नामस्मरण म्हणजे काय, आपल्या नामस्मरण ( Namsmaran ) वाणीचा आपल्या शरीरावर कसा प्रभाव पडतो....?- Read right Now


नामाचा महिमा अगाध आहे असं तर सर्वांनींच ऐकलेलं असतं परंतु जेव्हा आपण प्रत्यक्षात अनायासे नामस्मरणाचे कोणतेही मायने ठाऊक नसताना प्रत्यक्ष अनुकरण करत असतो तेव्हा आपली मापक आध्यात्मिक प्रगतीच्या अनुशंघाने आपण किती काळ नामवलयात टिकतो ? हा प्रश्न स्वतःशीच केला पाहीजे. 


नामाचे वलय म्हणजे काय ? 

सद्गुरुंनी स्वीकारलेल्या साधकानें ; नामस्मरण करण्यापेक्षा, नाम स्वदेहात अनुभवणे जास्त महत्त्वाचे आहे. तेव्हाच त्या साधकाच्या चित्तलयापलिकडील सुक्ष्मविश्वात होणाऱ्या पदापर्णाद्वारे नामशक्तीची स्पंदने साधकाला अर्धजागृतावस्थेत अनुभवास येतात. यातुनच कालांतराने स्थुल वृतीच्या म्हणजेच भौतिकवादी व्यक्तीतुन सद्गुरु अनुग्रहीत अभिव्यक्तीत साधकाचे दासात रुपांतरण होते ; त्या सुक्ष्मतम आत्मसंधानाला असणाऱ्या आभामंडळास नाम वलय असे म्हणतात. 

नामस्मरणाची गंभीर भुमिका
सामान्यतः मनुष्याला नामस्मरण जपणे / स्मरण करणे ; एक बाह्यावरणापायी एक अती उथळ व मनःशांतीसाठी सोपी सरळ उपासना जाणवु शकते.  ज्यांना विशेष आध्यात्मिक प्रगती करण्याची तीव्र उत्सुकता आहे आणि जे मुमूक्षु आहे ; अशा साधकांसाठी विशेष नामस्मरण प्रयोजन अधोरेखीत आहे. 


भौतिक जीवनात कोणीही, कुठेही, कसेही व केव्हाही नामस्मरण केल्यास मनःशांती क्षणात मिळणे तर स्वाभाविक आहे परंतु आध्यात्मिक प्रगति होणे हा अगदी वेगळा विषय आहे व नुसती मनःशांती मिळणे हा वेगळा विषय आहे. आध्यात्मिक प्रगति होण्याच्या दृष्टिकोनातून संबंधित साधकांनी नामस्मरणाचे मायने व्यवस्थित समजुन घेतले पाहीजेत. 

नामस्मरणाचे मायने काय आहेत ? 

साधकाने जे नामस्मरण करावयाचे असते त्याची अक्षरे कमीतकमी गणनेत असावीत अर्थात नाम किंवा मंत्रजपाच्या अक्षरांची ऐकुण संख्या जितकी कमी ; तितका नाम घटासाठी भरणीवेळ कमी लागणार. सरासरी विशेष आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी नामस्मरण प्रार्थमिक स्वरुपात स्थुलरुपात जरी असले तरी कालांतराने अर्थयुक्त झालेच पाहीजे. त्यायोगे नामातुन प्रकट होणाऱ्या सुक्ष्म अभिव्यक्तीचा प्रत्यक्ष संबंध नामसाधकाच्या सुक्ष्म देहाशी होऊन आत्मानंदाची सहज प्राप्ती होते. या अवस्थेत चिरकाल अर्थात सरासरी १२ वर्षे टिकाव धरल्यास म्हणजे प्रामाणिक व पारदर्शक, चारित्र्यसंपन्न सद्गुरु सेवेद्वारा भवितव्यात नामस्मरण करावे लागत नाही ; ते सहज होते. त्याचा आपण साक्षी भावाने साक्षात्कार करतो. त्याच अवस्थेत आपण अंतरीक  नामस्मरण अनुभवतो तर बाह्य स्वरुपात नाम वलय अनुभवतो.

अशाप्रकारे आपली अंतर्बाह्यस्थिती सद्गुरुमय होऊन साधक परमपदाला प्राप्त होण्यास अग्रेसर व अधिकारी बनतो. ही सर्व योग प्रक्रीया दिर्घकाळाची आहे. या आत्म मार्गात कोणीही ३, ५ अथवा ७ वर्षातही वरील अनुभव मिळवु शकत नाही. 


कष्ट करावेच लागणार. त्याचसोबत महाराज कसोटी बघणार ति तर वेगळीच गोष्ट आहे. आपण जर सद्गूरुंचे चरण घट्ट धरुन ठेवल्यास कोणतीही आपदामय स्थिती जरी उत्पन्न झाली तरी चिंतामुक्ती अनुभवता आली पाहीजे. नामस्मरणाची सुरवात ; मध्य व प्राप्ती मानवी देहाचा पुर्ण कायापालट करणारी ऐकमेव कलीयुगातील भक्तीमार्गाद्वारे अत्यंत दखलपुर्ण योगसाधना आहे. 

अर्थपुर्ण नामस्मरण होत असल्यास देवाला यावेच लागते ; देव या तत्वाला कधीही टाळु शकत नाही. त्याला धाम सोडुन साधकाच्या नाम घटात बसावेच लागते. तसे नामस्मरण झाले तरच याच देहातुन सायुज्य मुक्ती सहज प्राप्त आहे. 

यात एक गोष्ट कृपया नेहमी ध्यानात असु देत ; नामस्मरणाचा अनुभव येणे ही वेगळी आणि नामस्मरणातुन आध्यात्मिक प्रगती होणे ही वेगळी गोष्ट आहे. या दोघांमधे आकाश पाताळाचे अंतर आहे. ते अनुभवल्यास स्वतःची जागा अवश्य कळेल.

नामस्मरणात बहुतेक तारक मंत्राचाच उपयोग केला जातो. संसारीक साधकांना नाम दोन माध्यमातुनच अवगत होते.

नामस्मरण म्हणजे काय ?


संसार करावयाचा आहे तर जरूरीचे आहे, ते म्हणजे ' वित्त '. शरीर चालवायचे आहे, तर अन्नपचन होण्यास जरूरीचे आहे ते म्हणजे ' पित्त '. अर्थयुक्त नामस्मरण सहज व्हावयाचे आहे, तर बुद्धीकोटात आवश्यक लयता प्राप्त होण्यास जरूरीचे आहे, ते म्हणजे ' चित्त '....!

'नामस्मरण' हा शब्द ' नाम + स्मरण ' अशा जोडशब्दांनी बनला आहे. ' नाम ' म्हणजे ' आ + नम ' यात ' आ ' हा नारायण शब्दब्रम्हाचा स्वरवाचक तर, ' नम ' ही मन ची विपरीत उर्ध्वगती आहे. त्यायोगे ' नाम ' हे त्रिपदी व त्रिगुणात्मक आत्मसंधान अवतरीत आहे.

' स्मरण ' हे श्रीमत् दासबोध ग्रंथराजाच्या आधारतीर्थावर नवविधा भक्तीयुक्त आत्मसंकिर्ताचे द्योतक आहे. त्यायोगे ' नामस्मरण ' म्हणजे ' नारायणाचे आत्मसंकिर्तन ' असा अर्थ निहित आहे.

  • १. सद्गुरु अनुग्रहीत नाम
  • २. स्वईच्छित नाम

१. सद्गुरु अनुग्रहीत नाम

सद्गुरु शिष्य परंपरेला अनुसरुन साधकाला महाराज अनुग्रहीत करतात. प्रत्येक ईच्छुक साधकाला ही दिव्य उपलब्धी मिळत नाही. याचे प्रमुख कारण गत जन्मातील अर्धवट राहीलेली नामसाधना पुर्ण करणे हेतु पुर्नजन्म म्हणजेच सद्गुरु सान्निध्यमय प्रारब्ध. 


सद्गुरुकृपेशिवाय कधीही कोणालाही दैवत प्राप्ती होत नाही. या पारदर्शक धारणेला ठाम असलेल्या साधकांना महाराज अवश्य मार्गदर्शन करतात. 

२. स्वईच्छित नाम

या परीस्थीतीत साधक एक भक्त रुपात त्यास मनाला रुचेल अथवा गोडी लागेल अशा नामस्मरणात स्वतःला तल्लीन करण्याचा प्रयत्न करतो. यायोगे नामातील मर्म कळण्यास बर्याच वर्षाला अनुसरुन नामस्मरण चारित्र्ययुक्त चिकाटीने आणि भक्तीमयतेने केल्यास सान्निध्याचा अनुभव होतो. 

आध्यात्मिक सान्निध्य आणि स्वामीभक्ती दिखाव्याची आणि वरचेवर नसावी.... यासाठी आपण नामस्मरण तीन स्तरांवर करु शकता...!
  • १. उपांशु 
  • २. वाचिक
  • ३. मानसिक

मानसिक नामस्मरणात जीभ, ओठाद्वारे उच्चार केला जात नाही. हा ब्रम्हाण्डीय ध्वनीत परावर्तीत होणारा जप समजावा. देह त्याग वृत्ती बळकटीकरण होणे महत्त्वाचे. आध्यात्मिक उबंटुचा जर मानसिक जपात उपयोग केलात तर चांगला अनुभव येऊ लागतो. 

महाराज कर्मकांडाच्या विरोधात असत. मानसिक जप अथवा मानस पुजा ही प्राधान्यतः स्वामीं नेहमी स्वीकारतात.

 देहातील सुक्ष्मवृतीचा भेद जाणुन घेण्यायोगे नामस्मरणाची अंतर्मुखता समजुन घ्यावी.

१ आणि २ च्या तुलनेत मानसिक नामस्मरण अत्यंत प्रभावकारक व शीघ्र फलदायी आहे... कारण या जपात देहबुध्दी चे पुर्ण विसर्जन करता येते. आणि साधकाला आत्मबुध्दीकडे वळण्यास मदत होते. 

मानसिक जप करणारी वाणी म्हणजे "मध्यमा".. म्हणजे देहबुध्दी आणि आत्मबुध्दीच्या मधली जी थेट "पश्यंती" वाणीत मानसिक जपाद्वारे जाऊन एकरुप होते.

ह्दयस्थ असलेल्या यं बीजम् अनाहत चक्रातुन पश्यंतीबोध आधिष्ठात्री देवता ईशान रुद्कृपेने होतो. 

"पश्यंती" वाणी म्हणजे ह्दयस्थित आत्मवाणी म्हणजेच स्वामींचा अनाहत नाद म्हणजेच "ॐ कार"

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...


नामस्मरण कसे करावे, नामस्मरण साधनेतील धोकादायक टप्पे, सावधानता व सोपे उपाय : ३ दिवसात फरक जाणवेल.

दैविक आत्मोपचारिक उपायानुरुप साधकांचे स्वलिखित अनुभव पोस्ट ( Sadhak Experience Documented )

दत्त संप्रदाय व साधन, साध्य, समाधी

ही दत्तप्रबोधिनी लिँक जपुन ठेवा. यात सर्व Youtube Live व Facebook Live चर्चा माहीती संग्रह जतन केलेला आहे.

श्री गुरुचरित्राच्या सप्ताहवाचनाच्या पद्धती व संक्षिप्त रसग्रहण
0