माझ्या मनातल्या साईबाबांचे वात्सल्य रुप...!


भगवान श्री दत्तात्रेय स्वामीं महाराजांचे प्रथमावतार भगवान दत्तराज श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीं महाराज स्वयं सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराजांच्या रुपात अवतरण केले. सहस्त्रमाता करुणास्थान श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीं महाराजांनी दत्त भक्तांच्या उद्धाराहेतु पुढील अवतार कार्य मलंग बाबा साईनाथ महाराजांच्या रुपात केले. दत्तराज श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांच्या समकालीन असणारे महापुरुष तिरुमलदास यांना स्वतः साईनाथ महाराजांच्या अवतारासोबत आपल्या दासाला संत गाडगे महाराजांच्या रुपात अवतरण होण्याची आज्ञा केली.


भगवान श्री दत्तात्रेय स्वामीं महाराजांचे प्रथमावतार भगवान दत्तराज श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीं महाराज स्वयं सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराजांच्या रुपात अवतरण केले. सहस्त्रमाता करुणास्थान श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीं महाराजांनी दत्त भक्तांच्या उद्धाराहेतु पुढील अवतार कार्य मलंग बाबा साईनाथ महाराजांच्या रुपात केले. दत्तराज श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांच्या समकालीन असणारे महापुरुष तिरुमलदास यांना स्वतः साईनाथ महाराजांच्या अवतारासोबत आपल्या दासाला संत गाडगे महाराजांच्या रुपात अवतरण होण्याची आज्ञा केली.
सद् गुरु श्री भक्तराज महाराज ( इंदौर )
सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज हिंदु धार्मिक भक्त व दासगणांसाठी साक्षात द्वारकामाई तर मुस्लिम धार्मिक भक्त व दास गणांसाठी अवलिया म्हणुन दर्शन देत. खुलताबाद येथील शुलींभंजन पर्वतावर संत एकनाथ महाराजांना दत्त महाराजांनी मलंग रुपात दर्शन दिले. ते मलंग तेजोमय ' फकिर कि लकिर ' म्हणजे साक्षात साईबाबा सद्गुरु महाराज असे. साईबाबांचे वात्सल्यमय सहस्त्रमाता करुणामय स्वरुप अंतःकरण भारावुन ठेवणे तर त्यांचा सहजच परमभाव आहे. आपल्या जीवनाचे सार्थक फक्त सद्गुरु महाराजांच्याच शरणात राहुन भक्तीभावाने आपलं सर्वस्व समर्पण करणें हाच असला पाहीजे. त्यायोगे अष्टसात्विक भाव अंतरी दाटुन येणे व आत्मा परमात्म्याचे एकजीवीकरण होणें शक्य आहे आणि ते बाबाच करु शकतात असा आमचा आत्मविश्वास आहे.

मला कळलेले सच्चिदानंद परमब्रम्ह सद्गुरु साईनाथ महाराज....!

' साई ' हा काही एक वैखरी स्थुल शब्द नसुन... अनंत ब्रम्हांण्ड व्यापुन उरलेले अद्वितीय परमशिव तत्व आहे. साई म्हणजे स + आई अर्थात साई...! सद्गुरु महाराजांच्या परमतत्वाचं आत्मविश्लेषण यत्किंचितही या पामराकडुन होणे शक्य नाही. जे अंतरी प्रकट होत आहे तेच लिखाण सहज होत आहे. यात जराही संभ्रम नाही. साई हे एक विशाल आध्यात्मिक वटवृक्षाचे त्रिपदी बीज आहे. याचे आत्म निरुपण शब्दात मांडता येणे कधीही शक्त नव्हते अथवा यापुढे कधीही शक्य होणार नाही. जर काही शक्य आहे तर सहज आणि सुलभ बाबांनी उपलब्ध करुन दिलेला परमशक्तीयुक्त भक्तीमार्ग...!

साई म्हणजे स + आई म्हणजे साई या परमतत्वाचा भावार्थ खालीलप्रमाणे...

स ( पुरुष ) + आई ( प्रकृती ) म्हणजे साई...! हे पुरुष व प्रकृती चे जागृत स्वरुप प्रत्येक मानवी देहातील अनुक्रमे जीव ( पुरुष ) + आत्मा ( प्रकृती ) म्हणजेच साईनाथ महाराज....! या परमतत्वात ' स ' म्हणजे साक्षात कैलासराणा सदाशिव व ' आई ' म्हणजे जगदंबा स्वरुप यांचे सहज स्वरूप दर्शन म्हणजे सद्गुरु साईनाथ महाराज...! याचप्रमाणे ' स ' देहातीत असलेले सहस्त्रार चक्रावर आसनाधीस्थ परमतेजोमय सत्पुरुष + भावयुक्त ' आ ' आणि ईश्वरी शक्ती ' ई ' यांचे स्वरुप ' आई ' म्हणजेच अनंतकोटी ब्रम्हांडधीश राजाधीराज सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज होत.

यामाझ्या बोबड्या बोलातुन योग्य तोच अर्थ ग्रहण करावा. जे ह्दयगत आहे तेच मांडले आहे. त्यातुन काही साई काव्यही स्फुरल्याशिवाय राहात नाही...! याअधी आपण काही स्वामी काव्यही सद्गुरु महाराजांच्या कृपेने ब्लाँगवर प्रकाशित केले आहेत. सद्गुरु साईनाथ महाराज परमवात्सल्याचे दत्तस्वरुपी सहस्त्रमातास्वरुप आहे हे सहजच पटेल असा आमचा विश्वास आहे.

बाळ बोबडे जरी बोले l बोल जननीसी ते कळे ll

आपल्या दासांचे बोल कसेही असले तरी ते, सद्गुरु महाराजांना कळल्याशिवाय राहात नाही. हेच त्यांचे भक्तवत्सल रुप जे भक्तांसाठी सदैव जागरुक असते.

नाथ खरोखर दयेचे नाथच आहेत...! गुरुभक्तकोणीही असो नाथ ह्या शब्दानेच श्री सद्गुरुनाथ महाराजांची आठवण झाल्याखेरीस रहात नाही.

' बाळ रडिता धरी कास l माता अंकी घेई त्यास ll असे महाराजांचे रुप आत्मानंदाचे ज्योतीस्वरुप...! 

' ध्यास हा लागे चकोरपरी l शिरडी ही त्यासी नसे हो दुरी ll

जसे शिरडीत म्हाळसापतींना नाथांनी आत्मप्रचिती देऊन दर्शन दिले. त्यांच्या मुखातुन जडदेहास ' श्री साई ' या नावानी वदविले. तेथुन श्रीनाथ साईनाथ ह्या स्वरुपाने प्रसिद्धीस आले. माझ्या मुढमते साई हे नाम म्हाळसापतीच्या भक्ती व प्रेमाच्या स्वरुपाचे पुर्णबिंब आहे. खरोखरच जर त्याच प्रेमाने व प्रामाणिकपणे साईनामाचा उच्चार केला तर साई प्रत्यक्ष त्या भक्तास म्हाळसापतीप्रमाणे दर्शन देऊन त्याचे भ्रम दुर करतील व त्याच्या स्वरुपाची ओळख करवुन देतील.

ओळख पटेना जरी तुम्हासी l लीन व्हावे साईचरणासी ll
देतील ओळख स्व-स्वरुपाची l शुद्ध प्रेमे चित्त वेधी ll

साईबाबा काव्य - १

श्री गुरु येती ज्यांचे घरा l वाहे आनंदाचा नयन झरा ll
रुपे कांचन तुच्छ वाटे l तोडी या भवबंधाचे फासे ll

साईंकृपा होई ज्यासी l दुःखे त्यासी ना पीडिती ll
चुकुनी जरी स्मराल नामी l चित्त दाटे सत्व मती ll

नाम घेता मुखी त्यांचे l ओढी गाडे संसाराचे ll
विकल्प जळे नाना चित्ती l देई क्षणी त्यासी मुक्ती ll

चित्ती असु द्यावी भक्ती l दावी उद्धाराची युक्ती ll
चरणीं देह अर्पण ज्याचे l होई सार्थक जन्मजन्माचे ll

ऐशा माझ्या साई वंदा l मना लावी लडीवाळ छंदा ll
सदा माना साईसत्य बोला l दिन ह्दयी शिवसाई भोळा ll


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...


महाकालेश्वर उज्जैन स्वामीमय सेवा माहिती

त्र्यंबकेश्वर सेवा माहिती

दत्त संप्रदाय व साधन, साध्य, समाधी

सर्व स्वामींशिवभक्तांसाठी अद्वितीय शिवसाधना पद्धती...!!!

श्री गुरुचरित्राच्या सप्ताहवाचनाच्या पद्धती व संक्षिप्त रसग्रहण


संपर्क : श्री. कुलदीप निकम
भ्रमणध्वनी : 9619011227

GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती


All about Swami Samarth, Real unknown secrets, Step by step Spiritual Growth explained, Build your soul, Boost your life on top. - Visit Website Here !

Embed श्री स्वामी समर्थ योग व गहन आध्यात्मिक मार्गदर्शन on Your Site: Copy and Paste the Code Below