आत्मक्रिया योग व सहज समाधि प्रबोधन: श्री महाकालेश्वर ( Mahakaleshwar ) उज्जैन स्वामीमय सेवा माहिती SEO

Dattaprabodhinee Sevaa Trust’ was started in the year 2014 with a vision to create a non-profit humanitarian proficient area for spiritual people to actively engage them in soulistic existences.

ब्रम्ह अंतःकरण कसे बनते ? अनुकरणशील स्वतंत्र सद् मार्ग...!
घरातील देवघर व देव पंचायतन आधिष्ठान - २
नवनाथ ग्रंथ ( Navnath Bhaktisar ) पारायण कसे करावे ? ब्रम्हाण्डीय सामर्थ्य विश्लेषण...!
आत्मरत्न ( Soul Gem ) म्हणजे काय ? माणुस का भरकटतो ?
श्री गोरक्ष किमयागिरी प्रवाह नाथामृत सिद्धग्रंथ व कार्यसिद्धी...!
Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

गुरुवार, ७ जुलै, २०१६

श्री महाकालेश्वर ( Mahakaleshwar ) उज्जैन स्वामीमय सेवा माहिती


महाकालेश्वर जोतिलिंंग हे भारतातील ऐतिहासिक वारसा आसलेला मध्यप्रदेश राज्यातील उजैन शहरात वसलेले  असून ६००० वर्षे+ जुने स्थान आहे. भगवान  श्रीकृष्ण  यांनी येथे  शिक्षण  घेतले  आहे . भौगोलिक दृष्ट्या देखील  उज्जैन शहराला महत्त्वाचे  स्थान आहे . तसेच  येथे  गुप्त व रहस्यमय शक्तिंचा वास आहे .  हजारो वषांपुवी उज्जैन हे शहर उज्जैनी या नावाने ओळखले जात होते  व उत्तर भारताची राजधानी म्हणून  प्रसिद्ध होते तसेच महीश्मती हे शहर दक्षिण भारताची राजधानी म्हणून  प्रसिद्ध होते .

उज्जैनच्या महाकालेश्वरचे महत्त्व


http://blog.dattaprabodhinee.org/2016/07/mahakaleshwar.html

पृथ्वीवरील उजेंचे उज्जैनस्थित महाकालेश्वर ज्योतिलिग हे नाभिस्थान आहे . संहारात्मक उजैचा प्रवाह खंड प्रलय आणि महा प्रलय यांची दिशास्थाने महाकालेश्वर ज्योतिलिंग आहे . आकाशस्थित तारकलिंग व पाताळस्थित हटकेश्वरलिंग आणि पृथ्वीवरील महाकालेश्वर ज्योतिलिंग हे तिन्ही अत्यंत  उग्र स्वरूप व जागृत  आहेत .  या तीन शिवलिंगां पैकी  महाकालेश्वर शिवलिंग स्थूल चक्षुंना दिसते आणि इतर  दोन शिवलिंगे सुक्ष्म आहेत. महाकालेश्वर ज्योतिलिंग हे १२ ज्योतिलिंगांपैकी एकमेव असे ज्योतिलिंग आहे जिथे स्मशानाच्या भस्माने भगवान शिवाची अमृत मुहुर्तात महाआरती केली  जाते.

बारा ज्योतिलिंगांपैकी महाकालेश्वर ज्योतिलिंग प्रतिष्ठायुक्त आणि उग्र स्वरुप आहे. महाकालेश्वर ज्योतिलिंगाची स्थापना ब्रम्ह देवाने केली  आहे असा पुराणोक्त उल्लेख  आहे .


उज्जैन काळभैरव देवस्थानाचे महत्त्व


प्रमुख काळभैरव मंदिर उज्जैन शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर भैरवगड येथें स्थित आहे. काळभैरव मंदिर एकमेव असे मंदिर आहे  जिथे देवाला मद्याचा नैवेद्य दाखविला जातो. महाकालेश्वराच्या शिघ्र् प्रसन्नतेसाठी काळभैरवाचे प्रार्थमिक दर्शन अनिवार्य असते. भगवान शिवाने पुण्य पाप शोधक कोतवाल म्हणून काळभैरव देवाची नियुक्ती केली. हा काळभैरव उज्जैनचा क्षेत्रपाल म्हणून ओळखला जातो.

काळभैरव  मंदिरासमोर विक्रांतभैरवाचे प्राचीन मंदिर आहे. शास्त्रोक्त पुराव्यांच्या आधारे विक्रांतभैरव मंदिर ४०००+ वर्षे जुने आहे. तंत्र मंत्र  यंत्र संबंधित साधनेसाठी विक्रांतभैरव मंदिरात साधना करण्याची पुरातन प्रथा  आहे. विक्रांतभैरव मंदिराजवळ सुक्ष्म शक्तीपीठ असून इच्छाधारी नाग नागिन त्याचे राखणदार आहेत.

विक्रांतभैरव मंदिर परिसर अतिशय रमणीय व निसर्गरम्य आहे. प्रत्येक शिव भक्ताने महाकालेश्वर दर्शनाथीं विक्रांतभैरवाचे दर्शन घेणे महत्त्वाचे असते .

एकूण आठ भैरव रुपांपैकी एका भैरव रुपाचे वर्णन अतिशय विचित्र आहे.  त्या भैरवाचे अर्धे शरीर मूत्यु लोकांत व अर्धै शरीर पाताळस्थित आहे . भैरवनाथांचे अवतार वेताळ देव उज्जैनच्या वेशीवर आग्या वेताळ म्हणून स्थित आहेत. अनेक रहस्ययुक्त अशा उज्जैन स्थानी दत्त प्रबोधिनी सेवा ट्रस्ट मार्फत सामूहिक स्वामीमय सेवा दर महिन्याला आयोजित केली जाते.


सेवा उद्दिष्टे...


१. स्वआत्मबळ वाढवणें. शिवस्वामीआत्मानुसंधान करुन आपलं जीवन सार्थक करणें.

२. सत् पात्री दुःखी पिडीत लोकांना स्वामीअनुभूतीच्या माध्यमातुन कोणतेही अर्थकारण, राजकारण आणि दंभकारण न करता सामुदायिक स्वामीमय सेवेच अनन्यसाधारण महत्त्व पटवुन देणें. यथाशक्ति सद्गुरु स्वामींमहाराजांचा हेतु आणि व्याप्ती समजावुन देणे.

३. केंद्र, मठ आणि मंदिराच्या संकुचीत मनोवृत्तीत न अडकता आणि कोणत्याही अज्ञानी मंडळाच्या राजकारणाला बळी न पडता, त्यातुन बाहेर पडुन घरगुती प्रश्न, आध्यात्मिक प्रश्न, पर्यावरण संतुलनाचा प्रश्न आणि राष्ट्रहीत सुरक्षेच्या प्रश्नांवर सद्गुरुकृपे उपायाहेतु एकत्र येऊन सामुदायिक स्वामीमय रात्रप्रहर सेवा करणें.


सेवा अधिष्ठान...


१. आत्मअवलोकनात्मक स्वामीमय त्रिकालसंध्या करणें.
२. आत्मबळ वाढवणें हेतू सद्गुरुस्वामीं अधिष्ठानाचा स्वगृही न्यास करणें.


सेवा धोरणें...


१. सामुदायिक स्वामीमय सेवा विनामुल्य आहे.
२. सद्गुरु स्वामीमहाराज आणि त्यांच्या भक्तगणांमध्ये कोणतेही प्रकारचे माध्यम नाही. साधकाचे सर्व चित्त गाभाऱ्यात असायला हवे.


सेवा नियोजन...


सामुहीक सेवा नियोजन स्वरुप खालीलप्रमाणे...

दिनसेवा: श्री क्षेत्र महाकालेश्वर
रात्रसेवा: श्री क्षेत्र काळभैरव उज्जैन

घरगुती प्रश्न - ( पितृदोष, वास्तुदोष, नकारात्मक ऊर्जे संबंधित )
आध्यात्मिक प्रश्न - ( नामस्मरण, आत्मपरायण आणि सद्गुरु सेवा संंबंधित )


स्वामीमय सेवेत.... अनुक्रमे


️बाहेरील बाधा, ️वास्तुदोष, ️प्रखर पितृदोष, घरातील देवारा आणि संरचना️, आध्यात्मिक उपासना यांबद्दल विनामुल्य मार्गदर्शन केले जाते.


  • सेवेकरीता निघण्याची वेळ. सकाळी ७.३० वाजता.
  • नाश्ता,चहा आणि जेवण प्रवासा दरम्यान होतो.
  • नृसिहं घाट येथे सामुहीक नामस्मरण व पारायण.
  • विनामुल्य वास्तुदोष निवारण मार्गदर्शन 
  • प्रश्न उत्तरे  व नित्य उपासना मार्गदर्शन
  • महाकालेश्वर येथुन सुमारे दुपारी ४.३० वाजता बसेस काळभैरव उज्जैनसाठी रवाना
  • रात्री ७.०० वाजता महाप्रसाद
  • रात्री ८.०० वाजता सामुहीक मंत्र जप व पारायणाच्या माध्यमातून रात्रसेवेला आरंभ. ही सेवा सकाळी ३.०० च्या सुमारास पुर्ण होते.
  •   सकाळी ७.०० वाजेपर्यंत बसेस प्रारंभस्थानी पोहोचतात.


दत्तप्रबोधिनी प्रतिष्ठान सेवा ट्रस्ट माध्यमातुन दर महीन्याया ७ तारखेच्या स्वामीसेवेसाठी इंदौर, खंडवा व रतलाम विशेष बससेवा नियोजन केले जाते.

संपर्क : श्री. कुलदीप निकम
भ्रमणध्वनी : 9619011227ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

श्री नृसिंहावाडी सेवा माहिती व नोंदणी अर्ज 

त्र्यंबकेश्वर सेवा माहिती

दत्त संप्रदाय व साधन, साध्य, समाधी

सर्व स्वामींशिवभक्तांसाठी अद्वितीय शिवसाधना पद्धती...!!!

श्री गुरुचरित्राच्या सप्ताहवाचनाच्या पद्धती व संक्षिप्त रसग्रहणमहत्त्वाची सुचना :

संबंधित पोस्टबद्दल विशेष गोपनीय माहीती फक्त संस्थेच्या अधिकृत सभासदांनाच विनंतीवरुन कळवण्यात येते.Click here to subscribe DATTAPRABODHINEE SEVAA TRUST

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Enter your email address:

Delivered by FeedBurner

लोकप्रिय पोस्ट

स्वामीसभासद नोंदणी प्रार्थमिक अर्ज