सिद्ध श्री लक्ष्मी कुबेर यंत्र Immediate relief from financial crisis. Sorrow will destroy poverty. Siddha Shri Lakshmi Kuber Yantra


सिद्ध श्री लक्ष्मी कुबेर यंत्र हे आजच्या विस्कटलेल्या आर्थिक परिस्थितिला सावरणारे वरदान ठरेल.  विनासायस सहज सोप्या मार्गाने भाग्य चक्र झपाट्याने बदलेल. घरात सुख शांती समृद्धि येण्यासाठी, अडलेली कामे मार्गी लागण्यासाठी, दत्तप्रबोधिनी न्यास द्वारे सिद्ध श्री लक्ष्मी कुबेर यंत्र आपल्या सेवेसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.सिद्ध श्री लक्ष्मी कुबेर यंत्राचा विनियोग तुम्हाला तुमच्या देवघरात करायचा आहे. देवघरात तुम्हाला गज लक्ष्मी मातेचा जो साधा फोटो आहे. माता लक्ष्मी बसलेली पाहिजे उभी नाही. तिच्या दोन्ही बाजूला हत्ती असतात तिला गज लक्ष्मी असे म्हणतात. 

आपल्या पंचायतनयुक्त देव्हाऱ्यात गजलक्ष्मी मातेचा फोटो ठेवायचा आहे. आणि फोटोच्या वरती तुम्हाला हे  सिद्ध श्री लक्ष्मी कुबेर यंत्र लावायचे आहे. ज्यांच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा फोटो जरी नसला तरी काही हरकत नाही त्या ठिकाणी हे यंत्र ठेवले तरी चालते. लक्ष्मी मातेचा फोटो जर असला तर त्याचा प्रभाव अधिक चांगला पडतो आणि ह्या सिद्ध श्री लक्ष्मी कुबेर यंत्रासोबत तुम्हाला सिद्ध श्री लक्ष्मी कुबेर अत्तर हे तुम्हाला घ्यावे लागणार आहे. तुम्हाला हे अत्तर सिद्ध श्री लक्ष्मी कुबेर यंत्रासोबतच देव्हाऱ्यात ठेवायचे आहेत.  

सिद्ध श्री लक्ष्मी कुबेर यंत्राला तुम्हाला देव्हाऱ्यात ठेवायचे आहे रोज सकाळी उठल्यावर स्नानादी कर्म उरकल्यावर शुचिर्भूत झाल्यावर “ओम काळभैरवाय नमः” “श्री स्वामी समर्थ” हा जप करायचा आहे आणि आजीवन साधकांनी त्यांना दिलेला जप करायचा आहे.


सकाळी अंघोळ दिवा - बत्ती वगैरे झाली की सगळ्यात पहिलं “ओम काळभैरवाय नमः” “श्री स्वामी समर्थ” मंत्राचा जप एक माळ करायचा आहे. ऊबंटुच्या वेळेत जर जप केला तर आणखी उपयोग होईल. जर तुम्हाला शक्य नसल्यास तुमच्या दैनंदिन पुजेच्या वेळेनुसार जप करू शकता. पुजा विधी सुरु करण्याआधी अनामिकेवर अत्तर घ्यायचे आहे आणि सिद्ध श्री लक्ष्मी कुबेर यंत्राच्या मध्य भागी लावायचे आहे. तसेच बाजुच्या चिन्हांकित भागावर देखील मध्यभागी लावायचे आहे. अत्तर लावल्यावर अगरबत्तीने ओवाळायचे  आहे. सुगंध दरवळण्यासाठी लक्ष्मी मातेच्या फोटोच्या वरती सिद्ध श्री लक्ष्मी कुबेर यंत्रा जवळ ती अगरबत्ती लावायची आहे. तसेच पुन्हा अत्तराचे काही थेंब अनामिकेवर घ्यायचे आहेत ते देव्हारातल्या शंखावर देखील लावायचे आहे घरातील महिला आणि पुरुष मंडळींनी पंचायतन देव्हारा मधला जो शंख आहे त्या शंखाला हे अत्तर लावायचे आहे .


दुसरी गोष्ट अनामिकेने जरी अत्तर लावले तरी मधल्या बोटावर सिद्ध अत्तराचे काही थेंब घ्यायचे आहेत आणि ते तळहातावर असलेल्या शुक्राच्या उंचवट्यावर लावायचे आहे आणि शुक्र उंचवट्यावरती तुम्हाला बोट ठेऊन “ओम काळभैरवाय नमः” “श्री स्वामी समर्थ” जप करायचा आहे. अश्या पद्धतीने जप केल्यास तुम्हाला  सिद्ध श्री लक्ष्मी कुबेर यंत्राची ताकद प्राप्त होईल. सिद्ध श्री लक्ष्मी कुबेर यंत्रातून देवतेचे आवाहन होते आणि ती देवता तुमचा बिघडलेला शुक्र सुधारते त्यामुळे धनाकर्षणाचे योग जुळून येतात.

हे सिद्ध श्री लक्ष्मी कुबेर यंत्र दोन पद्धतीने तयार केलेले आहे भोजपत्रावर आणि गोल्ड प्लेटेड पत्र्यावर देखील कोरलेले आहे. गोल्ड प्लेटेड यंत्र रचना ही भोजपत्रा पेक्षा जास्त प्रभावी आहे. भोजपत्रा वरील सिद्ध श्री लक्ष्मी कुबेर यंत्राची वैधता एक वर्षा पर्यंत आहे आणि गोल्ड प्लेटेड यंत्राची वैधता दोन वर्षा पर्यंत आहे. हे सिद्ध श्री लक्ष्मी कुबेर अत्तर शौक ची वस्तु नाही हे अत्तर पुजनीय आहे. भगवती आणि देवतांच्या पुजनासाठी हे अत्तर आहे. त्यांचा सन्मान होणं अनिवार्य आहे. लहान मुलांना लावायचे नाही. बाहेर जाताना अंगाला लावून जायचे नाही. जर तुमच्या बोटाला हाताला लागलेलं अत्तर तुम्ही तुमच्या कपड्यांना लावायचे आहे. सोयरे, सुतक, मासिक धर्माचे पालन करायचे आहे. रजस्वाला स्त्रीची सावली देव्हाऱ्यावर पडता कामा नये. पडदा लावण्याचा प्रबंध करणे गरजेचे आहे.

ह्या सिद्ध श्री लक्ष्मी कुबेर यंत्राच्या पुजनातून महाराजांना प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून इथे लक्ष्मी स्वयं सिद्ध आहे. “ओम काळभैरवाय नमः” “श्री स्वामी समर्थ” ह्या मंत्रातून तुम्ही लक्ष्मी मातेचे आवाहन जर केले तर अतिशय वेगाने आणि सद्गुरू कृपेला अनुसरून तुमच्या समोर येऊन ती उभी राहणार आहे. ह्या एकाच साधनेतुन तुम्ही महाराजांच्या पायी एकनिष्ठ रहाल आणि तुमची अडली नडलेली कामं आहेत आर्थिक जी कामं आहेत ती सुद्धा सिद्ध श्री लक्ष्मी कुबेर यंत्राच्या माध्यमातुन मार्गी लागतील आणि महाराजांच्या इच्छेने आणि तुमच्या कृपेने तुम्हाला तुमच्या जीवनाला उच्च शिखरावर आणता येईल. 

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...


Post a Comment

0 Comments

0