आत्मक्रिया योग व सहज समाधि प्रबोधन: दासबोध ( Dasbodh ) परमतत्वाचे आत्मनिरुपण कसे करावे SEO

Dattaprabodhinee Sevaa Trust’ was started in the year 2014 with a vision to create a non-profit humanitarian proficient area for spiritual people to actively engage them in soulistic existences.

ब्रम्ह अंतःकरण कसे बनते ? अनुकरणशील स्वतंत्र सद् मार्ग...!
घरातील देवघर व देव पंचायतन आधिष्ठान - २
नवनाथ ग्रंथ ( Navnath Bhaktisar ) पारायण कसे करावे ? ब्रम्हाण्डीय सामर्थ्य विश्लेषण...!
आत्मरत्न ( Soul Gem ) म्हणजे काय ? माणुस का भरकटतो ?
श्री गोरक्ष किमयागिरी प्रवाह नाथामृत सिद्धग्रंथ व कार्यसिद्धी...!
Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

मंगळवार, ५ जुलै, २०१६

दासबोध ( Dasbodh ) परमतत्वाचे आत्मनिरुपण कसे करावे


समर्थांनी त्यांचे शिष्य कल्याणस्वामींच्या हस्ते श्रीमत् दासबोध ग्रंथाचे आत्मविवेचन लिहुन घेतले तशी भगवान रामचंद्रांची ईच्छा होती. संसारीक माणसाला भक्त आणि दास या दोन अभिव्यक्तींतील फरक ओळखणे हेतु समर्थांनी ह्या कल्पवृक्षाची आत्मनिरुपणाद्वारे सुस्पष्ट व सोपी रचना केली.


Lord Dattatreya Upasana,Spiritual Ubuntu, Six chakra purification, Yogkriyaa, naamsmaran, Parayan upasana, Pitrudosh solutions, All Tratak Upasana.

श्रीमत दासबोध हा ग्रंथ माणसला संसारातील चतुर व्यवहार ज्ञान व आध्यात्मिक जीवनतील दास्यभक्तीचे आत्मज्ञान सहज समजावुन देणारा ग्रंथराज आहे. ह्या ग्रंथराजात सद्गुरु व शिष्याचा आत्मसंवाद काव्यरुपात प्रकट केला आहे. भक्तिमार्ग कसा ओळखावा व कशाप्रकारे अंतःकरणात रुजवावा ह्याचे बोधक समर्पण मांडण्यात आले आहे. काही साधक दासबोध ग्रंथाचे पारायणही करतात. समर्थांनी दासबोध ग्रंथ संग्रहात भौतिक जीवनातील तत्वाच्या आधारे सर्व संसारीक घडामोडींचा उहापोह मोडुन काढला आहे. त्यायोगे संसारीक माणसाला वर्तमान व भविष्यात होणाऱ्या घटनांची पुर्वमाहीती ग्रंथाचे अध्ययनामार्फत सहज मिळु शकते. त्याच सोबत आध्यात्मिक साधकाला सद्गुरु तत्वाच्या अधीन राहुन आपल्या मर्यादेचे परिपुर्ण पालन करुन कशाप्रकारे आत्मोद्धार करवुन घेता येईल याचे मार्मिक व तात्त्विक विश्लेषण समर्थांनी व्यक्त केले आहे.

श्रीमत दासबोध म्हणजे काय ?

 कोणत्याही ग्रंथाचे अध्ययन अथवा पारायण करण्यापुर्वी त्या ग्रंथाची अक्षरब्रम्हात ओळख करवुन देणारे शब्दब्रम्हाचे पुर्वज्ञान प्रत्येक साधकाला असायला हवे. ग्रंथाचे शीर्षक नाम हे संपुर्ण ग्रंथ संग्रहाचे बीज मानले जाते. हे बीज आपल्या अंतः करणात व्यवस्थित आत्मसात व्हायला हवे. ह्या ग्रंथनाम बीजातुनच महान ग्रंथाचे निरुपण आपण यथार्थ समजावुन घेऊ शकतो. आपल्या बाह्यमन व अंतर्मनात ग्रंथनाम ठासुन भरल्यावर, पुढील सर्व आत्ममार्ग क्रम आपल्या प्रकृती पुरुषात निर्विघ्नतेने आत्मसंचारीत करण्याचे कार्य संबंधिक ग्रंथाचे नाम करते. मग तो ग्रंथराज श्री गुरुचरित्र, श्री नवनाथ ग्रंथ, श्रीमद् भगवद्गीता, श्री ज्ञानेश्वरी व ईतर ग्रंथवल्ली सुद्धा समन्वयित होतात.

श्रीमत् दासबोध या ग्रंथाच्या माध्यमातून समर्थांची स्पष्टोक्ती व अभिवचने असुनही लोक मुर्ख व अनधिकृत आध्यात्मिक दलालांच्या व धर्म मार्तंडांच्या मागे धावण्याचा उपहास करतात. आपण आपल्या जीवनात आध्यात्मिक अनुभुती घेण्याहेतुने दुसऱ्या कोणाचाही आधार मर्यादेपेक्षा जास्त घेऊ शकत नाही. आत्मानुभुती ही स्वतःच्याच अनूकरणातुन घ्यावी लागते. कारण आध्यात्मिक प्रगतीत व्यक्तीत्वाची नाही तर चारित्र्याची गरज असते, असे दास्यचरित्र्य कोणाचं अनुकरण अथवा आदर्श मानुन मिळत नसतं. ते प्राप्त करण्यासाठी स्वतःला झिजावं लागतं. ग्रंथातुनच सद्गुरु महाराज प्रकट होतात ज्याअर्थी आपलं बोट धरुन ते संसारिक व आध्यात्मिक जीवनात पदोपदी मार्गदर्शन करतात.

आदी ग्रंथनामाचे स्मरण l ग्रंथ तत्वाचे सखोल संरुपण ll
सद्गुरु कास परमहीताची l घडी सौख्यता आत्मदेहाची ll

श्रीमत् दासबोध या परमतत्वात समर्थांनी कोणाच्या मताने आध्यात्मिक जीवन जगावे हे स्पष्ट केले आहे. पदोपदी समर्थ ' श्री ' मताचाच उल्लेख करतात. छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा ' ही श्रींचीच ईच्छा ' सतत बोलत असत. छत्रपती शिवाजी महाराज हे समकालीन असलेले श्री रामदास स्वामीं समर्थांचे शिष्य असत. त्यायोगे ' श्री ' मत याच तत्वाचा आपण अंगीकार करायला हवा. ' श्री ' तत्व हेच ते सद्गुरु तत्व श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज आहेत. श्री मतानेच आपलं जीवन योग्य व सुरक्षितरित्या परिपूर्णतेला जाऊ शकते. ईतर कोणतेही माध्यम विश्वासु व नितीमत्तेला अनुसरुन आहे याची काहीच खात्री नाही. या संबंधित अपेक्षित आध्यात्मिक लक्षणांसाठी येथे क्लिक करा.

श्री मताने ग्रंथाचरण कसे करावे


http://blog.dattaprabodhinee.org/2016/07/dasbodh.html

श्रीमत दास बोध ग्रंथापुर्वी त्या ग्रंथनामावर ईतके आत्म विवेचन आहे, कि हे आत्म निरुपण कधीही लिहुन पुर्ण होणार नाही. ' श्री ' मताने ग्रंथनाम समजावून घेऊन ग्रंथपाठाला आरंभ केल्यास, प्रामाणिक व पारदर्शक मनोवृत्तीतुन अध्ययन सुरु केल्यास स्वतः  'श्री स्वरुप सद्गुरु महाराज ' आपल्याला मार्गदर्शन करतात. त्यावेळी आपल्यात आणि महाराजांमधे कोणीही मध्यस्थी नसते. फक्त मी आणि माझे सद्गुरु महाराज हीच आभिव्यक्ती उर्वरीत राहाते. हेच आत्मकर्तव्य आपल्याला आपल्या जन्म मरणातुन मुक्त करणारे ऐकमेव मुक्तीदाता  " श्री दत्तात्रेय स्वामीं " महाराजांच्या चरण कमळापर्यंत पोहोचवते.

श्रीमत दासबोधात सांगितल्याप्रमाणे दास्यरुप प्राप्त होणे ईतके सहज व सोपे नाही. त्यासाठी काही आत्म प्रमाण आहेत ते खालीलप्रमाणे आहे.


  • पहीला टप्पा : सर्वप्रथम माणुस म्हणुन मानवतावादी होणे.

  • दुसरा टप्पा : आध्यात्म समजुन घेणेहेतु भक्तीमार्ग परायण होणे. ( नवविधा भक्ती  )

  • तिसरा टप्पा: आध्यात्मिक अस्तित्व ऐकांतात व्यतीत करणे.

  • चौथा टप्पा : आपल्याला आवडणार्या ग्रंथाचे ' ग्रंथनाम ' समजुन घेणे.

  • पाचवा टप्पा :   ग्रंथनामाच्या आत्मपचनातुन अंतरिक प्रतिक्रिया समजावून घेणे व त्यायोगे पुढील आध्यात्मिक मार्ग क्रमण करणे.

  • सहावा टप्पा : ग्रंथाचे सखोल विश्लेषण ग्रंथनामाच्या मदतीने करणे.

  • सातवा टप्पा : यथाशक्ति अंतर्मुख अभिव्यक्ती होणे. जेणे करुन सद्गुरु शिष्य संवाद होऊ शकेल.


वरील सात टप्पे क्रमाक्रमाने करावेत. हाच एक मार्ग आपल्याला देहबुद्धीच्या पलिकडे घेऊन जातो. ईतर कोणीही आपल्याला घेऊन जाऊ शकत नाही असे समर्थ स्वतः म्हणतात.

श्रीमत दासबोध ग्रंथराज अध्ययन करण्यापुर्वी आपण जर मनाचे श्लोक ऐकण्याचा सराव केलात तर आपल्याला पुढील आत्म अध्ययन सहज सोपे व आत्मपचन होण्यास बरीच मदत होते असा माझा स्वतःचा अनूभव आहे.ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...


त्राटक विद्या म्हणजे काय ? त्राटक विद्या व साधना महत्व...!

महत्त्वाची सुचना :

संबंधित पोस्टबद्दल विशेष गोपनीय माहीती फक्त संस्थेच्या अधिकृत सभासदांनाच विनंतीवरुन कळवण्यात येते.

संपर्क : श्री. कुलदीप निकम
भ्रमणध्वनी : 9619011227

Click here to subscribe DATTAPRABODHINEE SEVAA TRUST

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Enter your email address:

Delivered by FeedBurner

लोकप्रिय पोस्ट

स्वामीसभासद नोंदणी प्रार्थमिक अर्ज