स्वामींसमकालीन थोरातबुवांनी काव्यस्वरुपात भक्तीपदातुन स्वामींचे केलेले स्तवनात्मक लीलामृताचा सार स्वामींकृपेने २१ अध्यायी श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथ लिहुन सर्व स्वामीं भक्तांचे कल्याणच केले. ह्या ग्रंथाचे प्रामाणिक व पारदर्शक नितीमत्तेने आचरणात्मक साधन साध्य योजल्यास महाराज साक्षात स्वगृही निवास करुन योगक्षेम तर चालवतातच सोबत सहज साक्षात दर्शनही देतात. दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्टच्या माध्यमातून संबंधित अक्कलकोटीय दत्तस्वरुपाय भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सारामृत ग्रंथाचे सुक्ष्म संधान प्रकाशित करत आहे.
अक्कलकोटीय श्री स्वामी समर्थ हेच सर्वाभुत परम सद्गुरुतत्व....!
' अक्कलकोट ' म्हणजे काय ?
या जगातील कोणत्याही स्थुल अथवा सुक्ष्म प्रलोभनाला न फसता स्वताःच्या मतीचा सद्पयोग स्वामीं नामातुन करणे त्यायोगे आपल्या बुद्धीतील अंतरीक भेद ( कोट ) याचा सारासार विचार करुन स्वामीमय अंतःकरणयुक्त मंगलाचरण सहज होणे या सद्गुरु योगक्रीयेला ' अक्कलकोट ' असे म्हणतात. अशा स्वामीमय अंतःकरणाने बाळप्पावर्णिय महाराजांना अभिप्रेत असणारे आचरण स्वानुभवास येऊन आपण परमसौभाग्यशाली होऊ शकतो. बाळप्पा स्वामींचे महाराजांप्रति सद्भक्ती, अष्टसात्विक भाव व वैराग्य या सद् गुणांचा अंशमात्र जरी अविर्भाव आपल्या अंतःकरणात झाला तर आपलं जीवन सफल झाले असे समजा. स्वामींचे बाळप्पा स्वामींवरही अतोनात प्रेम होते. हे सद्गुरु व दास यांमधील श्री दास्यभक्तीच्या पुढील अवस्थेतील श्री सख्यभक्तीचे द्योतक आहे. अशी गुरुभक्ती प्राप्त होणे प्रत्येक योगीचे आत्मलक्ष्य असते.
' श्री स्वामी समर्थ ' चा नेमका अर्थ काय ?
षडाक्षरी स्वामी नाम ' श्री स्वामी समर्थ ' हे महाराजांचे नाव नाही, तर ब्रम्हाण्डगस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीज मंत्र आहे. ॐ नमः शिवाय, दूं दूर्गायै नमः, श्री गुरुचरित्र हे ज्याप्रकारे षडाक्षरी तारक मंत्र आहेत त्याच प्रमाणे समानार्थी ' श्री स्वामी समर्थ ' हा सुद्धा सद्गुरु अनुग्रहीत तारक मंत्र आहे. ह्या तारक मंत्राद्वारे आपण आपल्या श्वास श्वसनावर अजपाजप संधान केल्यास महाराजांचे अंतरीक आत्मज्ञान चित्त शुद्धीकरण योगातुन सहजच होते. असा आमचा अनुभव आहे. या तारक मंत्राचा मतीतार्थ व्यवस्थित समजुन घेऊन त्यायोगे आत्माचरण करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित आत्मप्रत्यययोग सर्व साधारण वेळेपेक्षा अधिक लवकर व आधिक प्रभावकारक होत असतो.
श्री स्वामीं समर्थ या सद्गुरु ब्रम्हवाचक षडाक्षरी तारक बीजमंत्राचा मतीतार्थ खालीलप्रमाणे आहे.
श्री
स्वयं श्रीपदाविराजीत सद्गुरु भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज...!
स्वामी - स्वाः + मी
स्वाः म्हणजे भस्म करणे अथवा आत्म समर्पित करणे असा आहे. मी म्हणजे माझे अज्ञान, अहं भाव, रिपु गण व ईच्छ्या...! अर्थात स्वामी म्हणजे माझा मी पणा स्वाः करा.
समर्थ
समर्थ म्हणजे संसाररुपी भवसागर सहज तारुण येण्यासाठी माझे स्वयंभु शिवत्व जागृत करा...!
त्यायोगे ' श्री स्वामी समर्थ ' म्हणजे श्रीपदविराजित भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझे मीपण भस्म करुन स्वयंभु शिव तत्व सद्गुरुकृपे अंकित करा.
- सद्गुरु साटम महाराजांचे सद्गुरु अवलिया हाजी अब्दुल रेहमानबाबा ( डोंगरी )
- अवलिया हाजी अब्दुल रेहमान बाबांचे सद्गुरु पीरसाहेब मिर्झा सिनिया ( जुना पंजाब )
- सिनिया पीरबाबांचे सद्गुरु अक्कलकोटचे श्री स्वामीं समर्थ महाराज...!
या योगे सांगण्याचे प्रयोजन असे की,
' स्वामीं चरणी लीन विनम्र मती येता l अवघी सृष्टी आत्म रंगली सहजता ll '
स्वामीं सान्निध्यात येताच आपल्या अंतःकरणाचा कायापालट झाल्याशिवाय राहाणार नाही. असे हे दत्त स्वामीं तत्व सर्व चराचर व्यापुनी उरलासे.
ॐ नमो स्वामीं समर्थाय नित्यानंदायमुर्तयै l अक्कलकोटी विराजीत परमगुरवें वेदशास्त्रार्थ दर्शनें ll
सत् चित्त व आनंदाचे परम द्योतक स्वामीं चरण अक्कलकोटी विराजलेले असुन अशा परम गुरुच्या अमृतमय चित् पावन मंगलमय चरण कमळांनी आपल्याला वेदशास्त्र वेदोक्त ज्ञान व वेदांत वेदांच्याही पलिकडील सद्गुरु तत्वज्ञान सहजच होते. असे भक्तवत्सल स्वामी महाराज सदैव भक्तगणांवर कृपावर्षाव करोत.
श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथ पाठ कसा करावा....?
सर्वप्रथम अक्कलकोटीय तत्व शब्द न गाळलेली ग्रंथप्रतच घ्यावी. संबंधित सारामृत ग्रंथप्रत योग्य वैखरी शब्दांकित असावी. वरील संदर्भ ध्यानात घेऊन पारायण केल्यास दर वेळेला एक नवीन मतीतार्थ स्वामी पोथी द्वारे उमगेल. अशी अक्कलकोटीय स्वामींची सारामृत पोथी आपल्या घरातील देवार्यात स्वामींचे कमळ चरण समजुन तेवत असणाऱ्या दिव्याच्या उजव्या अंगास स्वच्ध व पवित्र अशा पिवळ्या वस्त्रात घडी करुन ठेवावीत. यथाशक्ति सगुण भक्तीमार्गातुन पोथीचे पुजन करावेत. गोड काही नैवेद्य ही दाखवावा. एकुण २१ अध्यायांचे दैनंदिन स्वरुपात पाद सेवन खालीलप्रमाणे आहे.
सप्ताह-पारायण पध्दति...
कोणत्याही गुरुवारी सकाळी अथवा संध्याकाळी प्रसन्न करून शांति, समाधान, आनंद ( जी इष्ट कामना असेल ती बोलून ) प्राप्त करण्यासाठी श्री स्वामीं समर्थ सारामृत पोथीचे ७ दिवसाय पारायण करणार आहे तरी हे कार्य भगवान श्री स्वामी समर्थांनी कृपा करून पूर्ण करून घ्यावे. अशी प्रार्थना करावी व सकाळी किंवा रात्रीच्या भोजनापूर्वी सारामृत पोथी वाचावी. शूचिर्भूत असावे.
- गुरुवार - अध्याय १, २ व ३
- शुक्रवार - अध्याय ४, ५ व ६
- शनिवार - अध्याय ७, ८ व ९
- रविवार - अध्याय १०, ११ व १२
- सोमवार - अध्याय १३, १४ व १५
- मंगळवार - अध्याय १६, १७ व १८
- बुधवार - अध्याय १९, २० व २१
बुधवारी रात्रीच्या आपल्या जेवणाच्या पात्राचा नैवेद्य स्वामींना दाखवावा व तेच उद्यापन समजावे. पारायण करताना दीवा तेवत ठेवावा. दत्त संप्रदायी साधूला कमीत कमी २१ रु. दक्षिणा व पिवळे शुभ्र वस्त्र दान द्यावे. ही क्रिया काही कामना हेतु पुर्तीसाठीच करावी.
पोथी मोठयाने वाचली तरी चालेल. इतरांनीही ऐकावी. बुधवारी वाचन पूर्ण झाल्यावर आपल्याला स्वामीं सद्बुद्धी येण्यासाठी १०८ वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा ( जमल्यास रोज जप करावा ). संस्थेच्या सामुहीक मानसिक श्री स्वामी समर्थ नामस्मरण आध्यात्मिक उबंटुत सहभागी व्हावेत.
ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...