वास्तुसाठी ( Vastu } काय उपाययोजना कराल ? नवीन वास्तु विकत घेण्यापुर्वी काय खबरदारी घ्याल ?- Read right Now

एखादी वास्तु बाहेरून खुप सुंदर दिसते. वास्तुच्या ईंटेरीअर आणि ऐक्सटेरीअर डिझाईन्स माणसाला मोहात पाडतात. परंतु सर्व चमकते ते कधी सोने असते का ? हा प्रश्न स्वतःला विचारता आला पाहीजे...!

कोणतीही वास्तु विकत घेण्यापुर्वी त्या वास्तूच्या जागेचा ईतिहास आणि वास्तुतील पुर्व वसाहत  याचा अभ्यास आपल्याला करता आला पाहीजे. कष्टाचा अमाप पैसा आणि वेळ खर्च करण्याची तयारी असल्यास नवीन वास्तुचे वास्तु पुरुषात्मक आत्म निरीक्षण करता आले पाहीजे. ज्याअर्थी भविष्यात कोणत्याही मोठ्या अकस्मात होणाऱ्या दुर्घटनांना सामोरे जाण्याचे टाळता येईल. वेळ निघुन गेल्यावर दुःखी होण्यात काहीच अर्थ राहात नाही. वास्तु संबंधी सर्व नकारात्मक उर्जा शमन करणे हेतु आपल्याला प्रारंभिक स्वरुपात पुर्वतयारी सुरु करावी लागते.



बाधिक वास्तुच्या कालचक्रात बेसावध लोक आपल्या मुलाबाळांसहीत विनाकारण अडकले जाताता. अडकण्याचे ऐकमेव कारण म्हणजे वास्तु मधील मृतात्म्यांचा वावर...! हे मृतात्मे वास्तूतील सदस्यांना मानसिक, शारीरिक, सामाजिक, आर्थिक आणि आध्यात्मिक व्याधी उत्पन्न करतात. परिणामी माणसे दगावतात बहुतांशी मृत्यूमुखीही पडतात. त्यामुळे आवदसा निघावी या हेतुने वास्तू स्वस्त भावात विकायला काढताता आणि दुसऱ्या मुर्ख माणसाच्या गळ्यात मारतात. हे व्याधीचक्र असेच सुरु असते.

आपण साधक या मृत्यूसापळ्यात कधीही महाराजांच्या कृपेने अडकु नये यासाठीच वास्तुवरील माहीती लिहीत आहे.



नवीन वास्तु अथवा वापरलेली वास्तू विकत घेण्यापुर्वी वास्तुसंबंधी दिशांना अनुसरुन काय दोष आहेत हे आपण तर बघतोच पण त्याच बरोबर वास्तु संबंधी ईतिहास, वास्तुचा परीसर आणि निद्रीस्त स्पंदने ओळखता आली पाहीजेत. सर्वसामान्य नियमांप्रमाणे नर्सिंग होम, फ्लायोवर ब्रीज, स्मशान भुमी, कब्रीस्तान, जांभुळ वृक्ष, चिंचेचे वृक्ष आणि वट वृक्ष यांपासुन आपली वास्तु अंतरावर असावी.
राहते घर बाधिक वास्तू आहे का ? हे कसे ओळखायचे !
ज्या घरात नेहमी घाण, कचरा, किटकांचे जाळे असतात अशी घरे मृतात्म्यांना फार आवडतात. ते तिथेच ठाण मांडुन बसतात. त्याच प्रमाणे जेथे मृतांची श्राद्धे केली जात नाहीत तेथेही उलटे सुलटे उपद्रव सुरु असतात. तसेच घरात कुणाचा मृत्यु झाल्यास आपल्याकडे उदकशांत करण्याची प्रथा आहे. ही पद्धत खरोखरच फार चांगली आहे. यायोगे वास्तु शुद्ध होते. पुष्कळ लोक बाहेरुन घरात आल्यावर हात पाय धुत नाहीत. काही वेळा स्मशान भुमी, नर्सिंग होम, फ्लायोवर ब्रीज, कब्रीस्तान, जांभुळ वृक्ष, चिंचेचे वृक्ष आणि वट वृक्ष या आवारातुन येत असता सोबत मृतात्मेही घरात घुसतात. त्यामागे बहुतेक वेळा महीलांच्या देहाचा वापर घरात घुसण्यासाठी केला जातो आणि हे सर्व आपण ओळखूही शकत नाही.
बाधिक वास्तू साठी काय करायला पाहीजे ?

वास्तू शुद्ध करण्यासठी प्रार्थमिक स्वरुपाचे उपाय सुचवीत आहे. वास्तु फारच दुषित नसेल तर ह्याचा अवश्य उपयोग होईल. उपाय सतत सहा महीने तरी न कंटाळता करणे आवश्यक आहे. दोन- चार दिवस करुन काहीही उपयोग होणार नाही. नियमित स्तोत्रवाचन आणि गुरुचरित्राचे पारायण चालु ठेवावेत जेणेंकरुन कोणताही नवीन त्रास उद्भवणार नाही.
प्रार्थमिक स्वरुपाचे उपाय खालीलप्रमाणे...!
  • १. आपली वास्तु जास्तीतजास्त स्वच्छ व पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करावा.
  • २. पावित्र्य निर्माण होण्यासाठी रोज स्तोत्रवाचनात रामरक्षेचा ११ वेळा पाठ करावा.
  • ३. घरात अधुन मधुन गोमुत्र शिंपडणे, अर्गला, किलक व कुंजिकास्तोत्र पाठ करणें.
  • ४. नवनाथ ग्रंथ, गुरुचरीत्राचे पारायण करणें, वाचन करताना किमान रोज १०० ओव्या मोठ्याने वाचणे.
  • ५. घरात लोभान, धुप जाळणे. वातावरण सुगंधीत ठेवणे.
  • ६. ज्या वास्तुत नित्य काही उपासना तसेच नामस्मरण ई. चालु असल्यास तेथे दुष्ट आत्मे राहु शकत नाहीत.

काही वेळा उपाय सुरु केल्यास त्रास जास्त वाढतो. कारण त्या दुष्ट शक्तींना ती वास्तू सोडुन जाण्याची ईच्छा नसते. म्हणुन त्रास वाढल्यास आपण सुरु केलेले उपाय योग्य आहेत असे समजुन अखंडीत सहा महिने सातत्य ठेवावेत. सहा महिन्याच्या कालांतराने त्याचा परिणाम दिसुन येईल. कृपया घाई करु नये.


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...