्यांच वर्णन प्रत्यक्ष त्या वृक्षांकडूनच ग्रहण करत असे. हे सर्व औषध सामग्री ज्ञान ते स्वतः जसेच्या तसे जनहीतासाठी निःस्वार्थ भावाने कल्याणप्रद करत असे.
श्री गोरक्ष किमयागिरी प्रवाह सिद्ध ग्रंथाचे पारायण कसे करावे ? यासंबंधीत अधिक सविस्त माहीतीसाठी दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट येथे संपर्क करावेत. तात्त्विक विनंतीस ग्राह्य समजुन यथायोग्य माहीती देण्यात येईल.
श्री गोरक्ष किमयागिरी प्रवाह हा नवनाथ महाराजांचे विस्तारक 'नवनाथ भक्तीसार' ग्रंथाप्रमाणे चरित्रवर्णन अगदी सुंदर, आनंदमय, लयबद्ध, काव्यस्वरुपी व मनोहरी स्वरुपात व्यक्त केले आहे. ह्या ग्रंथाचे व्यवस्थित दैनंदिन पठन करण्यास साधारणतः १ तासाचा कालावधी लागतो. या अनमोल ग्रंथाचे आत्मविवेचनाच्या अनुशंघाने प्रत्येक काव्य ओवी तन्मयतेने व आवडीने आकलन करता येणे आवश्यक आहे. नाथलीला वर्णन करताना वर्णबीज, मंत्रांची माहीती, चित्तारुढ तत्वनिरुपणे व नाथांची गहन विचारसरणीं काव्य ओव्यांमधे अप्रतिमतेने गुंफली आहे. फलश्रुतीत दोन सिद्ध दत्तमंत्रांचा अगदी स्पष्ट उल्लेख करवुन दिला आहे.
श्री गोरक्ष किमयागिरी प्रवाह सिद्धग्रंथाचे आत्मविवेचन करण्यापुर्वी मानसिक तयारी म्हणुन दत्त तत्वाचा प्रारंभिक स्वरुपात मनाच्या स्थिरतेसाठी नामावलोकनात्मक अभ्यास करावा. अर्थात सद्गुरु महाराजांच्या चरणकृपेशिवाय दैवत नाही ही स्पष्ट धारणा आपल्या अंतरी अनुभवास येणं महत्वाचं...! ईतर कोणतेही माध्यम ह्या अनंत ब्रम्हांडातील नियतीच्या पलिकडील दैवतांना प्रसन्न करु शकत नाही. एकमात्र सुमेरु आणि देहातीत महामेरु सद्गुरु महाराजच आपल्या आत्म्याचा संबंध प्रत्यक्ष परमात्म्याशी जोडु शकतात. ईतर दुसरे कोणतेही अधिकृत माध्यत अस्तित्वात नाही. यातत्वाची आचरणात्मक गाठ आपल्या अंतरी बसायला हवी. जेणे करुन दत्त तत्व, नाथतत्व व भैरव तत्व यांमधील सद्गुरु तत्वसाम्यतेने आपण सहजच परमतत्वाच्या नजरेत येऊ शकतो.
श्री गोरक्ष किमयागिरी प्रवाह सिद्धग्रंथातील सर्व मंत्रांचे व्यापक स्पष्टीकरण येथे देणं शक्य नाही. ह्या ग्रंथाच्या आत्माकलनयुक्त समग्र पठणाने काव्य ओवींचा मतितार्थ आपल्या अंतरी प्रतिबिंबीत होऊन संबंधीत वाताकर्षण विद्या, विभक्तास्त्र, हनुमन्त विद्या, स्पर्श मंत्र, भैरव मंत्र, लक्ष्मी तंत्र, कष्टोद्धरण आणि चित्तलय संस्करण संंबंधित अभ्यासाची सहजच गोडी उत्पन्न होते. ज्याअर्थी योगसाधनेत ध्यानधारणा व नामसाधनेच्या माध्ममातुन आपली अगाध आध्यात्मिक प्रगती होऊन आत्मज्ञान प्राप्ती होत असते. ह्या सर्व साधनेत सद्गुरु महाराजच आपल्याला आपल्या प्रामाणिक आणि पारदर्शक नितीमत्तेला अनुसरुन सहकार्य करतात.
हठयोग साधना, गोरक्ष योगपद्धती व योगबिंदू ईत्यादी नाथपंथीय योगविषयक अभ्यासाच्या अध्ययन हेतु नित्य पठणात श्री गोरक्ष किमयागिरी प्रवाह ग्रंथ असायला हवा. नाथांमधे सर्वश्रेष्ठ सद्गुरु महाराज शिवगोरक्ष दत्त चरणांच्या भक्तीभावावर आरुढ आणि सद्गुरु तत्व आचरणातुनच सर्व विद्या, त्रिविध शक्ती, सहज सिद्धी प्राप्त होण्याचे योगमार्ग आहेत. ईतर कोणताही आध्यात्मिक मार्ग साधकाला तारक अथवा प्रगतीकारक नाही. शाबरी विद्येचा अभ्यास शाबरी सिद्धमंत्राद्वारे अनुष्ठानातुन पुर्ण व्हावा यासाठी नाथ महाराजांनी सद्गुरु तत्वावरच जोर देऊन प्रत्येक शाबरी मंत्राच्या पुर्वी गुरु सुमेरुमाला मंत्र म्हणण्याचे नियम बांधुन दिले. जेणेकरुन सर्व योगक्रिया गुरु आधिष्ठानाच्याच माध्यमातुन शक्तीसंपन्न व्हाव्यात. त्यायोगे तत्व नियंत्रणात राहुन जनहीत साधण्यास मदत होईल.
ह्या तपश्चर्येत गुरुमहाराज घोर जंगलात जाऊन एका ठिकाणी जमीनीत सरासरी ६ फुटाचा खोल खड्डा करवुन घेत असत. त्या जमीनीतील खड्ड्यात स्वतः अन्नपाणी ग्रहण न करता लागोपाठ २१ दिवस सलग वृक्ष संभाषणाची मणिबंधन साधना करत असत. परिणामी अमावस्येच्या रात्री त्याच्या सभोवताली परीसरात असणारे सर्व वृक्ष सुक्ष्म देहाने त्यांच्या जवळ येऊन सर्व माहीती गुरु चरणी प्रकट करत असे.
त्यायोगे गुरु महाराज विविध रोग उपचारावर कोणत्या वृक्षाच्या पंच अंगांचा औषधोपचार म्हणुन काय उपयोग आहे, ह्यांच वर्णन प्रत्यक्ष त्या वृक्षांकडूनच ग्रहण करत असे. हे सर्व औषध सामग्री ज्ञान ते स्वतः जसेच्या तसे जनहीतासाठी निःस्वार्थ भावाने कल्याणप्रद करत असे.
श्री गोरक्ष किमयागिरी प्रवाह सिद्ध ग्रंथाचे पारायण कसे करावे ? यासंबंधीत अधिक सविस्त माहीतीसाठी दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट येथे संपर्क करावेत. तात्त्विक विनंतीस ग्राह्य समजुन यथायोग्य माहीती देण्यात येईल.
या विषयाला अनुसरुन संबंधित पोस्टस् पहा.