घरबसल्या सामुहिक नामस्मरण (ऊबंटू) कसे कराल व स्वामीकृपा कशी मिळेल ?




सकाळी सहा वाजल्यापासुन ते रात्री नऊ वाजेपर्यंत दर तीन तासांनी पृथ्वीतलावरुन "अनाहत रुद्र नादोक्त ब्रम्हांडीय नामप्रवाह" हजारो साधकांच्या माध्यमातुन आपण "आत्मा" ते सुर्यस्थित "परमात्मा" यांमधे ब्रम्हांडीत उर्जेच्या रुपात फार मोठ्या प्रमाणात प्रवाहीत होत आहे. त्या प्रवाहात कोणत्याही ईच्छ्या आकांशा न ठेवता मीसुद्धा सहभागी होत आहे. अशी प्रबळ धारणा तयार करा.



मनात नाम धारणा कशी करावी ?

"सुर्यलोकस्थित थोर सिद्ध महासिद्धपुरुषांना आपली आत्मजाणीव पोहोचणे हेतु मी साधना करीत आहे, या सुदृढ भावनेने पुर्ण श्रद्धा आणि विश्वासाने मानसिक सेवा स्वतः दत्त महाराजच करवुन घेत आहेत" अशी धारणा करा. सुरवातीस एक महीना ही नामसाधना करुन अनुभव घ्या.

आपण सर्व भुतलावरील नश्वर जीव आणि सुर्यस्थित परमेश्वर शिव यातील अंतर भरुन काढणे हेतु ही साधना आज प्रकाशित करत आहे. आपली नाळ अर्थात आपल्या आत्म्याची नाळ त्या सद्गुरु दत्तात्रेय स्वामींमहाराजांच्या चरणकमळांशी असलेल्या परमात्म्याशी जोडलेली असते ती गाठ ब्रम्हगाठ होणे हेतु ही सुक्ष्म साधना लिहीत आहे.

साधना नाम मंत्र व विधी 

दररोज सकाळी ६ वाजल्यापासुन श्री स्वामी समर्थ सामुदायिक सेवामाध्यमातुन SPIRITUAL UBUNTU सामुदायिक सेवा ६ वेळचक्रात षट् म्हणजे ६ चक्रशुद्धीकरण हेतु दिवसभरातून ६ वेळा सामुहीकस्तरावर फक्त १ माळ जप ७००००+ हून अधिक साधक करत आहेत.


दररोज सकाळी ६ वाजल्यापासुन ते रात्री ९ वाजेपर्यंत दर तीन तासांनी फक्त तीन मिनिटांसाठी खालील धारणायुक्त नाममंत्र जप करणे

  • 🔵 प्रथम मंत्र... ll ॐ काळभैरवाय नमः ll
  • 🔵 द्वितीय मंत्र... Il श्री स्वामी समर्थ ll


🔘आध्यात्मिक ऊबंटू नित्य वेळ. ( रेडीओ टाईम )

  • सकाळी... ६ वाजता ठिक🕕 ( १ माळ अथवा सरासरी वेळ )दररोज
  • सकाळी... ९ वाजता ठिक🕘 ( १ माळ अथवा सरासरी वेळ )दररोज
  • दुपारी... १२ वाजता ठिक🕛 ( १ माळ अथवा सरासरी वेळ )दररोज
  • दुपारी... ३ वाजता ठिक🕒 ( १ माळ अथवा सरासरी वेळ )दररोज
  • संध्याकाळी... ६ वाजता ठिक🕧 ( १ माळ अथवा सरासरी वेळ )दररोज
  • रात्री... ९ वाजता ठिक🕘 ( १ माळ अथवा सरासरी वेळ )दररोज

  • ▶सामुहीक प्राथनेसाठी स्थानबंधन नाही.
  • ▶सामुहीक प्रार्थनेसाठी परिस्थितीबंधन नाही.

👉👉👉वेळ चुकली सामुहीक सेवा चुकली. 

सर्वच साधनावेळा दररोज १००% पाळल्या जाव्यात असेही बंधन नाही. यथाशक्ती जे सहज शक्य आहे तसे करणे.


या विषयाला अनुसरुन संबंधित पोस्टस् पहा.

email-signup-form-Image

Subscribe

सभी नई जानकारी तुरंत ईमेल द्वारा प्राप्त करें..