मंत्र विधान Mantra Vidhan Mantras Deepest secret you must know !


अंतर आत्म्यात ध्यासपुर्वक विलयकरणाद्वारे मनाला वळवुन आध्यात्मिक शक्ती जागृत करण्याचे संयत्र म्हणजे ' मंत्र ' असे म्हणतात. मंत्र रचना अनेक रूपात असुन त्याची विशिष्ट सजोडीय ठराविक रचना नसतै. मंत्रांची उत्पत्ती बीज मंत्राद्वारे सुर्य चंद्र उत्पत्तीच्याही अगोदर झाली. वेदांमार्फत मृत्युलोकात प्रसारीत झाली. मंत्र शक्ती जागृतीकरणातुन संबंधित प्रभाव तंत्र व यंत्रातुन प्रसारीत करण्यात येतो. या प्रयोगात मंत्र सामर्थ्याचेच माहात्म्य प्राधान्यतः विशेष असते.



अंतर आत्म्यात ध्यासपुर्वक विलयकरणाद्वारे मनाला वळवुन आध्यात्मिक शक्ती जागृत करण्याचे संयत्र म्हणजे ' मंत्र ' असे म्हणतात. मंत्र रचना अनेक रूपात असुन त्याची विशिष्ट सजोडीय ठराविक रचना नसतै. मंत्रांची उत्पत्ती बीज मंत्राद्वारे सुर्य चंद्र उत्पत्तीच्याही अगोदर झाली. वेदांमार्फत मृत्युलोकात प्रसारीत झाली. मंत्र शक्ती जागृतीकरणातुन संबंधित प्रभाव तंत्र व यंत्रातुन प्रसारीत करण्यात येतो. या प्रयोगात मंत्र सामर्थ्याचेच माहात्म्य प्राधान्यतः विशेष असते.

मंत्रांची उत्पत्ती सर्व प्रथम अथर्व वेदातुन उपनिषदाच्या मुल मंत्रातुन व्यक्त झाली. त्यायोगे अथर्व वेदातुन यजुर्वेद ; यजुर्वेदातुन ऋग् वेद व ऋग्वेदातुन सामवेदाची उत्पत्ती क्रमशः झाली. वेदाच्या संरचनात्मत्क शक्ती केंद्राला अनुसरून मंत्रव्युहरचना करण्यात आली.


मंत्रांचे स्वरुप प्रकृती व पुरुषाच्या सामायिकरणाचे शाश्वत प्रतिक असते. कोणत्याही मंत्रात स्वर म्हणजे प्रकृती ( शक्ती ) व व्यंजन म्हणजे पुरुष ( शिव ) अशा सिद्धांताद्वारे अभिव्यक्ती प्रकट होत असते. संबंधित साधकाच्या प्रकृती ( शरीर म्हणजे आत्मा ) व पुरुष ( जीव ) अनुसरुन मंत्र जागृती करण्यात येते. हाच मंत्र विधानाचा मुळ आधार आहे.


नियमबद्ध तात्त्विक अनुसंधानातुन मंत्र शक्तीचा तात्काळ अनुभव येतो. योग्य दिशा, वेळ, आसन, साहीत्ये व सद्गुरु अनुग्रह यांद्वारेच योग्य मंत्र जागृतीची कार्यप्रणाली अमलात आणता येते.


सर्वांगीण पावित्र्य असणे महत्त्वाचे आहे. साधन, साध्य व समाधी अनुसरुन अंतर्बाह्य व्यक्तीत्व व चरित्र सात्विक असणे आवश्यक आहे. तेव्हाच भक्तीमय सान्निध्यातुन आत्म ज्ञान व वैराग्य प्रकट होण्याची संभावना जागृत होते. या आधारावरच कोणताही तारक अथवा मारक मंत्र सिद्धावस्थेला येतो.



ॐ अपवित्र : पवित्रो  वा  सर्वावस्थां गतोsपिवा । य: स्मरेत पुंडरीकाक्षं स: बाह्य अभ्यंतर: शुचि ॥

अंतरिक स्वच्छ्यतेसाठी सतत नामानुसंधानावर आरुढ राहावे लागते. सोबयच मन काया व वाचा सद्गुरुमय कशी होईल याचा गंभीर विचार करावा व या ब्लाँगवरील जास्तीतजास्त आध्यात्मिक लेखनाचा वाचनपुर्वक फायदा घ्यावा. काही महीन्यातच तुमच्या वागणुकीत विलक्षण मनःशांती अनुभवाला येईल व संभ्रमावस्था संपुन योग्य दिशानिर्देशने मिळतील.



ॐ अमृतोपस्तरणमसि स्वाहा। ॐ अमृताविधानमसि स्वाहा। ॐ सत्यं यश: श्रीमंयी श्री: श्रयतां स्वाहा।
ॐ नारायणाय नम:” आचमन करुन हात धुवुन घ्यावेत.

योग साधनेचा आपण उपयोग मंत्र जागृतीत अनुष्ठानपुर्वक प्राणायामाद्वारे करु शकता. प्राणायाम म्हणजे प्राणाला आराम मिळवुन देणे. प्राणायाम प्रक्रीयेत विशेष सावधानता बाळगावी. संबंधित योग आचरणात आणताना अनुलोम विलोम माध्यमातून मंत्राच्या मात्राही मोजल्या जाव्यात. त्याचा प्रभाव देहातील अजपाजपवर पडून हंसात्मक बीजाचे सोहं शक्तीत परिवर्तन होण्यास मदत होते. या कालावधीसाठी पुष्कळ वर्षे सातत्याने सराव करणे महत्त्वाचे आहे.



ॐ भू: ॐ भुव: ॐ स्व: ॐ मह:।

ॐ जन: ॐ तप: ॐ सत्यम।

ॐ तत्सवितुर्ररेण्यं भर्गो देवस्य धीमही धियो यो न: प्रचोदयात।

ॐ आपोज्योतिरसोअमृतं बह्मभूर्भुव स्व: ॐ।

दिग् बंधनादी प्रक्रीया कवचजपाच्या माध्यमातून सिद्ध करता येतात. त्यायोगे जल, भस्म किंवा काठीच्या उपयोगातुन कवच प्राप्ती करण्यात येते. जेणेकरुन संबधित मंत्र साधना निर्विघ्नतेने पार पाडण्यात येते.



ॐ वाड़्॰गमे आस्येऽस्तु (मुखाला स्पर्श करावा)

ॐ नसोऽर्मे  प्राणोऽस्तु (दोन्ही नाकपुड्यांना स्पर्श करावा)

ॐ अक्ष्णोर्मे  चक्षुरस्तु (दोन्ही डोळ्यांना स्पर्श करावा)

ॐ कर्णयोर्मे श्रोत्रमस्तु (दोन्ही कानांना स्पर्श करावा)

ॐ बाह्वोर्मे  बलमस्तु (दोन्ही बाहुंना स्पर्श करावा)

ॐ ऊवोर्मे   ओजोऽस्तु (दोन्ही मांड्यांना स्पर्श करावा)

ॐ अरिष्टानि अङ्गानि सन्तु (देहाच्या उर्वरित सर्व अवयवांना स्पर्श करावा)

आसन संबंधित माहीती हेतु येथे क्लिक करा.


ॐ   ह्रीं    क्लीं   आधारशक्ति    कमलासनाय    नम: ।

ॐ   पृथ्वि!  त्वया  घृतालोका  देवी!   त्वं   विष्णुना  घृता

त्वं   च   धारय    मां   देवी!   पवित्रं   कुरु    चासनम्।

ॐ आधार शक्तये नमः, ॐ कुर्मासनाय नमः, ॐ अनन्तसनाय नमः, ॐ  विमलासनाय  नमः, ॐ  आत्मासनाय   नमः ।

ॐ अपसर्पन्तु ते भूता: ये भूता: भूमि संस्थिता:।

ये  भूता:  विघ्नकर्तारस्ते  नशयन्तु  शिवाज्ञया॥

अपक्रामन्तु भूतानि  पिशाचा: सर्वतो  दिशम्।

सर्वेषामविरोधेन पुजा कर्म समारभे ॥

विनीयोग व संकल्प सगुणोपासनेत केला जातो. त्या त्या मंत्र ऋषीचे आवाहनाद्वारे मंत्र ध्यानातुन अनुष्ठानाची सुरवात करण्यात येते.


ॐ  विष्णु विष्णु विष्णु मी आज संवत् ………, शक संवत्…………., सन्………, मासोत्तमेमासे …………..मासे,……………………शुक्ल/कृष्ण पक्षे…………, तिथि……….., दिन…………, क्षेत्र………., पत्ता…………, स्थळ………..,मुहर्त…………., चरण…………., गौत्र…………., नाव…………, मी ………….साधना प्रयोग करण्याचा संकल्प करत आहे.


ज्यायोगे माझी अंतरिक ईच्छा ………………..,येणाऱ्या भवितव्यात पुर्ण व्हावी,


सद्गुरु महाराज स्वतः येऊन माझी अंतरिक ईच्छा पुर्ण करतील व माझा त्यायोगे आत्मोद्धार होईल असे विनम्र आत्मनिवेदन सद्गुरु चरणी करत आहे. 


हातात घेतलेले जल जमीनीवर सोडावेत.


प्रारंभी श्रीगणपती आराधना करुन संबंधित अनुष्ठानाला प्रसन्न चित्ताने सुरवात करावी.



विध्नेश्वराय  वरदाय   सुरप्रियाय।

लम्बोदराय सकलायजगद्विताय॥

नागाननाय श्रुति यज्ञ  विभूषिताय।

गौरी  सुतायगणनाथ नमो नमस्ते॥

सद्गुरु स्मरण हेतु...


गुरूर्ब्रह्मा गुरूर्विष्णुः गुरूर्देवो महेश्वरः।

गुरू साक्षात परंब्रह्म तस्मै श्री गुरूवे नमः ॥

आदीशक्ती स्मरण हेतु...


नमो  दैव्यै महादेव्यै  शिवायै  सततं  नम:।

नम: प्रकृतयै भद्रायै नियता: प्रणता: स्मताम॥

या  देवी  सर्व  भूतेषु  मातृरूपेण  संस्थिता।

नमस्तस्यै  नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:॥

जपमाळ संबंधित माहीती हेतु येथे क्लिक करा.


यानंतर आपला संबंधित जप ११,२१, ५१ अथवा यथाशक्ति करावा...!


अंती शांती मंत्राद्वारे

ll श्री सद्गुरुर्चरणार्पणामस्तु ll 
ll श्री स्वामी समर्थ महाराज की जय ll

द्वारे अनुष्ठान समाप्ती करावी. 


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...